आज नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी.
गांधीवधाबद्दल नथुराम यांना फाशी दिले गेले. गांधी हे अहिंसेचे पूजक, समर्थक व प्रसारक. 'डोळ्याला डोळा' या न्यायाने सगळे जग आंधळे होईल असा युक्तिवाद गांधीवादी 'हिंसेला हिंसा हे उत्तर नाही' याचे समर्थनार्थ करतात.
फाशी म्हणजे हत्या हे समजत असतानाही नथुराम गोडसे यांना फाशी का दिली गेली? तो न्यायालयाचा निर्णय होता असा युक्तिवाद कदाचित गांधीवादी करतीलही, पण एकाही गांधीवाद्याने या फाशीला अक्षेप घेतला नाही, त्याविरुद्ध आंदोलन केले नाहीवा कुणी आमरण उपोषणासही बसला नाही हे सत्य आहे.
आपल्याच तत्त्वाच्या विपरीत वर्तन अहिंसावाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय नेता असल्याने त्याच्या वधकर्त्याला वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता? (मला कम्युनिष्टांचे ब्रीदवाक्य आठवले - " ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल")
ही फाशी म्हणजे अहिंसेचा पराभवच नाही का?
हा चर्चा विषय हा नथुरामला झालेली फाशीची शिक्षा आणि त्या शिक्षेस अनुसरून अहींसेचे तत्वज्ञान या संदर्भात आहे. त्यावर सभासदांनी चर्चा करावी. इतर अति-अवांतर आणि भडक असलेले सर्व प्रतिसाद तात्काळ उडवले जातील याची नोंद घेण्यात यावी ही विनंती. - संपादक मंडळ
प्रतिक्रिया
15 Nov 2010 - 11:42 pm | शिल्पा ब
गांधी होते तोपर्यंतच त्यांचा गांधीवाद अस्तित्वात होता...आता नुसताच वाद उरलाय..सगळाच आनंद
गोडसेंना श्रद्धांजली.
16 Nov 2010 - 11:30 am | गांधीवादी
बरोबर बोललात ताई.
15 Nov 2010 - 11:54 pm | शुचि
एका व्यक्तीला शासन केले नसते तर अन्य कुणालाही शासन करता आले नसते. मग तुरुंग भरत राहणार का? कैदी पोसत राहणार का? ते कितपत शक्य आहे? हे काही प्रश्नदेखील त्या अनुषंगाने येतातच.
मी गांधीवधाचे समर्थन अथवा खंडन करत आहे असे नाही. पण एका वेगळ्या दृष्टीने विचार करता वरील प्रश्न मनात येतात.
16 Nov 2010 - 12:01 am | स्वानन्द
गांधीजीनी तुमच्या दृष्टीने विचार का नाही केला? इंग्रजांना शासन करायचे सोडून पोसावसं का वाटलं बरं त्याना!
16 Nov 2010 - 12:04 am | बेसनलाडू
तुरुंग भरायला लागू नयेत किंवा कैद्यांना पोसायला लागू नये म्हणून देहदंडाची शिक्षा गरजेची आहे, असा काहीसा तुमच्या प्रतिसादाचा सूर दिसतो आहे. प्रतिसादाचा मूळ उद्देश तो नसेल, तर लिहिण्यावरून तरी तो तसा प्रतीत होत आहे. मी या विचाराशी असहमत आहे.
(असहमत)बेसनलाडू
अॅम्नेस्टी इन्टरनॅशनलने येथे म्हटल्याप्रमाणे जगातील ६६% पेक्षा जास्त देशांनी देहदंडाची शिक्षा कायद्याने रद्दबातल ठरवली आहे. त्यात फ्रान्स, न्यूझीलन्ड, इटली, स्वित्झर्लन्ड, हॉलंड यांसारख्या देशांचाही समावेश आहे. हॉलंड, इटलीसारखे काही देश तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करता भारताच्या तुलनेत पिटुकलेच आहेत. पण त्यांच्याकडे तुरुंग कमी पडणे, कैद्यांना पोसावे लागणे वगैरे प्रश्न उद्भवल्याने देहदंडाची शिक्षा कायम ठेवल्याचे ऐकलेले नाही.
(दुवादार)बेसनलाडू
16 Nov 2010 - 12:08 am | शुचि
ह्म्म खरं आहे पण मग देहदंडाची शिक्षा ही "टूथ फॉर अ टूथ अँड आय फॉर अॅन आय" या न्यायाने देखील नसावी. समाजात रहाण्यास एखादी व्यक्ती लायक आहे की नाही हे कायदा ठरवत असावा. केवळ सूडभावना नसावी असे वाटते.
16 Nov 2010 - 12:23 am | बेसनलाडू
ज्या देशांत अजूनही देहदंडाची शिक्षा कायम आहे, तेथे ती सूडभावना किंवा कायदा अशा दोन्ही मार्गाने अस्तित्त्वात आहे. एखाद्याचा जगण्याचा मूलभूत अधिकारच हिरावून घेणार्याला जगायचा अधिकार नाही, हा युक्तीवाद सूडभावनेकडे झुकणारा वाटतो; तर कायद्याने अशी शिक्षा दिल्यावर समाज हिंस्र गुन्हे करण्यापासून परावृत्त होईल, असा युक्तीवाद जास्त संयत वाटतो. परंतु त्याच वेळी समाजाला गुन्ह्यापासून प्रवृत्त करण्यासाठी देहदंडाव्यतिरिक्त अन्य काही मार्ग आहेत का, याचाही विचार आवश्यक वाटतो.
विकिपिडियावर या दोन्ही बाजू स्पष्ट करणारा छोटेखानी लेख आहे. जरूर वाचावा.
(दुवादार)बेसनलाडू
ही चर्चा मूळ चर्चाविषयापासून फारकत घेणारी असल्याने, या विषयाशी संबंधित वेगळी चर्चा करण्यास प्रत्यवाय नसावा. या धाग्यावर मूळ विषयाला अनुसरून प्रतिसाद दिले जावेत, असे वाटते.
(मुद्देसूद)बेसनलाडू
16 Nov 2010 - 7:05 am | ए.चंद्रशेखर
कोणत्याही अपराध्याला देहदंडाची शिक्षा ही समाजातील इतर लोकांच्या मनात असे गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व या शिक्षेची दहशत त्यांच्या मनात बसावी म्हणून दिली जाते. नथुराम गोडसे सारखी व्यक्ती तर या शिक्षेला मनातून तयारच असते. त्या व्यक्तीला या शिक्षेचे काहीच महत्व वाटत नाही.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही शिक्षा न्यायपालिकेने देशाच्या प्रचलित कायद्यांप्रमाणे दिलेली होती. त्या शिक्षेने जे खरेखुरे अहिंसावादी असतील त्यांना काय वाटले असेल याचा संबंध जोडता येणार नाही.
16 Nov 2010 - 12:18 am | मिसळभोक्ता
ह्या निमित्ताने हिंसा म्हणजे काय, हे कळले तर उत्तम.
(उदाहरणार्थः अँटिबायोटिक घेणे म्हणजे हिंसा आहे का ?)
16 Nov 2010 - 12:57 am | Nile
अहो व्याख्या तिकडे ,इकडे फक्त काकु! ;-)
16 Nov 2010 - 12:30 am | प्रियाली
कदाचित गांधींनी फाशीच्या शिक्षेला अहिंसेतून वगळले असेल. काही तज्ज्ञ गांधींनी भगतसिंगाची फाशी थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत असे म्हणताना आढळतात. त्यावरून मला असे वाटले. ;)
16 Nov 2010 - 12:58 am | मिसळभोक्ता
(मला कम्युनिष्टांचे ब्रीदवाक्य आठवले - " ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल")
अर्थातच ! तरी आठवत होतो, हे कुठे ऐकले आहे ते.
16 Nov 2010 - 6:38 am | गांधीवादी
हिंसा आणि अहिंसा यातील सीमारेषा धूसरच नाही, तर माझ्या मते सीमारेषा हि अस्तित्वातच नाही.
नथुराम गोडसे जेव्हा महात्मा गांधीजींना गोळी मारत होता, तेव्हा जर कदाचित महात्मा गांधीजींच्या हातात बंदूक असती तर त्यांनी काय केले असते ? (संपादकांना नम्र विनंती, हे वाक्य जर अयोग्य वाटत असेल तर कृपया करून संपादित करावे, कोणाचाही अपमान करण्याचा उद्देश नाही)
16 Nov 2010 - 6:49 am | daredevils99
तर नथुराम शेपूट घालून निघून गेला असता.
बाकी आजच्या दिवशी त्याला लटकवला काय? माहित नव्हते. चांगला कोल्हापुरी तांबडा रस्सा वगैरे हाणून साजरा करायला पायजे दिवस. नाय?
16 Nov 2010 - 6:55 am | सुप्परमॅन
आवरा या लोकांना. उद्या एखादा सर्वभक्षी उठायचा आणि कसाबची पुण्यतिथी साजरी करायचा.
16 Nov 2010 - 3:49 pm | प्रियाली
कुणालाही मारणे हे स्पृहणीय नाही. तो कायद्याने गुन्हा आहे.
16 Nov 2010 - 10:36 am | नितिन थत्ते
गांधींच्या अहिंसेबद्दल प्रश्न विचारला आहे म्हणून गांधी स्वतः काय म्हणतात ते पाहिलेले बरे.
Even manslaughter may be necessary in certain cases. Suppose a man runs amuck and goes furiously about, sword in hand and killing anyone that comes his way and no one dares to capture him alive. Anyone who despatches this lunatic will earn the gratitude of the community and be regarded as benevolent man.
From the point of Ahimsa, it is plain duty of everyone to kill such man. The Yogi who can subdue the fury of this dangerous man may not kill him. But we are not here dealing dealing with beings who have almost reached perfection; we are considering the duty of the society, of the ordinary erring human beings.
He who refrains from killing a murderer who is about to kill his ward (when he cannot prevent him otherwise) earns no merit but commits a sin, he practices no ahimsa but himsa out of of a fatuous sense of ahimsa.
वरील विधान गांधींच्या My philosophy of Life या १९६१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातले आहे (पृ ४८-४९).
हे वाचल्यावर एक गोष्ट स्पष्ट आहे की 'आधुनिक भारताचे दधिची', 'प्रातःस्मरणीय', 'भारतरत्न', 'परमपूज्य' नथुराममहाराज गोडसे यांना फाशी देणे हे गांधींच्या तत्त्वाला अनुसरूनच होते.
बाकी आजच्या काळात फाशीची शिक्षा असावी की नसावी हा वेगळा विषय आहे. त्यावर वेगळा काथ्याकूट करूया.
(अवांतर : जसे चार्वाकाचे डिस्टॉर्टेड तत्त्वज्ञानच आता उपलब्ध आहे असे म्हणतात तसेच मराठी मध्यमवर्गीयांमध्ये गांधींचे तत्त्वज्ञान देखील डिस्टॉर्टेड स्वरूपातच सांगितले/ऐकले जाते. हा काथ्याकूट त्याचेच एक उदाहरण आहे).
16 Nov 2010 - 11:19 am | गांधीवादी
>>From the point of Ahimsa, it is plain duty of everyone to kill such man.
यह किसीभी आतंकवादी का अधिकार है, की वे यहाँ आये, हमे मरे, और यहांके अदालत में ही खुदको निर्दोष साबित करने के लिए सालोंसाल लढे. Then how can we kill him ?
एका आतंकवादीच्या मागे दरवर्षी ३१ कोटी रुपये. हे कोणत्या तत्वत बसते ?
>>मराठी मध्यमवर्गीयांमध्ये गांधींचे तत्त्वज्ञान देखील डिस्टॉर्टेड स्वरूपातच सांगितले/ऐकले जाते.
महात्मा गांधीजींच्या तत्वांचा चुथडा त्यांच्याच अनुयायांनी चालू केला आहे. त्यातून जनता काय बोध घेणार ?
सकाळ छायाचित्रसेवा
http://www.esakal.com/esakal/20100727/5291903974553732731.htm
http://www.esakal.com/esakal/20100727/4694592634251557274.htm
महात्मा गांधी कितीही काहीहि म्हणाले असतील तरी त्यांचे आजचे अनुयायी त्याचा उपयोग केवळ मते मागण्या करिताच करतात, आचरणात आणण्यासाठी नव्हे.
एकतरी नेत्याचे नाव कळू द्या ?
16 Nov 2010 - 11:19 am | नितिन थत्ते
सुसंस्कृत जगात खटला पूर्ण करून शिक्षा करण्याची पद्धत आहे. सालोसाल लागण्याविषयी म्हणाल तर तो प्रश्न तुम्ही त्याचे अपील दाखल करून घेणार्या उच्च न्यायालयाला* विचारला तर बरे.
(* सध्याच्या बजबजपुरीतून न्यायालयेच आपल्याला तारतील असाही एक पॉप्युलर समज मध्यमवर्गीयांत आढळतो).
16 Nov 2010 - 11:27 am | गांधीवादी
>>सुसंस्कृत जगात खटला पूर्ण करून शिक्षा करण्याची पद्धत आहे.
ज्या जगात खटल्याला २०-२५ वर्षे लागतात, आणि खटला पूर्ण होऊ सुद्धा फाशी होत नाही, त्या जगाला कोणते जग म्हणावे, सुसंस्कृत ?
एकूण आपल्या प्रतिसादातून आम्हाला आमचे उत्तर मिळाले,
>>Then how can we kill him ?
We can't kill him, we just have to wait till we die.
म्हणजे थोडक्यात 'त्यांचे' तत्वज्ञान आजच्या काळाला लागू पडत नाही तर.
