"गोडसे" असे म्हटल्यावर तुम्हाला काय आठवते?
१) एखादा गोड पदार्थ
२) तुमचा आवडता गोड पाळीव प्राणी
३) मुग्धा गोडसे
सुचना - वर उल्लेखलेल्या तीन पर्यायांव्यतिरीक्त अन्य पर्याय उपलब्ध नाहीत याची कृपया नोंद घ्यावी आणि धागा अवांतराकडे भरकटणार नाही याची काळजी घ्यावी!
स्वगत : छ्या बॉ! आजकाल सगळीकडेच "गोड"से ज्वराचा सुळसुळाट झालेला दिसतो. यावर काहीतरी "जहाल आणि मादक" उतारा हवाच!
प्रतिक्रिया
20 Sep 2009 - 7:56 am | विसोबा खेचर
मस्त धागा!
आपला,
(मुग्धा गोडसेवर जीव असलेला) तात्या.
20 Sep 2009 - 10:24 am | टारझन
अगदी !! अगदी !!
बाकी तिरळं कुत्र पहिल्यांदाच दाखवल्याबद्दल सुनिलरावांचे शतशः आभार ..
हे तर आमच्या स्वप्नातही आलं णव्हतं .. आणि कोण ही मुग्धा गोडसे ? आमची नजर कत्रिणा-आयेषाच्या पल्याड जातंच नाही... एकणिष्ठ फॅन आहोत आपण तर बॉ...
तात्याचं बराय .. त्यांची बँडविड्थ बर्रिच मोठी आहे .. अगदी नॉर्थ ते साऊथ ..
चालूद्या :)
-(आयेषा प्रेमी) टारोबा टाकिया
![](http://www.sawf.org/Newsphotos/Bollywood/AyeshaTakia26Oct2007.jpg.jpg)
20 Sep 2009 - 8:44 pm | लवंगी
=)) तिरळं कुत्र !!
20 Sep 2009 - 8:12 am | शाहरुख
ही आणि काय भानगड !!
बाकी धागा वाचून फ्रेंड्स या मालिकेतील जोई (Joey) या पात्राच्या या प्रसंगाची आठवण झाली. (५४ सेकंदापासून पुढे)
काही लोकांना संवाद आक्षेपार्ह वाटू शकतात..
(आयुष्यातील काही वर्षे फक्त फ्रेंड्स बघण्यात घालवलेला आणि मुग्धा गोडसे बरोबर जिलबी खायची स्वप्नं बघणारा) शाहरुख
20 Sep 2009 - 8:17 am | एकलव्य
मरताना काही क्षण राहिले आहेत असे कळले तर तेव्हढे फ्रेन्डस् पाहत हसू द्या थोडावेळ असे आमच्या तोंडातून येईल.
(अलिकडे फ्रेन्डस् फारसे न बघणारा पण मनापासून आवडणारा) एकलव्य
20 Sep 2009 - 10:17 am | भडकमकर मास्तर
मुग्धा गोडसे बरोबर जिलबी खायची स्वप्नं बघणारा
लै भारे शहरुख
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
20 Sep 2009 - 8:13 am | मदनबाण
हे पहाच :---
http://www.youtube.com/watch?v=mk8Z0WbSWV0
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
20 Sep 2009 - 8:19 am | एकलव्य
गोडसे म्हटले की आम्हाला चितळे -- तेच हो पुण्यातले फ्फेमस -- आठवतात :P
20 Sep 2009 - 9:46 pm | निमीत्त मात्र
हे वाचले नाहीत का?
तसे मला गोडसे म्हंटले की वेगळेच काही आठवते ते इथे दिले तर पुन्हा मिपावरचा दंगेखोर असे म्हंटले जायचे मला. ;)
20 Sep 2009 - 9:29 am | भोचक
क्या बात है. मजा आला वाचून. हा उतारा हवाच
(भोचक)
तुम्ही गांधीवादी आहात? कोणत्या पक्षाचे?
तुम्ही हिंदूत्ववादी आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती
20 Sep 2009 - 9:53 am | प्रकाश घाटपांडे
आम्हाला तर गोडसे म्हटल्यावर दगडुशेट गणपतीचे सर्वेसर्वा प्रतापराव गोडसे डोळ्यासमोर येतात. यांनी दगडुशेट गणपतीला नवसाला पावायाला भाग पाडल ब्वॉ!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
20 Sep 2009 - 10:18 am | भडकमकर मास्तर
मला पुण्यातले गोडसे वाद्यवादन वर्ग आठवतात
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
20 Sep 2009 - 11:25 am | प्रमोद देव
गाय(अमेरिकन नव्हे!) चावते....असं वाटतं! ;)
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
20 Sep 2009 - 11:36 am | मराठमोळा
>>"गोडसे" असे म्हटल्यावर तुम्हाला काय आठवते?
