सभ्यतेची अभिरूची : नागपुरी तडका
छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
चॅनल पाहावं कोणतंय तं उघडेबंब नाचते
टीव्ही पाह्यतांना पोरासंग, मायबाप लाजते
सभ्यतेची अभिरूची लईच दिसते न्यारी
अब्रू गेली ढोड्यात अन नोट झाली प्यारी
आता उघडं काय, झाकलं काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
जलश्यातल्या पोरी कशा टगरबगर पाहे
चार लोकामंधी मात्र झाकूनझुकून राहे
जे काही करे ते अंधारात करे
उजेडात मात्र इज्जतीले मरे
आता उजेड काय, अंधार काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
कालेजचे तोतामैना वर्गात नाय दिसत
आडमार्गी झाडाखाली बसते दात किसत
जनाची लाज ना मनाले खंत
खुलेआम प्रेमलीला, नाही त्याले अंत
आता दिवस काय, रात्र काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात
बिनावार्यानं झुडपं तिथं, खल-खल हालतात
झुडपाच्या आडोशाला दोन पाखरं बसते
"प्रेम" या शब्दाचे धिंडवडे नुसते
आता भय काय, अभय काय, सारखंच झालं
हात्तीच्या बैनमाय भलतंच झालं ...... !!
. गंगाधर मुटे
------------....--------------....--------------
..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा..
------------....--------------....--------------
प्रतिक्रिया
27 Jul 2010 - 1:35 pm | निखिल देशपांडे
हा हा हा
खरयं..
27 Jul 2010 - 3:51 pm | शुचि
भाषा काय लाजवाब जमून आलीये. मला खूप आवडली ही कविता.
27 Jul 2010 - 4:00 pm | मितभाषी
हात्तीच्या बैनमाय,
गंगाधरराव तुमीतं भल्लेच झामल झामल करुन र्हायले वं भाउ. शेती वावर सोळुन कालीजात घुमुन र्हाइले. =)) =))
जोक्स अपार्ट, खास वर्हाडी शैलीत तुमचा अधिकार उच्च आहे. एकदम झक्कास. वर्हाडी झटका. :)
27 Jul 2010 - 4:58 pm | इंटरनेटस्नेही
छान! पुलेशु!
27 Jul 2010 - 5:36 pm | बहुगुणी
नागपूरी तडक्याचा चांगलाच ठसका बसला! मस्त जमलंय!
27 Jul 2010 - 7:29 pm | गंगाधर मुटे
प्रतिसाद वाचुन भारावलो.
सर्वांचा आभारी आहे.
27 Jul 2010 - 8:05 pm | चतुरंग
नाग्पुरी तडका जोरदार! :)
27 Jul 2010 - 11:47 pm | शेखर काळे
गंगाधर भौ .. जमून गेलं बावा तुमाले !
14 Jan 2011 - 1:02 pm | गंगाधर मुटे
चतुरंगजी, शेखरजी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
मी कविता लिहितांना नागपुरी भाषेचा लहजा आणि काही विशेष नागपुरी/वर्हाडी शब्द कवितेत वापरण्यासाठी तद्वतच काही चुकिच्या पायंड्यावर थोडेसे घाव घालण्यासाठी नागपुरी-तडका या नावाने कविता लिहीतो आहे.
पण या प्रकारात मी अंशतः नागपुरी भाषेचा लहजा आणि काही खास वैशिष्ठ्य असलेले शब्द वापरतो.
निर्भेळ नागपुरी भाषेचा/वर्हाडी भाषेचा वापर करीत नाही.
या कवितांना मी " नागपुरी तडका " असे नांव दिले आहे.
या प्रकारात मी आतापर्यंत खालील रचना केल्या आहेत.
१) नाकानं कांदे सोलतोस किती? : नागपुरी तडका
२) खाया उठली महागाई : नागपुरी तडका
३) कुठे बुडाला चरखा? : नागपुरी तडका
४) विदर्भाचा उन्हाळा : नागपुरी चटका
५) धकव रं श्यामराव - नागपुरी फ़टका
६) चापलूस चमचा : नागपुरी तडका
७) लकस-फ़कस : नागपुरी तडका
८) बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका
९) खरुज : नागपुरी तडका
......................................................