16 Nov 2010 - 11:16 am | सर्वसाक्षी
ऐकुन फारच नवल वाटले.
हे जर गांधींचे खरेच मत असते तर जुलुमी इंग्रजांना कंठस्नान घालणार्या क्रांतिकारकांचा त्यांनी वेळोवेळी धि:क्कार का बरे केला? त्यांच्या फाशीचे समर्थन का केले?
हे प्रतिपादन गांधी गेल्यानंतर एक तप उलटुन गेल्यावर आलेल्या पुस्तकात आहे तर. असो.
16 Nov 2010 - 11:47 am | नितिन थत्ते
>>हे प्रतिपादन गांधी गेल्यानंतर एक तप उलटुन गेल्यावर आलेल्या पुस्तकात आहे तर. असो.
माझ्याकडे असलेली प्रत १९६१ मधली आहे. मूळ पुस्तक कदाचित आधी प्रसिद्ध झालेले असेल. मला माहिती नाही.
गांधींनी क्रांतिकारकांचा वेळोवेळी धिक्कार केला हे तरी खरे का? त्यांनी क्रांतिकारकांना वाट चुकलेले देशभक्त म्हटले होते.
फाशीचे समर्थनही त्यांच्या तत्त्वाला अनुसरूनच होते. ते स्वतःदेखील जेव्हा कायदेभंग करीत तेव्हा त्याबद्दल होणारी शिक्षा भोगायला तयार असत.
(कायदेभंगाची आणि असहकाराची खरी विचारसरणी सुशिक्षित भारतीयांना कळलीच नाही) :)
16 Nov 2010 - 3:59 pm | सर्वसाक्षी
<गांधींनी क्रांतिकारकांचा वेळोवेळी धिक्कार केला हे तरी खरे का>
गांधींनी अनेकदाच नव्हे तर सातत्याने क्रांतिकारकांचा धि़:क्कार केला आहे. गांधीप्रेमींनी वा सरकारी कृपाभिलाषींनी लिहिलेल्यांखेरीज पुस्तके वाचुन पाहा.
कुठेच काही मिळाले नाही तर सांगा, मी देइन.
16 Nov 2010 - 4:03 pm | नितिन थत्ते
गांधीप्रेमींनी वा सरकारी कृपाभिलाषींनी लिहिलेल्यांखेरीज पुस्तके वाचायची म्हणजे कोणती ते कळत नाही. म्हणून तुम्हीच सांगा.
अवांतरः पुस्तकांवरून एक जुनी रोचक चर्चा आठवली.
16 Nov 2010 - 8:35 pm | नगरीनिरंजन
विश्वास पाटलांच्या महानायक मध्ये हा स्पष्ट उल्लेख आहे. भगतसिंगांची फाशी रद्द करण्यासाठी रदबदली करण्यास गांधींनी नकार दिला.
शिवाय सावरकरांना काँग्रेसचे सदस्यत्व देण्यासही गांधींचा विरोध होता असे अत्र्यांच्या मी असा झालो मध्ये वाचल्याचे स्मरते.
16 Nov 2010 - 9:58 pm | नितिन थत्ते
या संकेतस्थळावर एका नाटकातील सावरकरांच्या पात्राच्या तोंडचे उद्गार संदर्भ म्हणून अस्वीकारार्ह असल्याचे ठरले होते.
17 Nov 2010 - 3:32 am | नगरीनिरंजन
खरं आहे. मी कसा झालो हे फिक्शन आहे हे मला माहित नव्हतं. क्षमस्व.
एवढंच काय, माझा मूर्खपणा इतका की मी महानायकला चरित्र समजत होतो.
असो.
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर वर दिलेल्या अहिंसेच्या व्याख्येप्रमाणे गांधींनी कोणती कृती केली हे मी विचारणार नाही. झाली तेवढी शोभा पुरे.
17 Nov 2010 - 7:48 am | नितिन थत्ते
मी कसा झालो याला मी फिक्शन म्हटलेले नाही. महानायकला म्हटले आहे. ती सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील 'कादंबरी 'आहे.
17 Nov 2010 - 7:52 pm | सर्वसाक्षी
निरंजन,
शांत व्हा. गेली अनेक वर्षे असे वाद चालु आहेत. आपण जालावरच्या तत्संबंधीत वादविवादांचा मागोवा घेतलात तर असे दिसते की गांधीवादाचे समर्थक हे त्यांना सोयीचा नसलेला इतिहास दृष्टीआड करतात.
महानायक हे पुस्तक केवळ कादंबरी आहे म्हणुन रद्दबातल. बरोबरच आहे, कारणं त्यातील उल्लेख यांच्या सोयीचे नाहीत.
मा. थत्ते साहेबांसारख्या सुजाण व्यक्तिला ना. सी. फडके यांच्या कादंबर्या आणि महानायक यातला फरक माहित नसावा असे वाटत नाही. पण अर्थातच ते 'कादंबरी' हा एकच शब्द धरतील.
आता 'महानायक' विषयी. या एका महानायकाचे जीवन शब्दबद्ध करणार्या कादंबरीच्या सुरुवातीचे लेखकाचे मनोगत जर वाचले तर लेखकाने 'कादंबरी' लेखना विषयी सुंदर विवेचन केले आहे (अर्थात जे सोयीचे नसेल ते सोडुन द्यावे....).
लेखकाने नेताजी व त्यांचे महान कार्य जनसामान्यांपुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी 'कादंबरी' हा प्रकार निवडला, अर्थातच ते सत्याधारीत असून कपोलकल्पीत निश्चितच नाही. या पुस्तकाने न भूतो न भविष्यती असे यशच नव्हे असंख्य भारतियांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले आहे.
हे लेखन करताना लेखकाने अपार कष्ट घेतले आहेत, ज्या विषयी प्रकाशनाच्या निमित्तने अनेक ठिकाणी लिहुन आले आहे व लेखकाच्या मुलाखतींमधुनही त्यांचा उल्लेख आहे
या लेखानाच्या संदर्भार्थः
लेखकाने महायुद्धाला ५० वर्षी झाल्या निमित्त काही लष्करी अधिकार्यांनी युद्धभूमिला भेट दिली त्यांचेबरोबर प्रवास केला आहे.
संबंधित अशा ७८ व्यक्तिंच्या मुलाखतींचा अभ्यास केला आहे
संबंधित अशी ५ हस्तलिखिते; २७ जपानी , २३ बंगाली , ३ जर्मन, १५ मराठी, ८ हिंदी व २११ इंग्रजी पुस्तकांचा आधार घेतला आहे.
इतिहास या सदरातील नेताजींवरील कुठलेही पुस्तक पडताळले असता 'महानायक' मध्ये इतिहासाचा लोप करणारे वा सत्याला सोडुन किंवा कपोलकल्पित असे काहीही आढळत नाही. असले तर विद्वानांनी ते निदर्शनास आणुन द्यावे.
अर्थात जे आपल्या सोयीचे नाही ते अमान्य करायचे व फोल ठरवायचे हे एकदा ठरले की पुढे यावर अशा व्यक्तिंशी वाद घालण्यात अर्थ नसतो.
आता राहिले ते हुतात्मा भगतसिंह यांची फाशी व गांधीनी ती रद्द होण्यासाठी न केलेले प्रयत्न. मुळात आपल्या दृष्टीने हुतात्मे असलेले क्रांतिकारक हे गांधींच्या लेखी 'हिंस्त्र खुनी' होते. ही फाशी ३१ मार्च १९३१ पूर्वीच अमलात आणावी हे स्वतः गांधींनी सुचविले होते हे सत्य आहे व ते गांधीच्याच एका प्रिय अनुयायाने लिहिलेले आहे मात्र जे आपल्या सोयिचे नाही ते गांधीवाद्यांच्या वाचनात कधीच येत नाही.
17 Nov 2010 - 8:46 pm | नितिन थत्ते
काल मी सर्वसाक्षी यांना गांधी क्रांतिकारकांचा तिरस्कार करत असत याचे संदर्भ द्या म्हटले होते. तसेच गांधींनी ३१ मार्च पूर्वीच भगतसिंगांना फाशी द्या असे केव्हा सुचवले ते दाखवून द्यावे.
येथे दिलेल्या माहितीनुसार
गांधींचा यंग इंडिया मधला लेख=
Bhagat Singh and his two associates have been hanged. The Congress made many attempts to save their lives and the Government entertained many hopes of it, but all has been in a vain.
Bhagat Singh did not wish to live. He refused to apologize, or even file an appeal. Bhagat Singh was not a devotee of non-violence, but he did not subscribe to the religion of violence. He took to violence due to helplessness and to defend his homeland. In his last letter, Bhagat Singh wrote --" I have been arrested while waging a war. For me there can be no gallows. Put me into the mouth of a cannon and blow me off." These heroes had conquered the fear of death. Let us bow to them a thousand times for their heroism.
But we should not imitate their act. In our land of millions of destitute and crippled people, if we take to the practice of seeking justice through murder, there will be a terrifying situation. Our poor people will become victims of our atrocities. By making a dharma of violence, we shall be reaping the fruit of our own actions.
Hence, though we praise the courage of these brave men, we should never countenance their activities. Our dharma is to swallow our anger, abide by the discipline of non-violence and carry out our duty.
March 29, 1931
येथे दिलेल्या माहितीनुसार
गांधींनी शिक्षा माफ करण्याची मागणी केल्याचे लॉर्ड आयर्विन यांनी स्वतःच म्हटले आहे.
As I listened to Mr. Gandhi putting the case for commutation before me, I reflected first on what significance it surely was that the apostle of non-violence should so earnestly be pleading the cause of the devotees of a creed so fundamentally opposed to his own, but I should regard it as wholly wrong to allow my judgment to be influenced by purely political considerations. I could not imagine a case in which under the law, penalty had been more directly deserved.
17 Nov 2010 - 11:39 pm | सर्वसाक्षी
मा. थत्तेसाहेब,
आपण दिलेला उतारा आपण एकदा वाचुन पाहा.
१) हे लेखन २९ मार्च १९३१ चे म्हणजे फाशी नंतरचे आहे
२) दुसरा परिच्छेद असे सांगतो की हुतात्मा भगतसिंह यांना जगायची इच्छा नव्हती, त्यांनी क्षमा मागीतली नाही, त्यांनी दयेचा अर्ज केला नाही.
जो क्रांतिकारक मरणाची तमा न बाळगता मातृभूमीच्या स्वातंत्र्यास्तव रणात उतरला आहे त्याला जीवनाची आसक्ती नसते, मात्र गांधींनी असा उल्लेख केला आहे की हुतात्मा भगतसिंह जणु वैयक्तिक नैराश्यापोटी आत्महत्या करायला निघालेला बेकार वा भग्नहृदयी प्रेमवीर आहे! वा रे वा! याला कौतुक म्हणायचे की नालस्ती?
३) याच परिच्छेदात गांधी पुढे म्हणतात की हुतात्मा भगतसिंह यांनी हिंसेचा मर्ग स्विकारला तो त्यांच्या मातृभूमीच्या रक्षणार्थ. मग यात गैर ते काय?
४) याच परिच्छेदात पुढे गांधी असे म्हणतात की हुतात्मा भगतसिंहांनी स्वतःच सरकारकडे वीरमरणाची मागणी केली. "आम्हाला सामान्य गुन्हेगारागत फासावर न देता योद्ध्याप्रमाणे गोळ्या घालुन वीरमरण द्या" हे तेजस्वी उद्गार गांधींनी सोयिस्कररित्या फाशी विरुद्ध आवाज न उठवण्यासाठी वापरले व "त्यांनाच मरायाचे आहे तर मी काय करु?" असा पवित्रा घेतला
५) तिसर्या परिच्छेदात गांधी म्हणतात की "जनतेने यांचे अनुकरण अजिबात करु नये" वर असा कांगावाही करतात की "अशाने आपलेच लोक आपल्या अत्याचाराचे नाहक बळी ठरतील" म्हणजे गांधींना असे सुचवायचे आहे का की हुतात्मा भगतसिंह प्रभृतिंनी आपल्याच निष्पाप लोकांचे खून पाडले? हे असले उल्लेख म्हणजे पराकोटीचा तिरस्कार व धिक्कार याचेच द्योतक आहेत.
थत्ते साहेब,
गांधींनी आयरविनकडे "जमलेच तर फाशी चे काही करता येते का ते पाहा" असा गुळमुळितपणे का असेना पण विषय काढला, पण कधी? तर २३ मार्चला सकाळी! म्हणजे ते दिव्य देशभक्त फासावर जाणार हे निश्चित झाल्यावर. ४ मार्च १९३१ ला जो गांधी आयर्विन तह झाला त्यात गांधींनी या विषयावर चकार शब्दही काढल्याचा उल्लेख नाही. उलट ते त्यांना गळ घालायला गेलेल्या मंडळींना ठोकुन सांगत होते की हे तत्वात बसत नाही आणि मी ते करणार नाही. अखेर एकदा जनमानसातील त्या महान क्रांतिकारकांविषयीच्या पराकोटिच्या आदरभावना लक्षात घेत एक नेता म्हणुन जनतेला अगदीच फाट्यावर मारणे बरे दिसणार नाही तेव्हा आता फाशी अटळ आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी टाकणं टाकल्यागत एकदा 'जमल तर बघा' अस म्हटल.
हे म्हणजे एखाध्याच्या घरी लग्न असते, गावची बोलावणी झालेली असतात मात्र शेजार्याला बोलावलेले नसते आणि अचानक शेजारी आदल्यादिवशी समोर भेटतो मग त्याला तोंडदेखले म्हटले जाते "उद्या लग्न आहे समजलेच असेल, जमल तर या". हो, आपला शेजारी आहे उगाच बोलावले नाही असे नको, मग असे आमंत्रण दिले की 'बोलावला तर खरा नी न आला तर बरा"
18 Nov 2010 - 7:57 am | नितिन थत्ते
१. वर दिलेले गांधी आयर्विन यांच्यातले बोलणे २३ मार्चच्या सकाळी झाले हे सिद्ध करा. या साठी पुरावा म्हणून गोपाळ गोडसे यांची पुस्तके सांगू नयेत.
