भवानी तीर्थंकरच्या डायरीतील एक पानः
लक्षवेधी: हे डायरीतील एक पान आहे. त्यामुळे इथे छायाचित्र टाकता येणार नाही. वास्तविक शाहीदला ते हवं होतं, पण डायरीतल्या पानासोबत छायाचित्र म्हणजे संपादकीय (तेच ते, अग्रलेख किंवा उग्रलेख) चौकटी असं वाटायला नको, असं आमच्या पत्रकार मित्राचं मत झालं. त्याच्या मते ही शाहीदची (फुकट) जाहिरातही झाली असती, सबब छायाचित्र का नाही यावर वाद न घालणंच बरं, कसें?
लक्षवेधी संपली, डायरीतले पान सुरू ...
---------------------------------------------------
स्थळः दक्षिण मुंबईतला एक पॉश बार.
आमचे एक पत्रकार मित्र आहेत; त्यांना काही बारबालकांवर अभ्यास करायचा होता. अर्थात विठ्ठलाला भेटायचं तर पंढरीत जावं लागतं, किंवा खरा सिंह पहायला गीरलाच जावं लागतं, तसं बारबालकांना भेटायला कुठे जाणार? मग प्रश्न आला, कारण या बारमधे एकट्या पुरूषाला जाता येत नाही, कारण एकतर हा शुद्ध स्ट्रेट बार आहे. दुसरं म्हणजे एकट्यादुकट्या पुरषाने जाणं म्हणजे कामपिसाट स्त्रियांच्या वखवखलेल्या नजरांना आमंत्रणच. फाटलेले कपडे सांभाळत, कण्हत कण्हत बाहेर यावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग माझा फोन वाजला. अलिकडे खरडी आणि प्रतिसादांचा धंदा मंद असल्यामुळे मलाही वेळ होताच. मी लगेच सहकार्य जाहीर केलं. तेव्हा मला कल्पनाही नव्हती की या नव्या विश्वात मी वेगळ्या, शरीराचा बाजार करणाऱ्या पण आतून खऱ्याखुऱ्या हाडामासाच्या माणसांनाच भेटणार होते.
---------------------------------------------------
आतमधे बर्यापैकी उजेड आणि वर लागलेलं ढणढणाट 'म्युझिक' आणि त्यावर कडी करणारे फ्लॅशसारखे दिसणारे डिस्को लाईट्स! डोळ्यांना सरावायला थोडा वेळच लागला. मग मी आणि मित्र एक टेबल पकडून बसलो. मुंबईतल्या बारमधे जाण्याची माझी पहिलीच वेळ; या आधी फक्त सायबाच्या देशातल्या पब आणि बारमधेच गेल्यामुळे मी थोडी बुजलेच होते. तेवढ्यात माझ्या शेजारी एक हँडसम म्हणावा असा पुरूष येऊन बसला. हा बहुदा माझ्या मित्राच्या ओळखीचा असावा, आता याच्याकडून कोणा बारबालेशी ओळख होईल अशी मी समजूत करून घेतली. मी किती सेक्सिस्ट आहे, माझ्यात जेंडर बायस किती भरलेला आहे याची मला एवढ्या चटकन जाणीव होईल असं मला वाटलं नव्हतं. दोन मिनीटांपूर्वी 'काय हँडसम आहे ना हा' असा मी ज्याच्याबद्दल विचार केला होता त्यालाच भेटायला आम्ही आलो होतो हे संवादांतून दोन मिनीटांत माझ्या लक्षात आलं. सवयीप्रमाणे त्याने मुलाखतकाराला टाळले आणि माझ्याशेजारीच खुर्ची ओढून बसला. खरंतर त्याच्या चेहेर्यावरचा आत्मविश्वास, शांतपणे माझ्याशेजारी येऊन बसणं, त्याची पिळदार शरीरयष्टी ... मी त्याला पाहिलं आणि ... आणि अशी मुलं माझ्या वर्गात कधी का नव्हती असाच विचार माझ्या डोक्यात आला. हे बरं होतं, म्हणजे एकतर मित्रावर उपकार केल्याचा आव आणायचा आणि वर पोरंही बघायला मिळतायत तर! उगाच का खोटं बोला, पण जीव खुळा होण्याचा मक्ता काय फक्त बारबालांच्या चाहत्यांनीच घेतलाय का? मुलाखतीला सुरूवात झाली होती. खरंतर त्याला त्या दिवशीची टिप, भाडं सगळंच माझ्या मित्राच्या मॅगझिनकडून मिळणार होतं. पण शाहीदच्या मनात काहीतर वेगळंच होतं. शाहीद कपूरच्या चेहेर्याशी साधर्म्य होतं म्हणून यानेही आपलं नाव शाहीद ठेवून घेतलं होतं. काय फरक पडतो मला, त्याचं नाव जॉन असेल नाहीतर शाहीद नाहीतर आणखी काहीतरी! एकूणच त्या बारमधे येणार्या इतर बायकांप्रमाणे त्याने माझ्यातही गिर्हाईक पाहिलं होतं. त्याचा काय दोष म्हणा यात, बारमधे येणारी प्रत्येक स्त्री म्हणजे त्याच्यासाठी पैशांचा स्रोत, फक्त पोट भरण्याचं साधन. बाप रे, काय हे जीवन होतं याचं!! एखादा माणूस समोर दिसला की कोणी अण्णा, कोणी चिमा, कोणी