बिहार निवडणूक निकाल

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in जनातलं, मनातलं
24 Nov 2010 - 10:34 am

बिहार निवडणुकीत संयुक्त जनता दलाचे घवघवीत यश.

त्याबद्दल नीतिश कुमार यांचे अभिनंदन !!!!

समाजराजकारणअभिनंदन

प्रतिक्रिया

आँ ! येवढ्यात मतमोजणी संपली?

नितिन थत्ते's picture

24 Nov 2010 - 10:40 am | नितिन थत्ते

हो.

रिडिफ वरील बातमी.

Results of all 243 seats declared. Here's a breakup. JDU 99, BJP 76 (combined is 175), RJD 34, LJP 13 (combined is 48), Cong 4, Others 16.

छोटा डॉन's picture

24 Nov 2010 - 10:44 am | छोटा डॉन

बहुतेक रेडिफवाल्यांची अंमळ गल्लत झाली आहे किंवा त्यांना 'आघाडी असणे' आणि 'जिंकणे' ह्यातला फरक महत्वाचा वाटत नसावा.
चालायचेच !

- छोटा डॉन

छोटा डॉन's picture

24 Nov 2010 - 10:42 am | छोटा डॉन

उत्तम ...
शेवटी बिहारची जनतसुद्धा आजकाल 'विकास, सोईसुविधा, नोकरी-धंदा आणि सुरक्षा' ह्या मुद्द्यांना प्राथमिकता देत आहे हे पाहुन आनंद झाला.

लालुंचा आक्रस्ताळ्या आणि राहुलच्या बालिश प्रचाराला जनता बळी पडली नाही म्हणुन त्यांचेही अभिनंदन :)

बाकी सविस्तर निकाल अजुन बाकी आहे, पण नितीशकुमार मैदान मारतील ह्यात शंका नाही.
नीतिश कुमार यांचे अभिनंदन !!!!

अवांतर : 'भाजपा' चे नाव बिहारमध्ये कुठल्याच बाबतीत घेण्याच्या लायकीचा तो पक्ष आता राहिलेला नाही, बाकी असो.

- छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Nov 2010 - 11:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काही बिहारी मित्रांकडून प्यार्टी घ्यायला हवी. "यादवराज" ऐवजी "कायदाराज" टिकण्याचा आनंद त्यांनाही होतोच म्हणे!

ऋषिकेश's picture

24 Nov 2010 - 12:18 pm | ऋषिकेश

प्रतिक्रीयेशी बहुतांश सहमत! आणि नितिशकुमारांचे अभिनंदन!
मात्र खालील अवतरणाशी असहमत आहे

'भाजपा' चे नाव बिहारमध्ये कुठल्याच बाबतीत घेण्याच्या लायकीचा तो पक्ष आता राहिलेला नाही, बाकी असो.

१०२ लढवलेल्या जागांपैकी ८०-८२ जागांवर आघाडीवर असलेला भाजपा बिहारमधे एक मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे

छोटा डॉन's picture

24 Nov 2010 - 12:26 pm | छोटा डॉन

कदाचित भाजपाच्या अपयशामुळे 'नीतिश'चा चान्स जाऊ नये ह्या विचाराने बिहारी जनतेने जदयुशी 'युती' असलेल्या भाजपाच्या पारड्यात माप टाकले असावे असे मला वाटते.
आमच्या भागात पण राष्ट्रीय / राज्य पातळीवर झालेल्या युतीमुळे जनता जेव्हा 'रिपाई' किंवा तत्सम पक्षांना मतदान करते तेव्हा ते मतदान खरे तर काँग्रेस पक्षाला राज्य / राष्ट्र पातळीवर मजबुत करण्यासाठी असते, तसेच इथे असावे असे वाटते.

मात्र भाजपने खरोखरच काही काम केले असल्यास मी माझे वाक्य माझे घेतो.
तसेही जदयुने भाजपाला 'एवढ्या' जागा लढवु दिल्या म्हणजे काही तरी असु शकते, असो.

अवांतर : माझा 'भाजपा' आणि 'रिपाई / तत्सम ' पक्षांची तुलना करण्याचा हेतु नाही, मला केवळ 'युती'चे राजकारण मांडायचे आहे

-छोटा डॉन

आता हाफीसात असल्याने जास्त टंकत नाही.. मात्र इतकेच की बिहारचे उपमुख्यमंत्री व काहि अन्य खात्यांच्या मंत्र्यांची कामेही प्रशंसनीय आहेत. नितीशकुमारांबरोबर भाजपचे राजकारणही "बेरजेचे" आहे. त्यामुळे इथे भाजपच्या मतांपैकी बरीच मते भाजपसाठी असतील असे वाटते.

