सर्व मिसळपाव वाल्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
आई जगदंबेच्या कृपेने, शेअरबाजार तुफान कोसळून मार्केटची काशी होवो, अशी प्रार्थना.
आपला,
(तेजी-पीडित) धोंडोपंत
आज तरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई जगदंबेने आमचं गार्हाणं ऐकलं म्हणायचं. सोमवार पासूनही अशीच पडझड कायम राहो.....
आई जगदंबे...... या धोंड्याला पाव गं पाव !!!!!
प्रतिक्रिया
12 Oct 2007 - 7:17 pm | लबाड बोका
आज तरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई जगदंबेने आमचं गार्हाणं ऐकलं म्हणायचं. सोमवार पासूनही अशीच पडझड कायम राहो.....
वा धोंडोपंत आमच्या आधीच मागणे मागीतले
माते निफ्ठी ला १० लोट मधे शोर्ट व स्ठोकमध्ये ४ कंपन्यांचे पुठ घेतले कमीत कमी ४०० पोइठ उतरु दे
बोक्का
13 Oct 2007 - 8:38 am | विसोबा खेचर
फ्युचर्स आणि कॉल पुट मध्ये काम करायचं असेल तर माझ्याकडे कर. मार्जिन घेणार नाही आणि ब्रोकरेज एकदम कमी लावीन.. :)
व्य नि पाठव किंवा फोन कर...
तात्या.
९८२०४९४७२०
13 Oct 2007 - 6:53 pm | लबाड बोका
तात्या
धन्यवाद
माझी कंपनी ब्रोकिंगचेच काम करते
दलाल बोका
15 Oct 2007 - 3:27 pm | आवडाबाई
मग आम्हाला पण द्या की टिप्स
चला, नक्की केव्हा शॉर्ट करायचं ह्याचा तरी (रिवाईज्ड) अंदाज द्या बरं
15 Oct 2007 - 3:24 pm | आवडाबाई
पण आई जगदंबेने आपलं गार्हाणं काही फारसं सिरियसली नाही घेतलेलं दिसत !! :-(((
आम्हीही शॉर्ट करण्याच्या योग्य वेळेच्या प्रतिक्षेत, तो पर्यंत लाँगच, त्यामुळे आम्ही खुष !!
15 Oct 2007 - 4:43 pm | धोंडोपंत
एवढं गार्हाणं घालून मार्केट खाली नाही आलं तर त्यात आमची नाही "आई"ची बदनामी आहे.
आई जगदंबे !!!!!! तुझी अब्रू तूच सांभाळ.
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
16 Oct 2007 - 11:32 am | धोंडोपंत
आवडाबाई,
आई पावते की काय? मार्केट डाऊन आहे.
आपला,
(मंदीवाला) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
16 Oct 2007 - 2:37 pm | आवडाबाई
मार्केट डाऊन आहे.
आईची अब्रू राखण्यापुरतं खाली गेलं हो, पण परत येतय वाटते मुळ पदावर !
आज तर मार्केट पासून लांबच आहे आपण!!
16 Oct 2007 - 2:42 pm | प्रमोद देव
आईची अब्रू राखण्यापुरतं खाली गेलं हो,
बाजार खाली जावा म्हणून जसे आईला साकडे घालणारे आहेत तसे बाजार अजून वर जाऊ दे असे साकडे घालणारेही आहेतच ना! मग उगीच आईला कशाला गोवता. जी काही अब्रू जायची असेल ती भक्तांची जाईल. आईसाठी सगळेच सारखे नाही का!
16 Oct 2007 - 7:18 pm | आवडाबाई
बाजार अजून वर जाऊ दे असे साकडे घालणारेही आहेतच ना
आम्हीच आहोत की ! आमची अब्रू (आणि पैसा) वाचवला आईने !
17 Oct 2007 - 11:31 am | आवडाबाई
मंदीवाल्यांची चांदी !!
बोक्याची पांचो उंगलियां घी में और सर कढाई में !!
चलो, किसी का तो भला हुवा
आम्ही अजूनही लांबच !
17 Oct 2007 - 11:45 am | लबाड बोका
मंदीवाल्यांची चांदी !!
