'आलेख'

स्पंदना's picture
स्पंदना in जे न देखे रवी...
10 Nov 2010 - 6:38 pm

मंडळी हा 'आलेख' आहे तुमच्या माझ्या मोठ्ठे होण्याचा! बाल पावलांनी धावता धावता उंबरा ओलांडण्याचा ! एका छोटुल्याला मोठ होताना पहाण्याचा.

प्रत्येक आलेखाला एक परिमाण असते. इथ ते परिमाण आहे कागद. आजच्या जगात मोठ होण्याचं मोज माप मला कागदानच मोजावस वाटल. अन मग त्या मोठ्ठा होणारयाला पण नाव आहे कागद.
'कागद' आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग!

माझा कागद सहा महिन्यांचा असतो.
पालथ पडून पुढ सरकताना
पेपरवर हात मारून येणारा आवाज
त्याला गम्मत वाटतो.

वर्तमान पत्रातलं अक्षर न अक्षर
चिमण बोटांनी उखडून टाकण्याचा
त्याचा निर्धार असतो.

कागद थोडा मोठा होतो.
दारातल्या झिम्मड पावसात
छोट्या छोट्या नावांनी
भिजत रहातो.

आता कागदाला उधान येत
ताज्या वर्तमान पत्राचे गोळे करून
तो युद्ध खेळतो,
कधी घडी घडीच विमान होऊन
गल्लीभर उडतो.

मग कागदावर गिजमिड अक्षर उमटतात.
हळू हळू ती सुवाच्य होतात,
त्यांची अक्षर बनतात.

आता कागद इतिहास भूगोलात
गरगरु लागतो.
व्याकरण गणितान भिरभिरू लागतो.
आणि
कागदाला शिंग फुटतात!
रॉकेट होऊन तो अचूक नेमबाजी करतो,
पकडला की चोरासारखा निसटतो !

कागद आणखी मोठा होतो.
त्याला डोळेही फुटतात
अगदी एक दोन प्रेम पत्रेही होतात.
चारदोन हलक्या ओळींच्या कवितांचा प्रयत्न होतो,
दोन चार ठिकाणी नकार घेऊन
कागद मार्गाला लागतो.

आता कागद प्रौढ होतो.
एक दिवस पत्रिका बनून येतो !

आज मी
दुसऱ्या पिढीचा कागद
मांडीवर खेळवते.

त्याच्या कडे बघताना
अचानक माझं कागद नजर फिरवतो
अगदी डोळ्यात डोळे घालून बघतो
हळूच त्याच्या नजरेत रॉकेट फिरून जात !
माझ्या नजरेन ते टिपल्याची
खात्री झाल्यावरच
तो परत
वर्तमान पत्र बनतो.....

अपर्णा
__/\__

शांतरसमांडणीकविताशब्दक्रीडा

प्रतिक्रिया

सकाळच्या कागदाचा काही उल्लेख नाही... असो.

स्पंदना's picture

10 Nov 2010 - 6:46 pm | स्पंदना

मुद्दामच टाळलाय अवलियाजी, 'सकाळचा कागद' हा जीवनाचा रोजचा भाग झाला. विशिष्ट वयात वापरुन पुढे जाण्याचा भाग नव्हे! मी हळु हळु वर चढणारा आलेख काढलाय. स्लीपिंग लाइन नाही!

अवलिया's picture

10 Nov 2010 - 6:58 pm | अवलिया

ओके.

धमाल मुलगा's picture

10 Nov 2010 - 7:56 pm | धमाल मुलगा

च्यायला....
अनुभव हीच खात्री असं का म्हणतात ते आज कळालं गं. :)

तुमची कविता मनापासुन खुप खुप आवडली ..
१ दा वाचुन मन भरले नाही म्हणुन पुन्हा पुन्हा वाचली ..

माझ्या आवडत्या कविते मध्ये संग्रहीत करुन ठेवणार आहे ह्या कवितेला मी ..

मनापासुन आवडलेली .. वेगळी आणि तितकीच खरी कविता ...

पैसा's picture

10 Nov 2010 - 8:44 pm | पैसा

खूपच छान!!!!

सर्वच कडवी मनात बसत आहेत ..

शेवट तर खरेच खुप छान केलाय .. जबरदस्त
--
त्याच्या कडे बघताना
अचानक माझं कागद नजर फिरवतो
अगदी डोळ्यात डोळे घालून बघतो
हळूच त्याच्या नजरेत रॉकेट फिरून जात !
माझ्या नजरेन ते टिपल्याची
खात्री झाल्यावरच
तो परत
वर्तमान पत्र बनतो.....

स्पंदना's picture

11 Nov 2010 - 9:37 am | स्पंदना

पैसा ताई अन गणेशा धन्यवाद.

धमालजी थोडफार शब्दात बांधायचा प्रयत्न केलाय, पण विषय असा अवखळ की बांधला नाही जात घडत जातो!

सहज's picture

11 Nov 2010 - 9:41 am | सहज

काव्यकल्पना आवडली.

ज्ञानराम's picture

11 Nov 2010 - 4:31 pm | ज्ञानराम

खूप छान लिहिलय अपर्णा ताई.... साध सोप्प आणि मनाला स्पर्शून जाणारं....

जागु's picture

11 Nov 2010 - 4:36 pm | जागु

छानच मांडलयत.

फ्रॅक्चर बंड्या's picture

12 Nov 2010 - 1:30 pm | फ्रॅक्चर बंड्या

आवडली कविता ...
अतिशय छान

प्राजक्ता पवार's picture

12 Nov 2010 - 2:46 pm | प्राजक्ता पवार

कविता आवडली

रणजित चितळे's picture

12 Nov 2010 - 3:27 pm | रणजित चितळे

खुप आवडली कल्पना. मस्त आहे कवीता.

कल्पना छान आहे आणि मांडणी तर अजून भारी!