बाकी 'युती'चे राजकारणाच्या परिणामांबाबत (अन्यत्र) सहमत

विकास's picture

24 Nov 2010 - 10:44 am | विकास

त्याबद्दल नीतिश कुमार यांचे अभिनंदन !!!!

अगदी असेच काँग्रेस प्रवक्त्या जयंती नटराजन म्हणाल्या आहेत. ;)

नीतिश कुमारांचे अभिनंदन!

काँग्रेसने एकट्यानेच सर्वच्या सर्व जागा लढवणे, जे नीतिश कुमारांनी देखील केले नाही, ती योग्य स्ट्रॅटेजी होती का?

छोटा डॉन's picture

24 Nov 2010 - 10:48 am | छोटा डॉन

>>काँग्रेसने एकट्यानेच सर्वच्या सर्व जागा लढवणे, जे नीतिश कुमारांनी देखील केले नाही, ती योग्य स्ट्रॅटेजी होती का?

होय, काँग्रेसने जे केले ते योग्यच होते.
नीतिश कुमारांचा विजय आधीच स्पष्ट दिसत होता, त्यातुन जे काही उरेल सुरेल तो फायदाच होता, मग त्यात उगाच कशाला 'लालु-पासवान' सराखे उपटसुंभ आणि अर्धवट भागीदार ?
शिवाय त्यांना 'राहुल करिष्मा' ट्राय करायचा असेल अशी एक शक्यता वाटते.

- छोटा डॉन

चिंतामणी's picture

24 Nov 2010 - 2:47 pm | चिंतामणी

शिवाय त्यांना 'राहुल करिष्मा' ट्राय करायचा असेल अशी एक शक्यता वाटते.

काही उजेड पडला नाही कुलदिपकांच्या करिष्म्याचा.

उंच उंच उडणारी विमाने जमिनीवर आली असतील (खरे तर Crash Landing झाली आहेत) अशी आशा आहे.

विविध क्लुप्त्यावापरून काहिही फायदा झाला नाही.

छोटा डॉन's picture

24 Nov 2010 - 2:55 pm | छोटा डॉन

>>काही उजेड पडला नाही कुलदिपकांच्या करिष्म्याचा.
+१, हेच म्हणतो.

बहुतेक बिहारी लोकांना राहुलजींच्या म्हणण्याप्रमाणे 'बिहारहुन मुंबईत जाऊन मुंबईचा विकास करणे' ह्यापेक्षा नितिशबाबुंची 'बिहारचाच विकास करु' ही संकल्पना जास्त आवडलेली दिसत आहे. :)
तसे असेल तर फारच उत्तम, कित्येक प्रश्न आपोआप सुटतील व अनावश्यक वाद निर्माणच होणार नाहीत.

- छोटा डॉन

अनामिका's picture

24 Nov 2010 - 5:50 pm | अनामिका

बहुतेक बिहारी लोकांना राहुलजींच्या म्हणण्याप्रमाणे 'बिहारहुन मुंबईत जाऊन मुंबईचा विकास करणे' ह्यापेक्षा नितिशबाबुंची 'बिहारचाच विकास करु' ही संकल्पना जास्त आवडलेली दिसत आहे
सहमत.

अर्धवट's picture

24 Nov 2010 - 3:21 pm | अर्धवट

राजकीय वादात आम्हाला ओढल्याचा निषेध..

चला त्या निमित्ताने हा राहुल गाम्धींचा आणि पर्यायाने सोनिया गांधींचा पराभव समजायचा का? आणि त्यांना लोकांनी नाकारले असे समजायचे का? कारण जिंकले असते तर त्या दोघांमुळेच जिंकलो असे प्रत्तेक काँग्रेजी टिर्र्या बडवत बोंबलला असता....

नितिन थत्ते's picture

24 Nov 2010 - 11:15 am | नितिन थत्ते

तसे समजायला काहीच हरकत नसावी.

शिवाय काँग्रेसला ५ आणि लालू पासवान जोडीला ६०+ हेही लक्षात घ्यायला हवे.