२. भगतसिंग आदिंना ३१ मार्च पूर्वीच फाशी द्यावी अशी मागणी गांधींनी केल्याचे तुमचे कालचे विधान सिद्ध करा.
३. मी दिलेला उतारा फाशीनंतरचा आहे हे मला माहिती आहे.
४. "हुतात्मा भगतसिंह यांना जगायची इच्छा नव्हती, त्यांनी क्षमा मागीतली नाही, त्यांनी दयेचा अर्ज केला नाही." हे गांधींनी भगतसिंगाचे कौतुक म्हणून लिहिले आहे हे कोणाही साधारण बुद्धीच्या माणसाला कळू शकेल.
५. "याच परिच्छेदात गांधी पुढे म्हणतात की हुतात्मा भगतसिंह यांनी हिंसेचा मर्ग स्विकारला तो त्यांच्या मातृभूमीच्या रक्षणार्थ. मग यात गैर ते काय?"--- गांधींनी हे भगतसिंग यांचे समर्थन म्हणूनच लिहिले आहे.
भगतसिंगाचा मार्ग सगळ्यांनी चोखाळू नये असे गांधींनी म्हटले आहे ते त्यांच्या तत्त्वाला अनुसरूनच आहे. गांधींचा परिच्छेद डिट्टेलमध्ये वाचावा. त्यात भगतसिंगचा तिरस्कार कुठेही नाही. अन्यायाचा बदला खुनाने घ्यायला लागलो तर मोठी बिकट परिस्थिती होईल असे म्हटले आहे. गोरगरीब आपल्या कृत्यांचे बळी ठरतील असे म्हटले आहे. भगतसिंगाने गोरगरीबांवर अत्याचार केले असे म्हटलेले नाही. (गोरगरीब बळी ठरतील हे "कोलॅटरल डॅमेज"च्या संदर्भात आहे).
आपण क्र. १ आणि २ चे संदर्भ दिल्यावरच पुढे चर्चा चालवू. तोपर्यंत माझी टैमप्लीज.
18 Nov 2010 - 8:39 am | विकास
वर दिलेले गांधी आयर्विन यांच्यातले बोलणे २३ मार्चच्या सकाळी झाले हे सिद्ध करा. या साठी पुरावा म्हणून गोपाळ गोडसे यांची पुस्तके सांगू नयेत.
खालील संदर्भात (पहील्याच परीच्छेदात) म्हणल्याप्रमाणे गांधीजींनी यंग इंडीयात त्या सकाळी आयर्विनला पत्र लिहीले होते पण उपयोग झाला नाही असे म्हणल्याचे आहे. याच पुस्तकाच्या एकविसाव्या पानावर गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळ ही काही तरूणांच्या फाशीपेक्षा महत्वाची होती असे देखील म्हणल्याचे सांगितले आहे.
(पुस्तकाचे नावः Encyclopaedia of eminent thinkers, Volume 7
By K. S. Bharathi, (हे मला वाटते संपादक असावेत). लेखक: आशू पसरीचा).
कृपया हा संदर्भ बरोबर नसला तर तसे सांगावेत ही विनंती. बाकी चालूंदेत.
18 Nov 2010 - 8:58 am | daredevils99
I pleaded with the Viceroy as best I could ... I wrote a personal letter to the Viceroy at the morning of 23rh
यावरून हे आपोआपच सिद्ध होते की, I pleaded with the Viceroy as best I could हे २३ तारखेच्या पूर्वी घडले आहे.
पण त्याहूनही महत्त्वाचे, Even the Viceroy admitted that Gandhi tried his best to save Bhagat Singh and his collegues हे वाक्य मात्र काहींना अडचणीचे वाटू शकेल!!
18 Nov 2010 - 10:22 am | नितिन थत्ते
काय कळत नाही बुवा.
तुमच्या संदर्भात तर "व्हाइसरॉय हिमसेल्फ अॅडमिटेड दॅट गांधी ट्राईड हिज बेस्ट टु..." असेच म्हटले आहे.
शिवाय Mahatma told him that the question was not between violence and non violence but saving precious lives असेही म्हटले आहे.
18 Nov 2010 - 10:42 am | विकास
माझे उत्तर हे तुमच्या, "वर दिलेले गांधी आयर्विन यांच्यातले बोलणे २३ मार्चच्या सकाळी झाले हे सिद्ध करा. या साठी पुरावा म्हणून गोपाळ गोडसे यांची पुस्तके सांगू नयेत." संदर्भात आहे.
18 Nov 2010 - 9:32 am | विकास
भगतसिंग आदिंना ३१ मार्च पूर्वीच फाशी द्यावी अशी मागणी गांधींनी केल्याचे तुमचे कालचे विधान सिद्ध करा.
हा भाग मी देखील ऐकलेला आहे. त्या संदर्भात मी जे काही ऐकले आहे त्याप्रमाणे जर फाशी देयचीच असेल तर ती कराची आधिवेशनाच्या आधी द्या असे प्रत्यक्ष नसेल पण सुतोवाच करणारे संवाद झाले असावेत असा मी अर्थ काढला होता. मात्र कधी त्यावर परत शोधण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. आत्ता तुमच्या प्रश्नामुळे उत्सुकता चाळावली आणि थोडेसे शोधले तर काही दुवे मिळाले...
वर दिलेल्या संदर्भात जेंव्हा व्हॉईसरॉय तीन शक्यता गांधीजींना बोलून दाखवल्या: पहीली शक्यता ही ठरल्यावेळेस (म्हणजे वास्तवीक २४ तारखेस) फाशी देण्याची होती, दुसरी फाशीची शिक्षा रद्द करण्याची होती, तर त्यातील तिसरी शक्यता ही फाशीच्या शिक्षेचा निर्णय ३१ मार्चपर्यंत (आधिवेशन संपेपर्यंत) लांबवण्याची होती. अर्थातच ज्या अर्थी फाशी ही ठरल्यावेळेच्या आधी म्हणजे २३ तारखेस आणि काँग्रेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष कराची (अधिवेशन स्थानी) पोचायच्या तारखेच्या (२४ मार्च) ऐवजी एक दिवस आधीच झाली त्या अर्थी अप्रत्यक्षरीत्या गांधीजींनी पहील्या शक्यतेला दुजोरा दिला असा अर्थ होऊ शकतो.
या संदर्भात अजून एक संदर्भ मिळाला तो असा:
त्यातील गृहसचीव हर्बर्ट इमरसनचे वक्तव्य पण वाचण्यासारखे आहे.
असो.
18 Nov 2010 - 9:39 am | daredevils99
यातही काही गैर दिसत नाही. भगत सिंगांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यावर (जे तुम्हीच तुमच्या वरच्या प्रतिसादात दिले आहे), जर फाशी होणारच असेल तर ती अधिवेशनापूर्वी व्हावी, हे मत मांडण्यात काहीही चूक नाही.
भगत सिंगांना गांधींनी वारंवार धिक्कारले, हे सर्वसाक्षींनी अद्याप सिद्ध केलेले नाही.
आणि विकास राव, तुम्हीदेखिल नथुरामप्रेमी असल्याचे पाहून दु:ख झाले.
असो.
18 Nov 2010 - 10:20 am | विकास
आणि विकास राव, तुम्हीदेखिल नथुरामप्रेमी असल्याचे पाहून दु:ख झाले.
हे विधान बिनबुडाचे असल्याने आक्षेपार्ह आहे. कशाच्या बळावर मला नथुरामप्रेमी ठरवलेत ते सांगा नाहीतर शब्द जाहीरपणे मागे घ्या.
यातही काही गैर दिसत नाही. भगत सिंगांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यावर (जे तुम्हीच तुमच्या वरच्या प्रतिसादात दिले आहे), जर फाशी होणारच असेल तर ती अधिवेशनापूर्वी व्हावी, हे मत मांडण्यात काहीही चूक नाही.
माझा प्रतिसाद नीट वाचल्यास समजेल की मी चूक अथवा बरोबर काहीच म्हणलेले नाही. आधीच्या प्रतिसादात नितीनरावांनी प्रश्न विचारला होता, "भगतसिंग आदिंना ३१ मार्च पूर्वीच फाशी द्यावी अशी मागणी गांधींनी केल्याचे तुमचे कालचे विधान सिद्ध करा." त्यावर मी संदर्भ देऊन सिद्ध केले आहे. आता तुम्ही त्या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत नवीन प्रश्न विचारत आहात... पण ह्या संदर्भाबाबत थत्यांकडून मला उत्तर नक्कीच अपेक्षित आहे नाहीतर केवळ देवभोळेच अंधश्रद्धाळू नसतात असे म्हणावे लागेल. असो.
18 Nov 2010 - 10:26 am | नितिन थत्ते
या संदर्भात हे इमर्सन गांधी-आयर्विन यांच्यातली बोलणी चालू असताना "कधीकधी" तेथे उपस्थित असत असे म्हतले आहे. त्यामुळे त्यांनी गांधींनी प्रयत्न केला नाही असे ठासून म्हणण्याला फारसा अर्थ नाही.
18 Nov 2010 - 10:31 am | विकास
त्यांनी गांधींनी प्रयत्न केला नाही असे ठासून म्हणण्याला फारसा अर्थ नाही.
मग गुळमुळीतपणे तीन शक्यतांमधील पहीली शक्यता मान्य केली असे म्हणायचे आहे का?
18 Nov 2010 - 10:32 am | नितिन थत्ते
>>पहीली शक्यता ही ठरल्यावेळेस (म्हणजे वास्तवीक २४ तारखेस) फाशी देण्याची होती, दुसरी फाशीची शिक्षा रद्द करण्याची होती, तर त्यातील तिसरी शक्यता ही फाशीच्या शिक्षेचा निर्णय ३१ मार्चपर्यंत (आधिवेशन संपेपर्यंत) लांबवण्याची होती. अर्थातच ज्या अर्थी फाशी ही ठरल्यावेळेच्या आधी म्हणजे २३ तारखेस आणि काँग्रेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष कराची (अधिवेशन स्थानी) पोचायच्या तारखेच्या (२४ मार्च) ऐवजी एक दिवस आधीच झाली त्या अर्थी अप्रत्यक्षरीत्या गांधीजींनी पहील्या शक्यतेला दुजोरा दिला असा अर्थ होऊ शकतो.
असा अर्थ कसा निघतो हे कळत नाही. आयर्विनने बहुधा तीनपैकी एक स्वीकारण्याची ऑफर दिली नसावी. म्हणजे तीन पर्यायांत फाशीची शिक्षा रद्द करणे असा पर्याय ठेवण्याइतका आयर्विन भोट नसावा.
अशी ऑफर दिली होती आणि गांधींनी त्यातला ठरल्यावेळेस फाशी द्यायचा पर्याय स्वीकारला असे म्हणणे असेल तर मला माझ्या बुद्धीविषयीच शंका येऊ लागली आहे.
18 Nov 2010 - 10:40 am | विकास
आयर्विनने बहुधा तीनपैकी एक स्वीकारण्याची ऑफर दिली नसावी. म्हणजे तीन पर्यायांत फाशीची शिक्षा रद्द करणे असा पर्याय ठेवण्याइतका आयर्विन भोट नसावा.
व्हॉईसरॉयने त्याच्या आत्मचरीत्रात तसे स्वतः लिहीले आहे हे वरील दुवा वाचल्यास लक्षात येईल. आता ते मान्य नसेल तर गोष्ट वेगळी..(all most three decades after... च्या पुढे वाचले नसेल तर वाचावेत).
18 Nov 2010 - 11:43 am | नितिन थत्ते
Almost three decades च्य पुढेही आयर्विनने ऑफर केल्याचे म्हटलेले नाही.
उलट आयर्विन याम्नी काही केले नाही तर करार कोसळू शकेल असे गांधी म्हणाल्याचे म्हटले आहे. गांधींनी व्हाइसरॉयच्या सदसदविवेकबुद्धीला हाक दिली असेही आयर्विनने म्हटले आहे.
18 Nov 2010 - 10:43 am | मी_ओंकार
प्रतिसाद तिरके होउ लागल्यामुळे आणि गांधी व भगतसिंगची फाशी हा विषय मूळ चर्चाविषयापेक्षा (नथुराम ची फाशी आणि अहिंसा/गांधीवाद) तपशीलात वेगळा असल्याने नवीन चर्चा सुरू करावी ही विनंती. बाकी चर्चा उत्तम.
- ओंकार.
21 Nov 2010 - 11:10 pm | सर्वसाक्षी
थत्तेसाहेब
आपल्याला उत्तरे मिळाली आहेतच. कदाचित ती माहितही असतील. असो.
<<४. "हुतात्मा भगतसिंह यांना जगायची इच्छा नव्हती, त्यांनी क्षमा मागीतली नाही, त्यांनी दयेचा अर्ज केला नाही." हे गांधींनी भगतसिंगाचे कौतुक म्हणून लिहिले आहे हे कोणाही साधारण बुद्धीच्या माणसाला कळू शकेल.>> कौतुक व उपहास यातला फरकही सर्वांना समजतो, आपण कितीही मखलशी करा पण ही स्तुती नक्कीच नाही.
