२०११ चं पहिलं सुर्य दर्शन.

५० फक्त's picture
५० फक्त in कलादालन
1 Jan 2011 - 11:03 pm

आपणां सर्वांना २०११ या नविन वर्षाच्या अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा.

आज सकाळी लवकर उठुन या वर्षाच्या पहिल्या सुर्याचे काही फोटो काढले, म्ह्यणले आज आपल्यापॅकी बरेच जणांना हि प्रथम सुर्यदर्शनाची संधी मिळाली नसेल, म्हणुन ते फोटो येथे टाकत आहे.



त्याच वेळेला शेजारच्या इमारतीवर काही पोपट पोपट्चाळे करित होते, ते पण टिपले आहेत. त्यांच्या बोलण्यावरुन त्यांना हा स्पॉट स्वस्त मिळाला आहे, तिथे आधि राहणा-या कबुतरांकडुन असे समजले.

धन्यवाद,

हर्षद.

मौजमजाछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

किल्लेदार's picture

1 Jan 2011 - 11:08 pm | किल्लेदार

छान कन्सेप्ट आहे !!!!

रेवती's picture

1 Jan 2011 - 11:48 pm | रेवती

आम्हाला सूर्यदर्शन घडवल्याबद्दल आभार.
पोपटांचे फोटूही चांगले आलेत.

टारझन's picture

2 Jan 2011 - 12:26 am | टारझन

वाह !! २०११ च्या पहिल्या सुर्याची बातंच काही और आहे ... २०१० च्या सुर्यात काही राम नव्हता असे आमचे आधीपासुनंच मत होते. एकदम वेगळा आणि ताजातवाणा दिसतोय सुर्य .

मजा आली फोटु पाहुन. पोपटांच्या करामतीदेखील चित्ताकर्षक आहे.
धन्यवाद धागाकर्ते.

- (कलाबाज पोपट) सुर्यकांत

उल्हास's picture

2 Jan 2011 - 9:38 am | उल्हास

छान आहेत फोटो

अवांतर :- पार्टिनंतर रात्रभर जागेच होता काय ( ह. घे.)

यशोधरा's picture

2 Jan 2011 - 10:54 am | यशोधरा

पहिला फोटो भारी आहे, मस्त

डान्रावांनी पाहिला का हा फटु?

मुलूखावेगळी's picture

3 Jan 2011 - 6:37 pm | मुलूखावेगळी

हर्षद,
छान आले आहेत फोटो
सुर्योदय आनि पोपट २हीचे पन

डान्रावांनी पाहिला का हा फटु?
>>> असेच म्हन्ते

छोटा डॉन's picture

5 Jan 2011 - 6:20 pm | छोटा डॉन

>>डान्रावांनी पाहिला का हा फटु?

पाहिला हो पाहिला !

छानच आहे फोटो आणि सुर्योदय वगैरे, आवर्जुन आम्हाला हे सर्व दाखवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सर्वांचे आभार :)

- छोटा डॉन

विनायक बेलापुरे's picture

2 Jan 2011 - 1:30 pm | विनायक बेलापुरे

छान फोटू आलेत २०११ च्या पहिल्या सूर्याचे. आणि पोपटचाळ्यांचे पण (त्यांची पण चांगलीच रंगलेली दिसतेय ३१ ची )

चिंतामणी's picture

3 Jan 2011 - 6:52 pm | चिंतामणी

आपल्यापॅकी बरेच जणांना हि प्रथम सुर्यदर्शनाची संधी मिळाली नसेल, म्हणुन ते फोटो येथे टाकत आहे.

जाता हा टोला का मारला?

आमोद शिंदे's picture

4 Jan 2011 - 2:30 am | आमोद शिंदे

ह्यात टोला काय आहे?

फोटो चांगले आलेत बरं का! फक्त जर त्यातून बिल्डींगचा भाग काढता आला असता तर आणखी छान दिसले असते (हे माझं मत)
मी सुद्धा सूर्योदय बघण्यासाठी लवकर उठण्याचा प्लॅन बनवला होता पण माझा पोपट झाला ;-)

५० फक्त's picture

3 Jan 2011 - 10:28 pm | ५० फक्त

आज सकाळी मुलाला शाळेत सोडायुला गेलो तेंव्हा चक्क सुर्य शुभ्र पांढरा दिसत होता, पण माझ्याकडे कॅमेरा नव्हता. उद्या रिपिट शो असेल तर काढेन आणि येथे टाकेनच.

सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद आणि वाचनमात्रांना फक्त धन्यवाद.

हर्षद

सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद आणि फक्त पेक्षकवर्गाला धन्यवाद.

येत्या २-३ दिवसांत सुर्याचे अजुन काही फोटो काढेन, ते सुद्धा टाकेन येथे.

धन्यवाद

हर्षद.

आत्मशून्य's picture

5 Jan 2011 - 12:27 am | आत्मशून्य

वाटले होते थोडे नीसर्गरम्य ठीकाणचे फोटो असतील, हे काय सींमेंटच्या जंगलातील ?

येत्या २-३ दिवसांत सुर्याचे अजुन काही फोटो काढेन, ते सुद्धा टाकेन येथे.

ह्म्म नवीन कॅमेरा घेतलेला दीसतोय, २-३ दिवसांत सुर्याचे अजुन काही फोटो काढणार आहात म्हणून शंका ? कोणती कंपनी आहे ? कीतीला पडला ?

कॅमेरा तसा जुनाच आहे, फुजी एस १८०० , पुण्यात १२००० ला घेतला आहे.

सुर्याच्या फोटोचं म्हणाल तर, या जगात तो एकमेव उर्जास्त्रोत आहे, ज्याच्या मुळं तुम्ही मी आणि सगळं जग चालतं, तोच सगळ्यांचा बाप आहे.

माझ्या दिवसाची सुरुवातच 'तेजोमय निधि लोहगोल ' आणि ' गगन सदन तेजोमय' एकुन होते. दिवसभर कसलं ही टेन्शन राहात नाही, सकाळी सकाळी हा डोस घेतला की.

हर्षद.

गणेशा's picture

5 Jan 2011 - 6:14 pm | गणेशा

छान .. येवुद्या आनखिन