अहो चांदीच काय सोने प्लेटिनम युरेनिय्म हिरे जड जवाहीर वाटेल ते म्हणा
दिड महीना आधीच दिवाळी !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ढिंग चांग ढिचांग
ढिंग चांग ढिचांग
ढिंग चांग ढिचांग
ढिंग चांग ढिचांग
(नोटा मोजण्यात गर्क )बोका
17 Oct 2007 - 11:57 am | सहज
आता जर मुद्याच बोलतो.
जमल्यास तुम्ही हे फ्युचर्स आणि कॉल पुट का मंदीवाल्यांची चांदी का शॉर्ट नक्की काय केलेत. नॉर्मल शेअर्स घेणे, विकणे पेक्षा हे वेगळे कसे.
जे जरा थोडक्यात समजावलेत तर ही जरा "चर्चा"म्हणण्यालायक होईल.
कृपया सोदाहरण सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन.
धन्यवाद
17 Oct 2007 - 7:25 pm | लबाड बोका
सहजराव
Derivatives, options, futures हे सर्च करुन पाहिले असता तुम्हाला भरपुर साहित्य मिळेल
मुळात हे सर्ब ENGLISH मध्ये वाचणे व समजुन घेणे सोपे जाईल
मराठीत पर्यायी शब्द सहज समजण्यासारखे नसल्यामुळे व या सर्व गोष्टी मी मुळात ENGLISH मध्ये व माझ्या गुजराथी मित्राकडुन गुजराथीत समजुन घेतल्याने ती मराठीत लगेच सांगता यैणार नाही
तरी मी एखादा लेख फावल्या वेळात लिहीण्याचा प्रयत्न करीन
तोपर्यत गुगल जिंदाबाद
बोका
12 Oct 2007 - 10:23 pm | विकास
शक्ती देवीची साडे तीन पिठे आहेत आणि त्यातील अर्धे पिठ हे महाराष्ट्रातील संप्तश्रृंगीचे आहे असे आत्ताच सकाळ मधे वाचले. इतर तीन पिठे कोणची? त्या संदर्भात काही माहीती कुणास आहे का?
12 Oct 2007 - 11:50 pm | प्रियाली
विकिवरील दुव्यावरून ५१ शक्ती पीठे माहित आहेत. पुराणांनुसार ती १०८ असल्याचेही सांगितले जाते. शिवपत्नी सतीच्या प्रेताचे तुकडे जेथे जेथे पडले तेथे ही शक्तीपीठे निर्माण झाल्याचे सांगतात. ती संपूर्ण भारतवर्षात आणि श्रीलंका, तिबेट इ. ठीकाणीही आहेत.
सती ही आदिशक्ती मानली जाते. (पार्वती हा सतीचा पुनर्जन्म) तिच्या प्रेतांच्या तुकड्यांचे रक्षण करायला शिव भैरव स्वरुपात हजर असतो. ज्या ठीकाणी हे दोन्ही देव आढळतात त्यांना शक्तीपीठ असे म्हणतात. आजच मला उपक्रमावर चाणक्यांनी सकाळमधील चक्रेश्वरवाडीतील एका पुरातन आणि दुर्लक्षित मंदिराची माहिती पाठवली होती. त्या मंदिरात देवीसह अनेक भैरव मूर्ती असल्याबद्दल लिहिले आहे, पर्यायाने ते उपेक्षित का होईना पण शक्तीपीठ आहे.
महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूरच्या मंदिरातही भैरव मूर्ती असाव्यातच कारण ते एक शक्तीपीठ. तुळजापूर आणि माहूर ही बाकीची दोन.
पण अर्धे पीठ म्हणजे काय ते माहित नाही. :(
13 Oct 2007 - 7:51 am | सहज
>>शिवपत्नी सतीच्या प्रेताचे तुकडे जेथे जेथे पडले, तिच्या प्रेतांच्या तुकड्यांचे रक्षण करायला शिव भैरव स्वरुपात हजर असतो.
उगाच आपण जुने हिंदी /तामीळ पिक्चर भडक असतात म्हणतो. हे पुराण काही कमी आहे का? एका धार्मीक घरी जर का मुलांनी देवीचे "अमूक अमूक अंग "(श्लेश) कुठे पडले विचारले तर मुस्काटात मिळेल की नाही?