नाही हो. आत्ता असे दिसत आहे की ३०-३२ मिळतील.

प्रदीप's picture

24 Nov 2010 - 10:55 am | प्रदीप

अजून लागलेला नाही, आघाड्या आहेत असे आताच हि. टा. च्या संस्थळावर वाचले. तरीपण हा ट्रेंड स्पष्ट आहे.

पाकिस्तान बलशाली झाला की भारतास त्याचा फायदा होईल, ही एक रेकॉर्ड पूर्वी वाजवली जायची (आताही मेणबत्तीवाले तशी वाजवीत असतील कदाचित). त्याच धर्तीवर आता बिहार सशक्त झाला की त्यांचे अतिउर्मट व कायद्याला 'ह्याच्या'वर बसवणारे लोंढे महाराष्ट्रात यायचे थांबतील, व मग केवळ आमचे आम्हीच उरू (आम्ही काय कमी उर्मट आहोत?) अशी आशा करूयात!

रालोआचे अभिनंदन! (१०९ सं. जनता दल+ ८६ भाजपा ?)

मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे कार्य आजपर्यंत चांगले झालेले आहे. यापुढेही ते बिहारच्या प्रगतीस अग्रक्रम देऊन आदर्श राज्यकारभार करतील अशी अपेक्षा करूया.
या निवडणुकीने स्पष्ट केले की जात-धर्म विरहित, स्वच्छ आणि प्रगतीशील राज्यकारभार केल्यास बिहारसारखे 'तथाकथित अशिक्षित आणि असंस्कृत' राज्यही योग्य व्यक्तींना मतदान करू शकते. इतर राज्येही असा विचार करतील तेव्हा समस्त भारताची प्रगती होईल.त्याबरोबरच नरेन्द्र मोदी, शिवराज सिंग चौहान, नितीशकुमार या उदाहरणांवरून असे दिसते की शीर्षस्थ व्यक्ती जर प्रगती हेच ध्येय मानत असेल तर सामान्य जनतेचा विकास होतो आणि सामान्य जनतेची दिशाभूल केली नाही तर जनता त्याच नेत्यांना मतदान करते.
इतर राज्यांच्या आणि भारताच्याही प्रमुखांना यावरून बरेच शिकता येईल.

या निवडणुकीत सर्वात जास्त फायदा भाजपाला झालेला आहे. (+३०) अर्थातच भाजपाने 'हिंदुत्ववादी / सांप्रदायिक' नेते नरेन्द्र मोदी आणि वरुण गांधी यांना प्रचारात उतरवले नाही त्याचा उपयोग झाला असेही म्हणता येईल.

जयंत कुलकर्णी's picture

24 Nov 2010 - 12:38 pm | जयंत कुलकर्णी

बिहारमधलील जनतेचा जर काँग्रेसबद्दल भ्रमनिरास झाला असेल तर मला वाटते काँग्रेसचा अंत आता जवळ आला आहे असे समजायला हरकत नाही. हे वाईट होईल पण मला वाटते त्यातूनच काहितरी चांगले उदयास येईल.

मला वाटते की महाराष्ट्रच भविष्यात काँग्रेसला परत उर्जित अवस्था प्राप्त करून देईल.

अर्थात हे माझे विचार आहेत, चुकीचे असण्याची शक्यता जास्त आहे.

लोखंडी घमेल्यातून प्रचंड ओझे वाहणार्‍या अनवाणी महिलेच्या मागे प्लास्टिकचा रिकामा टब घेवून एक युवराज परदेशी बनावटीचे स्पोर्ट शूज घालून जात असल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते. (कदाचित बनावट स्वदेशी असू शकते, पण मालकी परदेशीच असावी)

ह्या नौटंकीचा आता सामान्य बिहारी जनतेला उबग आलेला दिसतोय. हा कदाचित त्यांचाच 'विधायक' सूड असेल ...

सुधीर काळे's picture

24 Nov 2010 - 1:24 pm | सुधीर काळे

तो फोटो पाहिल्यानंतरच मला गजाननराव वाटव्यांच्या भालचंद्र खांडेकर लिखित "हीच राघवा हीच पैंजणे" या जुन्या गाण्यातील खालील ओळी आठवल्या होत्या!
ज्या चरणास्तव देह वाहिला
त्याविण ठावुक कांहि न मजला
मुखचंद्र तिचा कधि न पाहिला
कसे ओळखू अन्य दागिने
पण.....
हीच 'राहुला' हीच पैंजणे!