५. "याच परिच्छेदात गांधी पुढे म्हणतात की हुतात्मा भगतसिंह यांनी हिंसेचा मर्ग स्विकारला तो त्यांच्या मातृभूमीच्या रक्षणार्थ. मग यात गैर ते काय?"--- गांधींनी हे भगतसिंग यांचे समर्थन म्हणूनच लिहिले आहे.>> तसे त्यांना नाईलाजाने म्हणावेच लागले. कारण त्या कालखंडात हुतात्मा भगतसिंह हे जनतेच्या, खास करून युवा पिढीच्या सर्वाधिक प्रेमास व आदरास प्राप्त होते व त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना गांधींनाही असावी.
मी आपल्या निदर्शनास आणून देउ इच्छितो की तुम्ही मूळ विषयापासून बरेच भरकटत आहात. अधिक चर्चेसाठी आपण हुतात्मा भगतसिंह यांची फाशी व गांधी असा नवा धागा सुरू करा. आणखीही माहिती मिळेल. याविषयी अनेक प्रश्न आहेत. आपण धागा टाका आणि विचारा, मीही विचारेन.
आपल्या प्रश्नांना उत्तरे दिली ती केवळ आपल्याला मी उत्तरे न दिल्याची सबब मिळु नये म्हणुन.
18 Nov 2010 - 11:34 am | गवि
+०.५
Bhagat Singh did not wish to live. He refused to apologize, or even file an appeal. Bhagat Singh was not a devotee of non-violence, but he did not subscribe to the religion of violence. He took to violence due to helplessness and to defend his homeland. In his last letter, Bhagat Singh wrote --"
आणि नंतरची विधाने ही एकत्र मिळून एक ठोस काही मिळत नाही.
त्या फाशी गेलेल्यांचे कौतुकही, आणि त्यांना सबस्क्राईब करु नका असा संदेशही. सर्व सारवासारव वाटते. काय करु नका हे कळले. पण काय करा हे नाही कळले अशागत काहीतरी. निदान या परिच्छेदांमधून तरी.
हा परिच्छेद यंग इंडिया मधला असेल तर तो सामान्य / कॅज्युअल वाचकांसाठी होता. त्या सर्वांनी गांधीजींची सर्व मूलतत्वे प्रदीर्घ व्यासंगाने वाचली असतीलच असे नाही किंवा अपेक्षणे चुकीचे. त्यांनी यातून काय घ्यावे?
यापुढे अजून थोडं :
गांधीजींची काही तत्वे न पटणे म्हणजे लगेच "नथुरामभक्त" किंवा "त्यांची हत्या योग्य होती " अशा मताचे असंच नसतं.
त्यांची तत्वे थोरच आहेत, पण ती अशा गृहितकांवर आधारलेली आहेत की जी खरी असती तर जग फारच वेगळं आणि सुंदर असतं.
25 Jul 2012 - 1:58 pm | विजुभाऊ
फाशी म्हणजे हत्या हे समजत असतानाही नथुराम गोडसे यांना फाशी का दिली गेली?
गुन्ह्याला शिक्षा मिळायला हवीच. शिक्षा ही गुन्हेगाराचे कृत्य आणि उद्देश यांचा लेखाजोखा घेवूनच दिली जाते.गांधींचा हिंसेला विरोध होता. न्यायदानाला नव्हे.
हे जर गांधींचे खरेच मत असते तर जुलुमी इंग्रजांना कंठस्नान घालणार्या क्रांतिकारकांचा त्यांनी वेळोवेळी धि:क्कार का बरे केला? त्यांच्या फाशीचे समर्थन का केले?
क
क्रांतीकारकानी जे केले ते प्रतिक्रीया म्ह्नणून केले. त्यानी केलेले कृत्य कितीही देशभक्तीचे असले तरी त्याचे समर्थन होऊ शकत नाही. एखाद्याने नि:शस्त्र माणसांवर गोळ्या झाडल्या तर त्याला न्यायदानाने शिक्षा करता येवू शकेल. त्याला नि:शस्त्र गाठून त्याची हत्या केली तर त्या दोन्ही कृत्यात फरक काय उरला.
न्यायसंस्था / कायदा असताना तो हातात घेण्याचे प्रयोजन काय?
गांधीनी असहकार चळवळ /मिठाचा सत्याग्रह या मार्गाने कायद्याला सुद्धा वेळोवेळे विरोध केलेला आहेच.
2 Feb 2013 - 5:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
+१०००००००००..
16 Nov 2010 - 11:31 am | गवि
फाशीची शिक्षा असावी का नसावी हा खूप चघळलेला विषय आहेच.
(लिव्ह इन, गे-लेस्बियन वगैरे विषयांसारखा).
माझ्या ब्लॉगवर यावर पूर्वी एकदा चर्चा केली होती. ती आपल्या सर्वांसाठी मिपावर नवीन धागा बनवून उघडतोयः
http://www.misalpav.com/node/15455
नवीन काही होईल अशी आशा.
21 Nov 2010 - 8:14 pm | विकास
काही आक्षेपार्ह...
हे वाचल्यावर एक गोष्ट स्पष्ट आहे की 'आधुनिक भारताचे दधिची',...
वास्तवीक नितीनरावांना ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की हे 'आधुनिक भारताचे दधिची' हा शब्दप्रयोग हा दळवींच्या नाटकातला असून तो पूर्णपणे चुकीचा अर्थात असत्य आहे. (त्यांच्या वाक्यातील उरलेली "'प्रातःस्मरणीय', 'भारतरत्न', 'परमपूज्य' वगैरे विश्लेषणे ही त्यांनी स्वतःच तयार केलेली असावीत असे वाटते.)
तरी देखील ते परत परत इथे आणि तिथे (उपक्रमावर + अजून कुठे असेल तर माहीत नाही) त्याचा संदर्भ देतात. हे अत्यंत आक्षेपार्ह आहे विशेष करून जी व्यक्ती गांधींच्या आरत्या ओवाळते आणि दुसरीकडे असत्याचे प्रयोग करत बसते तेंव्हा. ह्यातून केवळ त्यांचा आकस दिसतो असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे...नितीनराव हे गांधीवादी आहेत अथवा स्वतःला तसे समजतात का ते माहीत नाही पण तरीदेखील त्यांच्याकडून असली अपेक्षा नव्हती आणि नाही. अर्थात त्यांनी सत्यकथनाचा पुरस्कार करावा का असत्यकथनाचा हे तेच ठरवू शकतील.
जर दळवींच्या नाटकांचाच संदर्भ वापरायचा असेल तर ते गांधीजींबद्दल काय बोलले ते देखील खरे मानावे लागेल आणि गांधींजींचे चौथे पुत्र देवदास गांधी हे देखील नथुरामला जाऊन भेटले आणि हस्तांदोलन केले असे म्हणता येईल...
21 Nov 2010 - 8:32 pm | विकास
गेल्या दोन एक दिवसात येथे आलेल्या दोन इतिहास संशोधकांना भेटण्याचा योग आला. त्यांना या चर्चेतील मूळ विषयावर प्रश्न विचारला की तत्कालीन गांधीवादींनी नथुरामच्या फाशीला विरोध कसा केला नाही.
त्यावर मला तात्काळ उत्तर मिळाले की देवदास रामदास गांधींनी तसा विरोध केला होता. फाशी देणे हे स्वतःच्या (देवदासांच्या/रामदासांच्या) वडीलांच्या (म. गांधींच्या) तत्वाच्या विरोधात आहे असे त्यांनी म्हणले होते आणि (मला वाटते) सरकारला पत्र देखील पाठवले होते. त्यांची नथुरामला भेटायची इच्छा होती. नथुरामने त्यांना सांगितले की भेटायला हरकत नाही. पण जर माझे म्हणणे पटले तर तसे जाहीर सांगायचे लपवायचे नाही.... मात्र पुढचे कारण माहीत नाही, पण ती भेट काही कारणाने घडू शकली नाही.
ही अर्थातच आमचा अगदी थोडक्यात जो काही संवाद झाला त्यावर आधारीत माहीती आहे.
21 Nov 2010 - 8:59 pm | इन्द्र्राज पवार
"....(मला वाटते) सरकारला पत्र देखील पाठवले होते. ..."
~ पत्र पाठविले गेले होते, पण ते श्री.देवदास यांच्याकडून नव्हे तर श्री.रामदास यांच्याकडून.
श्री.देवदास यांच्याबरोबर नथुराम गोडसे यांची [खटला चालू होता त्या काळात] थोड्या अवधीसाठी का होईना तुघलक रोड येथील तुरुंगात झाली होती. देवदास हिंदुस्थान टाईम्सचे संपादक तर गोडसे हिंदुराष्ट्र दैनिकाचे संपादक या नात्याने त्यापूर्वी एका पत्रकार परिषदेतही भेटले होतेच. कच्च्या कैदेतील ते बोलणे अर्थातच अल्पकाळ होते कारण सुरक्षा अधिकार्यांनी श्री.देवदास याना 'बोलू नये' अशी विनंती केली. जितके बोलले गेले ते केवळ ते गांधीपुत्र होते म्हणूनच बोलू दिले गेले होते हेही सत्यच होते. [या भेटीचा ऑफिशियल रिपोर्ट दिल्लीचे डी.एस.पी. श्री.जयवंतसिंग यानी लिखित स्वरूपात कोर्टात सादर केला आणि तो रितसर नोंद झाल्याने अधिकृत मानावा लागेल.]
पुढे सिमला येतील तुरुंगात गोडसे व आपटे याना आणल्यानंतर मात्र श्री.रामदास गांधी यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार झाला व त्यातील एका पत्रात श्री.रामदास यानी, "हिंदुस्थानच्या महाशासकाना मी जे पत्र धाडले आहे त्यात आपल्याविरुद्धचा अभियोग चालविणार्या विशेष न्यायासनाने आपणास दिलेली शिक्षा आपणास का भोगावयास लावू नये याचे कारण मी त्या पत्रात दिले आहे." असे म्हटले आहे. भेटीची इच्छादेखील श्री.रामदास गांधी यानीच प्रकट केली होती...श्री.देवदास यानी नव्हे....अर्थात भेट ही झाली नाहीच.
इन्द्रा
22 Nov 2010 - 9:25 am | विकास
नावातील गोंधळ लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. वास्तवीक ज्या येथील इतिहास संशोधकांनी सांगितले त्यांनी रामदास गांधी असेच नाव घेतले पण त्यांचा चुकून उल्लेख त्यांनी हिंदूस्थान टाईम्सचे संपादक म्हणून केला. नंतर जेंव्हा गुगलले तेंव्हा "एचटी" चे संपादक देवदास गांधी दिसले म्हणून मला वाटले कदाचीत ते असतील असे. परत एकदा चूक दुरूस्ती केल्याबद्दल धन्यवाद!
22 Nov 2010 - 8:26 pm | नितिन थत्ते
१. दधिची या उल्लेखावरील आक्षेपाच्या इतिहासाची पूर्ण माहिती आहे.
त्यावेळच्या आक्षेपाचा विषय "सावरकरांनी नथुरामला कधी दधिची म्हटले होते का?" याबाबत होता आणि तेव्हा सावरकरांनी असे म्हटल्याचे संदर्भ नाहीत असे म्हणून ते वाक्य रद्दबातल झाले होते.
पण आत्तासुद्धा मी हे विशेषण सावरकरांनी वापरलेले म्हणून उद्धृत केलेले नाही. नथुरामला ग्लोरिफाय करणार्यांपैकी काहींच्या (उदा. नाटककार दळवी) मनातले विशेषण म्हणूनच उद्धृत केले आहे.
२. बाकीची विशेषणे औपरोधिक आहेत. आणि ती राहुल गांधी यांच्यासाठी याच संकेतस्थळावर वापरल्या जाणार्या/गेलेल्या "तरुणांचे आशास्थान, निगर्वी, निधर्मी, नम्र"....."अख्ख्या सूर्यमालेचेच.. नाही नाही... आकाशगंगेचे.. चूकलो चूकलो.. अखिल ब्रह्मांडाचेच नेते" वगैरे औपरोधिक विशेषणांसारखीच आहेत. नथुरामचे भक्त नथुरामसाठी ही विशेषणे वापरू शकतील.
स्वगतः माझ्या गांधीसमर्थनाबाबत विकास यांना काय अडचण आहे ते समजत नाही. मी माझ्या मित्रांशी खरडवहीतून साधलेला संवादही गांधीवादाशी विपरीत आहे की काय यावर त्यांचे लक्ष असते.
22 Nov 2010 - 8:54 pm | विकास
१. दधिची या उल्लेखावरील आक्षेपाच्या इतिहासाची पूर्ण माहिती आहे.
त्यावेळच्या आक्षेपाचा विषय "सावरकरांनी नथुरामला कधी दधिची म्हटले होते का?" याबाबत होता आणि तेव्हा सावरकरांनी असे म्हटल्याचे संदर्भ नाहीत असे म्हणून ते वाक्य रद्दबातल झाले होते.
उपक्रमावर देखील त्याच चर्चेचे दुवे देणे आधी झाले होते. आत्ता देखील नाव घेतले नाही तरी तेच चालते म्हणून लिहून स्पष्टीकरण केले. हेतू हा की किमान आपल्यासारख्यांकडून तरी परत परत जे ऐतिहासीक असत्य आहे त्याचा गोबेल्सच्या तंत्राप्रमाणे वापर होणार नाही.
बाकीची विशेषणे औपरोधिक आहेत. . नथुरामचे भक्त नथुरामसाठी ही विशेषणे वापरू शकतील.
सहमत आणि त्याबद्दल आक्षेप घेतला नव्हता. मात्र अजून काही अर्थ असला तर तो समजावा इतका नक्कीच उद्देश होता. खुलाशा बद्दल धन्यवाद..
स्वगतः माझ्या गांधीसमर्थनाबाबत विकास यांना काय अडचण आहे ते समजत नाही.