मला मुग्धा गोडसे जिलेबीसारखी समोर बसलेली दिसते... ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
20 Sep 2009 - 11:42 am | अवलिया
तिन्ही आप्शन्स लै डेंजरऽऽऽ ब्वा !!
प्रमाणापेक्षा जास्ती झाले तर 'निमित्तमात्र' व्हायचे आजाराला... अनुक्रमे हगवण, डॉगफ्ल्यु आणि... हॅ हॅ हॅ !! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
20 Sep 2009 - 1:47 pm | चिरोटा
गोडसे/गोडांबे म्हंटल्यावर गोड पदार्थ -मुरांबा
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
20 Sep 2009 - 4:55 pm | चतुरंग
सुनीलभौ चांगलाच उतारा देतात अशा त्यांच्या ख्यातीला ते पुन्हा एकदा जागलेत! :)
वरचे तीनही पर्याय अफलातून आहेत! तुमच्या कल्पनाशक्तीला मनापासून दाद! हॅट्स ऑफ सुनीलभौ!!
पहिला पर्याय आमची जन्मजात आवड आहेच, दुसरा पर्याय हा तिसरा पर्याय दिला नसता तर नक्कीच स्वीकारला असता! ;)
(मुग्ध)चतुरंग
20 Sep 2009 - 5:38 pm | स्वाती२
मला गोडसे काका आठवतात. आजोबांचे जिवलग मित्र. त्यांच्या दुकानातल्या लिमलेटच्या गोळीची चव आजही जिभेवर रेंगाळते.
20 Sep 2009 - 6:01 pm | सोनम
मला कधी ही गोडसे म्हटल्यावर जिलबी हा पदार्थ आठवतो... :) :)
![](http://themoderatevoice.com/wordpress-engine/files/2007-october/namaste.JPG)
कारण जिलबी मला ही आवडत नाही........... :( :(
20 Sep 2009 - 8:40 pm | योगी९००
मला तर "नथूराम गोडसे" च पहिल्यांदा आठवतात..
खादाडमाऊ
21 Sep 2009 - 4:43 am | विकास
मस्त चर्चा विषय!
तसे आपण दिलेल्या पर्यायातील विचार करता, पर्याय एक मधील जिलेबी आठवली, मग त्यातून मला जलेबी हे नाव आठवले जे राबडी देवींच्या बहीणीचे आहे, जी (राबडी देवी) लल्लूप्रसाद यादवांची पत्नी आहे, जे (लल्लू) हे एकेकाळचे सर्वोदयी आणि समाजवादी विचारांतील भविष्यातील आशा मानले गेले होते पण नंतर त्यांचे काय झाले आणि एकीकडे गांधीजींचे आणि गांधीवादाचे नाव घेत या समाजवाद्याने काय केले हे आठवले ;)
इतके सगळे आपण दिलेल्या पर्याय#१ मधून आठवले! यात तिसरा कुठल्याच पर्यायाचा विचार केला गेला नाही, त्यामुळे यात अवांतर धरले जाणार नाही अशी आशा करतो. ;)
21 Sep 2009 - 5:24 am | प्रियाली
साठमारी, कुस्ती, बॉक्सिंगच्या खेळात पहिल्या रांगेतले फुकट मिळणारे तिकिट आठवते.
सध्या शिट्ट्या, टाळ्या आणि फेटे उडवून तृप्त झालो आहोत.
21 Sep 2009 - 11:41 am | हर्षद आनंदी
अवांतर म्हणा, चांदण्या द्या नाहितर फाट्यावर मारा...
आम्हाला फक्त नथुरामच आठवतात
21 Sep 2009 - 11:43 am | अमोल केळकर
सहमत
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
21 Sep 2009 - 3:41 pm | वारकरि रशियात
सुनीलभौ,
व्यक्तींपैकी कालानुसार प्रथम आठवतात
गोडसे भटजी - (माझा प्रवास) कर्ते १८५७ चे समर आणि राणी लक्ष्मीबाई प्रत्यक्ष पाहिलेले!
बाकी चालू द्यात!
मुक्तसंगः अनहंवादि
21 Sep 2009 - 6:08 pm | ॐकार केळकर
गोडसे म्हटल्यावर नथुराम आणि....
हेच आठवतं... बाकी आठवावं लागतं!