ज्ञानेश्वरांच्या अभंगांबद्दल असं बोललं जातं की एक तरी ओवी अनुभवावी अर्थात एका तरी ओवीचा गूढार्थ उकलून घेण्याचा प्रयत्न करावा.
बर्याच वर्षापूर्वी "मोगरा फुलला" या अभंगातील एका ओवीचं सुंदर विवेचन माझ्या वाचनात आलं होतं. ते इथे मांडते.
"इवलेसे रोप" म्हणजे गुरुभेट झालेली आहे आणि गुरुकृपेने शिष्याला गुरुमंत्राची दीक्षा मिळाली आहे. हा मंत्र फक्त "द्रां", "र्हीं" किंवा "गँ" असा बीजमंत्र असू शकेल किंवा "श्रीराम जय राम जय जय राम" किंवा "नम: शिवाय" असा मोठा मंत्र देखील असू शकेल. पण हे इवलसं रोपटं शिष्याला मिळालं आहे.
या रोपट्याला नित्यनेमाने ठराविक वेळी, ठराविक मापाचं खतपाणी घालून शिष्याने जोपासलं आहे. अर्थात शिष्याने निश्चयाने, शुचितेने , भक्तीभावाने मंत्राची रोज अखंड उपासना केली आहे.
आणि काय आश्चर्य "तयाचा वेलु गेला गगनावरी" ; एक वेळ अशी आली की या साधनेला फळ आलं. त्या इवल्याशा मंत्राने कुंडलिनी जागृत होऊन तिचा प्रवास गगन अर्थात सहस्रार चक्राच्या दिशेने सुरू झाला.
आणि मग पुढे येतं -
मोगरा फुलला मोगरा फुलला| फुले वेचिता अति भारू कळियासि आला||२||
मनाचिये गुंति गुंफियेला शेला| बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पियेला||३||
पूर्ण अभंग पुढीलप्रमाणे -
इवलेसे रोप लावियेले द्वारी|तयाचा वेलु गेला गगनावरि||१||
मोगरा फुलला मोगरा फुलला| फुले वेचिता अति भारू कळियासि आला||२||
मनाचिये गुंति गुंफियेला शेला| बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पियेला||३||
प्रतिक्रिया
13 Oct 2010 - 8:20 am | सुनील
छान!
हे आठवलं!
13 Oct 2010 - 10:37 am | पारुबाई
सुरेख
छान वाटले वाचून.
अजुन येवु द्या.
13 Oct 2010 - 10:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बसमधल्या महिला आरक्षणाचा किंवा फुले-कर्व्यांनी सुरू केलेला महिला सक्षमीकरणाचा वेलू कधी बहरू (अति भारू??) येणार कोण जाणे?
अवांतरः ओवी म्हणजेच अभंग का?
संदर्भः ज्ञानेश्वरांच्या अभंगांबद्दल असं बोललं जातं की एक तरी ओवी अनुभवावी अर्थात एका तरी ओवीचा गूढार्थ उकलून घेण्याचा प्रयत्न करावा.
13 Oct 2010 - 7:13 pm | शुचि
नक्की माहीती नाही ओवी म्हणजे काय.
इवलेसे रोप लावियेले द्वारी|तयाचा वेलु गेला गगनावरि||१||
मोगरा फुलला मोगरा फुलला| फुले वेचिता अति भारू कळियासि आला||२||
मनाचिये गुंति गुंफियेला शेला| बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पियेला||३||
या अभंगात ३ ओव्या असाव्यात हा माझा कयास आहे.
13 Oct 2010 - 9:55 pm | विसोबा खेचर
पुन्हा एक सुधारणा -
इवलेसे रोप लावियेले द्वारी|तयाचा वेलु गेला गगनावरि|
असे नसून
इवलेसे रोप लावियेले द्वारी|तयाचा वेलु गेला गगनावेरी
असे आहे..
त्यातून शुचिजींना याकडे दुर्लक्षच करायचं असेल तर प्रश्न मिटला..
तात्या.
--
शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!
13 Oct 2010 - 9:59 pm | शुचि
बरोबर गगनावेरी आहे. चुकी झाली परत एकदा. माफ करा.
13 Oct 2010 - 9:59 pm | नगरीनिरंजन
गगनावेरीचा अर्थ काय?
13 Oct 2010 - 10:00 pm | शुचि
जुन्या मराठीत गगनावरी असा अर्थ आहे.
13 Oct 2010 - 10:10 pm | इन्द्र्राज पवार
"गगनावेरी..." हेच बरोबर आहे.
