गणप्या झाला गम्पति .........
आमच गणप्या आता 18 वर्षाच झालय, रिंगटोन आता चिरकत नाही खनखानित वाज्तुया
१० वी नापास झालान बकुलीच्या नादान , म्हणून सध्या रिकाम टेकड़ हुत!
गणप्याच्या नरसोबा वाडीत गणरायाच जून मंदिर हुत नवसाला पावणारा गंपती म्हणून सर्वांची लैई शरद्धा हुती गणरायावर !
गणप्याच्या अख्या वाडीला मिळून एकच मंडळ होत ढोल ताशे, लेझीम लै धमाल असायची साम्द्याची, मुल लई बिझी असायची धा दिस .काही कामात ,
काही मुलींकड बघण्यात , यंदाच्या वर्षी गनप्याला अध्यक्ष बनविल हुत समद्यांनी ,त्यामुळ गणप्या आधीच तयारीला लागल हुत वर्गणी गोळा करण्यापासून गणपती बुड विन्यापोतूर सर्वे जवाबदारी गनाप्याच्या मंडळावर हुती, गणप्या आन गनाप्याच मंडळ लैई बीजी झाला हुत रातच्याला तीग् बी शेतावर प्लानिंग करायच, यंदा नवीन कायतरी करू गाड्या दर वर्षी त्येच त्येच...
हनाम्या :- काय नवीन करायचं म्हन्तुस ?
गणप्या: शेहरात जश्या स्पर्धा हुतात तसं काही आपुन बी करू ना र!
हनाम्या" :- लै बेस पण काय करायचा म्हन्तुस नक्की ?
गणप्या: " आपुन संगीत खुडची ठिऊ समद्या बायकांची आन पोरींची आन एक नंबरला बक्शिश बी ठिऊ काय ?
हनाम्या:- वा वा लई झाक म्हंजी तुपली बकुळी, आन माही शकी बी येईन ठिव ठिव आजून बी कायतरी ठिव ?
गणप्या: आन बायकांची उखाण स्पर्धा ठिऊ ? आन लहान पोरास्नी लीमू टिंबू स्पर्धा ठिऊ ?
बबन्या:- आन मोठ्या मानासास्नी काय?
हनाम्या:- त्यांना घरीच ठिऊ , लय पीर पीर कार्त्येत त्ये मधीमधी बर, बर, त्येंच बघू काय तरी .
ठरलं गंपती जवळ आले गन्प्याच मित्र मंडळ वर्गणी गोळा करू लागल (कधी पिर्मान तर कधी दम दाटीन )
वर्गणी गोळा करता करत समद्या बायाकास्नी स्पर्धेबद्दल बी सांगितलं आन वरतून बक्शिश हाये म्हणाल्यावर महिलामंडळी लई खुश झाली बघा !रोजच्या रामरगाड्यातून त्येनं बी वेळ नग का?
गणरायाच आगमन ढोल-ताशे लेझीमच्या दणक्यात झालाय, आरतीचं काय ? "जय देव जय देव मंगल मूर्ती हेवडच जमायचं (पुजारी सोडला तरकुणाच्या बा ला येत हुती तवा )
पुजारी आपल नाकातून (गुनगुन) गायच, बाकीचे समदे सुरुवातीला आन एंड ला कोरस नि साथ द्यायचे, जय देव जय देव जाय मंगलमूर्ति ...... मधि सगळ्यांचा आवाज गुडुप , थेट एंड ला च "गणपति बाप्पा मोरया" टाळया मातुर मन लाउन पिटायचे हाँ s s s s अंग आक्षी चालून दया चालून दया .........