गांधीसमर्थनाबाबतच काय मला गांधीजींची पण अडचण नाही. नक्की मी गांधीजींच्या विरोधात ते निव्वळ गांधीजी आहेत अथवा मला सावरकर आवडतात वगैरे गोष्टींचा संदर्भ देत कधी काय बोललो आहे ते दाखवून द्या. मात्र भोंदूगिरी करणार्या गांधीवाद्यांबद्दल मात्र मला आक्षेप आहे. त्यांच्यामुळे आपल्या देशाचे जास्त नुकसान झाले आहे असे वाटते... नथुरामने गांधीजींना मारले हे आक्षेपार्हच आहे आणि तो माझ्या दृष्टीने खुनीच होता पण त्या गांधीजींचा पार्थिव देह गनकॅरेजवर (तोफेवर) ठेवला गेला आणि गांधीवादाला जी एका अर्थाने तोफांजली दिली गेली ते देखील गांधीवादी आदर्शाचे मारेकरीच होते आणि तेच पिढ्यान पिढ्या चालत राहीलेत असे वाटते. असो.
मी माझ्या मित्रांशी खरडवहीतून साधलेला संवादही गांधीवादाशी विपरीत आहे की काय यावर त्यांचे लक्ष असते.
तुम्ही कुठल्या संदर्भात म्हणत आहात याची कल्पना नाही, कारण मी काही खरडवही बघितली नव्हती, अथवा एकंदरीतच मी आपणहून बघत नसतो. मात्र आता उत्सुकता चाळवली आहे आणि खरडवही पब्लीक आहे त्यामुळे नक्की बघेन.. :) कुठल्या संस्थळावरील आणि साधारण कधीचे पाहू ते खरडीने कळवल्यास सोपे जाईल. ;)
22 Nov 2010 - 9:21 pm | क्लिंटन
हो ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.अनेकदा नेत्याच्या विचारांची उंची अनुयायांना कळतच नाही त्यातूनच दुर्दैवाने महान नेत्यांचा सर्वात मोठा पराभव त्यांचेच अनुयायी करतात. डॉ. आंबेडकरांबाबत हा प्रकार वारंवार दिसून येतो. छत्रपती-शंभूराजांच्या नावाने गुंडगिरी करणारे लोक छत्रपतींच्या बाबतीतही हाच प्रकार करतात. आमच्या एका ज्येष्ठ नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे सावरकरांचे वर्षश्राध्द त्यांच्या अनुयायांनी केले होते. (चु.भू.दे.घे) सावरकरांचा अशा कर्मकांडांना किती विरोध होता हे तर जगमान्यच आहे.तरीही हा प्रकार खरा असेल तर त्यांच्या अनुयायांना सावरकरांच्या विचारांची उंची कळली नाही असाच अर्थ होत नाही का? तोच प्रकार गांधींजींबाबतही.
22 Nov 2010 - 11:58 pm | इन्द्र्राज पवार
श्री.विकास आणि श्री.क्लिंटन दोघांनीही 'गांधींचा देह' आणि 'गन कॅरेज' या दोन घटनांना 'आदर्शवादा' शी गुंफून तसे करणार्यांना दूषण दिले आहे. याबाबत काही खुलासा करणे गरजेचे आहे कारण राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्याबाबतीत जगभर जे काही "प्रोटोकॉल" पाळले जातात तित 'स्टेट फ्युनरल' नावाचा जो प्रकार आहे तिथे गन कॅरेजचा 'ऑनर' मिलिटरीतर्फे दिला जातो. मिलिटरीने त्या व्यक्तीला दिलेली एक प्रकारची वंदना असते. याबद्दलची तत्वे केन्द्र सरकारनेच मान्य केली असून तिथे व्यक्तीवादापेक्षा "मरणोत्तर" बिदाई....जी मिलिटरीकडे असते....कशा धाटणीची असणे आवश्यक आहे याची रितसर नोंद आहे.
गांधीजींचा देह जसा गन कॅरेजवर ठेवण्यात आला होता तद्वतच नेमक्या त्याच कॅरेजवर सप्टेंबर १९९७ मध्ये 'मदर तेरेसा' यांचाही देह ठेवला गेला. त्यावेळी तर दिल्लीत इन्द्रकुमार गुजराल हे जनता दलाचे पंतप्रधान सत्तेवर होते. म्हणजेच 'गन कॅरेज' अंतयात्रा हे एक प्रकारचा त्या व्यक्तीला दिलेला सन्मान आहे हे सर्वच पक्षांनी मान्य केले आहे हे दिसतेच. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आदर्शवादाचा त्यात कुठे उपमर्द होतो असे मानू नये.
त्या काळात देशात तिरंगा अर्ध्यावर आणला जातो. हे निशाणदेखील सार्या देशाला दु:ख झाले आहे हे दर्शविते, जे प्रतिकात्मक असते. दु:ख झाले म्हणून देश तो पूर्ण आठवडा उपाशी बसत नाही हे जितके सत्य आहे तितकेच तशा प्रकारचा सन्मान एखाद्याला दिला म्हणजे देशाने कुठल्यातरी आदर्शाला मूठमाती दिली असे समजण्याची बिलकुल आवश्यकता नाही....!
शेवटी 'आदर्शा'ची काय वासलात लागायची ती लागतेच....चौघांच्या खांद्यावरून गांधीजींना सरणाकडे नेले असते तर त्यांचा आदर्श आज राहिला असता काय?
इन्द्रा
23 Nov 2010 - 1:17 am | विकास
राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्याबाबतीत जगभर जे काही "प्रोटोकॉल" पाळले जातात तित 'स्टेट फ्युनरल' नावाचा जो प्रकार आहे तिथे गन कॅरेजचा 'ऑनर' मिलिटरीतर्फे दिला जातो.
अहो अगदी मान्य आहे. पण हे गन कॅरेज फक्त तीनच व्यक्तींसाठी वापरले गेले... दोन तुम्ही सांगितलेल्या आणि तिसरी पं. नेहरू. त्या व्यतिरीक्त अजूनही पंतप्रधान आणि राष्ट्रपती होऊन गेले आहेत. विशेषतः शास्त्री आणि इंदिरा गांधी. त्यांना पण असे वापरले गेलेले दिसले नाही. अर्थात त्यांना शासकीय सन्मान नक्कीच मिळाला असेल आणि त्यात गैर काहीच नाही. शासकीय सन्मान देयलाच हवा. एक मदर तेरेसा यांना सोडल्यास असा सन्मान ज्या कोणत्या राष्ट्रीय नेत्यांना दिला गेला तो योग्यच होता असे माझे वैयक्तीक मत आहे. मदर तेरेसा या काही माझ्या लेखी राष्ट्रीय नेत्या नव्हत्या.
गांधीजींच्या बाबतीत सन्मान देणे योग्य होते, पण त्यासाठी गन कॅरेजच वापरणे काही गरजेचे होते असे वाटत नाही इतकेच म्हणायचे होते. तसे करत असताना मुद्दामून नाही पण त्यांच्या तत्वाची शासकीय कर्मकांडे करत असताना पायमल्ली झाली असे वाटते. त्याचे कारण गांधीवादी म्हणून कोणीच "स्वाध्याय" करत नव्हते. आडातच नाही तर पोहर्यातून कसे येणार.
हाच प्रकार क्लिंटन यांनी वर सांगितलेल्या सावरकरांच्या उदाहरणात आहे. सावरकरांचे हिंदू शब्दावरील विचार पोपटपंचीसारखे बोलणे पण त्यांनीच सांगितलेला "हिंदूइझम" (हिंदूधर्मातील कर्मकांडे) सोडणे थोडेच जमणार होते?
16 Nov 2010 - 1:18 pm | परिकथेतील राजकुमार
कोण गांधी ?
16 Nov 2010 - 3:01 pm | गणेशा
ही फाशी म्हणजे अहिंसेचा पराभवच नाही का?
हा तुमचा प्रश्न तुम्ही बरोबर विचारला आहे मात्र
फाशी म्हणजे हत्या हि तुमची व्याख्या आवडली नाही .
अहिंसा म्हणजे हिंसा न करणे ..
केलेल्या वाईट कर्माला शिक्षा ही असलीच पाहिजे (कायद्यात फाशी असावी का नसावी हा विषय येथे नाहीये).. आणि शिक्षा आणि अहिंसा यांचा संबधच नाही ..
--
जसा युक्तीवाद केला जातो की अहिंसेच्या अनुयांनी काहीच आक्षेप नाही घेतला फाशीला ..
तसेच मग जर नथुराम नी स्वता फाशीला जायचे आहे म्हंटल्यावर .. त्यांचे अनुयायी किंवा बाजुचे लोक मग फाशी नव्हती व्हायला पाहिजे . याविरुद्ध आंदोलन झाले पाहिजे होते ते ही गांधींच्या अनुयायांकडुन हे हास्यास्पद वाटत आहे ..
असो ...
16 Nov 2010 - 3:27 pm | विसोबा खेचर
नक्कीच..!
(नथुरामप्रेमी) तात्या.
16 Nov 2010 - 9:35 pm | हुप्प्या
गांधीवाद हा अतर्क्य विसंगतींनी भरलेला आहे. त्यामुळे नथुराम गोडशांची फाशी ह्या विसंगतीशी सुसंगत आहे.
काही उदाहरणे म्हणजे
१. एक अत्यंत अनावश्यक धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायला खिलाफत नावाची एक चळवळ गांधींनी १९२५ च्या आसपास सुरू केली. तुर्कस्तानमधे लोकशाही नव्याने स्थापन झाली होती, महिलांना हक्क मिळू लागले होते. आधुनिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. त्याविरुद्ध काही मुस्लिम धर्ममार्तंडांनी ही चळवळ सुरू केली. आणि गांधींनी त्याला पाठिंबा दिला. ह्याच्या नसत्या उपद्वयापाच्या बदल्यात मुस्लिमांनी गोहत्याबंदी करावी अशी अहिंसक मागणी गांधींच्या काही अनुयायांनी केली ती गांधींनी साफ फेटाळली. लोकशाहीला विरोध आणि जुनाट, रानटी खलिफाच्या राजवटीला समर्थन. केवळ मुस्लिमांच्या लांगूलचालनाकरता! वा रे महात्मा!
२. दुसर्या महायुद्धात इंग्रजांना मदत करण्याचे धोरण. युद्ध म्हणजे अफाट हिंसा. दुसर्या महायुद्धातील हिंसा ही त्या आधी झालेल्या सर्व युद्धांपेक्षा जास्त होती. पण गांधीना त्या युद्धात भारतीयांना आजिबात गैर वाटले नाही. बंगालचा मानवनिर्मित दुष्काळ, जालियनवाला बाग हत्या असले सगळे हिंसक प्रकार
केलेल्या इंग्रजांना आणखी एका हिंसक मोहिमेकरता समर्थन देणे. ही कुठली तत्त्वनिष्टा?
३. गांधींनी जर्मनीच्या ज्यू लोकांना उद्देशून एक अचाट व अतर्क्य पत्र लिहिले. तुम्ही निर्भयपणे कत्तलींना सामोरे जा. कचरू नका. कुठलाही प्रतिकार करू नका. असे केल्यानेच तुमची महता सिद्ध होईल. निर्दोष व्यक्तींच्या हिंसा थांबवायला केलेली हिंसा उचित आहे असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे अशा प्रकारे हिंसा शांतपणे सहन करायचा उपदेश!
http://www.sepiamutiny.com/sepia/archives/004247.html
16 Nov 2010 - 9:50 pm | धमाल मुलगा
क्या बात है!
अत्यंत सडेतोड मुद्दे.
16 Nov 2010 - 10:20 pm | नितिन थत्ते
>> दुसर्या महायुद्धात इंग्रजांना मदत करण्याचे धोरण. युद्ध म्हणजे अफाट हिंसा. दुसर्या महायुद्धातील हिंसा ही त्या आधी झालेल्या सर्व युद्धांपेक्षा जास्त होती. पण गांधीना त्या युद्धात भारतीयांना आजिबात गैर वाटले नाही. बंगालचा मानवनिर्मित दुष्काळ, जालियनवाला बाग हत्या असले सगळे हिंसक प्रकार
केलेल्या इंग्रजांना आणखी एका हिंसक मोहिमेकरता समर्थन देणे. ही कुठली तत्त्वनिष्टा?
येथे दिलेल्या माहितीनुसार
The Congress Party had earlier taken the initiative upon the outbreak of war to support the British, but were rebuffed when they asked for independence in return. Gandhi had not supported this initiative, as he could not reconcile an endorsement for war (he was a committed believer in non-violent resistance to tyranny, used in the Indian Independence Movement and proposed even against Hitler, Mussolini, and the Japanese) and had a deep suspicion of the British attitude, mindset and leadership, realizing such support would not be rewarded, well ahead of other Congressmen.
>>एक अत्यंत अनावश्यक धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायला खिलाफत नावाची एक चळवळ गांधींनी १९२५ च्या आसपास सुरू केली. तुर्कस्तानमधे लोकशाही नव्याने स्थापन झाली होती,
थोडीशी चुकीची दुरुस्ती..... खिलाफत चळवळ १९१९ मध्ये सुरू झाली आणि १९२५ मध्ये संपली.
बाकी मुस्लिम लांगूलचालनाचे म्हणावे तर मुस्लिमांना राखीव मतदारसंघ देणारा लखनौ करार खिलाफत चळवळ सुरू व्हायच्या आधी ३ वर्षे १९१६ मध्ये टिळकांच्या नेतृत्वाखाली झाला.