पिल्लू, कोणी काकू असे विचार माझ्या डोक्यात येतात आणि हा तर स्त्री दिसली की फक्त उदरनिर्वाहाचा विचार करतो. आणि उदरनिर्वाहासाठी काय तर समोरच्या गिर्हाईकाला खूष करायचं. आणि मग त्यासाठी रोज व्यायाम करायलाच पाहिजे, शरीर बेताल सुटलेलं असेल तर आकर्षक कसं असणार? रोज आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण दिसलंच पाहिजे, नाही तर कशाला ढुंकून पाहतील याची गिर्हाईकं याच्याकडे? मुलाखत सुरू होतीच, एकीकडे हा बोलत होता आणि माझ्या मनात मात्र त्याच्याबद्दल असणारं आकर्षण क्षणोक्षणी बदलत होतं. "कसला हँडसम आहे हा!" इथपासून "बिचारा, काय लाईफ आहे सालं याचं!" इथपर्यंत माझे विचार सुरू झाले होते. पण तरीही त्याच्याबद्दल एक विचित्र आकर्षण वाटत होतं हे खरं!
मुलाखत घेणार्या मित्राला बाजूला सारून मीच शाहीदशी गप्पा मारायला लागले होते. रोज शरीरसुखासाठी येणार्या स्त्रिया त्याच्याकडून काय काय कामं करवून घेत असतील याची मला कल्पनाही आली नसती. नवरा महिनोन-महिने घराबाहेर असतो, वेळेत लग्न झालं नाही, नवरा फार डॉमिनेटींग आहे म्हणून घरात कवडीची किंमत नाही, लग्न म्हणजे जबाबदारी आणि ती नको, किंवा उगाच गंमत म्हणून अशा अनेक कारणांसाठी तिथे येणार्या अनेकविध आकार, रूपांच्या स्त्रिया; पण सगळ्यांमधे एक गोष्ट कॉमन, "मी मालक आहे. मी पैसे मोजून तुला आत्ता विकत घेतलं आहे" ही बॉसी भावना! आणि या वर्चस्व गाजवण्याच्या वृत्तीमधून शाहीदला सहन कराव्या लागणार्या अनेक गोष्टी! हे सगळं ऐकून बारमधल्या गुबगुबीत खुर्चीवर, एसीत बसल्याजागी मला घाम फुटला की काय मला वाटत होतं.
एक मात्र होतं, कोरडेपणाने प्रश्न विचारणार्या माझ्या पत्रकार मित्रापेक्षा शाहीद माझ्याकडेच जास्त मोकळेपणाने बोलत होता. पैसे मोजून एक पत्रकार त्याच्या अंतःकरणाला हात घालू शकला नव्हता, पण सहजच आत्मीयतेने केलेल्या चौकशी आणि बोलण्यातून मी मात्र त्याच्या करूण कहाणीला हात घातला होता. "का रे करतोस हे सगळं नाही आवडत तर? घरी कोणी काही बोलत नाही का तुला? लग्न कसं होणार तुझं?" माझं मध्यमवर्गीय डोकं घरचे, लग्न, संसार यापुढे जातच नव्हतं. "लग्न ... त्यामुळेच तर सगळा प्रॉब्लेम झालाय!" आता मात्र मला सगळ्यात मोठा बॉम्ब माझ्यावर पडल्यासारखं वाटायला लागलं होतं. त्याने खिशातून तिचा फोटोच काढून दाखवला. "माझी बायको आणि मी एकाच ट्रेकिंग ग्रुपमधे होतो. तिच्या धाडसी स्वभावामुळेच मी तिच्याशी लग्न केलं. पण लग्नामुळे शिक्षण सोडून द्यावं लागलं. कमावतं कोणी नव्हतं ना घरी! मी एका कॉल सेंटरमधे ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. बायकोचंही शिक्षण सुरू होतं. तिला एयर होस्टेस बनायचं होतं. आणि तुला तर माहित असेल किती खर्च होतो आजकालच्या जगात. त्यातच माझे सासरे आजारी पडले. त्यात खूप खर्च झाला पण ते वाचले. आता फार हट्टी झाले आहेत ते! आता त्यांचं ऐकलं नाही तर ते व्हायलंट होतात आणि असं झालं की बायकोला सहन होत नाही. माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे, तिचं दु:ख मी पाहू शकत नाही. मग तिनेच उपाय दाखवला. खरंतर मला माझी चांगली नोकरी सोडायची नव्हतीच. पण काही पर्यायच नव्हता. सासर्यांचं आजारपण आणि बायकोचं शिक्षण यांच्यासमोर माझ्या नोकरीचं काय महत्त्व?" शाहीद बोलत होता आणि आम्ही दोघं आश्चर्यचकीत होऊन ऐकत होतो. चांगल्या घरातला मुलगा अशा मार्गाला लागला याचं वाईटही वाटत होतं, पण आम्ही काय करू शकणार होतो? 'स्टारकास्ट' मॅगझिनमधे सत्यशोधक या पदावर काम करणारा माझा मित्र आणि गेली पाचेक वर्ष फुटकळ नोकर्या करत फिरणारी मी, आम्ही किती शाहीदना मदत करू शकणार होतो? आयुष्यांच्या मशाली पेटवायला आमची हिंमत नव्हती, नाही हे निश्चित!