मला दोन बाबतींचा आनंद झाला! एक म्हणजे 'रास्वसं' आणि 'सिमी'ला एकाच मापाने मोजणार्‍या राहुलचा धुव्वा उडणे व दसरी बाब म्हणजे कसलीही लायकी नसलेल्या राम विलास पासवान यांचा नि:पात होणे!
यातली कुठली जास्त आनंददायी आहे ते अद्याप ठरविलेले नाहीं.
विदूषक लालू आणि त्यांच्या 'कर्तबगार' अर्धांगाची-राबडीदेवी-सद्दीही संपली आहे. आता उरल्या इंपोर्टेड राबडीदेवी! त्याही संपल्या म्हणजे सुटली भारताची जनता!

राबडीदेवी दोन्ही मतदार संघात पिछाडीवर आहेत हे वाचुन आनंदाने बेहोष व्हायची पाळी आलीय...

http://timesofindia.indiatimes.com/city/patna/Rout-for-RJD-Rabri-Devi-lo...

आता उद्याच्या अंकात 'सुमार' काकांचा तिळपापड वाचायला मी अतिशय उत्सूक आहे. युवराजांची नाटकं इतक्या गरीब, अशिक्षित लोकांनाही लक्षात यावीत म्हणजे काय? दोन आकडी संख्या सुद्धा गाठता येवू नये? कदाचित बिहारमधे 'सुमारसत्ता' ची आवृत्ती निघत नसेल, त्यामुळे तेथील अशिक्षित जनतेचं प्रबोधन कोण करणार! शिवाय त्यांच्या साता जन्माच्या वैर्‍याला मात्र ८०-९० जागा मिळतात ... छे ... छे नक्कीच मतदान यंत्रच ह्या भगव्या दहशतवाद्यांनी 'हॅक' करून ठेवली असणार ...

चिंतामणी's picture

24 Nov 2010 - 2:56 pm | चिंतामणी

१०० % सहमत.

इन्द्र्राज पवार's picture

24 Nov 2010 - 4:00 pm | इन्द्र्राज पवार

'बैलजोडी', "गायवासरू", "पंजा", "पणती", 'विळाकणीस", "कमळ", "कंदील" पाहून मतदार शिक्का मारायचा....मग त्या चिन्हाच्या मागे एखाद्या गाढवाचे [वा गाढविणीचे] का नाव असेना.... पुढे बटन आले, मतदार निव्वळ सुशिक्षित न राहता तो शहाणाही झाला - किंवा होत आहे - आणि आता तो 'थोर इतिहासाकडे' न पाहता काल केलेल्या कामाकडे पाहून उद्या त्या नेत्याला कामासाठी खुर्ची द्यायची का नाही हे ठरवू लागला आहे.

गुजराथ ही सुरूवात म्हटले तर बिहार आता 'पुढचे पाऊल' म्हणावे लागेल. मोदी आणि नितिशकुमार दाखवून देत आहेत की जनता त्यांच्याबरोबर का आहे तर ते जनतेसाठी आहेत. केवळ एक आडनाव आहे म्हणून मला निवडून द्या असे यापुढे कुणीही म्हणू नये हेच सार बिहारचे निकाल दर्शवितात.

नितिशकुमार आणि आघाडीला मनःपूर्वक शुभेच्छा !

इन्द्रा

अवलिया's picture

24 Nov 2010 - 4:57 pm | अवलिया

नितिशकुमारांचे अभिनंदन केल्याबद्दल नितिन थत्त्यांचे अभिनंदन :)

