(घट डोईवर घट कमरेवर)

मेघवेडा's picture
मेघवेडा in जे न देखे रवी...
5 Jan 2011 - 3:29 pm

पुन्हा एकदा पी. सावळाराम यांची माफी मागून,

घट सगळे धर चल सखये, नळ मोरीमधला बंद झाला, बंद झाला रे ॥धृ.॥

धुणि कशि होतील, अर्धीच र्‍हातील,
जो तो आता रांगही लावील
सर्व कुळाच्या संडासाला, बंद झाला रे, बंद झाला रे ॥१॥

बघ तो वरचा भट शिंदळिचा,
कितके घट तो आणि एकटा
मध्येच लायनित तो घुसला रे, बंद झाला रे बंद झाला रे ॥२॥

नेलीस जोडी, भरे तेवढी
तोवर करतो जिन्यात कोंडी
छकुली तूही धर हा पेला, बंद झाला रे, बंद झाला रे ॥३॥

मूळ गीत : घट डोईवर घट कमरेवर

हास्यकविताविडंबन

प्रतिक्रिया

हॅ हॅ हॅ

शिंच्या , विडम्बने बरी करतोस रे

नेहमीप्रमाणेच चान चान !!!

यशोधरा's picture

5 Jan 2011 - 4:10 pm | यशोधरा

=))

मेव्या लेका, सुडौल कंबरा बघायचं वय तुझं अन संडासाच्या लायनींची कसली काळजी रे तुला? ;-)

(मेव्याचा शिनीयर)

यहीच बोलताय.....
वाया गेला राव हा मेव्या.... ;)

प्रीत-मोहर's picture

5 Jan 2011 - 4:31 pm | प्रीत-मोहर

=))

मेवे..मस्त्..धमाल आवडेश..

गवि's picture

5 Jan 2011 - 4:35 pm | गवि

डबल म्हणून प्र का टा आ..

नंदन's picture

5 Jan 2011 - 4:43 pm | नंदन

चालीवर (आणि चाळीवर) फिट्ट बसणारे विडंबन :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Jan 2011 - 11:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा ...

फक्त पिदाड विडंबन नसल्यामुळे पी.मेवाराम म्हणता नाही येणार.

निखिल देशपांडे's picture

5 Jan 2011 - 4:50 pm | निखिल देशपांडे

हम्म्म

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jan 2011 - 5:20 pm | परिकथेतील राजकुमार

हा हा हा भारीच !

मितान's picture

5 Jan 2011 - 6:23 pm | मितान

पर्फेक्टो !!!!

=)) =))

अवलिया's picture

5 Jan 2011 - 6:23 pm | अवलिया

=))

केशवसुमार's picture

5 Jan 2011 - 6:37 pm | केशवसुमार

मेवेशेठ,
मस्त विडंबन..
(वाचक)केशवसुमार
आम्हाला आमच्या घट पोटावर घट कमरेवर...
ह्या विडंबनाची आठवण झाली..
(स्मरणशील)केशवसुमार

पैसा's picture

5 Jan 2011 - 7:38 pm | पैसा

आता अधिकृतपणे तुझं नाव व्ही. मेवाराम करण्यात येत आहे!
(पण असा चाळीत हिंडत राहिलास तर 'मदनाच्या मंजिर्‍या' कुठे भेटतील?)

यशोधरा's picture

5 Jan 2011 - 7:39 pm | यशोधरा

व्ही. मेवाराम =))

प्राजु's picture

5 Jan 2011 - 8:51 pm | प्राजु

मस्तच! :)

नेहमी आनंदी's picture

5 Jan 2011 - 11:04 pm | नेहमी आनंदी

आमच्या लहानपणी आम्ही भट डोईवर भट कमरेवर असे म्हणत असु

असुर's picture

7 Jan 2011 - 5:05 am | असुर

जमलंय अगदी!!! चाल आणि चाळ दोन्हीही !!!
चालीवरच्या सगळ्या हरकती आणि चाळीतल्या सगळ्या कसरती बारकाईने टिपल्याबद्दल अभिनंदन!!! :-)

--असुर

राजेश घासकडवी's picture

9 Jan 2011 - 6:56 am | राजेश घासकडवी

छान विडंबन. अजून येऊ द्यात. हा नळ बंद होऊ देऊ नका.

विनायक बेलापुरे's picture

9 Jan 2011 - 7:12 am | विनायक बेलापुरे

=))
=))