मी शाहीदला बोलतं केलं खरं, पण ते नकोसं होतं खरं तर. पत्रकार मित्राच्या प्रश्नांवर मग त्यानं तितक्याच तटस्थपणे या धंद्यातील प्रवेश, त्यानंतर आलेले अनुभव सांगण्यास सुरवात केली. आमचे हे मित्र ते टिपून घेत होते. मग शाहीदनं त्याच्या घरी येण्याचंही निमंत्रण आम्हाला दिलं. आपली कोणी मुलाखत घेतंय हेच त्याला इतकं भावून गेलं होतं की, तो आपल्या जिंदगीची सारी किताबच आमच्यासमोर खुली करत गेला. घरी त्याची पत्नी नव्हती, पण सासरे होते. खाटेवर पडून हातात रिमोट अशा स्थितीत ते होते. समोर टीव्हीवर फॅशन चॅनल सुरू होता. आपल्या पक्षाघाती अपंग पण तरीही हिरवट सासर्याला शाहीद मेतकूट-भात भरवत होता. भरवता भरवता त्याचाशी आपुलकीनं बोलत होता. मध्येच त्याच्या तोंडातून भातखिमट बाहेर येत होता तो पुन्हा चमच्याने नीट त्याला भरवत होता. म्हातार्याच्या चेह-यावर भावनेचा लवलेश नव्हता, अगदी या पोराबद्दल कृतज्ञताही नाही! इतक्या हाल-अपेष्टा सोसून फॅशन चॅनल साठी केबलवाल्याची दरमहा फी भरणे खायचे काम नाही! त्याकडे पहात शाहीदनं फक्त आमच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्यावेळी त्याच्या डोळ्यातील ते हजार सशांच्या व्याकूळतेला लाजवणारे भाव... आम्ही काही करू शकत नव्हतो पाहण्यापलीकडे. घरचं वातावरण अगदी मध्यमवर्गीय ते उच्चमध्यमवर्गीय. बोलता-बोलता शाहीदनं मग पत्रकार मित्राशी शेअर बाजाराचीही चर्चा केली. त्याची तिथं गुंतवणूक होतीच. भविष्यासाठी केलेली. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठीची. त्याला कम्प्यूटर इंजिनियर करायचं आहे असं तो म्हणत होता. मुलगा फर्स्ट क्लास मिळवतो म्हणाला. म्हणजे तसा इंजिनियर करायचं तर पैसे लागणारच हे त्यानं आत्ताच ओळखलं होतं. शाहीदला या विश्वातून बाहेर यायचं होतं का? असावंही. पण तो तसं स्पष्ट बोलत नव्हता. जिंदगी-जिंदगी काय असते शेवटी भवानी? असं तो मलाच विचारत होता आणि माझ्याकडे त्याचं काही उत्तर नव्हतं. पत्रकार मित्राकडंही उत्तर नव्हतंच.
मी ते दृष्य पाहात होते... भारावून गेले... मोठ्यांबद्दल आदर, प्रेम, विश्वास या नवीन पिढीत नाही असं कोणी म्हातारे मला सांगायला लागल्यावर मला शाहीदचीच आठवण यावी. या विचारांतून माझी तंद्री भंगली. मिश्कील चेहेर्याने शाहीद मला विचारत होता, "तुलाही आहे का अॅडव्हेंचरस लाईफची आवड?"
बरंच काही लिहीण्यासारखे अनेक विषय डोक्यात असतात. पण असा एखादा शाहीद असा चमकून जातो आणि मग लिहावंसं वाटतं. बाकीचे विषय पुन्हा कधीतरी.