अनामिका's picture

24 Nov 2010 - 5:49 pm | अनामिका

बिहारची हि निवडणुक संयुक्त जनता दल व भाजपाने" बिहारी अस्मिता' या विषयावर देखिल काही प्रमाणात लढवली आहे .........मला या निमित्त्ताने सावरकरांची आठवण झाली ......सगळ्याच प्रांतांना या निमित्ताने प्रांतिय अस्मितेची लागण होवू लागली आहे आता याची सुरुवात महाराष्ट्राने केली की गुजराथने हा प्रश्न वेगळा!.....बहुमत असाव तर अस! उगिच याच्या त्याच्या कुबड्यांची गरज लागणार नाही आणि बिहार बद्दलचे महत्वाचे निर्णय घेताना आता नितिशकुमार यांना कुणावर अवलंबून रहावे लागणार नाही ........बिहारची समस्त जनता अभिनंदनाची पात्र आहे......
सत्तेच्या उन्मादाने माजलेल्या सगळ्यांचाच माज योग्य वेळी उतरवून त्यांना त्यांची योग्य जागा बिहारच्या सुज्ञ जनतेने दाखवून दिली याचा आनंद जास्त आहे....काँग्रेसला मिळालेल्या जागा बघता हा पक्ष १२५ वर्षे जुना आहे यावर विश्वास ठेवणे कठीण ...भारतिय राजकारणातला सगळ्यात जुन्या पक्षाचा सुपडा साफ झालेला बघुन अंमळ अत्यानंद झाला...उत्त्तरोत्तर अश्याच प्रकारचे चित्र समस्त हिंदुस्थानात निर्माण होवो हिच सदिच्छा!
नितिश कुमार व नरेंद्र मोदी यांनी विकास या मुलभुत विषयावर देखिल निवडणुका लढवुन बहुमत प्राप्त करता येते हे दाखवून दिले....महाराष्ट्राची जनता देखिल यावरुन काही धडा घेईल अशी आशा करावी कि न करावी या विवंचनेत आहे..
अवांतर्-थत्तेचाचांनी लालूंप्रमाणे फक्त नितिशकुमारांचे अभिनंदन केले आहे ते बघुन गंमत वाटली
.जय हिंद!
जय महाराष्ट्र!

हा विजय खरोखरच आश्चर्यकारक असा आहे. १५५ जागा पकडल्या होत्या ,त्या एकदम २०१ झाल्या . राहुल गांधीचे देखिल अभिनंदन त्याना ५ जागा मिळाल्या. तसेच श्री लालु यादव व रामविलास पासवानह्याचे देखिल अभिनंदन. अजुन त्याना जनतेने थोडा का होईना पाठिंबा दिला आहे.
रामविलास पास्वान व रामदास आठवले ह्याच्यात काहीतरी साम्य आहे.

असुर's picture

24 Nov 2010 - 6:54 pm | असुर

>>> रामविलास पास्वान व रामदास आठवले ह्याच्यात काहीतरी साम्य आहे. <<<
साम्य नक्कीच आहे. त्या दोघांनाही मेंदू नाही आणि जातीपातीच्या राजकारणापलिकडे समज नाही! अजून काही साम्य असेल तर तेही लिहावे.

--असुर

चिरोटा's picture

24 Nov 2010 - 6:57 pm | चिरोटा

दोघांमध्येही राम आहे तरी जनतेने त्यांना राम-राम केलाय.

वेताळ's picture

24 Nov 2010 - 7:45 pm | वेताळ

त्याना बघितले कि मला गोचीड किटकाची आठवण होते.

वेताळ's picture

24 Nov 2010 - 7:45 pm | वेताळ

त्याना बघितले कि मला गोचीड किटकाची आठवण होते.

चिरोटा's picture

24 Nov 2010 - 6:55 pm | चिरोटा

अभिनंदन. उद्याच्या लोकसत्तेत कुमार केतकर काय 'थियरी' मांडतात बघुया!!राहुल गांधींना जबाबदार न धरता स्थानिक कॉन्ग्रेस नेत्यांमुळे पराभव झाला असे नक्की सांगणार.
अवांतर- महाराष्ट्रात बिगर्-काँग्रेस पक्षांना असे यश कधीच का नाही मिळाले?

महाराष्ट्राची जनता देखिल यावरुन काही धडा घेईल अशी आशा करावी कि न करावी या विवंचनेत आहे..

सहमत आहे.महाराष्ट्रातील राजकिय पक्षांनी देखील भाषा,धर्म,ईतिहास ह्यावरून टगेगिरी न करता विकासाच्या मुद्द्यांवरच सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडावे.

जयंत कुलकर्णी's picture

24 Nov 2010 - 8:04 pm | जयंत कुलकर्णी

अतिसुमार केतकरांचा लेख साधारणतः या प्रकारचा असेल असा अंदाज आहे.