जेव्हा पार्वतीने गणपती "बनवला" काय वय होते बर त्या बाल गणेशाचे? कारण वध करावा असे शिवगणांना वाटले एवढा मोठातर असावा ना? बहूतेक शिवगण बायो कौन्सीलची मान्यता नव्हती तसेच ऑफीशीयल पेपेरस (नो आय. डी. / पॅन / फॅमीली प्रुफ / ऍड्रेस / डि. एन. ए. मॅचींग टू यू नो हू. कार्ल रोव्ह ऑह शिवप्रभू ऍडमिनीस्ट्रेशन, मस्ट हॅव ऐक्टेड ऑन हीज ओन, थींकींग इट इज हीज जॉब ऑर परहॅप्स टेस्ट बाय द एम्प्लॉयर. वरिष्ठांचे प्रकरण दाबणे चे हे बरेच जुने उदाहरण. हिमालय स्टेट्स मधे. हे शिवगण नंतर बिहार, यू.पी. मधे स्थाईक होऊन राजकारणाच्या परंपरा तर चालवत नाही ना?) नव्हते म्हणून डीस्ट्रॉय द इललीगल स्पेसीमेन, सो व्हाट फाउंड ऐट चेयरमन्स पॅलेस, इट कूड बी एलियन. नंतर असे प्रयोग काही कोणी बनवले नाही वाटत.
सध्या देव इ. आजच्या जगात आहे असे कोणी "मानत" नाही मग सध्या भारतात / हिंदू धर्मात ऑलमोस्ट टॉपची मंडळी कोण म्हणायची? उद्या अश्या एक पोहोचलेल्याने माझ्या शरिराचे अमुक तमुक तुकडे करा व इकडे इकडे नेउन पीठे करा म्हणले तर आपली सर्वांची काय प्रतिक्रीया असेल?
नो डिसरिस्पेक्ट पण हे सगळ किती पचवायच? त्यातून अश्या दैवी देवीच्या भारतात, बहुसंख्य स्त्रीयांची परिस्थीती फक्त प्रा. डॉ.च जाणे. ;-)
पुरातन काळी भारत बायोटेक हब होता का? बरीच जैवसंशोधन चालायची. आता कळले वैज्ञानिक धनंजय महाराजांना संस्कृत मधे एवढा रस का?
आज नवरात्रीच्या निमित्ताने मला विचारावेसे वाटते की तुम्ही ही सगळी पुराण "माहीती" (प्रेत तुकडे, मळापासून माणूस) म्हणून लक्षात ठेवता का मनापासून मानता? म्हणजे ह्या सगळ्याला माहीतीला कधी कोणी "फिल्टर" लावणार की असेच आपण पुढच्या पिढीला हीच अशीच माहीती फीड करणार?
का कोण जाणे मला नमूद करावेसे वाटते की मी नास्तीक नाही. माझा काही छुपा अजेंडा नाही. अमुक एक धर्म चांगला, अमुक वाईट किंवा सगळे वाईट असेही म्हणायचे नाही. मी परफेक्ट किंवा मला सगळे कळते असे तर अजिबातच नाही.
----------------------------------------------------------------------------------------
बरेच जण म्हणत असतील जाऊ दे ना! सध्यापुरती मला तरी माता सरस्वती व (विशेषता) माता लक्ष्मीची कृपा मिळाली बास.
13 Oct 2007 - 8:35 am | धनंजय
तशी आपली पुराणे पुरुषांनाही या बाबतीत स्थान देतात. शंकराची ज्योतिर्लिंगे कुठे आहेत त्याबद्दल सुद्धा गमतीदार कथा आहे. कामातुर शंकराला मोहिनी पकडता आली नाही; त्यावेळचे तिच्यापाठी धावतानाचे शिंपडलेले रेत जिथे जिथे पडले तिथे तिथे ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे.
अवांतर : मला असे अंधुक आठवते की सतीच्या प्रेताच्या "अमुक अमुक" सर्व अंगांचा हिशोब पुराणांत दिला गेला आहे. त्यामुळे मुलाने नीट (फाजीलपणा न करता) प्रश्न विचारला तर मुस्कटात देऊ नये. तसेच दुर्गा सप्तशतीत दुर्गेची सर्व "अमुक अमुक" अंगे कोणकोणत्या देवाने रचली त्याचा पूर्ण हिशोब लागतो. सर्व अंगाचे वर्णन करणे तर योग्यच आहे. एखादे अंग मुद्दामून उल्लेखातून वगळणे म्हणजे त्या अंगाबद्दल विचित्र बाऊ करणे नाही का?