आभारप्रदर्शन: डायरीतले पान इथे टाकण्यात मदत करणार्या सर्व आयडी श्रावण मोडक, बेसनलाडू आणि राजेश घासकडवी यांचे आभार.
प्रतिक्रिया
16 Nov 2010 - 11:39 pm | मृत्युन्जय
खुपच चटका लावणारी करूण कहाणी. थोड्या फार पैशासाठी आजचे तरूण कुठला मार्ग अनुसरतील काही सांगवत नाही.
बादवे शाहीदकडे होंडा सिटी होती का?
16 Nov 2010 - 11:55 pm | चिगो
असेच म्हणतो... बाकी ह्याआधी वाचलेल्या अश्याच एका आणि ह्या कहाणीत "शाही" हा लसावि आहे...
अवांतर : "न" चा "द" होतो आजकाल... काका, मामा, आत्या, आजोबा ! अहो, कुणीतरी मला वाचवा !!
16 Nov 2010 - 11:48 pm | पैसा
आणि "पाशवी" वर्णन!
17 Nov 2010 - 12:05 am | सुहास..
रि डि क्यु ल स !!
आभारप्रदर्शन: डायरीतले पान इथे टाकण्यात मदत करणार्या सर्व आयडी "श्रावण मोडक"
JUST CANT BELIEVE IT !! जर ते खरे असेल तर !! मो अ र रि डि क्यु ल स !!
ठराविक प्रतिसांदकांना ( चमचा हा शब्द शोभणार नाही म्हणुन टाळलाय ) शुभेच्छा !!
असो, सुहाश्या, एस्कलेट टु आंत'रजा'लीय लाईफ !!
16 Nov 2010 - 11:59 pm | रेवती
बिच्चारा शाहिद!
17 Nov 2010 - 12:00 am | बेसनलाडू
कहाणी करुण आणि तरुण दोन्ही आहे. वातावरणनिर्मिती चांगली साधली आहे नि व्यक्तीनिर्मितीही. यावर नक्कीच एखादा चित्रपट काढता येईल!
(निर्माता)बेसनलाडू
17 Nov 2010 - 12:05 am | शुचि
हट के!
17 Nov 2010 - 12:39 am | प्रशु
तात्या नेहमी 'त्या' विश्वातल्या स्त्रियांबद्दल लिहितात तसाच हा 'त्या' विश्वातल्या पुरुषांबद्द्लचा लेख, सत्यस्थिती कुठेही नाटकीपणा न होता लिहिल आहे. शाहिद बद्द्ल किती हि वाट्लं तरी आपण काहिच करु शकणार नाहि हे सत्य..
17 Nov 2010 - 12:43 am | राजेश घासकडवी
भवानीताईंची संपूर्ण डायरी वाचायला आवडेल :) निदान काही पानं तरी अशीच अधूनमधून टाकत जा.
17 Nov 2010 - 1:25 am | मुक्तसुनीत
लेख वाचून पडलेले काही प्रश्न :
१. या लिखाणाचा विषय असलेल्या व्यक्तीसारख्या व्यक्ती या व्यवसायात आपखुषीने उतरलेल्या असतात काय ? बळजबरीने उतरल्या असल्यास , अशी नेमकी काय समस्या असेल की निव्वळ शरीरविक्रय करूनच सोडवता येईल ? आपखुषीने उतरल्या असतात त्यांच्या बाबतच्या उत्तानपणाचे नुसते वर्णन करण्यात आणि फोटो न देण्यात नेमके काय श्रेयास्पद आहे ?
२. इतकी जवळीक प्रस्थापित केली तर आपण चुम्म्माचाटी का केली नाही ?? या प्रश्नांसारखे प्रश्न पडले काय ? पडले नसल्यास का पडले नसावेत ?
17 Nov 2010 - 1:34 am | शुचि
मुक्तसुनीतांना पडलेले प्रश्न वाचून माझं डोकं गरगरायला लागलं आहे.
इतका वेळ मी कहाणी अतिरंजीत आणि मनोरंजनाचा विषय, बनावट कहाणी म्हणून समजत होते.
असं खरच असेल तरी का? भारतात बायका अशा खुल्लमखुल्ला बारमध्ये जातात का? बरं बार नाही तर त्या फोन करून अशा "जिगोलो" का काय ना भारतात बोलावतात का? आय सिंपली कॅन नॉट बिलीव्ह इट.
17 Nov 2010 - 1:39 am | मुक्तसुनीत
http://www.misalpav.com/node/14229
अवांतर : शुचिताईंच्या उपरोक्त प्रतिसादानंतर प्रस्तुत धाग्यातल्या विनोदाच्या नावाने श्रद्धांजली वाहणे हे मी माझे कर्तव्य समजतो. (दोन मिनिटे शांतता.)
