गणप्या भाग-२

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
26 Nov 2010 - 10:42 am

गणप्या भाग-२
नुकतच आमच्या गनप्यास्नी सोळावं (धोक्याच ) वरीस लागलया ,मिसरूड फुटू लागल आन आवाज बी घोगरा व्हाया लागला, रिंगटोन, न गडी माणसांचा न बायकावणी मधीच चीर चीर चीरकायाचा !
गणप्याला , गणप्या म्हणाल कि तो गडी डाफरायचा म्हणयाचा ,"आर
तुमच्या बा ची ,मला गणपत म्हणा कि जरा, गणप्या काय लावलाय ?म्या मोठा झालोय आता! तवा गणपत म्हणा लेकाच्यानो "
बबन्या आन हनम्या त्याच जीवाभावाच
मैतर नेहमी दोघांच लेंडार त्येच्या पाठीमागच, पण मागल्या काही दिवसापासून
गणप्या त्यांना भेटतच नवता ,दोघांना बी टाळायचा , एक दिस बबन्या आन हनम्या न गनप्याला
साळा सूटल्याबरुबर पकडलं
"काय हो गणपत राव कुठ बिझी असता तुमी न सांच्यला पाराखाली येता गप्पा माराय्ल्या ,न पावायला येतसा नदीवर ,आन
आता त साळत बी दरसन हुईना तुमच काय चुकल का साह्येब या गरिबांच? १० वी ला बोर्ड- बीड फाडून येता का काय जणू ?"

गणप्या म्हनला नाई नाई तास काय बी नाई काम आसत्यात जरा !
" कनच काम चाललाय आम्हाला बी कळण का गणपतराव ?"
दोघांनी बी ठरवील होत आज एयकायचाच भानगड तरी काय हाय ?
लाई आढ - वेढ घिऊन गणप्या म्हनला ती बकुळी हाये ना ती , गणाकाकाची नववितली रे ,ती मला जाम आवड्तीया आन तिला बी मी आवड्तुया आस तीन पत्र लिवल हुथ मला तेव्हापासून माज कशात बी मन लागणा काहीच ग्वाड वाटणा तीच दिसतीय सारखी डोल्याफुड
हम्म .....ssss
आस आस , तर गड्या ऐकून प्रकरण पार हितपर्यंत पोहचल आन आम्हला पत्त्या न्हाय, वा रे गड्या लयं भारी ! बा च निघाला कि र तू आमचा हिकड मला काळीबेन्द्री शकू पटना !
मंग काय म्हणत्यात बकुळा वाहिनी ?गणप्या असा लाजला म्हणून सांगू ? नको सांगाया
हा तर काही गाठी -भेटी झाल्या का अजून चिठ्या -पट्ट्या च का?
आर कसली भेट? तिचा बाप कसा सैतान हाये माहित हाये ना तुला ? आन वरतून आपली एवडूशी वाडी कुणी पादल तरी समद्यांना ऐकाय जातया
पाणवठ्यावर जावा तर तिथ बायका , शेतात जावा तर तिथ गडी , पडक्या वाड्यात जावा तर तिथ ४-५ टकूर आधीच बसलेली असत्यात एक भी
लव्हर प्वाइंट नाही बग गावात भेटावा तरी कुठ ?

हनम्या म्हनला एकूण आवघडच आहे गड्या ?
"मामला तो बहुत बिगड गया हे बोले तो हाथ के बाहेर निकल गया हे अभी हम्कुच कुच्छ करणा पडींगा
तेरी प्यार कि गडी कु हम्कुच धक्का देणा पडींगा "
दोन दिस बबन्या आन हनम्या सायकलवर हिंडत होत्ती जागा शोधाया आन तिसर्या दिवशी गनप्याला साळत गाठला म्हणाल जागा सापडली लेका ,
गणप्या तर हुरळून आल कुठ रे कुठ ? हनम्या म्हणाल गावाच्या खालचा " मसणवटा "
च्यायला तुमच्या मारी दोस्त हैसा का दुश्मन ? लेकाच्याणु भूताच नाव काढल्या तरी बी ओलि होतीय माझी आन मी " मसणवटा " ते बी भेटाय
श्टार्ट होनेसे पेहले हि दि एंड करतूस का काय हनम्या ? ना बां ना आपुन नाही जाणार
हनम्या :-आर गणप्या आर तीच जागा बेस हाय कुणी बी फिरकत नाई तिकड आन उद्या आमवस्या हाय कुणाच्या बाची हिम्मत न्हाय बग ?तू ऐक माझ राव," तू आन बकुळी फकस्त , मंग तू तीज्याशी हातात हात घिऊन गप्पा मार ,प्रेझेंट दे तिला सायकलवर फिरीव कोण येतेय बघाया बघ इचार कर नीट? धाडू का निरोप बकुळा वाहिनीला (परत वाहिनी! लाजून लाजून गन्या गपगार )