13 Oct 2007 - 8:48 am | सहज
संस्कृतचा एवढा र्हास कसा. बहुसंख्यांना हे असले वाचणे, बोलणे व त्याहून लहानग्यांनी असले तसले प्रश्र विचारणे मान्य नव्हते. :-)
काही नको संस्कृत बिंस्कृत आम्ही आपले मन्वगतीच वाचू. प्रौढमनावर उगाच बालपरीणाम नको. ह. घ्या. :-)
14 Oct 2007 - 1:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्यातून अश्या दैवी देवीच्या भारतात, बहुसंख्य स्त्रीयांची परिस्थीती फक्त प्रा. डॉ.च जाणे. ;-) खरे तर आम्ही आहोत भोळे देवभक्त, त्यामुळे दिसलं भलं की, माणूस असो की देव, आम्ही माथा कधी टेकतो ते आम्हालाही कळत नाही !देव आणि देव्यांच्या बाबतीत तर आम्ही फार श्रद्धाळू, तुळ्जापूरची देवी, वणीची देवी, आम्ही तिथे नतमस्तक होतो.पण आम्हाला एक प्रश्न पडतो की, या सर्व देव्या डोंगरावरच का असतात ? तर जुनी जाणती, टेकलेली माणसं म्हणतात की, गावाच्या रक्षणासाठी त्या उंचावर जाऊन राहतात. अनेक संकटांचा मुकाबला त्या करतात,( स्त्री वादाचे मुळ इथेसापडते, पुरुष असुनसुद्धा गावाच्या रक्षणाची जवाबदारी स्त्री घेते, देव थकून गेले पण देव्यांनी हार मानली नाही.) पण मार्केंडेय पुराणात देवी महात्म्य नावाचा एक भाग आहे म्हणतात, त्यात असे म्हटले आहे की, सात्वीक, लोकांच्या कल्याणासाठी परमसमर्थ देवी अवतीर्ण होत असते कोणत्या तरी प्रसंगी देवीचे वचन आहे की, " भक्त हो ! मी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहीन. संकटकाळी अनन्यभावाने शरण आल्यास मी प्रगट होऊन तुम्हास दुख:मुक्त करीन. प्रत्येक आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवस घट, पूजा, होमहवन, वगैरे प्रकारांनी माझे पुजन करावे, जो अचल निष्ठा ठेऊन जे माझी करुणा भाकतील त्यांच्या सुखासाठी मी सदैव जपत राहीन. या वरुन नवरात्र पाळण्याची प्रथा रुढ झाली असावी, त्याही पेक्षा सर्व जातीच्या लोकांचा हा उत्सव आहे,जसे जमेल तसे विधीची परवानगी आहे, आणि आनंदाचा कळस म्हणजे, मद्यमांसार्पणयुक्त पुजा विधीही चालत असल्यामुळे हा उत्सव आम्हाला फार जवळचा वाटतो........! :)बोलो दुर्गा मात्ता की जय !
अनन्याभावाने देवीला शरण गेलेला !
प्रा.डॊ.दिलीप बिरुटे
अक्षररंग योजना :- गमभन च्या सौजन्याने !
15 Oct 2007 - 8:54 am | टग्या (not verified)
काठमांडूच्या गुह्येश्वरीची ष्टोरी एक्झॅक्टली हीच आहे. स्थानिक लोकांना हे सांगण्याची काहीही लाज वाटत नाही. फक्त वर्णन करताना 'ढुंगण' असं स्पष्टपणे न म्हणता 'इंटर्नल ऑर्गन्स' वगैरे जरा 'सभ्य' यूफिमिस्टिक भाषा वापरतात, इतकंच. पण मूळ फॅक्टची कोणाला लाज वाटत नाही. (तसं लाज वाटण्यासारखं काय आहे म्हणा त्यात - प्रत्येकाला असतं! देवी झाली म्हणून काय झालं?)
12 Oct 2007 - 11:01 pm | विकास
'महा'भोंडला!