17 Nov 2010 - 2:22 am | आळश्यांचा राजा
आमचेही दोन मिनिटे मौन!
(डोक्याला स्टन गन लागली!)
17 Nov 2010 - 1:26 pm | सूड
+१
17 Nov 2010 - 2:24 am | शुचि
कळलं मला कळलं तुमचा प्रतिसाददेखील उपरोधीक होता :) :) :)
खी: खी:
आय अॅम सच्च अ ट्यूबलाईट
17 Nov 2010 - 2:26 am | चित्रा
प्रस्तुत धाग्यातल्या विनोदाच्या नावाने श्रद्धांजली वाहणे हे मी माझे कर्तव्य समजतो. (दोन मिनिटे शांतता.)
माझीही श्रद्धांजली.
17 Nov 2010 - 10:04 am | मृत्युन्जय
तो विनोद होता हे मान्य. पण सत्यपरिस्थिती पण अशीच असु शकते यावर तुमचा विश्वास का बसु शकत नाही. कविता महाजनांच्या ग्राफिटी वॉल मध्ये याहुन भन्नाट गोष्टी समोर येतात. एकदा वाचाच.
17 Nov 2010 - 1:57 am | प्रियाली
लेख आणि शुचितैंचा प्रतिसाद नं.२ भारी आवडले.
17 Nov 2010 - 2:08 am | सुनील
मिपावरील शीर्षकसूचकतेचा पायंडा न पाळल्यामुळे शुचितैंना पडलेले "गंभीर" प्रश्न निर्माण होतात.
इडंबन आवडले हेवेसांनल!
17 Nov 2010 - 2:13 am | मुक्तसुनीत
मिपावरील शीर्षकसूचकतेचा पायंडा न पाळल्यामुळे
म्हणजे काय ते जरा समजावून सांगा राव ! :-)
17 Nov 2010 - 2:28 am | सुनील
हॅ हॅ हॅ !!!
आता हे आम्ही तुम्हाला समजावून सांगायचे म्हणजे .......
17 Nov 2010 - 2:31 am | प्रभो
मुसुंना आजकाल बर्याच गोष्टी समजावून सांगाव्या लागताहेत.. ;) काय म्हणता मुसु?
17 Nov 2010 - 2:44 am | मुक्तसुनीत
- "ऑब्सोलीट"ली राईट !
17 Nov 2010 - 2:24 am | इनोबा म्हणे
भवानी, व्यक्तीचित्र आवडले...!
अजून येऊ दे.
भवानीभक्त
- फिलीप
17 Nov 2010 - 2:18 am | आळश्यांचा राजा
लेखिकेच्या प्रामाणिकपणाविषयी शंका घेण्याचा हेतू नाही (तो किती आहे त्याविषयी शंकाच नाही)
तथापि
केरसुणीनं समुद्राच्या लाटा परतवण्याचा केविलवाणा प्रयत्न
करण्याची वेळ प्रस्तुत प्रसंगात आली की नाही, त्याचे काय झाले, इ. बाबी स्पष्ट न झाल्यामुळे लेख वास्तवतेला धरुन वाटत नाही हे स्पष्टपणे आणि नम्रपणे नमूद करतो.
(आंबटशौकीन)
17 Nov 2010 - 2:22 am | मुक्तसुनीत
लेखिकेच्या प्रामाणिकपणाविषयी शंका घेण्याचा हेतू नाही = लेखिकेच्या अप्रामाणिकपणाविषयी शंका घेण्यास जागा नाही
;-)
17 Nov 2010 - 2:26 am | आळश्यांचा राजा
स्टन गन लागल्यामुळे काही समजले नाही. (जाऊ द्या. काहीही आंबट डिटेल्स, फोटो इ. नसल्याने मजा नाही. पांचट लेख.)
17 Nov 2010 - 3:01 am | भाकरी
अदितीताई, तुम्हारा चुक्याच. तात्याची खेचायला गेलात आणि बिचार्या बारबालाना वेडावून दाखवलंत.
- (विषण्ण) भाकरी.
17 Nov 2010 - 3:02 am | अडगळ
बार . वेश्या . दारु.
असलेली ( किंवा मुद्दाम नसलेली )आंबटचिंबट वर्णने. साधलेले हुकलेले चान्स.वास्तव हे नेहमी इतकं बटबटीत आणि एकपदरीच कसं काय असू शकतं ? आयुष्यातले सात्विक , राजस अनुभव मांडणे हे तर जणु पापंच झालं आहे.
या भांगेत तुळशी सारखी उगवलेली ही कविता आठवते .
साहित्य हे असं असतं राजा.