आरती जाली ,
प्रसाद वाटला समद्यास्नी! लौड श्पिकार वर सांगितला सांच्याला ७ वाजता पुन्हा यावा आरतीला आज छोट्या मुलांची स्पर्धा हाये ,
झाल सांज्याला, लहान पोरांची लिंबू-टिंबू , बेडूक उड्या, गोणपाट उडी ,समद्या झाल्या काही धडपडली ,काहींच्या ढापर कोपर फुटली ,काही बक्शिश न्हाई मिळाल म्हणून गडबडा फुफाट्यात लोळायला लागली आणि काही आयाबयांचे पोरांवरून बाचबाची बी झाली (असून असून दे लहान पोर हैती ह्येवाढ चालतंय कुठ बी )
त्या रातच्याला गणप्या आन मंडळ हिशेब -
टीशेब करीत बसलं ,जाग बी राहायचा हुत म्हणून पत्ते खेळत बसलाय रातभर ,
पाच सहा दिस आसच मजेत गेले ,पण आज काय? आजच तर स्पर्धा हुती न बायकांची "संगीत खुडची" मुझिक चेयर सम्द्याच्या घरातन चेयर गोळा झाल्यात कुणाची लाल ,कुणाची पिवळी , कुणाची लाकडी तर कुणाची लोखंडी , मोठी- छोटी समद्या खुडच्या आलटून पालटून लावल्या .
समद्या बायकापोरी आन त्येंच्या पोरीबाळी बी आल्यात खेळाय त्येना ह्यो काय खेळ आहे समजता अर्धा- पाऊन तास गेला मंडळांच !
झाला मुझिक सुरु ! हन्म्याच हुता मुझिक चालू बंद कराया
गान "इस्टार्ट "
एक दो तीन .................................दस ग्यारा बार तेरा ............
तेरा करू गिन गिन के गिन....
काही बायांच्या माग त्येंची छोटी लेंढार बी पलात्यत "म्या पण ,आये मी बी खेलतोय "एक जन स्पेशल ठिवलय त्याना पकडून आणून बसवायला
"ईशटाप " झाल्याबारुबर समद्या हुंदडल्या (जश्या काय येस्नात बांधलेल्या म्हशी ),हिकड तिकड खुडची पकडाया ,
३-४ जनी खुड्ची पकडायच्या नादात धापकन पडल्यात (बघणारे फिदीफिदी हसत्यात )
कुणी मधून घुस्तंय कुणी फूड पळून परत माग येतंय, कुणी मागफुड खुडची शोधताय एका खुडचीवर दोन जनी बसल्यात ,म्या पकडलीया म्हणून ,गणप्या म्हणाला आर तुमच्या ........... समद्यांना सांगितलं हाये बायानू कस खेळायचं त्ये ! तवा कालवा नका करू
शेवंता वैंनी व्हा बाजूला ,
खेळ सुरु ,
बकुला आन शकी
दोघिबी हुत्या खेळात, म्हणून हन्म्यान मुद्दाम जुम्मा चुम्मा दे दे...ssss लावील ;)
परत गान इस्टार्ट "!
तश्या सगळ्या लागल्या पळायला कुणी मुद्दामच हळू पळतेय, तर आमची ठमाकाकू त्यास्नी मागून ढूसंन्या देतीय व्हा कि म्होर "आमची बकुळी आन शकी एकदम चंट हाईत ,
कुणाचा स्पीड खुड्ची दिसल्यावर गपकन कमी व्हातुय आन मागची येऊन धड्कातीय परत ,सम्द्यांची नजर फकस्त खुडचीवर,
गान "ईशटाप झाल तसं पुन्हा समद्या बोकाळल्या जिला खुड़ची मिळाली त्या बसल्यान बिगी बिगी ,आन आमची धोंडा बाई पल्तीय आजून बी कुठ गावतीय म्हणून हिकडून तिकड ,
गणप्या :-दमली ?झाला का अजून एक दोन राउंड मारायचं हाये ...
धोंडाबाई चला बाजूला
करा र गान इस्टार्ट "
तोफा,तोफा ,तोफा ,लाया ,लाया ,लाया, जस लावलं तसं
समद्या बिचकाया लागल्या न बुड टेकवायाचा का न्हाई इचार करता करता
अर्ध मूर्ध बुड टेकिवल तर गान
परत तोफा तोफा तोफा तोफा लाया ,लाया ,लाया,............