"वेरी" = एक विशिष्ट बिंदू, ज्याचे मोजमाप करता येत नाही. 'गगनावेरी' म्हणजे नजरेला 'गगन' तर दिसतेच पण ज्ञानेश्वरांना जो 'वेलू' अपेक्षित आहे तो गगनाच्या पोकळी पलिकडे गेला आहे....अंतरासाठी जो कुठल्याही मापाने मोजता येणार नाही.
वेळेच्या बाबतीतदेखील 'वेरी' वापरला जातो... उदा. "लताचे गाणे कालवेरी आहे" ~ म्हणजेच लताच्या गाण्याला समयाची सीमा नाही...ते अथकच चालणार आहे.
इन्द्रा
14 Oct 2010 - 7:22 am | नगरीनिरंजन
धन्यवाद इन्द्रा आणि शुचि. आज एक नवीन शब्द कळाला.
13 Oct 2010 - 9:58 pm | इन्द्र्राज पवार
ओवी = म्हणजे प्राकृत भाषेतील कोणत्यातरी कारणासाठी गुंफलेली काव्यमय रचना. उदा. लहान मुलाला झोपविण्यासाठी आई गुणगुणत असलेले गीत ही ओवी असते, किंवा पूर्वीच्या काळी पहाटे उठून जात्यावर दळण दळताना एखादी (त्या काळातील) अदिती ताल धरण्यासाठी म्हणत असलेली रचना, जी ईश्वर भक्तीशीच निगडीत असली पाहिजे असा काही दंडक नसे....म्हणजे अदितीला सासुरवाडीत आपला अजून बिनलग्नाचा राहिलेला भाऊराया आठवत असेल, आईची कामाने होत असलेली धावपळ आठवत असेल, कुणी मैत्रीण आठवत असेल....या सर्व आठवणींची गर्दी तिच्या डोक्यात भिरभिरत असेल आणि ती शमविण्यासाठी एखाद्या संताची/कवीची तशी हुरहूरीची 'ओवी' गात असेल. देवाची आळवणीही प्रसंगी ओवीत येत असतेच....म्हणजे 'माझा संसार सुखाचा कर.... मुलाला आशीर्वाद दे....कल्याण कर..." इ.
अभंग = विशिष्ट नियमावलीत बध्द असलेली 'देवाची स्तुती' म्हणजे अभंग. या रचनेत केवळ देवाचे/देवीचे माहात्म्य गौरविलेले असते आणि रचिता हा फक्त भक्ताच्या भूमिकेतच असतो. अभंग हा 'देव' कल्पनेशिवाय अन्य गुंफला जात नाही. यात देवावर टीका नसते, मात्र आवाहन जरूर केले जाते.
इन्द्रा
13 Oct 2010 - 10:03 pm | शुचि
फारच छान माहीती. धन्यवाद इंद्र.
13 Oct 2010 - 10:40 am | मस्त कलंदर
'फुले वेचिता बहरू कळियासि आला' असे आहे ते.

माझा अत्यंत आवडता अभंग आहे हा. माझ्यामते तो प्रत्येकाने आपल्याला हवा तसा अनुभवावा. असो, ही संधी साधून मी इथे बहरलेला कळ्या देतेय.
13 Oct 2010 - 11:37 am | परिकथेतील राजकुमार
धागा हायजॅक करण्याचा अजुन एक निंदनिय प्रयत्न !
सरोज खरे ह्यांचा निषेध !!
प्रस्थापितांच्या ह्याच अन्यायकारक वागणुकीचा बदला घेण्यासाठी आणि विस्थापीत नवोदित आणि दीन मिपालेखकांना न्याय मिळवुन देण्यासाठी आम्ही लवकरच 'दुर्लक्षित पँथर' ह्या संघटनेची स्थापना करणार आहोत. तेंव्हा आत्ताच सुधरा.
परिकथेतील टेक्सासकुमार
13 Oct 2010 - 12:39 pm | मस्त कलंदर
फ्टा!!! (याचा अर्थ काय ते आमच्या अदितीतैंना विचारा)
असो बदलणार नाही.
बाकी ते तुझ्या सातत्याने सकस आणि प्रोग्रेसिव्ह, पॉझिटीव्ह लेखनाला उत्तेजन देणार्या 'सकसलिखाणप्रेमी अतिपोषित समुदायाचे' काय झाले रे???
13 Oct 2010 - 1:08 pm | परिकथेतील राजकुमार
ते आम्हाला लक्षात आले.
खात्री होतीच !
सध्या आम्ही प्रतिसाद उत्तेजन मंडळ स्थापन केले आहेच की.
