माझिया केसानो!!

रमणरमा's picture
रमणरमा in जे न देखे रवी...
24 Nov 2010 - 12:03 pm

"माझिया मना" या अप्रतिम कवितेचे कवी सौमीत्र यांची माफी मागून निर्लज्जपने माझी पाण्च्ट कविता येथे टाकत आहे.
अत्यंत चांगल्या कवितेची वाट लावली आहे ( ती पण नीट लावता नाही आलेली )
कविता वाचून डोके आपटून घ्यावेसे वाटल्यास दगड किवा भिंतीची सोय आम्ही करणार नाही. ते आपले आपन बघून घ्यावे.

माझिया केसानो सरळ व्हा ना,
माझिया मस्तकी तुमचा धिंगाणा...
तुमचा गुंता अन मला वेदना.... माझिया केसानो ||

माझिया केसां जरा चमक ना,
माझिया केसां जरा चमक ना,
घालवु कशी मी ही तुझी रूक्षता...
टकलि न मी वाढतोस तू
आवरू कशी मी ही तुझी दुर्दशा!... माझिया केसानो ||

माझिया केसा तुला धुते ना,
माझिया केसा तुला धुते ना,
सांजवेळी रोज तेलही लावेन ...
रात्रित ते तुम्ही पिऊन घेणे
सकाळी येईल मस्त मउपणा... माझिया केसानो ||

माझिया केसानो सरळ व्हा ना,
माझिया मस्तकी तुमचा धिंगाणा...
तुमचा गुंता अन मला वेदना.... माझिया केसानो ||

शृंगारहास्यकरुणकविता

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Nov 2010 - 12:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वृत्तात थोडा मार खाल्ला आहेत, पण विषयनिवड आवडली.

माझिया बटा, सरल नाही ना असा काही प्रयत्न करून पहा.

मला आता हा धागा परत एडीट कसा करता येईल.. परत सगळी कविता लिहावी लागेल काय नवीन धागा उघडून ?

मेघवेडा's picture

24 Nov 2010 - 2:13 pm | मेघवेडा

वृत्तात थोडा मार खाल्ला आहेत, पण विषयनिवड आवडली

असेच म्हणतो! छान!

रमणरमा's picture

24 Nov 2010 - 12:17 pm | रमणरमा

छान सूचना.. ! धन्यवाद !
छान सूचना.. ! धन्यवाद !

आणि थोडा कसला हो व्याकरण वृत्त प्रकारात लहानपणापासूनच मार खाल्ला आहे..

चालायचेच...
( ही माझी सहीच करते आता..)