(मूळ वृत्त)
- मनीषा नित्सुरे
भोंडला हा आता इव्हेन्ट होऊ लागलाय. गच्ची, मैदानं, हॉल भोंडल्यासाठी 'बुक' होऊ लागले आहेत. काही ठिकाणी खऱ्या हत्तीभोवती फेर धरला जातोय तर काही ठिकाणी हत्तीची भव्य प्रतिकृती उभारण्यात येतेय. एरवी वेस्टर्न किंवा मॉडर्न आऊटफिट्स घालणाऱ्या मुली-बायका मुद्दामहून या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने पारंपरिक पेहराव परिधान करून सहभागी होत आहेत. भोंडल्याचं बजेट दरवषीर् वाढू लागलं असून प्रायोजकही पुढे सरसावतायत.
भोंडल्याचे मेगाइव्हेण्ट आयोजित करणाऱ्या शिवानी जोशी म्हणाल्या, 'मी पाच वर्षांपूवीर् भोंडल्याचे खेळ घ्यायला सुरूवात केली, त्यावेळी प्रचंड मरगळ आली होती. भोंडल्याचे खेळ थांबले होते. मात्र पाच वर्षांत आश्चर्यकारक बदल झाला आणि घरगुती भोंडला सार्वजनिक झाला. आजकाल माणसाच्या आयुष्यात टेन्शन्स, दगदग एवढी वाढलीये की आता त्याला उत्सव साजरे करायला निमित्तं हवीयेत. भोंडला हे एक निमित्त आहे. यानिमित्ताने महिलांना नटायला-सजायला, एकत्र यायला, गुजगोष्टी करायला, खेळायला मिळतं. भोंडला हा अठरापगड जातींत खेळला जाणारा खेळ असल्याने तो वेगाने विस्तारतोय.' ठाण्याच्या सखी-शेजारणी मंडळाच्या लीलाताई जोशी म्हणाल्या, 'यावषीर् अनेक प्रायोजकांनी आपणहून भोंडल्याच्या खेळात बक्षिसं देण्यासाठी पुढाकार घेतलाय. भोंडल्याच्या दिवशी आम्ही खरा हत्ती बोलवणार आहोत. अडीच हजार खिरापतीची पाकिटं वाटणार आहोत. काही गुजराती महिला मंडळांनाही खास या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलंय.' 'संस्कृती'चे संजय वाघुळे म्हणाले, 'जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं, यासाठी ठाण्यात तीन ठिकाणी नाव नोंदणी केंदं उघडलीयेत. याशिवाय राणी गुणाजी आणि नीलम शिकेर् या अभिनेत्रींना पाहुण्या म्हणून आमंत्रित केलंय. महिलांना साड्या, ड्रेस मटेरियल तर लहान मुलींना स्टेशनरीचं साहित्य अशी भरघोस बक्षीसं देणार आहोत. यंदा तिसरं वर्ष असल्याने प्रायोजकही भरपूर मिळाले आहेत.'
भोंडला पुन्हा फेर धरू लागलाय आणि बालिकांपासून ते तरुणींपर्यंत, नववधूपासून साठी ओलांडलेल्या आजीबाईंपर्यंत सगळ्याजणींच्या ओठांवर ऐलमा-पैलमा गणेश देवा, एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू, हातुका मातुका चरणी चातुका, अक्कण माती चिक्कण माती अशी भोंडल्याची गाणी रुळू लागली आहेत. भोंडल्याला सीडी, व्हीसीडी, भोंडल्याच्या गाण्यांची पुस्तकं, प्रसारमाध्यमांकडून मिळणारं पाठबळ या गोष्टी महिलांच्या उत्साहात भर घालतायत. त्यामुळे 'भोंडला मीन्स व्हॉट ममा?' असं विचारल्यावर गोंधळात पडणाऱ्या आणि मनात खंत निर्माण करणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर आजच्या मॉडर्न ममाला आता मिळू लागलंय.
..............................
- शनिवार १३ ऑक्टोबर,
सायं. ५. - घंटाळी मैदान ठाणे. संपर्क २५४३ ७५ ५४
- शनिवार १३ ऑक्टोबर,
सायं. ५.- मराठा मंडळ, केळकर कॉलेज जवळ, मुलुंड (पूर्व), संपर्क ९८२०० ३४६०६
- रविवार १४ ऑक्टोबर,
सायं. ५.३०- उमा-नीळकंठ व्यायाम शाळेचे
पटांगण, नौपाडा, ठाणे. संपर्क - ९८६९२ ७०१५३
सायं. ७. - राजेंद नगर नवरात्र मंडळाचं पटांगण,
राजेंद नगर, बोरिवली (पूर्व). संपर्क - २८७० ४५१६.