एय हनम्या ,ssss आर कनच गान हाये का स्वांग? संपलय का चालू हाय कळत न्हाई दुसर लावणा, दुसर लाव कि गान,
हनम्या: बर बर अक्काव !
लावतू
खैके पान बनारसवाला ढींग च्याक ढींग च्याक ढींग च्याक.. ढींग ....................
ईशटाप..
ठमाकाकी पडली फद्कन!, खुडची पकडायच्या नादात!
समद्या खिनकळल्या खी खी .................
बकुळा (लय हौस म्हातारीला ,बर झाल , बुड शेकल चांगल ,लयं ढूसन्या देत हुती कवाधरण!)
अयं सटव्यानो बघू का एकेकीकड ! काय हासन त्ये, आग लागू तुझ्या खेळाला!
देवा ......
प्रेषक मंडळी खुश एकदम ताल्यान, शिट्ट्या वाजवू वाजवू ....
आस करीत करीत तीन जनी उरल्यात ,खुडच्या दोन !
गान चालू "एजी ओजी लोजी सुनोजी
वन टू का फोर - फोर टू कावन ...
बकुला आन शकी बसलीय बद्कन !
आन भांडकुदळ सुमनी ला खुडची न्हाई
सुमी :-अये, बकुळे खुडची तुझ्या बाची हाये का ? मपल्या घरातून आणलीय हुठ "
बकुळा:-" अये सुमने , नीट बोल न्हाईतर .................म्या न्हाय उठणार म्या पकडलीया आधी
सुमी :- न्हाईतर .................काय मला दम देतीया, गावभवाणी कुठची ?
(बकुळीच कानशील गरम झाल्यात )
बकुळा:- अये सटवे, तुझ्या .......................
"तुझ्या मायला चा आन तुझ्या बां ला बटर" थोबाड भिताड एक करून टाकीन तुझ नरसाळे ,टरमाळे
दोगींची झीन्जाझीन्जी व्हायच्या आत
बाकीच्या बाया,हनाम्या ,गणप्या न सोडवा- सोडवी केली आन रिझल्ट लावून टाकला तीगीना बी पैला नंबर !
दुसर्या दिशी उखाण स्पर्धा हुती गनाप्यान आन मंडळान तर धसका घीतला हुता समद्या महिला मंडळीचा ....
हनाम्या:- अय.. भो.. गणप्या, म्या काय म्हणतु " कॅन्साल करायची का र स्पर्धा ......?मला तर आजचज पाहूनच भ्याव वाटतया उंद्याच काय?
गणप्या :" आपुन आस करू जोडीची स्पर्धा ठिऊ मंग भांडान व्हायचं काय कारण हाये ? दोघ बी हैती एकमेकास्नी धराया ........
दुसया दिवशी सांच्याला सर्वे जमल्यात जोडीन ,गणप्या
स्पिकार वर "समद्या जोड्यांनी उखाणा घ्यायचा ,आपले सरपंच साह्येब आन त्येंची मिशेष ठरवतीन ज्येचा बेष्ट ती जोडी जिंकली !
चला जनाबाई करा सुरु ...........
जनाबाई (लाजत-लाजत):- " दारात मोठ आंगण त्येला सारावल शेणान,...
" दारात मोठ आंगण त्येला सारावल शेणान,...
आन भाऊ साहेबांच नाव घेती,.... बघत्यात कस पिरमान.............."
टाळया..........वा व्व्वा वा लय झ्याक ............................
धोंडाबाई ( वा र गडी ,सगळ्या कडच बघतुया पिरमान बोका कुठला )
धोंडाबाई ची बारी :- " पराती त परात चांदीची परात
" पराती त परात चांदीची परात "
रावसाहेब आले पिऊन म्या न्हाई घेतलं त्येंना घरात " (तोंडाला पदर लावून समद्या हसत्यात खी खी खी .....)