गणप्या :- बर बर धाडा निरोप उन्द्याचा ,
आमच गणप्या
आता हवेतच उडत व्हत गान गुणगुणत होत "
"देखा है पहली बार बकुळी कि आंखो मे प्यार टिंग टीडिंग टिंग टीडिंग टिंग टीडिंग.................."

भल्या पहाट उठला गणप्या झोपलाच कवा? निस्ती बकुळीच दिसत हुती डोल्याफुड निस्ता इचार बकुळीचा गोरा गोरा हाथ मी हातात घीन लई गप्पा मारिन,तिला सायकलवर फूड बसविण अगदी पिचरमंदी दावतात तसं मंग तिज्या लांब काळ्याभोर केसात मोगर्याचा गजरा घालीन आन फूड बास बास तुमी लोग काय बी वंगाळ इचार करता राव ?
गन्प्यान दाढी खरडली न्हाव्याकडून मसाज बी करून घेतला ,इस्त्री केलेला नवा सदरा घातला अत्तार बी लावलाय स्वारी एकदम रेडी,

गावची येस सोडल्यावर हनम्या भेटलं वा रे गणप्या डीकटू अजय देवगण !

वैनी चं खर नाय ,बेसुध व्हायची तुला बगून
दोग बी निघाल गप्पा मारीत मारीत अंधार पडाय लागला हुता गाव सोडला पायवाट लागली हनम्या हजार सल्ले देत हुता अस नाही तस जणू त्येन डिग्री घेतली व्हती ,

पण गन्प्याच ध्यान कुठ व्हत अंधार पडला तसा गणप्या जरा घाबरल हुत हिकडे तिकडे बघत चालल हुत ,

गार वार सुटल व्हत वाटच्या दोनी बाजूना मोठीमोठी झाडझुडूप व्हती ती येडी वाकडी हलणारी झाडे जणू आपल्याला गपकन उचलतील अस भ्यावं वाटत हुत गनप्याला त्येंचा आकार, सळसळ आवाज आग बयो, दूर कुठतरी कोल्ह्कुई ऐकू आली कुत्रांचे इवळण चालू झालं बाकीची कुत्री बी काम्पिटीशन

मधी घुसली सगळ कस डेंजर ! गणप्यान ऐकल हुत कि भूत दिसल्यावरच कुत्री इवळतात गणप्या टरकला म्हनला, "अय भो आपण नाही येत भो, मरायची लय हौस नाही आली मला माझ्या बासनी एकुलता एक हाय म्या "
हनम्या :-आर गणप्या तू तर शूर गडी हैस,
काहून घाबरतो ?मर्द असून
आन ती बकुळी बघ एकलीच येणार हाई चव घालशीन लेका, गणप्या एकदम चरफडला हन्म्यावर
"हनाम्या तू फिर माघारी मी मर्द हाये कुणाची बी गरज न्हाय मला माज मी बघून घितो आता भूताच बा आल तरी बी न्हाय घाबरणार तुमी जावा

हनाम्या :- आर आर तसं नव्हत म्हणायचा लेका,

गणप्या:- सांगितलं न फिर माघारी हनाम्या चा नाईलाज झाला

आता गणप्या सायकल

हातात घेऊन पायी चालला हुता मसानवटा आल तसा गन्प्याच्या अचानक ध्यानात आल आज सकाळी च खालच्या आळीतील गंग्या ची बायकू वारली व्हती जाम टरकला गणप्या आर देवा तिची चितेच निखार आजून भी जळत व्हत आता मातुर गंप्याला धडकी भरली त्या चीतेकड पाहत झपझप पुढ गेला मनातल्या मनात सवताला लई शिव्या घालत व्हता "लई बहाद्दर गडी,चांगल हनम्या येत हुता आता मरा हिथच " चिता भी तयारच हाये "