- शनिवार २० ऑक्टोबर,
सायं. ४.- चोगले शाळेचे पटांगण, श्रीकृष्ण नगर,
बोरिवली (पूर्व). ९८२०७ ७२९८४
14 Oct 2007 - 11:47 am | नीलकांत
महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत. तुळजापूरची तुळजाभवानी , कोल्हापूरची महालक्ष्मी, आणि माहूरची रेणुकामाता ही तीन पुर्ण पीठं मानली जातात. तर सप्तश्रुंगीचे पीठ हे अर्धे मानल्या जाते. हे पीठ अर्धे आहे त्याला कारण ही देवी कुमारी आहे असं सांगीतल्या जातं. याबाबत अन्य माहिती नाही.
दक्ष कन्या सती हिने वनात तप करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले, शंकराशी लग्न केले. पण सतीच्या वडीलांना म्हणजेच प्रजापती दक्ष राजाला हे काही आवडले नाही. त्याच्या मते शंकर हा देवच नाही. तर तो स्मशानात राहणारा , दानव, पिशाश्च आदीं सोबत राहणारा रानटी मनुष्य आहे.
दक्षाचे हे असे मत असल्यामुळे श्रीशंकर दक्षासोबत कसलेच संबंध ठेवून नव्हते. एकदा दक्षाने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले होते. तेव्हा सर्व देवादिकांना आमंत्रण होते मात्र शंकराला बोलवने नव्हते. सतीला ह्याचा राग आला आणि शंकराची इच्छा नसतानाही ती आपल्या वडीलांना याचा जाब विचारायला म्हणून गेली. जाताना सोबत म्हणून महादेवाने वीरभद्र व महाकालीला सोबत दिले. यज्ञस्थळी सतीने वडीलांना श्रीशंकराला न बोलवण्याचे कारण विचारले त्यावेळी दक्ष श्रीशंकरांबद्दल वाईट बोलले. सतीने ही आपल्या पतीची निंदा आहे, आणि आपण ती ऐकली हे पाप झाले असं मानून तेथे पेटलेल्या यज्ञात उडी मारून देहांत प्रायश्चित घेतले. मात्र सोबत असलेल्या गणांनी आणि वीरभद्र आदींनी सतीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत सती मृत झाली होती. यांनी यज्ञ उध्वस्त केला, व ही वाईट बातमी शंकराला देण्यास निघाले.
आपल्या प्रिय पत्नीचे कलेवर पाहून शंकर संतापले आणि ते कलेवर दोन्ही हातात घेऊन सर्वत्र संचार करू लागले. सर्वत्र भीती पसरू लागली, व श्रीशंकराला ह्या शोकातून बाहेर काढण्यासाठी श्रीविष्णू यांनी चक्राने सतीच्या कलेवराचे तुकडे केले. हे तुकडे भारतात वेगवेगळ्या ठीकाणी पडले. तेथे तेथे शक्तीपीठांची निर्मीती झाली असं मानतात. त्याच वेळी ब्रम्हाने श्रीशंकराला सांगीतले की सती ही हिमालयाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेईल.
ही शक्तीपीठं वेगवेगळी आहेत. सामान्यत: शाक्तपंथी लोकांसाठी ही खुप महत्वाची आहेत. पण सर्वच हिंदू लोकांचे देवी हे आराध्य असल्याने याशक्तीपीठांकडे ओढाजास्त असतो. काही शक्तीपीठं ही विशेष साधनेसाठी उपयोगाची मानतात. मंत्रसिध्दी हा प्रकार माननारे लोक ह्या शक्तीपीठांच्या ठिकाणी मंत्रसिध्दी करण्यासाठी जातात. कामाख्यादेवी चे (आसाम) क्षेत्र तर आजही शाक्तपंथी लोकांसाठी सर्वोच्चपीठ मानल्या जातं.
(वरील माहिती काहिशी ऐकीव, वाचलेली आहे. )
नीलकांत