कुरुंदकरांच्या शब्दात सांगायचे तर मुस्लिमांना मतदारसंघ तोडून देणारे टिळक हे मुत्सद्दी आणि लखनौ कराराच्या पुढे एक पाउलही न टाकणारे गांधी लांगूलचालनवादी हे कसे?
16 Nov 2010 - 10:42 pm | हुप्प्या
टिळकांनी साधनशुचिता वगैरेचे गोडवे गायले नाहीत. ते व्यवहारी होते. आणि व्यवहारानेच वागले. थोडे मिळवण्याकरता थोडे गमावणे हे त्यांच्या तत्त्वात बसत होते. मात्र गांधींचे तसे नव्हते. शत्रूशीही अन्याय करायचा नाही. तत्त्वाशी तडजोड करायची नाही असे त्यांचे तत्त्व होते.
लखनौ करारामुळे राखीव मतदारसंघ झाला. हे अर्थातच वाईट झाले. पण मला वाटते खिलाफतमुळे जास्त नुकसान झाले. कसे? हे असे:
खिलाफतमुळे काय झाले? लोकशाहीपेक्षा धर्मावर आधारित राज्यपद्धती जास्त श्रेष्ट आहे असे सूचित झाले. मुस्लिमांच्या धर्मावर आधारित राज्यपद्धती लोकशाहीपेक्षा जास्त उजवी आहे असे सूचित झाले. बाकी कुठल्या धर्माकरता अशी चळवळ केली नाही. महिलांना अधिकार मिळण्यापेक्षा, आधुनिकीकरणापेक्षा खिलाफत श्रेष्ट असे सूचित झाले. शेकडो मैल दूर असलेल्या देशात हे सगळे घडत असताना त्याला समर्थन दिले. केवळ काही अतिरेकी विचारांच्या मुस्लिमांकरता. भारतावर ह्याचा खरे तर काही परिणाम होत नव्हता तरीही ही चळवळ हाती घेतली गेली. केवळ लांगूलचालनाकरता. तुर्कस्तानचे लोक मुस्लिम आहेत ह्या पलीकडे ह्या घटनेचा भारताशी काय संबंध होता? भारतात खलिफाचे राज्य कधी होते? कधीच नाही.
लखनौ करारात देशाबाहेर काही घडले नाही. देशातल्या लोकांची परदेशाची नाळ जोडायचा प्रयत्न झाला नाही. लोकशाहीविरोधी काही नव्हते. आणि टिळक हे आपल्या तत्त्वनिष्ठेची टिमकी वाजवत नव्हते. थोडे गमावून थोडे मिळवणे हे त्यांना पटत होते. गांधींचे तसे नव्हते.
तेव्हा ह्या दोन घटनांत आजिबात तुलना होत नाही.
16 Nov 2010 - 11:02 pm | नितिन थत्ते
गांधी एकूणातच धर्मश्रद्ध होते. त्यांनी 'रामराज्य' वगैरे कल्पनाही मांडल्या होत्या इतकेच नव्हे तर त्यांची अस्पृश्यविषयक भावनाही दयेची होती. त्यासाठी गांधींवर कोणी टीका करीत असेल तर माझे त्याच्याशी भांडण नाही.
माझा गांधीवाद स्वातंत्र्यलढ्यातल्या मार्गाविषयी आहे. (आणि काही प्रमाणात हिंदु-मुस्लिम प्रश्नाविषयी आहे)
>>महिलांना अधिकार मिळण्यापेक्षा, आधुनिकीकरणापेक्षा खिलाफत श्रेष्ट असे सूचित झाले.
महिलांचे अधिकार वगैरे मुद्दे त्यावेळी कुणाच्या विचारविश्वात नव्हते. केमाल पाशाच्या तुर्कस्तानमधील आधुनिकीकरण/सुधारणा १९२६ नंतरच्या आहेत. टिळकांनाही महिलांच्या (खरेतर लहान मुलींच्या) हक्कापेक्षा धर्म महत्त्वाचा वाटलाच होता.
17 Nov 2010 - 8:00 am | हुप्प्या
टिळकांनी सामाजिक सुधारणांना स्वातंत्र्यापेक्षा दुय्यम मानले होते. त्यावरुन त्यांचे आगरकरांशी भांडणही झाले होते. तेव्हा टिळकांचा सामाजिक सुधारणेचा दृष्टीकोन हा फार पुढारलेला नव्हता हे उघड आहे.
पण माझ्या माहितीप्रमाणे टिळक आणि गांधी ह्या वेगळ्या काळातील, वेगळ्या विचारांच्या व्यक्ती आहेत. टिळकांनी तशीच चूक केली म्हणून गांधींची चूक क्षम्य हे काय तर्कट आहे?
मग रँडला मारण्याची प्रेरणा देणारे टिळक आणि भगतसिंगाच्या शिक्षेविरुद्ध काही करायला नाकारणारे गांधी ह्या विरोधाभासाचे काय? जेव्हा सोयीचे असेल तेव्हाच टिळक आणायचे का?
हिंदूंमधे जातिबंधने आहेत आणि होती. गांधींनी त्याविरुद्ध आवाज उठवला आणि काही ठोस कार्य केले. अस्पृश्यांना सन्मानाने जगता यावे याकरता प्रयत्न केले. मात्र मुस्लिमांच्या धर्मातल्या तितक्याच वाईट गोष्टींविरुद्ध कधी आवाज उठवला नाही आणि टीकाही केली नाही.
उलट खिलाफतसारख्या उचापतीच्या निमित्ताने धर्मांध लोकांची री ओढली. हा दुटप्पीपणा का?
जिनांसारखा उच्चशिक्षित, धर्मापासून दूर असणारा हुषार माणूस. ह्याला जवळ न करता मौलाना महंमद अली आणि लियाकत अली असल्या डोकेफिरूंना जवळ का केले?
17 Nov 2010 - 8:15 am | नितिन थत्ते
>>पण माझ्या माहितीप्रमाणे टिळक आणि गांधी ह्या वेगळ्या काळातील, वेगळ्या विचारांच्या व्यक्ती आहेत. टिळकांनी तशीच चूक केली म्हणून गांधींची चूक क्षम्य हे काय तर्कट आहे?
वेगळ्याकाळातील व्यक्ती हे बरोबर. पण लखनौ करार(१९१६) आणि खिलाफत(१९१९) या फार दूरदूरच्या घटना नव्हत्या. मुसलमानांना जवळ करण्याची गरज त्या काळी सर्वांना वाटत होती. त्यानुसार प्रत्येकजण प्रयत्न करीत होता.
टिळकांचे कृत्य दाखवले कारण दोन्ही एकाच स्वरूपाची कृत्ये आहेत. आणि टिळक मात्र "दाढ्या कुरवाळणारे" म्हणून प्रसिद्ध नाहीत.
17 Nov 2010 - 11:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नितिन आणि नगरीनिरंजन यांचा प्रतिवाद अथवा त्यांना सहमती म्हणून नाही, केवळ माहिती म्हणून.
'लोकमान्य ते महात्मा' या पुस्तकाच्या पहिल्या खंडात (कादंबरी नव्हे, इतिहासाच्या पुस्तकात) डॉ. सदानंद मोरे यांनी टिळकांच्या मुसलमान विरोधापासून पुढे 'उत्क्रांत' झालेला मुसलमान 'अनुनय' याचे तर्कसंगत आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण दिले आहे. सध्या हाताशी हे पुस्तक नाही आणि आता या गोष्टी तपशीलवार आठवत नाहीत. पण आवड असल्यास हे दोन्ही खंड जरूर वाचावेत.
अनेक बाबतीत (पण वेगळ्या पद्धतीने) गांधींनी टिळकांचेच राजकारण पुढे सुरू ठेवले या विधानाचा पाठपुरावा करताना डॉ. सदानंद मोरे या संदर्भातील विचारांचा संदर्भ देतात.
(सदर पुस्तक स्वतःच्या मालकीचे असल्यास दुसरा खंड मला एक महिन्याच्या उधारीवर द्यावा ही विनंती.)
इंद्राकडून पुन्हा एकदा त्याच्या अभ्यासू या प्रतिमेला जागणार प्रतिसाद. आणि त्याबद्दल त्याचे आभारही.
17 Nov 2010 - 2:06 pm | इन्द्र्राज पवार
"....पण आवड असल्यास हे दोन्ही खंड जरूर वाचावेत. ....".
~ डॉ.मोरे यांच्या या पुस्तकाबद्दल मागेही मला कुणीतरी अशाच अर्थाने सांगितले होते, पण कामाच्या धबडग्यात ते पुस्तक मिळविता आलेच नाही. मात्र आता अदितीच्या या प्रतिसादानंतर, अभ्यासाच्या दृष्टीने ते मिळविणे फार गरजेचे वाटू लागले आहे.
"...अभ्यासू या प्रतिमेला जागणार प्रतिसाद..."
थॅन्क्स अदिती...आणखीन् काय म्हणू ?
इन्द्रा
17 Nov 2010 - 9:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिंदूंमधे जातिबंधने आहेत आणि होती. गांधींनी त्याविरुद्ध आवाज उठवला आणि काही ठोस कार्य केले. अस्पृश्यांना सन्मानाने जगता यावे याकरता प्रयत्न केले.
म.गांधींनी अस्पृश्यांसाठी काय प्रयत्न (हरिजन सेवक संघ सोडून) केले काही माहिती द्याल का ? सामाजिक आणि राजकीय दृष्टीने अस्पृश्यांना समान दर्जा प्राप्त व्हावा यासाठी असे कोणते ठोस कार्यक्रम आखले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबतीत असं म्हटलं होतं की, ''केवळ हिंदु व हिंदुत्त्व यांच्यासाठी हिंदुस्थान सुरक्षित करणे हा हरिजन सेवक संघाचा मुख्य हेतू होता. अस्पृश्य हे हिंदु म्हणून रहावे असे म.गांधींना वाटायचे पण हिंदूंच्या बरोबरीच्या दर्जाच्या भागीदार म्हणून नव्हे तर गरीब,दुबळे, म्हणून. हरिजन सेवक संघ हे त्यांच्या अनेक तंत्रापैकी एक तंत्र होते'' त्यामुळे अस्पृश्यांविषयी त्यांचा भाव दयाळुपणाचा, उदारमतवादाचा असला तरी ते सर्व सर्व सोंग होते असे वाटते. माझा मुद्दा इतकाच की अस्पृश्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी फार महान कार्य केले,असे काही वाटत नाही. असेल काही माहिती तर जरुर द्यावी.
-दिलीप बिरुटे
16 Nov 2010 - 10:55 pm | हुप्प्या
जर गांधींचा दुसर्या महायुद्धात भाग घ्यायला विरोध होता तर त्याविरुद्ध त्यांचे आवडते उपोषणाचे हत्यार का नाही वापरले? चोरीचौराच्या हत्याकांडानंतर तत्वनिष्टेची टिमकी वाजवत त्यांनी आपली असहकाराची चळवळ मागे घेतली. २२ लोक मेले तर अक्खी चळवळ मागे घेतली तर हजारो, लाखो लोक मारणार्या युद्धाकरता एक उपोषण करणे जड का जावे?
प्रतिसाद संपादीत. संवादात एखाद्या व्यक्तीबद्दल अथवा विचारांबद्दल मतभिन्नता दाखवताना देखील कृपया योग्य शब्दांचा वापर करावात. - संपादक मंडळ
16 Nov 2010 - 11:04 pm | नितिन थत्ते
>>गांधींचा दुसर्या महायुद्धात भाग घ्यायला विरोध होता तर त्याविरुद्ध त्यांचे आवडते उपोषणाचे हत्यार का नाही वापरले?
याचे उत्तर मी देऊ शकत नाही. ते गांधींनाच विचारायला लागेल.
17 Nov 2010 - 7:51 am | हुप्प्या
गांधींचा युद्धात सहभागी होण्याचा विरोध हा तोंडदेखला होता असे म्हणावे लागेल.
16 Nov 2010 - 11:18 pm | अडगळ
समजा 'म्हातार्या' असा उल्लेख मी गजानन महाराज , शिवाजी , स्वामी समर्थ , परमहंस वगैरे वगैरे यांच्यासंदर्भात जर कुठे केला तर किती % लोकांच्या किती % भावना दुखावतील ?
आप्पा बेलवलकरांचा फ्यान (अडगळ)
होय , होय . तुम्ही आहात तरूण.तुम्ही तरुण आहात म्हणजे करता येतो फक्त संभोग तुम्हाला माणसांच्या माद्यांशी .
अरे, पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत गिधाडं ही.
(नटसम्राट)
24 Aug 2012 - 4:31 pm | पुण्याचे वटवाघूळ
क्या बात है. हा मुद्दा मांडल्याबदल धन्यु.
25 Aug 2012 - 9:10 am | अर्धवटराव
टिळकांनी प्रथम मुसलमानांच्या दांडगाईविरुद्ध हिंदुनी दंड थोपटले तेंव्हा त्याचे सक्रीय समर्थन केले. इंग्रजांविरुद्ध भारतीय आघाडी उघडावी म्हणुन प्रसंगी मुस्लीमांना मतदार संघ तोडुन द्यायचे कबुल केले. पुढे मुस्लीम शिरजोर झाल्याचा शंशय जरी येता तर त्याचाही काटा टिळकांनी काढला असता. टिळक १००% राजकारणी म्हणुन वावरले. इथे सर्वधर्मसमभाव वगैरे "आत्म्याच्या आवाजाच्या" गप्पा त्यांनी केल्या नाहि. मनातुन टिळक एक गणिती विचारवंत होते. धर्माचा अविवेकी पगडा त्यांच्यावर नव्हता, आणि म्हणुन ते स्वभावतः सेक्युलर होते (त्या काळच्या मानाने).
