ज्याप्रमाणे गुलामगिरी, धूम्रपान व स्त्रियांच्या अधिकारातील कमतरता इतिहासजमा झाल्या आहेत. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार, सरंजामी वृत्ती व भ्रष्ट अकार्यक्षम लोकशाही इतिहासात जमा करणे शक्य आहे. पूर्वी स्रियांना अधिकार कमी होते. इंग्लंड अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाहीतही शंभर वर्षांपूर्वी महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. अमेरिकेत वेतन समानता तर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर शक्य झाली. भारतात स्वातंत्र्यानंतर स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी लढावे लागले नाही. पंचायत राज आणले तेव्हा ३३% जागा स्त्रियांसाठी आरक्षित ठेवल्या. संसदेतही महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सभापती एक दलित महिला नेत्या आहेत, सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्ष एक महिला आहेत, एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री महिला आहेत व राष्ट्र्पती एक महिला आहेत.
संदर्भ -एका दिशेचा शोध; लेखक – संदिप वासलेकर; प्रकाशक – राजहंस प्रकाशन,पुणे २०१०
वासलेकरांनी मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे. चूल ते मूल या मर्यादेत सिमीत असणाऱ्या महिला आज सत्ताधीश झाल्या आहेत. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत देखील जनतेने ३५ टक्के महिलांना निवडून यावर शिक्कामोर्तब केले आहे. पुरुषसत्ताक परंपरा असणाऱ्या भारतात आज संसद सभापती, सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री, सर्वात मोठ्य़ा पक्षाची नेत्या व राष्ट्रपती महिला आहेत. ही खरंच एक क्रांती मानली पाहिजे. जर महिलासंदर्भात हा बदल होऊ शकतो तर भ्रष्टाचार, सरंजामशाही वृत्ती इतिहासजमा करणे सहज शक्य आहे.
अधिक माहितीसाठी- http://www.facebook.com/home.php?#!/pages/Eka-Dishecha-Shodh/12610408744...
प्रतिक्रिया
2 Nov 2010 - 5:19 pm | अब् क
:)
2 Nov 2010 - 5:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सिमीत महिलापण होत्या? शुद्धलेखनाची अगदीच आई-माई नसली तरीही "सिमीत" या शब्दाने माझी फार गडबड उडली. इथे अपेक्षित असलेला शब्द सीमीत का सिमीत?
साधारण याच विषयावरचं, कदाचित जास्त व्यापक, करूणा गोखले यांचं ('राजहंस' प्रकाशनच) बाईमाणूस हे वाचनीय पुस्तक आहे.
2 Nov 2010 - 5:49 pm | प्रियाली
स्त्रिया पाशवी आहेत हे सिद्ध झाल्यानंतर त्या सिमीत असतील तर आश्चर्य काय म्हणते मी? ;)
2 Nov 2010 - 6:05 pm | स्वाती२
:D
2 Nov 2010 - 6:11 pm | यशोधरा
=))
2 Nov 2010 - 5:46 pm | नितिन थत्ते
पहिलंच वाक्य वाचून पुढे लेख वाचणे सोडून दिले. :(
2 Nov 2010 - 5:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ते पहिलं वाक्य मी वाचलंच नव्हतं हे आता प्रतिसाद पाहून लक्षात आलं. अचानक सिमीचा उल्लेख दिसला म्हणून तेवढंच काय ते नीट पाहिलं मी!
2 Nov 2010 - 8:32 pm | तिमा
+१,
काही लोक आधी लिहायला लागतात आणि मग वाचायला लागतात.
2 Nov 2010 - 5:57 pm | परिकथेतील राजकुमार
मी लेखाचे शिर्षक वाचुन, स्त्री राज्य असलेल्या बेटावर सापडलेल्या सुदैवी तरुणाची कथा वगैरे असेल असे समजुन धागा उघडला.
घोर फसवणूक आणि निराशा झाली.
2 Nov 2010 - 6:02 pm | नितिन थत्ते
उगी उगी.
सध्या उतारा म्हणून मचाक वाचणे. ;)
2 Nov 2010 - 9:41 pm | पैसा
..............
2 Nov 2010 - 9:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गर्र! मच्याक वाचून काय फरक पडतो का पर्याला?
2 Nov 2010 - 9:52 pm | पैसा
कॅफेत सगळं स्त्रीराज्यच ना!