"अमेरिकेत ओबामांची लोकप्रियता घसरली आणि त्याचवेळी नेमकी बिहारमधल्या निवडणूका जाहीर झाल्या. अमेरिका अफगाणिस्तानात व इराकमधे फसलेली आहे आणि त्याच वेळी बिहारमधे काँग्रेसचा पराभव यात काहितरी साम्य दिसत आहे. मध्यमवर्गीयांना नाहीतरी ओबामा नकोच आहेत म्हणून त्यांनी राहूल गांधींना धडा शिकवला. महाराष्ट्रात शहरी जनतेला याचा आनंद होतो आहे हे हेच सांगते आहे. तिकडे रशियापण बिहारच्या मध्यमवर्गीयांवर चांगलेच लक्ष ठेऊन आहे आणि आयर्लँड्च्या डुबत्या अर्थ्व्यवस्थेला कसे वरती आणायचे याच्या विवंचनेत आहे. त्यातच हे असे झाल्यामुळे क्युबाच्या मध्यमवर्गीयांची चांगलीच पंचाईत झाली असणार..........................blaaaaa blaaaaa blaa....."

कशाचा कशाला पत्ता नाही. चायला याच्या ............

विकास's picture

24 Nov 2010 - 8:40 pm | विकास

सहमत पण...

"ओबामा आज का शिंकतोय?" यावरही त्यांनी जर लिहीले, तरी त्यांच्या अशा अग्रलेखाची परीपुर्ती ही संघाला/हिंदुत्वाला नावे ठेवल्या शिवाय आणि ते कसे धोकादायक आहेत, हे सांगितल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे तुमचे "अंदाजपत्रक" ५०% च बरोबर असे म्हणावेसे वाटते. ;)

जयंत कुलकर्णी's picture

24 Nov 2010 - 8:51 pm | जयंत कुलकर्णी

ते शेवटच्या blaa... bla...मधे आहे असे समजा आणि मला ८० तरी गुण द्या !
:-)

नितिन थत्ते's picture

25 Nov 2010 - 10:45 am | नितिन थत्ते

लोकसत्तेच्या अग्रलेखाचं पहा काय झालंय....

Warning: Invalid argument supplied for foreach() in /data1/loksatta/web/html/loksattav2/components/com_content/models/category.php on line 337

Warning: mysql_num_rows(): supplied argument is not a valid MySQL result resource in /data1/loksatta/web/html/loksattav2/libraries/joomla/database/database/mysql.php on line 344
अग्रलेख

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Nov 2010 - 10:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

लोकसत्तेचा सर्व्हर बिहारमधे होता आणि नवचाणक्यांनी नवबहुमताच्या जोरावर अग्रलेख उडवून टाकला आहे असं काहीतरी भन्नाट डोस्क्यात आलं.

छोटा डॉन's picture

25 Nov 2010 - 11:03 am | छोटा डॉन

आज सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती केतकरांच्या अग्रलेखाचीच.
सर्वात पहिला शॉट म्हणजे लिंक गंडली आहे ;)

असो, अग्रलेख वाचला, अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचा 'पानीपता'ची सारवासारव करणारा आहे.
केतकरांनी केलेले विजयाचे अ‍ॅनालिसिस :

१. नरेंद्र मोदींना प्रचारात न आणल्याने हा विजय मिळाला.
( हे म्हणजे नेदरलँडच्या प्लेयर असणार्‍या डर्क क्युटने त्याचा लिव्हरपुलचा साथीदार फर्नांडो टोरेस स्पेनकडुन वर्ल्ड कपचा सामने न खेळल्याने स्पेनचा विजय झाला असे म्हणण्यासारखे आहे ).
२. नीतिश जे जातीयवादी भाजपाच्या जवळ जाण्यास 'काँग्रेस' कारणीभुत होती आणि तसे घडुनही नीतिश मुस्लिमांच्या नजरेत 'शेर का बच्चा' ठरले.
( हा विनोद मला शप्पथ नाही समजला, असो. )
३. विकासाचा मुद्दा ... ओके.
४. गुन्हेगारी पार्श्वभुमी असणार्‍या उमेदवारांचा पराभव आणि नीतिश ह्यांची स्वच्छ इमेज ... ओके.
५. प्रथेप्रमाणे लालुंना 'जोकर' म्हणले ... ओके, टिकमार्क केली आहे.