कोंडाबाई :- "आमच्या शेतात १० एकर लाविला उस
आमच्या शेतात १० एकर लाविला उस "
आमचे सोपानराव एक नम्बर कंजूस
.......(खडबडून जाग झाल सोपानराव)
(गणप्या हन्म्यसनी हळूच "च्या मारी उखाणायची स्पर्धा हाये कि दादल्याला नाव ठीवायची ,पण लयी मज्जा येतीय टाळयां.............................)
सोपानराव :पैली सोनी.दुसरी मनी ,तिसरी राणी समद्या सोडल्या कोंडाबाई साठी पण कोंडाबाई निघाली कानी ..फिस्स..............खॅ.....ख्या ..............खॅ.....ख्या ..............खॅ.....ख्या ..
("ह्या बया, काय ध्यान गावलंय ,तुम्ही घरला तर चला दावते तुम्हास्नी ").......................(सोपानराव जागेवरच खुडूक)
प्रेषक समदे येडे झाल्याती हासुनहासून...............
राख्माकाकी :"खोक्यात खोका ,खोक्यात खोका ,खोक्यात खोका,(आता बास कि )
म्या शिरपत रावांची मांजार आन त्ये माझा बोक्का "
मंजुळाबाई:- " पार्वतीला गावला शंकर , सीतेला गावलं राम.
" पार्वतीला गावला शंकर , सीतेला गावलं राम.
"आम्हास्नी गावलं सखाराम ,पाराखाली बसून बिड्या फुकन हेवडच जमतंय त्यास्नी काम ......................
सोनुबाई:- " रेश्म्याच्या सद्रयास्नी चांदीच बक्कल , " रेश्म्याच्या सद्रयास्नी चांदीच बक्कल ,डोक्याला पडल टक्कल पर
सुभानराव ला अजुन बी नाही आली अक्कल ............
सुभानराव :(चवताळल आना र माइक हिकड़ तिज्या मारी ...........)
सकाळी ४ , दुपारी ४ ,.सांच्याला ४ , तूप भाकरी खातीय नेमाची,
खाऊन खाऊन म्हस झाली ,सोनुबाय काय कामाची .
खी खी खी खी.................................................
(ऐकणाऱ्याच जबड दुखतंय आता )
जोरदार टाळ्या ........
पारू अक्का :-"आंब्यात आंबा , हापूस आंबा
"आंब्यात आंबा , हापूस आंबा ,
धन्याच नाव आठविते जरा वाईस थांबा ".................................
ताराबाई :- तुम्ही i समद्यांनी जोर लाविला म्हणून घ्येते उखाणा
तुम्ही i समद्यांनी जोर लाविला म्हणून घ्येते उखाणा
आन बबनरावांची तोंडी सदा तमाखुचा बकाणा ...
भागाबाई:-(नवरा दारुडा )"चांदीच्या ताटात ठेवला सोन्याचा घास ,
म्या न्हाई भरवत बया, छगन रावांच्या तोंडास्नी निसता दारूचा वास.....
बबी ताई :-"तेलाच्या दिव्यला तुपाची वात"
-"तेलाच्या दिव्यला तुपाची वात"
भुजंग रावांशी केल लगीन ,लागली आयुष्याची वाट"
(बाकीच्या गड्यास्नी धाक ! आता आपल काय ?आपुन हसतोय खी खी करुन नम्बर तर आपला बी हाय )
गनुबाई : "हेवढ़ा मोठा वाडा त्यावर टाकला पत्रा"
"हेवढ़ा मोठा वाडा त्यावर टाकला पत्रा"
रागोबांच घर म्हानजी जणू खु ळयाची जत्रा...
रागोबा ;- "गजरयात गजरा ,शेवंतिचा गजरा,
"गजरयात गजरा ,शेवंतिचा गजरा,
गनिला न्हाई गावाला कुणी मांग मलाच बनविला बकरा
खी खी .............."