13 Oct 2010 - 11:38 am | अरुण मनोहर
लेख छानच आहे.
फुललेला मोगरा पाहून मन प्रसन्न झाले.
संगणक क्षेत्रात आजूनही पुरेशी प्रगती झाली नाही ह्याचे वाईट वाटले. मल्टीमिडीयाच्या युगात कोणीतरी अजून ही जादू घडवून का आणित नाही? फुलांवर टिचकी मारली की सुवासाची कुपी उधळल्या गेली पाहिजे.
गणपांच्या स्वादिष्ट डिशेस् वर क्लीक केले की मस्त खाद्यगंध दरवरळा पाहिजे.......
ही यादी आणखीनही बरीच लांबविता येईल. पण थांबलेलेच बरे!
13 Oct 2010 - 12:28 pm | स्वैर परी
खुप सुन्दर! एक चित्र माझ्याकडुन ही!

13 Oct 2010 - 10:41 am | वेताळ
वाचुन अगदी नि:शब्द झालो.........
13 Oct 2010 - 11:42 am | यशोधरा
छान लिहिलेलं आहे शुचि. आवडलं.
13 Oct 2010 - 11:44 am | अनिल २७
आहाहा! वा वा वा !
मग पुढे जे येतं त्याचाही अर्थ सांगायचा ना..
"फुले वेचिता अति भारू कळियासि आला" म्हणजे काय ?
13 Oct 2010 - 11:47 am | परिकथेतील राजकुमार
प्रश्नातच उत्तर दडले आहे बघा.
13 Oct 2010 - 11:58 am | अनिल २७
?
13 Oct 2010 - 3:40 pm | llपुण्याचे पेशवेll
मोगरा फुलला मोगरा फुलला
फुले वेचिता बहरु कळियासी आला
असे माझ्या माहीतीप्रमाणे आहे.
13 Oct 2010 - 11:55 am | Nile
अजुन एक अंधश्रद्धेची सावली आहे असे वाटणारा चार ओळींचा लेख(?). नक्की काय म्हणायचं आहे? काय गुढार्थ लागला? कुठली कुंडलिनि? कुठले सहस्त्राकार चक्र? उगाच आपली अंधश्रद्धेवर फार श्रद्धा आहे म्हणुन काहीतरी असंबंद्ध लिहायचं का?(आणि त्यावर विपरीत प्रतिसाद आल्यावर मी सुधारेन वगैरे नेहमीची उत्तरे द्यायची का?) वगैरे प्रश्न लेखिकेने स्वत:ला विचारुन पहावेत असे वाटते.
13 Oct 2010 - 12:00 pm | अनिल २७
+१
13 Oct 2010 - 2:01 pm | मेघवेडा
तिरसटपणे लिहायलाच हवं का. नाही आवडलं लिखाण तर नीट सांगता येतं. तुमचा नसेल योगाभ्यासावर व अध्यात्मावर विश्वास म्हणून एखाद्याच्या श्रद्धेची अंधश्रद्धा म्हणून हेटाळणी करणे योग्य नाही. आधीच सांगतो माझाही योग-अध्यात्माचा विशेष अभ्यास नाही. मात्र तुझा प्रतिसाद अस्थानी वाटल्याने सांगतो आहे इतकेच.
काय गूढार्थ लागला ते लेखिकेने स्पष्ट लिहिले आहे. ते जर तुम्हाला कळले नसेल तर तसे विचारा की. मान्य आहे, लेख लहान आहे, काही गोष्टी अजून स्पष्ट केल्या पाहिजेत. पण जेवढं लिहिलं आहे ते असंबद्ध आहे हे तू कसं ठरवलंस? का आपल्याला काही कळले नाही (हे तूच लिहिलं आहेस, मी म्हणत नाहीये) म्हणून उगीच कुणालातरी टार्गेट करून शिंतोडे उडवायचे फक्त? तुला वाटत असेल की यावर अंधश्रद्धेची सावली आहे तर तुला असं का वाटलं ते स्पष्टपणे लिही की.
असो. प्रकटन आवडले. 'कुंडलिनि जागृत करणे' व 'सहस्त्रार चक्र' याबाबत माझ्यासारख्या नि नाईलसारख्या बर्याच जणांना माहिती नसेल. ते जरा आणखी स्पष्ट केलंत तर मस्त होईल शुचितै. आणि जरा मोठे लेख लिहा. :)
13 Oct 2010 - 2:03 pm | यशोधरा
परफेक्ट.
13 Oct 2010 - 2:05 pm | अवलिया
+१
13 Oct 2010 - 5:58 pm | मितान
मेवे, यशो, अवलियाशी सहमत.