कसबसा गणप्या ओट्या पोतूर पोहचला , सायकल कडला लावून दोन पायावर माकडागत बसला रुमालानी समदा घाम पुसला दाट काळोख पसरला हुता रात किड्यांची किर्र -किर्र , घुबडाचा घू- घू आवाज, दूरवर हलणारा पांढरा झेंडा जणू भूतच उडतया आस भासत होत , वटवाघळ हिकडून तिकड उडत होती ,

मधेच पाण्यात डुबुक डुबुक आवाज येत हुता

गणप्याला हुडहुडी भरली व्हती गन्प्याच "तुकाराम पांडुरंग ,हरी चालू झाले ,

गन्प्याची पापणी पडत नव्हती डोळे ताठरलेले ! निस्ता हिकड तिकड बघत होता जणू कुणी भूत गपकन आवळीन आपल नरड!अर्धा तास, मंग एक तास झाला तरी बकुळीचा पत्त्या न्हाय ,

बकुळी न झुठा वादा करून माझा चांगलाच वांदा केलाय च्या मारी बकुळीच्या!

ती कशाला झक मारायला येईन हेवड्या रातच्याला !असा विचार करीत असताना अचानक एक काळ मांजरांनी गन्प्यासमोर उडी मारली टाणकन उडाला गणप्या ,"तिज्या मारी मांजरीच्या "राहून राहून त्याच लक्ष त्या चीतेकड जात हुत आन आतापोतूर जेवढ्या बी भुताच्या आन हडळीच्या गोष्टी एकल्या होत्या त्या समद्या आताच आठवत हुत्या गणप्यसनी !

आन तेवढ्यात त्याला दूर त्या चीतेमाग काही हलल्यासारख वाटल ताडकन उभा राहिला टोर्च मारली ,पण काय दिसना नीट आर देवा गंग्याची बायकू हुठ्ली का काय ?आन माझ्याकडच येती जणू आज माझ रामनाम च ! " ति गणप्याला आवाज देत हुती पिरमान " गणप्या ए गणप्या बघ मी आले "

गण्याची पिवळी व्हायचीच राहिली आता! पांढरी कापड मोकळे केस आर मारुतीराया वाचीव मला १० नारळ फोडतो तुला"

गाण्यान कशीबशी सायकल काढली आन कट्या कुट्यातून सायकल दामटू लागल मागून आवाज " गण प्या ए गणप्या थांब ना मला भी घेऊन चल ना, ए गणप्या , गन्प्याच सारा जीव आता पायामंदी येऊन पॅडाल मारीत हुता झपाझप !

गन्प्यान मग पायलच नाही सायकल भी धड चालविता येईना काट्या कूत्यात पडल कुठ कुठ घुसलय,

आता गाव जवळ आला गन्प्यान सायकल टाकली आन पळतच सुटला थेट

घरापर्यंत सोडवायला दोन चार कुत्री बी आली त्येच्या माग !घरात घुसला कडी घातली जी गोधडीत घुसला सकाळ पोतुरच ,सकाळी लई ताप भरला म्हणून आई त्येला भगताकड घिऊन गेली ,भगतान अंगार धुपार केल ,लिंबू -टिंबू दिल रातच्याला भीती न्हाय वाटावी म्हणून ,

वाटेत हनम्या आन बबन्या भेटलं गन्प्याची काहाणी एकूण चाट पडल दोघ बी म्हणाल "वाचला र तू गड्या नाही तर गंग्याची बायकू राम राम राम"
गणप्या म्हणाला तुमी व्हा मोर म्या दर्शन घिऊन आलोच गन्प्यान मारुतीला नमस्कार केला तेवढ्यात कुनतरी त्येच्या खांद्यावर हाथ ठिवला
गणप्या परत टरकला!
मग पाहतो तर बकुळा
" कार मुडद्या , फुकनीच्या काल रात्री मला मसानवट्यात एकटीला सोडून पळला लाज नाही वाटली ,मी परसाकड चालले म्हणून निघाले हेवढी रिक्स घेऊन आली तुला भेटाय आन तू मुडद्या, माझा बा किती वरडला माझ्यावर,कुठ गेली व्हती म्हणून इचारत व्हता सारखा........

"तुझ्या आयला च्या आन बापाला बटर "परत माझ्याकड बघितलं तरं डोळ काढून हातात देईन तुझ्या, समंध संपला आपला "

दोन चार गावरान शिव्या हासडून बकुळा गेली निघून आन गणप्या पाठमोरी पाहत राहिला तिला .......................