साबुदाण्याच्या खिरीसारखा दाट समुद्र,
चवीपुरतं टाकून मीठ त्यात ,
मी देतोय माझ्या आत्म्याचा अर्घ्य .
लालभडक सोवळ्यातल्या सूर्याचं शीर्षासन,
पाखरांची फडफड शुभं करोती,
चुकार चकती बटाट्याची , भरकटावी तेलात जणू , तसा चंद्र ,
हे सारं मिसळो माझ्या आत्म्यात आणि
आणि दिगंतातून घुमू दे तो सोहम नाद:
"येथे उपासाच्या कचोर्या मिळतील".
17 Nov 2010 - 4:46 am | आंसमा शख्स
का वेळ वाया घालवता असा? खुदा तुमच्या लिखाणाला चांगला रस्ता देवो
17 Nov 2010 - 8:02 am | शहराजाद
:) 'आयुष्यांच्या मशाली ' शब्द काळजाला भिडला. आडवाटेला जाऊनही माणुसकीचा शोध घेण्याची तुमची तळमळ त्यातून प्रतीत होते.
17 Nov 2010 - 9:07 am | मिसळभोक्ता
आपला हा प्रांत नाही. जे जमत नाही, त्यात डोके घालू नये, डोक्याचे खोबरे होते, आणि कोकणस्थांनाच फक्त खोबरे आवडते. देशस्थ मात्र शेंगदाणे घालतात.
तेव्हा, नथूरामप्रेमींना हक्काचे एक ग्राऊंड आहे त्यावर असा कब्जा करू नये, ही नम्र विनंती !
(नुकतेच काही वाचलेले: हल्ली काय, पाऊस कधीही पडतो, सेंचुरी कुणीही मारतो, व्यक्तिचित्रे कुणीही लिहितो!)
17 Nov 2010 - 9:59 am | daredevils99
कोकणस्थांनाच फक्त खोबरे आवडते
असहमत. कारण खोबरे महाग असते आणि म्हणून कोकणस्थ ते क्वचितच ते वापरतात!
(कोकणात राहून मासे आणि खोबरे न वापरणारी ही जमात तशी विचित्रच)
17 Nov 2010 - 5:07 pm | वारकरि रशियात
?
सद्यस्थितीत दोन्ही (!) निरीक्षणांशी असहमत.
बाकी चालुद्या !
17 Nov 2010 - 1:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण तेंडूलकर आणि सेहवाग स्वस्तात औट झाल्यावर नेहेरालापण कधीकधी बॅट हातात धरावी लागते ना!
17 Nov 2010 - 1:22 pm | मिसळभोक्ता
तुला नेहरा नाही, हरभजन म्हणायचे असेल. असो. भावना पोचल्या.
17 Nov 2010 - 1:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही हरभजन म्हणत असाल तर मला थोडा आनंद निश्चित झाला.
17 Nov 2010 - 1:42 pm | ब्रिटिश टिंग्या
दाढी असलेली अदिती पगडी घालुन कशी दिसेल ह्या विचाराने अंमळ हॅ हॅ हॅ करुन घेतले :)
17 Nov 2010 - 9:09 am | कवितानागेश
'भवानी ' या नावाबदल म्हणतेय गं!
...एकदम रिअलिस्टिक!
17 Nov 2010 - 10:10 am | विजुभाऊ
या शाहीद वर जर आअणखी रौशनी टाकली तर बरे होईल
लेखाची सुरुवात " आओ विक्षीप्त तै कैसे हो. बौत दिनोसे तैम नै मिल्या ऐसा दिख्ताय" असे बोलत असतानाच
"ए भाड्यानो दिख्ता नै क्यारे इदर अच्चे म्हैमान बी अत्ये हय " असे म्हणत त्याने खिडकीतून डोकावणार्या अनाम चेहेर्याना हाकलत त्याने एक बसल्याबसल्याच एक पिंक टाकली आणि पानाचे तबक माझ्या पुढे सरकावले " लो पान लो. अच्चा हय मघई , खुशबु डालेल्या हय"
अशी काही जोरदार सुरुवात करायला हवी होती. ;)
17 Nov 2010 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
17 Nov 2010 - 10:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
... पण एवढं घाऊक लिहीणं जमलं असतं तर आत्तापर्यंत मराठी आंतरजालावरच लेखक म्हणून नाव नसतं का कमावलं?
17 Nov 2010 - 1:54 pm | अर्धवट
खरंय... पुढचा लेख विजुभाऊ पाडतायत बहुतेक..
17 Nov 2010 - 10:14 am | सूर्य
:)
- सूर्य.
17 Nov 2010 - 10:45 am | बिपिन कार्यकर्ते
हॅहॅहॅ!!!