शेवंता वैनी :- " म्हायेर माज अकलूज सासर नारसोबा वाडी ,
आन शम्भुराव ओढ़त्यात बीडी म्या लावते काडी"
उखान एइकुन समद बेजार झाल्यात ,
समादे हस्त्यात म्हणून उखान घेनार्याला बी चेव येतुय ,आता उखान स्पर्धा राह्याली बाजुला एकमेकांच उन दून काढ याची स्पर्धा सुरु झाली हाय ......................
लोखंडे वैनी :-( हलुच ,या बया मला नाही जमत, आव तुमि घ्या की )
लोखंडे भौ :- "चादरित चादर सोलापुराची ,चादरित चादर सोलापुराची ............
तुमच्या वैनीच तोंड म्हंजी काळया पाठीची लवंगी मिर्ची ही ही ...."
( वैनी खावळली !तुमि गप्पच बर हुत कशाला थोबड़ उघडल ? घरी चला दावते इंगा )
माइक चालू हाय समदे एइकत्यत वैनी ही ही ही ही ही ...................लोखंडे भौ आज खर न्हाई ..
मास्टर : - "सोन्यात सोन बावन कशी
सोन्यात सोन बावन कशी ....
मिशेष नि घातली हिरवी साड़ी,शेतात उभी म्हस जशी ............हया हया हया....
मास्टर ची मिशेष : - "आमच्या म्हायेरी हाय तेलाचा घाना "
"आमच्या म्हायेरी हाय तेलाचा घाना "
मास्तरांच्या खिशात नाही आना ,तरी बी म्हन्त्यात मला बाजीरावम्हणा........
मास्तर आव काय हे ?काय म्हानत्त्या वैनी ................ही ही ही ही
मास्तर: (चिडलय )अस्स , लै हसू नगा लेकानू , तुमचा मंजी अस हाय
"सवताच ठीवायच झाकून आन दुसर्यांच पह्याच वाकून"
आता कुठ स्पर्धा रंगात आली हुती खरपूस उखान , उखान्यास ताल्यान, शिट्ट्या ...
शंकर राव :- काय तरी काय बोलता राव , आम्ही काय पह्यालय तवा .............
सांगू का ?
" नगा काढू लेकानो ,ह्याची त्याची उनी -दुनी"
"सम्द्यासनी म्हैत हाय , शंकार राव कर्त्यात घरातली भांडी धुनी " ही ही ही ही हे कस हाय लेका ....
शंकर्याची बायकु मधिच " एय मास्तुरडया तुज्यासराखी दुसर्याची तर न्हाई धुत ना मंग ?
"एय टवळे, बुटुरने,म्हंजी काय म्हणायचा तुम्हास्नी ?"मास्तुरडया ची बायकु मधिच हुठ्ली
तुज्ह्या नवर्याकडे पाहाय अधि !
कसा गुबलघारी सारखा हिकड़ तिकड़ बघत अस्तोय !
शंकर्याची बायकु :- "तुजा नवरा जसा व्हिरोच लागुन गेला पिचरमदला,त्वांड बाघ कस काळ, काळ ,रंग गेला तर पैसा परत !
गणप्या मधिच आवो वैनी आवो आवो काय ? ,,,,,,, स्पर्धा भांडनाची न्हाई,
"तोंडाचा पट्टा आवरा जरा ..
"एय माकड तोंडया .... मधि पडायचा काम न्हाइ........" लै हावुस तुम्हाला आता का ?
बाकीच्या लोकांची मज्जाच झाली फुकाटाचा शिनेमा बघाय
"त्वांड घेउन बगतात मुडदे निस्ते "
गणप्या हनाम्याला , ;-
"आग बयो हया बाया हैत का काय? ले कठिन बा ,ह्यो बयांचा मामला"
ह्यो पाटिल बुळया काय कामाचा न्हाई,
ह्याच्या ..टिम्ब ,टिम्ब टिम्ब .......
गणप्या आन
मंडळाची चांगलीच हादरली कारण हया बायानी, त्येंची बिनपान्याची भादरली !