आपणास त्या येथे पाहता येतील.-नागपुरी तडका
28 Jul 2010 - 9:32 am | Pain
मस्त
2 Aug 2010 - 6:36 pm | गंगाधर मुटे
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
2 Aug 2010 - 6:42 pm | मदनबाण
सुंदर कविता... :)
14 Jan 2011 - 1:08 pm | गंगाधर मुटे
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
आपणास सर्व "नागपुरी तडका" या प्रकारातील रचना येथे वाचायला मिळतील.
------------....--------------....----------...------------
..ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा..
------------....--------------....----------...------------
.....................................
MP3 ऑडियो फ़ॉरमॅट मध्ये
पाहीजे असल्यास कृपया ई-मेल करा.
ई-मेलद्वारे MP3 कविता पाठवली जाईल.
E-Mail : ranmewa@gmail.com
.......................................
14 Jan 2011 - 1:16 pm | विनायक बेलापुरे
जे काही करे ते अंधारात करे
उजेडात मात्र इज्जतीले मरे
मस्त
नागपुरी तडक्याचा ठसका लागला.
:)
14 Jan 2011 - 3:36 pm | ५० फक्त
जबरदस्त कविता आणि तडकाही लगेच जाणवला.
अतिशय धन्यवाद, आणि अशाच सुंदर सुंदर कविता लिहित राहा.
हर्षद.
14 Jan 2011 - 9:44 pm | अविनाशकुलकर्णी
खुप सुंदर कविता गंगाधर राव..मजा आली वाचताना
14 Jan 2011 - 10:31 pm | नावातकायआहे
लै मजा आली वाचताना
14 Jan 2011 - 10:33 pm | नावातकायआहे
लै मजा आली वाचताना
9 Feb 2013 - 8:11 am | शुचि
तडका वर आणते आहे.
10 Feb 2013 - 1:29 am | अविनाशकुलकर्णी
मस्त
10 Feb 2013 - 3:26 am | टवाळ कार्टा
मस्त
10 Feb 2013 - 11:10 am | संपत
दात कीसणे हा नवीन वाक्यप्रचार कळला. मस्तच तडका.
10 Feb 2013 - 12:06 pm | तिमा
बोम्ली म्हणजे काय, हे न कळल्यामुळे पहिल्या दोन ओळी कळल्या नाहीत.
8 Jan 2015 - 8:55 pm | चिगो
बोम्ली म्हंजे बेंबी..
10 Jan 2015 - 6:21 pm | विवेकपटाईत
वाचताना मजा आली. सोळा-सतरावर्षांपूर्वीची गोष्ट हिवाळ्याचे दिवस होते, मुलांसोबत चिड़ियाघर बघायला गेलो होतो. त्या वेळी मुलगा ४-५ वर्षांचा असेल. दिल्लीच्या चिड़ियाघर मध्ये, मध्यवर्ती भागेत एक बदकांनी आणि अनेक विदेशी जल पक्ष्यांनी भरलेले सरोवर आहे, आणि समोर विस्तीर्ण बगीचा. जमिनी वर सतरंजी पसरवून, पक्ष्यांना बघत घरून आणलेले जेवणाच्या पदार्थांचा आस्वाद घेत होतो. मुलाला 'सु सु' आली होती, त्याने विचारले बाबा, कुठे जाऊ. समोर काही झुडपे दिसत होती, मी म्हणालो, तिथे जाऊन उरकून ये. मुलगा तिथे गेला, आणि अचानक दचकून ओरडला. त्या झुड्प्यांचा खाली उतार होता. तिथे एक 'जोड' बसलेला होता. वरून 'पाउस' पडताच ते दचकून उठले.... हासता, हासता डोळ्यांतून पाणी निघाले. असो. जिथे पोरबाळे घेऊन कुटुंब चिड़ियाघर बघायला येतात. तिथे असले प्रकार... काय म्हणावे ...