17 Nov 2010 - 11:19 am | परिकथेतील राजकुमार
झकास जमून आलाय लेख. आणि तुमच्या बिनधास्त सगळं कबूल करण्याच्या हिमतीला सलाम!
अशा परिस्थितीत स्वतःला आवरू कसं शकता तुम्ही? मोह भल्या-भल्यांची विकेट उडवतो. आणि 'असा' नशा आणणारा मोह टाळणं सोपं नव्हे. धन्य आहात तुम्ही!
च्यायला, आमच्या व्यवसायात आम्हाला पुफाट्यावरचे सिक्युरिटी गार्ड गुरकावून नजर वळवायला लावतात किंवा मॅनेजर संगणकात डो़कं घालून मेंदूचा भुगा करायला लावतात. (मी सॉफ्टवेअर इंजिनीअर नाही; सायबर कॅफेवाला आहे; म्हणजे कि-बोर्ड फायटर; चांगल्या संधी असतील तर कृपया सांगा. कि-बोर्ड फायटिंग मध्ये बरं का....)
बाकी तुम्ही जे लिहिलं आहे ते सगळ्यांच्याच मनात असतं; ते उघड सांगण्याचं डेअरिंग मात्र खूप थोड्या लोकांमध्ये असतं.
17 Nov 2010 - 1:31 pm | सूड
कुमच्याने नदीची वाट अडवणं हे फार्फार थोड्या लोकांना जमतं !!
17 Nov 2010 - 11:53 am | नंदन
अयाई गं! हे असलं काही असतं हे आत्तापर्यंत्त ठाऊक्कच नव्हतं. दारुण शहीदची करूण कहाणी वाचून डोळे पाणावले.
17 Nov 2010 - 11:59 am | सहज
सहमत.
दुर्दैवी शाहीदला काही मदत हवी असेल तर जरुर सांगा जसे त्या वृद्ध व्यक्तिला वैद्यकिय उपचारासाठी काही आर्थीक मदत इ. तुमच्या सारख्यांमुळेच आम्हाला अश्या वेगळ्या विश्वाची ओळख होते.
17 Nov 2010 - 1:18 pm | मिसळभोक्ता
शाहीद हा जर मिपाचा एक सदस्य असता, तर त्याला झालेल्या ह्या कर्करोगासाठी मिपासदस्यांकडून काही मदत (३ टक्क्याच्या बोलीवर) मिळवता आली असती.
18 Nov 2010 - 12:15 pm | कुंदन
खरच करणार आहात मदत ,की उगाच आपला हिरवा माज ? ;-)
17 Nov 2010 - 12:15 pm | मनीषा
वा !!!
आकाशावर रोखलेली दुर्बीण थेट भवानीच्या डायरीत ....!
सुरेख अनुभवकथन .
( अजुन काही डायरीची पाने वाचायची उत्सुकता आहे - आहेत का तुमच्याकडे ? )
17 Nov 2010 - 12:39 pm | स्वाती दिनेश
करुण कहाणी!
या वेगळ्या जगाची 'दुसरी बाजू'डायरीच्या ह्या पानातून दिसली.
स्वाती
17 Nov 2010 - 2:05 pm | आदिजोशी
आदिती ताई तुम्ही खरंच महान आहात. आम्ही तुमचे आणि तुमच्या लिखाणाचे फॅन झालो.
आम्ही पापभिरू माणसं आयुष्यभर आपल्या कोषात वावरतो. पण जिथे जायचा आम्ही साधा विचारही करू शकत तिथे तुम्ही गेलात आणि त्या विश्वाची सफर आम्हाला घडवून आणलीत त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
शाहीदची परवानही घेऊन (त्याचं आयुष्य म्हणजे खुल्ली किताब अथवा ओपन कार्ड असल्याने) त्याचा एखादा फोटो टाकला असतात तर बरं झालं असतं.
18 Nov 2010 - 12:18 pm | कुंदन
>>त्याचा एखादा फोटो टाकला असतात तर बरं झालं असतं.
त्याच बरोबर मेतकूट-भात ची पाकृ आणि मेतकूट-भात चा फोटु देखील.
नो फोटु , नो प्रतिसाद.
17 Nov 2010 - 2:27 pm | मन१
आँ?!
(शा) हीन दर्जाचं लिखाण विक्षिप्त बै.....
17 Nov 2010 - 2:32 pm | चांगभलं
चान ......
विक्षिप्तपणा ओसंडून वाहतोय......
17 Nov 2010 - 2:59 pm | सुधीर काळे
अदिती,
ललित लेखन हा माझा प्रांत नव्हे, पण आज बर्याच दिवसांनी तू लिहिलेस म्हणून उघडला.