आन गणपति बाप्पा सांसारिक लोकांची मज्जा पाहून गालातल्या गलत हसतच हुता जणू !:)
प्रतिक्रिया
9 Dec 2010 - 4:30 pm | प्रकाश१११
सोपानराव :पैली सोनी.दुसरी मनी ,तिसरी राणी समद्या सोडल्या कोंडाबाई साठी पण कोंडाबाई निघाली कानी ..फिस्स..............खॅ.....ख्या ..............खॅ.....ख्या ..............खॅ.....ख्या ..
("ह्या बया, काय ध्यान गावलंय ,तुम्ही घरला तर चला दावते तुम्हास्नी ").......................(सोपानराव जागेवरच खुडूक)
मस्त लिहितेस .एकदम सिक्सर !!
9 Dec 2010 - 4:31 pm | प्रकाश१११
सोपानराव :पैली सोनी.दुसरी मनी ,तिसरी राणी समद्या सोडल्या कोंडाबाई साठी पण कोंडाबाई निघाली कानी ..फिस्स..............खॅ.....ख्या ..............खॅ.....ख्या ..............खॅ.....ख्या ..
("ह्या बया, काय ध्यान गावलंय ,तुम्ही घरला तर चला दावते तुम्हास्नी ").......................(सोपानराव जागेवरच खुडूक)
मस्त लिहितेस .एकदम सिक्सर !!
9 Dec 2010 - 4:32 pm | स्पा
लय भारी
9 Dec 2010 - 4:34 pm | sneharani
मस्त मजेशीर
=)) =)) =))
9 Dec 2010 - 4:36 pm | मेघवेडा
=)) =)) =))
जोरदार आहे एकदम! धमाल आली!
9 Dec 2010 - 5:00 pm | छोटा डॉन
एकदम अफाट !
जबरान लेख आहे, काही काही ठिकाणी लै लै हाशिवलं
- छोटा डॉन
9 Dec 2010 - 5:44 pm | टारझन
छान ग ... मस्त ग ...
9 Dec 2010 - 5:40 pm | स्पंदना
पियु !! तुझ पाय कुठ हायती ? न्हाय जरा जपुन ठेव. काय हाय हित सारी जन आता मागायला लागतील. काय उखाणे? काय खुडची स्पर्धा !! चालु दे चालु दे जोरात !
9 Dec 2010 - 5:47 pm | नन्दादीप
जबराट......झक्कास...
9 Dec 2010 - 5:47 pm | गणेशा
हसुन हसुन पुरे वाट ..
जबरी झाला आहे हा भाग पण ....
१ नंबर
आणि "तुझ्या आयला चा अन बा ला बटर" इथ पण घेतल्याने छान वाटले ...
उखाने वाचुन एकदम्च मजा आली ...
9 Dec 2010 - 9:39 pm | पिंगू
च्यामारी जाम मजा आली.
उखाणे वाचून पुरेवाट झाली.
- पिंगू
10 Dec 2010 - 1:23 am | पक्या
जबराट.
हहपुवा
10 Dec 2010 - 2:17 am | इंटरनेटस्नेही
मस्त! पियुषा, तुझ्या लेखणीत जादु आहे. आवडला.
12 Dec 2010 - 3:42 pm | पियुशा
जादु ! काय तरिच तुझ
10 Dec 2010 - 11:55 am | गवि
लय क्रियेटिव्ह हैस की पियुसाबाय..
"झीन्जाझीन्जी" शब्द लय चपखल.
आवडेश.. :)
10 Dec 2010 - 12:56 pm | परिकथेतील राजकुमार
एकदम खुसखुशीत लेखन.
लै झाक!
10 Dec 2010 - 5:27 pm | रन्गराव
आमचाबी जबडा दुखाया लागला आता ;) लई भारी. चालू दे जोरात!
12 Dec 2010 - 3:40 pm | पियुशा
सर्वे वाचकाना धन्यवाद