जयश्रीताईंची सांज ही अशी थांबली आणि आम्हाला आमची लांबलेली (गुलाबी) सांज ही अशी आठवली -
लांबलेली सांज,
कातरवेळ...
मनात तीच..
तशीच नेहमीसारखी !
तेच जीवघेणं मौन ,
तीच नजर करारी.
त्या नजरेची दहशत,
ते गर्भगळीत होणं...नकळत !!
ते बहाणे, ती धडपड, ती धडधड...
लवकर कल्टी मारण्यासाठी.
मग कबुली, ते न पटणं, समजून न घेणं
मी फिक्सर, ती हिटलर ....
सार्या संध्येचा विसर !
बागेतलं भटकणं,
पावसातलं भिजणं,
बारमधलं रमणं,
शर्टावरल्या गुलाबी खुणा....
...
..
अन् अचानक...
अचानक तिचं प्रकटणं ..
मग तिचं अस्तित्व,
खरं, वास्तवातलं
कानफटातलं, बुक्क्यांतलं !
तो पाऊस, ती बाग, त्या शर्टावरच्या खुणा,
सारं काही पोरकं,
तिच्यासमोर !
आता लाथ कमरेत,
सामान बॅगेत
आणि रात्र.... रात्र घराबाहेर अंगणात !
प्रतिक्रिया
13 Nov 2010 - 8:26 pm | राघव
हा हा हा.. च्यायला... भारी हो!
अवांतरः आता एक फर्मास कविता, रचना येऊं द्यात साहेब.. बरेच दिस झाले तुमची रचना वाचून! :)
16 Nov 2010 - 2:11 pm | गणेशा
छान आहे ...
16 Nov 2010 - 5:01 pm | गवि
:-)