एक मिनिट, जरा मला मोजु द्यात.
मोदी, जातीयवाद, मुस्लिम मतदार, भाजपाची बोंबाबोंब, जोकर वगैरे, विकास आणि २०१४ च्या निवडणुका !
ओके, परफेक्ट, अरे झाला की केतकरांचा अग्रलेख, अजुन काय हवे ? ;)

- छोटा डॉन

चिरोटा's picture

25 Nov 2010 - 11:11 am | चिरोटा

बिहारच्या विजयाचा रशियाच्या विभाजनाशी वा अमेरिकेतल्या भांडवलदारवर्गाशी काहीच संबंध जोडलेला नाही?(म्हणजे रशियाचे ८९ साली विभाजन झाले तेव्हा बिहारमध्ये एक वेगळीच राजकिय शक्ति आकार घेत होती.८९सालचा काँग्रेसचा पराभव आणि रशियाचे विभाजन आणि बिहारमधला नितिशकुमारांचा उदय हा योगायोग निश्चित नव्हता वगैरे?)

छोटा डॉन's picture

25 Nov 2010 - 11:12 am | छोटा डॉन

असु द्या हो, बहुतेक पटकन सुचले नसावे.
असा अग्रलेख कधी काळी लिहावा लागेल ह्याची मानसिक तयारी नसावी ;)

तसे अजुन बरेच शब्द राहिले आहेत.
' जागतीक मंदी, आदरणीय गांधीजी, हिंदुत्वाची प्रयोगशाळा, भाजपा आणि बगलबच्चे, तांडव, कम्युनिस्टांची नौटंकी, विरोधक तोंडघाशी, संघिष्ट, चिंतनशिबीर .... वगैरे वगैरे '.
पण येवडा डाव माफी द्याच प्लीज :)

- छोटा डॉन

विकास's picture

25 Nov 2010 - 10:06 pm | विकास

नितीश यांच्या नावात "कुमार" असल्याने जवळीक वाटली असावी... :-)

चिरोटा's picture

25 Nov 2010 - 10:55 am | चिरोटा

mysql_num_rows(): supplied argument is not a valid MySQL result resource /blockquote>
केतकरांनी अग्रलेखात जी काही आर्ग्युमेंट्स केली असतील ती सगळी invalid आहेत असेच सर्वरला सांगायचे आहे.

श्रावण मोडक's picture

25 Nov 2010 - 12:03 pm | श्रावण मोडक

अग्रलेख वाचला. तो केतकरांनी लिहिलेला आहे, हे विधान धाडसाचे ठरेल. हे लेखन केतकरांचे वाटत नाही. केतकर आता निवृत्तीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नव्या शिलेदारांकडून ही मोहीम हाती घेतलेली असू शकते.

भाऊ पाटील's picture

25 Nov 2010 - 12:15 pm | भाऊ पाटील

अग्रलेख केतकरांनी लिहिलेला आहे असे वाटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Nov 2010 - 1:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गिरीश कुबेर हे लोकसत्ताचे कार्यकारी संपादक आहेत अशी बातमी अलिकडेच लोकसत्तेत वाचली होती. याचा अर्थ अग्रलेख कुबेरांनी लिहीला असण्याची शक्यता आहे काय?

अवांतरः सुमारांतर्फे डान्राव का माफी मागत आहेत?

प्रदीप's picture

25 Nov 2010 - 6:15 pm | प्रदीप

अलिकेडेच त्यांची हार्ट बायपास सर्जरी झाल्याचे कुठेतरी वाचले.

विकास's picture

25 Nov 2010 - 6:06 pm | विकास

कदाचीत हा आता उपलब्ध असलेला अग्रलेख मला वाटते कदाचीत संगणकाने नजरेखालून घातला असावा आणि काहीतरी तांत्रिक गडबड वगैरे म्हणत, "Warning: Invalid argument supplied " असे म्हणून वाचकांना सावध केलेले आहे. ;)

सुनील's picture

24 Nov 2010 - 6:59 pm | सुनील

जाती, धर्म, भाषा असल्या पोकळ मुद्द्यांपेक्षा विकासाच्या मुद्द्यावर मतदान होत असेल तर, सर्वच पक्षांसाठी तो एक चांगला धडा ठरेल.

तिमा's picture

24 Nov 2010 - 8:31 pm | तिमा

काँग्रेसच्या पतनाची ही सुरवात आहे. महाराष्ट्रातली जनता कधी शहाणी होणार ?