विनोदलेख

प्रतिक्रिया

स्वानन्द's picture

26 Nov 2010 - 10:59 am | स्वानन्द

आइल्ला जबर्री लिहिलं आहे . धम्माल :)
>>तुझ्या आयला च्या आन बापाला बटर
हे लय भारी. वापरायला हरकत नाही.

बाकी मध्येच 'गणप्या' चा 'गण्या' झाला बरं :)

अवांतरः स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम वापरताना एवढी काटकसर कशाला?

नगरीनिरंजन's picture

26 Nov 2010 - 11:09 am | नगरीनिरंजन

हात्तिच्यायला या गनप्याच्या तं. ऐन टायमाला शेपूट घातलंन्काय गड्यानं. येये ना मये आन घमेलं घीऊन पये..
लै झ्याक लिवलं बगा तै तुमी. घटकाभर वाईच हसून झालं.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Nov 2010 - 11:10 am | परिकथेतील राजकुमार

हा हा भारीच कथानक. ग्रामिण बाज आवडला.

मृत्युन्जय's picture

26 Nov 2010 - 11:13 am | मृत्युन्जय

एक नंबर जमले आहे. लै भारी.

स्पा's picture

26 Nov 2010 - 11:20 am | स्पा

हा हा भारीच कथानक. ग्रामिण बाज आवडला.

आईचा ...............

कडक.. लेख.........

अविनाशकुलकर्णी's picture

26 Nov 2010 - 11:24 am | अविनाशकुलकर्णी

आयला ...लई भारी लिवलय..मस्त

लंबर वन..

सलगपणे गावरानपणा भाषेत मेंटेन करायचा म्हणजे च्यालेंज आहे..

मस्त...

छोटा डॉन's picture

26 Nov 2010 - 2:50 pm | छोटा डॉन

मस्त जमली आहे गोष्ट.

>>सलगपणे गावरानपणा भाषेत मेंटेन करायचा म्हणजे च्यालेंज आहे..
+१, हेच म्हणतो.

पुलेशु

- छोटा डॉन

गणेशा's picture

26 Nov 2010 - 12:08 pm | गणेशा

अतिषय सुंदर लिहिले आहे ...

सर्व आवडले ...

स्पंदना's picture

26 Nov 2010 - 12:38 pm | स्पंदना

येकदम मसनात गाठभेट?

आमाला कंदीच सुचल नस्त. आता काय येळ गेली.

बाकी झ्याक गो, त्येचा आवाज चीर्चीर्न्या पासन सगळच कस झ्याक, आन त्याला घरला पोचवायला कुत्री तर लय भारी.

डावखुरा's picture

26 Nov 2010 - 1:15 pm | डावखुरा

मस्त पुलेशु......................

नावातकायआहे's picture

26 Nov 2010 - 2:42 pm | नावातकायआहे

>>तुझ्या आयला च्या आन बापाला बटर
हे लय भारी.

आजुन येउंद्या गणप्याचे भाग

इंटरनेटस्नेही's picture

26 Nov 2010 - 3:13 pm | इंटरनेटस्नेही

कथा आवडली. लेखिकेने अतिशय योग्यरित्या वापरलेला ग्रामीण भाषेचा बाज कथानकाला अगदी आपल्या समोर जणु जिवंत करतो.

>> तुझ्या आयला च्या आन बापाला बटर

हे लै भारी! कथानक तर खतरनाक आहे! आईशप्पथ. आणि सरसकट ग्रामीण बाज सांभाळत लिहिणे म्हणजे शॉल्लेटच! एक लंबर! आवडलेच!

>>तुझ्या आयला च्या आन बापाला बटर >> :D
आक्षी जंक्शान जमलय पघा!

तुझ्या आयला च्या आन बापाला बटर
:) :)

अडगळ's picture

27 Nov 2010 - 7:39 am | अडगळ

'

अप्पा जोगळेकर's picture

28 Nov 2010 - 5:58 pm | अप्पा जोगळेकर

सह्ही लिहिंलंय. भाषेतला ग्रामीण लहेजा अगदी परफेक्ट जमलाय.

विलासराव's picture

28 Nov 2010 - 6:59 pm | विलासराव

आपल्याला गणप्या हे पात्र.