हा तुझा लेख मला खरोखर अगदी मनापासून आवडला. त्यातही या 'नोकरी'त (कीं 'धंद्या'त) बायकोच्या सांगण्यावरून तो पडला यातली कारुण्याची झालरही जाणवली. तात्यांच्या 'पूर्वी'च्या कांहीं 'प्रथम-पुरुषी-एक-वचनी' लेखांची आठवण झाली!
शीर्षकावरून आधी कळले नाहीं कीं हा लेख खरंच करुण आहे कीं एकाद्या विडंबनाला तू असे शीर्षक दिले आहेस. पण खरंच विचार करायला लावणारा लेख आहे. शेवट जरासा अचानक (abrupt) वाटला. मला वाटते की तू या लेखाची एक sequel लिहावीस.
लेख वाचताना का कुणास ठाऊक श्रावण मोडकांची आठवण येत होती ती शेवटची ओळ वाचल्यावर खरी ठरली.
कांहीं वाक्यं काळजाला स्पर्शून गेली:
"आयुष्यांच्या मशाली पेटवायला आमची हिंमत नव्हती, नाही हे निश्चित!"
"त्याच्या डोळ्यातील ते हजार सशांच्या व्याकूळतेला लाजवणारे भाव... "
"मोठ्यांबद्दल आदर, प्रेम, विश्वास या नवीन पिढीत नाही असं कोणी म्हातारे मला सांगायला लागल्यावर मला शाहीदचीच आठवण यावी."
असंच कारुण्याची झालर असलेले लिखण कर. तुझी लेखनशैली मस्त आहे.
18 Nov 2010 - 12:25 pm | श्रावण मोडक
आता तुम्हीच "का कुणास ठाऊक" म्हटल्यानं माझी आठवण का झाली असे विचारण्याचीही सोय नाही राहिली.
21 Nov 2010 - 3:14 pm | सुधीर काळे
तसे नाहीं हो! या लेखनाच्या शैलीत मला तुमच्या लेखनशैलीचा भास झाला. पण नेमके कुठल्या वाक्याने किंवा उल्लेखाने तसे वाटले यावर बोट ठेवता आले नाहीं म्हणून मी तसा 'मोघम' उल्लेख केला व आताही करतोय्.
अदितीची शैली छानच आहे व अस्सलही आहे, पण कुठल्या तरी उल्लेखाने तुमची आठवण झाली हे मात्र खरे. कदाचित तो तुमचा नक्षल्यांवरचा लेखही असेल.
21 Nov 2010 - 6:57 pm | ज्ञानेश...
या लेखनाच्या शैलीत मला तुमच्या लेखनशैलीचा भास झाला
हे वाचल्यावर श्रामोंचा चेहरा कसा झाला असेल याची कल्पना केली. :D
17 Nov 2010 - 3:30 pm | सविता
चान चान....
17 Nov 2010 - 3:44 pm | गणेशा
जगातील एक खरी बाजु मांडली आहे तुम्ही..
असी माणसे खुप आहेत .. त्यांच्या आयुष्याची चित्रे पण खुप वेगवेगळी आहेत ...
17 Nov 2010 - 3:59 pm | ऋषिकेश
वा वा वा! शाहिद सारख्यांचं जीवन आम्हाला तुमच्यामुळेच कळतं, भवानीतै! (गेले आले अशी क्रियापदे असल्याने मुळ लेखिकेला तै म्हटले आहे मात्र भवानी तै/काकु नसून काका/दादा/आजोबा असल्यास माफी मागतो)
भवानीतैंच्या डायरीतील अजून पानं येऊ देत.. त्यांच्या अनुभवविश्वाची व्याप्ती पाहिली की आश्चर्य वाटतं
17 Nov 2010 - 5:01 pm | कवितानागेश
इतक्या करुण, काळजाला हात घालणार््या गोष्टी लिहिणार्या आपल्या लाडक्या लेखिका भवानीताई यांचीच एकदा मुलाखत घेउन इथे छापण्याची माझी फारफार इच्छा आहे.
तरी "सर्व आयडी श्रावण मोडक, बेसनलाडू आणि राजेश घासकडवी" याना 'जाहीर विनंती' आहे, की तमाम मिपाकर वाचकांच्या प्रेमाखातर त्यानी माननीय भवानीताईंना, त्यांच्या अशाच अनेक जगावेगळ्या अनुभवांशी मिपाकरांची ओळख करुन देण्याबद्दल, मुलाखतीसाठी आग्रहपूर्वक निमंत्रण द्यावे.
17 Nov 2010 - 5:36 pm | प्रीत-मोहर
हॅहॅहॅ
18 Nov 2010 - 12:00 pm | नीधप
आदितीबैंना दंडवत!!
21 Nov 2010 - 7:15 pm | अविनाशकुलकर्णी
गिगोलो