थेंब हे पावसाचे, धरणीसं सुगंधणारे
थेंब हे अत्तराचे, सर्वत्र सुवासणारे ||
थेंब हे घामाचे, सर्वांग निथळणारे
थेंब हे दवाचे, आळवास शोभणारे ||
थेंब हे जलाचे, तहानेस त्रुप्तणारे
थेंब हे ओषधाचे, यातनेस सुप्तणारे ||
थेंब हे सुरांचे, शांततेस भंगणारे
थेंब हे मदिरेचे, क्षणभर विसरवणारे ||
थेंब हे प्रतिभेचे, कवितेसं श्रुंगारणारे
थेंब हे तारुण्याचे, बंधनासं झुगारणारे ||
थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे
थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे ||
थेंब हे अश्रुंचे, डोळ्यातुन ओघळणारे
थेंब हे हास्याचे, ओठातुन पाझरणारे ||
थेंब हे तुषाराचे, मनासं अल्हादणारे
थेंब हे थेंबाथेंबाचे, थेंबात नाचणारे ||
(थेंबाथेंबांत लिहणारा) चेतन
प्रतिक्रिया
23 May 2008 - 11:06 am | फटू
थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे
थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे ||
थेंब हे अश्रुंचे, डोळ्यातुन ओघळणारे
थेंब हे हास्याचे, ओठातुन पाझरणारे ||
बहुतेक याला अनुप्रास अलंकार म्हणतात...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
23 May 2008 - 11:13 am | ईश्वरी
एकदम सही...छान केलीत कविता...आवडली.
ईश्वरी
23 May 2008 - 12:29 pm | चेतन
हा शब्दअनुप्रास आहे कि नाही हे माहीत नाही पणं अक्षरअनुप्रास होउ शकतो (चे, रे)
शब्दावर केलेल्या अनुप्रासाचे एक ढापलेले उदाहरणं
धवल करान्नी धवल फुले ती धवल गुणी गाठी
23 May 2008 - 7:33 pm | प्राजु
कविता आवडली..
थेंब हे मायेचे, मनासं ओलावणारे
थेंब हे प्रेमाचे, ह्रुदयास भिजवणारे ||
हे खास..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 May 2008 - 3:10 am | शितल
छान कविता आहे, सहज आणि सोपी.
26 May 2008 - 2:10 pm | चेतन
सतिश, ईश्वरी, प्राजु ताई, शितल
प्रतिक्रियांबद्दल आभार.
स्वगतः ह अनुप्रास आहे कि नुसते यमक? बहुतेक नमोगतावरचा लेख परत वाचल पाहिजे