गांधींचं नेमकं उलटं. मुस्लीम अनुययच नाहि, तर एकुण आयुष्यभर त्यांनी राजकारण केले पण आपण राजकारणी आहोत हेच मान्य केलं नाहि. संत-समाजसेवक-राजकारणी-मुत्सद्दी... कुठेलीच भुमीका "हो... मी असा आहे" इतक्या स्वच्छपणे न घेऊ शकणार्या गांधींना म्हणुनच सत्याचे प्रयोग करावे लागले.
भारताच्या स्वातंत्र्य-समृद्धीच्या आड मुस्लीम कट्टरता आलि तर सर्व शक्तीने-सर्व मार्गाने तिचा बिमोड करणे हा टिळकी खाक्या. तर राष्ट्रीय ऐक्याच्या नावाखाली, स्वतःचे संतत्व अबाधीत ठेवायला प्रसंगी राष्ट्र्कार्याचे नुकसान सहन करुन मुस्लीम अनुयय करणे हा गांधींचा स्वभाव. मुलभूत फरक आहे.
अर्धवटराव
2 Feb 2013 - 5:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
+++++८२३४२३८२८३३७२८८३४२३०९४२१३१२५६३१८१७२३६७२१७१२३६१२६३१२६५३१३६१२३६१२३८१२८३१२३६१२५३७१२३५२ वेळा समर्थन...!!!
16 Nov 2010 - 9:54 pm | धमाल मुलगा
ह्याच विचारांचे एक्स्टेन्शन असलेला प्रश्न मलाही पडलाय. उपरोल्लेखीत वाक्यांमध्ये आलेल्या फाशी हे तत्वविरोधी वर्तन अहिंसावाद्यांना कसे आवडले ह्याचाच पुढचा भाग म्हणजे त्यानंतर घडलेल्या जाळपोळी करणं हे अहिंसेच्या तत्त्वाच्या विपरीत वर्तन अहिंसावाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय नेता असल्याने त्याच्या वधकर्त्यासोबत त्याच्या ज्ञातीबांधवांवर सरसकट अत्याचार करणे हा वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता?
16 Nov 2010 - 11:40 pm | राजेश घासकडवी
मिपाकरांनो,
आपले प्रतिसाद हवे आहेत.
मिपावरती नोकिआच्या प्रायोजनाने आंतरजालावर वावरणाऱ्या व व्यवसायाने वा नोकरीत इतिसाहाशी काडीमात्र संबंध नसलेल्या हौशी लेखकांसाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत अर्थातच गुणवत्तेवर आधारित अशा मान्यवर परिक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या लेखांना कुठचेही पारितोषिक नाही. सर्वाधिक प्रतिसाद मिळविणार्या लेखासही तसे प्रत्यक्ष पारितोषिक नाहीच, पण आपणाला माहीत आहेच की अधिक प्रतिसाद आले की मिसळभोक्तांच्या मिपा टॉप २५ वगैरे यादीमध्ये ते लेखन पोहोचते.
प्रतिसाददान सतत चालूच असते. एकुण प्रतिसादांच्या संख्येकडे पाहता असे लक्षात आले की केवळ संयत लिखाण करून दहावीस प्रतिसाद सहज मिळतील मात्र भरघोस प्रतिसाद हवे असतील तर काही प्रक्षोभक शब्द लागतील. अर्थातच अशा वेळी गांधीवादाचा आधार मोठा!
मिपाकरहो - गांधीवाद्यांनो आणि गांधीद्वेष्टेहो, त्यासाठी खालील प्रक्षोभक शब्द व वाक्यरचना घातल्या आहेत, त्या वाचा व त्यामुळे उचकलात, किंवा पुन्हा एकदा गांधींना व गांधीवाद्यांना टपली मारण्याची संधी शोधत असाल तर भरघोस प्रतिसाद द्या. मतदानाला काळमर्यादा नाही. तसेच कितीही संगणकांवरुन, कितीही आयडींतून, रोज अनेकदा प्रतिसाद देता येतील (दोन्ही पक्षांना) तेव्हा सढळ हस्ते प्रतिसाद द्या ही विनंती
-गोडसे यांची पुण्यतिथी
-गांधीवध (गांधीहत्या नाही बरं का), नथुराम म्हणजे वधकर्ता
आपला कृपाभिलाषी
सर्वसाअक्षी
टीप - वरील प्रतिसाद हे प्रस्तुत लेखकाच्या आधीच्या मदत मागणाऱ्या धाग्याचं विडंबन आहे. ते विचारांचं विडंबन आहे, तेव्हा कृपया व्यक्तिशः घेऊ नये ही विनंती.
16 Nov 2010 - 11:43 pm | प्रियाली
की गांधीवधाचा?
लवकरच धनु आणि बियंतसिंग वगैरे क्रांतीकारकांची पुण्यतिथी साजरी करण्याचा विचार आहे. कुणाला लेखन करून चर्चेचा धागा टाकण्यात इंटरेष्ट असल्यास कळवावे. मला कामामुळे शक्य होत नाहीये.
17 Nov 2010 - 1:49 am | मनोहर काकडे
बाबू बजरंगी (गुजरात दंगल क्रांतिकारक), दारासींग( स्टेंन्सचा वध) इ. क्रांतिकारकांची जयंती वा वाठदिवस साजरे करायलाही सुरवात करायला हवीच. त्यांनी दुष्टांचे निर्दालन करून कशी छान पैकी शांती व सुखसमाधान देशात निर्माण केलं आहे.
17 Nov 2010 - 7:50 am | हुप्प्या
आपणही दाऊद इब्राहिम, मेनन बंधू, कसाब आणि अफझल गुरु या महात्म्यांचे वाढदिवस आणि असल्यास पुण्यतिथ्या साजर्या करा. तळहातावर शिर घेऊन या थोर विभूतींनी सर्व भारतीयांना शांती, सर्वधर्मसमभाव आणि प्रेमाचा संदेश दिला नाही का?
गांधीनी दुसरे काय केले? भगतसिंगाच्या फाशीला योग्य ठरवले पण स्वामी श्रद्धानंदाना मारणार्या नराधमाला भाई अब्दुल रशीद असे गौरवले. त्याची फाशी रद्द व्हावी म्हणून (अयशस्वी) प्रयत्न केले.
काँग्रेसही तीच उज्ज्वल परंपरा चालवत आहे. अफझल, कसाबला फाशी म्हणजे भारताच्या सर्वधर्मसमभावालाच छेद, हो की नाही?
17 Nov 2010 - 8:06 am | आनंदयात्री
>>स्वामी श्रद्धानंदाना मारणार्या नराधमाला भाई अब्दुल रशीद असे गौरवले. त्याची फाशी रद्द व्हावी म्हणून (अयशस्वी) प्रयत्न केले.
हुप्प्यामालक ! ही गोष्ट पहिल्यांदाच एकतोय, जरा विस्ताराने एकायला आवडेल.
बाकी तुमचे आणि थत्त्यांचे प्रतिसाद अत्यंत उत्तम, आवडले.
17 Nov 2010 - 8:58 am | मिसळभोक्ता
हे आर्यसमाजी कधी हिंदुबंधू होतात, तर कधी हिंदू त्यांना झिडकारतात. एक काही तरी ठेवा ना राव !
काय हुप्प्याशेठ, हे स्वामी दयानंद, श्रद्धाणंद, आणि आपण हुप्प्यानंद, हे हिंदू आहात की नाही, ह्याचे फायनल डिसिजन करा ने !
मग ठरवू, की आर्य समाजी आणि हिंदू हे भाई भाई, की अब्दुल रशीद भाई, ते.
17 Nov 2010 - 8:32 pm | विकास
हे आर्यसमाजी कधी हिंदुबंधू होतात, तर कधी हिंदू त्यांना झिडकारतात. .... मग ठरवू, की आर्य समाजी आणि हिंदू हे भाई भाई, की अब्दुल रशीद भाई, ते.
या प्रतिसादासंदर्भात इंद्रराज यांनी खाली अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून खुलासा केला असल्याने त्या संदर्भात लिहायची गरज नाही. फक्त आपण वर मांडलेल्या मुद्यासंदर्भात मला वाटते हुप्प्या यांनी आर्यसमाजी हिंदू आहेत का नाही हा विषय मांडलेला नसून गांधीजींनी भगतसिंगाच्या फाशीच्या वेळीस घेतलेली भुमिका ही अब्दुल रशीद भाईंच्या वेळेस कशी बदलली हा होता. त्यात कोण हिंदू आहे अथवा नाही हा प्रश्न नसून अहींसेचे तत्वज्ञान अॅक्रॉस दी बोर्ड वापरले आहे का नाही हा आहे.
बाकी चर्चा रोचक आणि बरीच नवीन माहीती मिळत आहे.
17 Nov 2010 - 8:54 pm | नितिन थत्ते
गांधींनी भगतसिंग यांची फाशी रद्द होण्यासाठी प्रयत्न केल्याचे वर दाखवून दिले आहे.
त्यामुळे वेगवेगळे तत्त्व वापरल्याचा आरोप खारीज झाला आहे.
अवांतर : विकास यांना या चर्चेतून "नवीन" माहिती मिळत आहे हे वाचून आश्चर्य वाटले.
17 Nov 2010 - 11:43 pm | सर्वसाक्षी
मा. थत्तेसाहेबांनी दाखवुन दिलेले प्रयत्न किती पोकळ होते ते मी त्याच प्रतिसादाच्या प्रतिसादात दाखवुन दिले आहे.
17 Nov 2010 - 8:23 am | daredevils99
महर्षी हुप्प्याजी हे अगाध ज्ञान आपण कोणत्या शिशुशाखेतून प्राप्त केले ते सांगा कारण विकीपिडिया काही वेगळेच सांगतोय!!!
17 Nov 2010 - 4:10 am | निनाद
ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल हे कम्युनिस्टांचे ब्रीदवाक्य नाही. हे जॉर्ज ऑरवेल या लेखकाने केलेले कम्युनिस्ट व्यवस्थेचे वर्णन आहे. कम्युनिस्ट आपल्याच तत्त्वाला इतक्या सहजते ने आणि उघडपणे हरताळ फासत नाहीत. ते फार ढोंगीपणा करतात त्यासाठी.
17 Nov 2010 - 8:07 am | आनंदयात्री
>>कम्युनिस्ट आपल्याच तत्त्वाला इतक्या सहजते ने आणि उघडपणे हरताळ फासत नाहीत. ते फार ढोंगीपणा करतात त्यासाठी.
खिक्क .. लै भारी !!
17 Nov 2010 - 8:30 am | नरेश धाल
'एक प्रश्न' लेखावर अबब किति प्रश्न.
गाडुन टाका हि सगळि प्रश्न
ते राम, त्याचे पुनर लेखन, क्रुष्ण होता का नव्हता, गांधी, टिळ्क, हे सगळ सोडुन एक दिवस तरि जगा लेकांनो.
विसरा त्या नथुरामाला, त्याने एकच गोळि मारली आनि तुमि लोक मागचि ६० वर्शे झेलताय.
सोडा
इथे आज एका फोनवरुन तलाक देन्या इतपत आपन पोहोचलो आनि हे काय तुम्हि ६०/१०० वर्शाचे दळन दळताय. http://www.thehindu.com/news/national/article888417.ece
Talaq uttered thrice by a Muslim man on a mobile phone will be considered valid even if his wife is unable to hear it all the three times due to network and other problems, a fresh fatwa has ruled.
म्हनुन चान्ग्ला मोबयिल घ्या बोल्लो तर लेख उडवला, ओके आहे.
wife should be able to hear clear voice एवढा तरि हक्क द्या ना राव.
17 Nov 2010 - 8:38 am | daredevils99
आज ६३ वर्षांनंतर, गांधी भाषा, जात, धर्म, देश यांच्या सीमा ओलांडून केवळ ओळखलेच नाहीत तर अभ्यासले जातात.
आणि, नथुरामाच्या ओळखीची धाव एका अत्यंत मर्यादित परीघापलीकडे जात नाही!
बाकी धागा मनोरंजक इत्यादी इत्यादी...
17 Nov 2010 - 10:39 am | विजुभाऊ
विरोधकाचे मतपरीवर्तन हा गांधींच्या विचारांचा पाया होता.
त्यानी हिंसेचे समर्थन केले नाही. पण पाणी डोक्यावरून जाते आहे हे कळाल्यावर त्यानी लोकाना करो या मरो असेही सांगितले होते.
नथुराम किंवा त्याच्या विचारांशी सहमत असणार्याना सर्वमान्यता कधीच मिळाली नाही.
नथुरामला फाशी दिली नसती तर फार बरे झाले असते. त्याला काहींच्या मते मिळालेले शहीदत्व प्राप्त झाले नसते.
भारतीय समाजाला एखादा विभाग वगळता बंडखोरी सशस्त्र चळवळ पेटून उठणे वगैरे जमत नाही.
त्यामुळेच की काय हिंदू जिहाद वगैरे संकल्पना प्रत्यक्षात येवू शकत नाही.
कमालीची आत्ममग्नता हा या समाजमानसाचा पाया झालेला आहे.
अन्यथा कुठून तरी एक बाबर इकड येतो आणि त्याचा वंश सर्वसत्ताक बनतो आणि शिवाजीला स्थानीकांकडुनच विरोध होतो. त्याची चळवळ घरच्यांकडुनच सम्पवण्याचा प्रयत्न होतो.
हा चमत्कार या इथेच दिसतो.
17 Nov 2010 - 11:28 am | इन्द्र्राज पवार
".....गांधीनी दुसरे काय केले? भगतसिंगाच्या फाशीला योग्य ठरवले पण स्वामी श्रद्धानंदाना मारणार्या नराधमाला भाई अब्दुल रशीद असे गौरवले....."