क्लिंटन's picture

24 Nov 2010 - 9:53 pm | क्लिंटन

टाईम्स ऑफ इंडियामधील बातमीप्रमाणे आताचा लेटेस्ट आकडा २०७!! नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली जद(यु) आणि भाजप युतीने अभूतपूर्व यश संपादन केले.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. जातीपातींच्या गलिच्छ राजकारणातून बाहेर पडून मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केले आहे असेच दिसते.जनमताचा कौल इतका निर्विवाद आहे की त्याविषयी कोणालाही शंका घेता येणार नाही.१९९० ते २००५ या काळात माकडचाळे करून बिहारी जनतेला खोटी आशा दाखवत लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या लालू यादवांच्या पक्षाचा पुरता पाडाव झाला हे सगळ्यात चांगले झाले.लालू यादव यांच्या बरोबर युती करून निवडणुक लढविणारे रामविलास पासवान आणि लालूं-राबडींच्या भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकारला पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचाही मोठा पराभव झाला यावरूनच लालूंच्या सरकारशी संबंधित प्रत्येकाला जोरदार धडा लोकांनी शिकवला आहे असे दिसते.असे म्हणतात की in politics, you can fool some people all the time, you can fool all the people some time but you cannot fool all the people all the time. लालूंना त्याची प्रचिती आली असेल.

मागे मिसळपाववरील विविध वेगळ्या चर्चांमध्ये ’ही कसली लोकशाही’ अशा स्वरूपाची मते अनेकांनी व्यक्त केली होती.अशांचे शंकानिरसन आजच्या या निकालाने झाले असेल अशी आशा करू या. तसेच २०७/२४३ म्हणजे पाच-षष्ठांशापेक्षा जास्त बहुमत नितीशकुमारांना मिळाले आहे.असेच किंबहुना यापेक्षाही मोठे बहुमत जयललितांना १९९१ मध्ये तमिळनाडूत मिळाले होते.पण नंतरच्या काळात आपल्या सामर्थ्याची नशा चढलेल्या जयललितांनी काय केले हे वेगळे सांगायलाच नको. यापासून धडा घेऊन नितीशकुमार आपले पाय जमिनीवरच ठेऊन बिहारमधील विकासप्रक्रिया पुढे नेतील अशी आशा करू या.

क्लिंटन

अर्धवटराव's picture

24 Nov 2010 - 10:02 pm | अर्धवटराव

नितीश कुमारांचे आणि रा.लो.आ. चे अभिनंदन. विकासाची तहान लागलेल्या बिहारी जनतेने नितीशकुमारांचे काम बघुन त्यांना दुसरा चान्स दिला. या सूज्ञपणाबद्दल बिहारी जनता देखील अभिनंदनास पात्र आहे.

आता राहिला मुद्दा कि महाराष्ट्रात असं काहि होईल कि नाहि... मला वाटतं, शक्यता कमी आहे. सगळ्यात मुख्य कारण म्हणजे लालूंची जी इमेज बिहार मध्ये होति/आहे तेव्हढी खराब इमेज महाराष्ट्रात काँग्रेस नेतृत्वाची नाहि. बिहारी जनता रा.ज.द. पेक्षा "लालूंना" कंटाळाली होती. महाराष्ट्रात काँग्रेस एक पक्ष म्हणुन सक्षम आहे. इथे पक्षाला एकच एक चेहरा नाहि कि ज्याच्या विरोधात मते एकजूट व्हावीत. दुसरं असं कि बिहारमध्ये "लालूंचा काटा काढायला नितीश" असं समीकरण जमलं. महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा असा कोण नेता आहे कि ज्याच्यावर महाराष्ट्राने विश्वास ठेवावा ?? तीसरं कारण काँग्रेस पक्षाची रा. काँग्रेससोबत असलेली युती. हे दोन पक्ष आपापसात कितीही लट्ठालट्ठी करोत, पण दोघांपैकी कुणी एकाने जरी थोडं चांअगलं काम केलं तरी फायदा त्यांच्या युतीला होतोच. मराठी जनता काँग्रेसशी नेहमीच प्रामाणीक राहिली आहे आणि शरद पवारांची इमेज चांगलीच आहे. ह्म्म्म... आता जर एव्हढ्यात महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर कदाचीत भा.ज.प.-सेना युतीला बिहार मधल्या निकालांचा थोडा फायदा झाला असता... तसही "आदर्श" वगैरे प्रकरण मराठी जनता बघतेच आहे.
असो.

अर्धवटराव