श्री.हुप्प्या यानी 'गांधींनी अब्दुल रशीदला 'भाई' असे म्हटले म्हणजे एक प्रकारे गौरविले' असे जे मत मांडले आहे त्याबद्दलच केवळ इथे प्रतिसाद देत आहे. [बाकी गांधीहत्या आणि नथुराम या विषयावर मिपावर या अगोदर खूप दळण रगडले गेले आहे, त्यामुळे द्विरूक्ती टाळणेच योग्य ठरेल.]
श्री.आनंदयात्री यानीही 'श्रद्धानंद' विषयावर विस्ताराने लिहिण्याची विनंती केली असल्याचे दिसले आहे. त्यामुळे तोही हेतू या निमित्ताने पूर्ण होईल.
खिलाफत चळवळीविषय एकदोन प्रतिसाद वर आले आहेतच. "खिलाफत = खलिफा हा सर्वेसर्वा मानला जावून तो म्हणेल ती पूर्व (कारण तो अल्लाचा प्रतिनिधी या नात्याने)" अशी समजूत मुस्लिम समाजात रुजली होती, जिला तुर्कस्थानात मुस्तफा केमाल पाशाने विरोध केला होता. पुनर्रज्जीवनवाद्यांनी खिलापत चळवळ जिवंत ठेवण्याचे प्रयत्न चालूच ठेवले पण साधारणतः १९२३ च्या आसपास ही चळवळ थंडावली. पण यामुळे भारतातील कट्टर मुस्लिमांनी त्याचा राग हिंदूंवर काढला. वायव्य सरहद्दीवरील पठाणापासून ते मलबारपर्यंत तसेच काश्मिरपासून ढाक्क्यापर्यंतच्या पट्ट्यात मुस्लिमांनी [खलिफा गमावल्याच्या विफलतेतून] केमाल पाशावर नव्हे तर हिंदूंवर संताप व्यक्त केला. अमृतसर, मुलतान, मीरत, पानिपत, जबलपूर, दिल्ली इतकेच काय तर महाराष्ट्रातील नागपूर आदी ठिकाणी मुसलामानांनी दंगे उसळवले. ९ व १० सप्टेम्बर १९२३ या दोन दिवसात वायव्य सरहद्द प्रांतातील 'कोहट' या गावी १५५ हिंदू मारले गेले तर लक्षावधी रुपयांच्या मालमत्तेची राखरांगोळी करण्यात आली. देवळेही उद्ध्वस्त झाली. कोहट परिसरातील भयभीत झालेल्या हिंदू समाजाला धीराचे शब्द देऊ पाहणारा त्या वेळचा एकमेव नेता म्हणजे 'स्वामी श्रद्धानंद'. त्यानी हिंदू समाजाची संघटना या कार्याला पूर्णवेळ वाहून घेतले होते. त्यांच्या पुढाकाराने हिंदू 'कोहटकांडा' नंतर एकत्र होऊ लागताच मुसलमानांच्या डोळ्यात स्वामीजी सलू लागले. त्यातील अतिरेक्यांच्या मनाने असे घेतले की श्रद्धानंदांचा काटा दूर केल्याखेरीज जात्यंध राजकारणाचा जय शक्य नाही व याच हेतूने अब्दुल रशीद याने स्वामींच्या दिल्लीच्या निवासस्थानी [ते आजारी असल्याने त्यांची चौकशी करायला बरेच लोक येत असत....प्रवेशही खुलाच असे] आदरांजली वाहण्याचा बहाणा करून रशीदने निवासात प्रवेश मिळवला व स्वामी श्रद्धानंदांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली....दिनांक २३ डिसेंबर १९२६.
आता इथे बाकीच्या [भल्याबुर्या] गोष्टींची चर्चा करण्यापेक्षा या हत्येवर नेमकी म.गांधींची प्रतिक्रिया काय होती ते पाहणे महत्वाचे आहे.
मूळ प्रतिक्रिया इंग्लिशमधील असून तिचा अनुवाद नंतर पाहू :
"...God had willed for him [i.e.Swami Shraddhanand] a martyr's death. I cannot mourn over his death. He and his followers are to be envied. ~~~ या ठिकाणी गांधीजी म्हणतात I cannot mourn over his death याचा अर्थ असा बिलकुल नाही की त्याना स्वामींच्या मृत्युबद्दल खेद वाटला नाही....तर पुढचे वाक्य असे आहे ~~ For though Shraddhanandji is dead he is yet living. He lived a hero. He has died a hero. ~ स्वामीजी आपल्यातून नाहिसे झाले असे मानू नये, असेच गांधी सुचवितात हे स्पष्ट आहे.
"....I deeply regret the event. The joy of the death is thus tempered by the sorrow that an erring misguided brother has been the cause of it. Let us not ascribe the crime of an individual to a whole community. Let us not harbor the spirit of retaliation. Let us not think of the wrong done by a Musalman against a Hindu, but an erring brother against a hero...."
प्रत्येक ठिकाणी गांधीजीनी स्वामींचा उल्लेख "हीरो" असाच केला आहे तर रशीदचा उल्लेख 'प्रमादशील बंधू' असा केला असल्याने त्याचा 'गौरव' केला असे म्हणणे धार्ष्ट्याचे होईल.
श्री.द.न.गोखले यानी केलेला अनुवाद...थोडक्यात ::: "परमेश्वराची इच्छा होती की, त्याना - स्वामीजींना - हुतात्म्याचे मरण यावे. मी त्यांच्या मृत्युबद्दल शोक करू शकत नाही. कारण जरी श्रद्धानंदजी मृत्यु पावले असले तरी ते अद्याप जिवंतच आहेत. शूर पुरूष म्हणून ते जगले, शूर पुरूष म्हणूनच ते मरणाधीन झाले. हिंदूनी एका व्यक्तीचे दुष्कृत्य सर्व जमातीवर लादू नये. प्रत्याघाताची भावना मनात आणू नये. एका मुसलमानाने एका हिंदूविरुद्ध केलेले दुष्कृत्य असे या घटनेकडे न पाहता, आपण एका प्रमादशील बंधूने एका शूर पुरुषाविरूद्ध केलेले दुष्कृत्य असे याकडे पाहावे."
[अवांतर ~~ पुढे झालेल्या खटल्यात या अब्दुल रशीदला स्वामी श्रद्धानंदाच्या हत्येबद्दल फाशी झाली. ज्या मुस्लिमांनी स्वामी हत्येबद्दल त्याचा उदोउदो केला होता त्यापैकी एकही माय का लाल रशीदचे प्रेत घेण्यास पुढे आला नाही, व शेवटी तुरुंगाच्या आवारातच सरकारी शिपायांनी त्याचे दफन केले.]
असो.
इन्द्रा
17 Nov 2010 - 11:49 pm | आनंदयात्री
माहितीबद्दल धन्यवाद इंद्र :)
17 Nov 2010 - 5:11 pm | गणेशा
थोडेफार रिप्लाय वाचले ...
नथुराम गोडसे यांचा नाटक पाहुन खुप चाहता होतो मी. त्यातच गांधीजींबद्दल जास्त आदर नव्हता .. नेटवर कोठेही त्यांच्याविरोधी मते वाचुनच होता तो ..
नंतर सारासार अभ्यास करुन आणि काही मित्रांच्या लेखामुळे गांधीजी खरेच महान होते हे पटले ...
नक्कीच ते मित्रांचे लेख नविन थ्रेड बनवुन देयीन ..... आवडतील सगळ्यांना ....
----
बाकी नथुराम - गांधी वाद करुन आपण कोणाचे प्रेमी आणि असेच पाहिजे हे फिजुल वाटते मला तरी ..
असो .. येथे थांबतो
17 Nov 2010 - 8:49 pm | मनीषा
हिंसेला प्रतिकार न करणे -- म्हणजेच हिंसा घडून देणे
हा सुद्धा अहिंसेच्या तत्वाचा पराभवच .
17 Nov 2010 - 10:39 pm | वेताळ
पण नथुराम गोडसेला फाशी दिली ती एक योग्य गोष्ट होती.
तसेच नथुरामच्या फाशीला उदांत ठरवणारे नकळत भारतिय घटनेचा देखिल अपमान करत आहेत.
कसाब देखिल त्याच्या धर्मासाठी भारतात हत्याकांड घडवण्यासाठी आला होता मग त्याला तरी कशाला दोषी धरायचे?
त्याच्या दहशतवादाला देखिल तात्विक मुलामा दिला तर तो देखिल देवदुत ठरतो.
17 Nov 2010 - 11:39 pm | सुनील
अशीच एक मनोरंजक चर्चा पलीकडे सुरू आहे. तिचाही आस्वाद घ्यावा!
बाकी "गोडसे" म्हटल्यावर आम्हाला तरी हेच आठवते. तुम्हाला काय आठवते?
17 Nov 2010 - 11:56 pm | मुक्तसुनीत
कुणाला काय तर कुणाला काय
18 Nov 2010 - 12:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता यावर दुसरीकडून 'अल्लाऽऽ जीव गेला' ऐकावं लागणार का काय? ;-)
18 Nov 2010 - 9:59 am | सुनील
च्यायला, तुमारा फटू मेरी फटूसे चकाचक कैसा?
असो, वर थोर्थोर मंडळी गंभीर चर्चा करीत असताना तुम्हा लोकांना असे थिल्लर चाळे सुचतातच कसे? (आता, त्या थोर्थोर मंडळींच्या दळणाचा आमच्या रोजच्या रोटीशी काय संबंध म्हणून काय विचारता?)
18 Nov 2010 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>अशीच एक मनोरंजक चर्चा पलीकडे सुरू आहे. तिचाही आस्वाद घ्यावा !
ओसाड संस्थळाच्या रंगमंचावर काहीतरी हालचाल व्हावी त्यासाठी
अशा चर्चा आवश्यक आहे असे वाटते. :)
-दिलीप बिरुटे
[ओसाड संस्थळावरील सदस्य]
18 Nov 2010 - 10:45 am | विकास
यावरून मला एकदम चिं.वि. जोशींच्या "ओसाडवाडीचे देव" हे पुस्तक आठवले. असो.
18 Nov 2010 - 11:50 am | नरेश धाल
विकास शेठ
मेरे पास काम धंदा है! यातिल काम धंदा वेब सायिट कुठे आहे, निट पत्ता द्या. मी बी जॉइन करतो.
21 Nov 2010 - 11:48 pm | यकु
त्यांचा खून केला जाणार आहे याबद्दल गांधींना सरदार पटेलांनी स्वत: भेटून पूर्वकल्पना दिली होती आणि पोलीसफोर्स तैनात करू देण्याचा आग्रह केला होता. पण अहिंसेची स्तोत्रे गाणार्या त्या गांधीबाबाने त्यांच्या सभेच्या प्रार्थनेच्या परिसरात पोलीसांनाही रिव्हॉल्व्हर बाळगायला मनाई केली होती.
नथुराम गोडसेंनी त्यांची भडास काढली आणि सर्वसाक्षींना पडलेला अहिंसेच्या व्याखेचा प्रश्न तेव्हाच जागतिक पटलावर उभा झाला तो तेव्हापासून तसाच आहे; कुणीही या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही आणि दिलेली उत्तरं मान्य होणार नाहीत कारण वास्तवात चालणारी उत्तरं नेहरूंच्या शासनाकडून (अॅटनबरोंच्या गांधी या सिनेमामध्ये एक खूपच मार्मिक दृश्य आहे - दंगलींच्या जाळपोळीत, धामधुमीत भारताला स्वातंत्र्य मिळते आणि पहिले पंतप्रधान नेहरू अख्ख्या चित्रपटभरात पहिल्यांदाच हातात सिगारेट घेऊन धूर काढीत पंतप्रधानांच्या खुर्चीत दिसतात! ) केव्हाच देऊन झाली आहेत - नथुरामना फाशी!
कोणत्याही शासनासाठी अहिंसेचे तत्व वगैरे सब झूठ है! एवढे लोक सांभाळायचेत ना (भलेही मग ते सांभाळता येवोत की न येवोत). गांधींची अहिंसा वगैरे त्यांच्यापुरतीच मर्यादीत होती आणि सध्या ती राजघाटाच्या कंपाऊंडच्या आत असते म्हणे!
अहिंसेच्या पराभवाची तर बिलकुल चर्चाच नको - नथुरामची गोळी खाऊन गांधीनी राम म्हटला तेव्हाच अहिंसेची काय लागायची ती वासलात लागलीय.
गांधींची अहिंसा इंग्रजांना मान्य नव्हती आणि आपण स्वीकारलेल्या इंग्रजांच्याच कार्बन कॉपी कायद्यात तर खूनाला शक्यतोवर फाशीचीच शिक्षा दिली जाते - कायद्याचे यथायोग्य पालन झाले आहे.
आता तुम्ही कायदा गाढव आहे म्हणा, गांधींचे आणि नथुरामचेही टाळके सरकले होते म्हणा काहीही म्हणा. त्यानं काय फरक पडतो?
22 Nov 2010 - 5:14 pm | daredevils99
नथुराम प्रेम ही एक वि़कृती.
अनवधानाने तुमचा उल्लेख नथुराम प्रेमी असा केला गेला. त्याबद्दल जाहीर माफी.
23 Nov 2010 - 12:59 am | आमोद शिंदे
नथुराम प्रेम ही एक वि़कृती... असे असेल तर मिपावर असे अनेक विकृत दिसत आहेत.
22 Nov 2010 - 5:58 pm | इंटरनेटस्नेही
माननीय संपादक मंडळाला विनाकारण कामाला लावणारा धागा पाहुन ड्वोले पाणावले!
(वर्तमानात जगणारा) ॠषिकेश.