13 Oct 2010 - 2:22 pm | Nile
तिरसटपणे लिहलेलं नाही तर स्पष्टपणेच लिहलेलं आहे.
सदर लेखिकेने पुर्वी "माझी असेल अंधश्रद्धा कदाचित" अश्या प्रकारचे प्रतिपादन केले आहे. त्यावरुन सदर लेखिकेची ही श्रद्धाच आहे अशी खात्री नसावी असा कयास मी करु शकतो. काहीही असले तरी, स्वत:च्या श्रद्धा-अंधश्रद्धेची खात्री करुन लेख लिहलात तर उत्तम अशी सुचवणी करण्यास हरकत नसावी. सदर लेखिकेने अश्या प्रकारचे लेखन अनेक विपरीत प्रतिसाद येउनही केले आहे हा मुद्दा ही विसरु नये.
मी एक वाचक आहे, मला संबंध दिसला नाही, हे मी 'स्पष्टपणे लिहलं आहे'. तुला संबंध दिसला असेल तर ठीक. मला जे वाटलं ते मी लिहु नये का? लेखिकेला माझे मत किती महत्त्वाचे आहे ते ठरवु देत. (मलाच संबंध दिसला नाही पण पन्नास लोकांना दिसला तर लेखिकेने माझे म्हणणे विचारात घेउ नये)
मला का वाटलं हे मी वरती स्पष्टपणे नमुद केलं आहे. वरती असे प्रश्न लेखिकेने स्वतःला विचारावेत असे अनाहुत सुचवलेलेही आहे.
13 Oct 2010 - 2:39 pm | यशोधरा
नायल्या, कांगावा किती करशील? पुढे मुद्द्याचं बोल म्हटलं की तू पळ काढतोस की! :)
>>मी एक वाचक आहे, मला संबंध दिसला नाही >> अगदी असं लिहिलं तरी चालेल, योग्यच आहे, पण तितकं सरळपणे काही तू लिहिलेलं नाहीस. "उगाच आपली अंधश्रद्धेवर फार श्रद्धा आहे म्हणुन काहीतरी असंबंद्ध लिहायचं का?" ह्याला कदाचित मेव्या तिरसट म्हणत असावा. तू का ठरवतोस लेखिकेची अंधश्रद्धेवर श्रद्धा आहे (म्हंजे काय रे?) लिखाण असंबंद्ध आहे वगैरे? बरं असंबंद्ध आहे म्हणतोस तर योग्य काय असायला हवे हे सांगू शकशील का?
आणि शुचि, "अतिभारु" हाच शब्द मूळ आहे, आणि योग्यही आहे. संदर्भ सापडला की देतेच. :)
13 Oct 2010 - 2:52 pm | Nile
खरंतर हे लिहायचं नव्हतं पण आता नाईलाज आहे.
शुचि यांना मी मागे एकदा,
"कृपया आपण अंधश्रद्धा पसरवण्यास मदत करत तर नाही ना, ह्याचा विचार करावा" असा प्रतिसाद दिला होता(आणि त्यांनी तो त्यावेळी "पुढल्यावेळी काळजी घेईन" अश्या प्रकारे स्विकारला होता. मागे जाउन पहा, त्यांनी तो धागा उडवला नसेल तर सापडेल.
शुचि यांनी पुर्वीही विपरीत प्रतिसाद आल्याने स्वतःचे धागे उडवले होते. स्वतः लेखिका, माझी कदाचित अंधश्रद्धा असु शकेल असे विधान करते तेव्हा लेखिकेच्या हेतु बद्दल आम्ही काय निष्कर्ष काढायचा?
अनुभवावरुन, मी जे लिहलं आहे ते सरळ आणि स्पष्ट आहे. साखरेच्या वेष्टनात गुंडाळुन एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा देण्यात मला रस नाही. एखाद्या देवभोळ्याला "मी नास्तिक आहे" हे विधानही तिरसट्/अपमानास्पद वाटेल.
लिखाणात मला संबंध दिसला नाही हे मि सांगितलं आहे, त्याचा संबंध शोधुन काढणे ही माझी जबाबदारी नाही.
13 Oct 2010 - 3:06 pm | यशोधरा
आले लक्षात नायल्या. जे लिहायचे मनात नव्हते, तेच मूळ असल्याने, लिहिलेस हे उत्तम झाले. तुझी भूमिका समजली. तरीही केवळ शुचि चार ओळी लिहिते म्हणून, तुला जी अंधश्रद्धा वाटते ती झंझावाताप्रमाणे पसरेल असे काही मला वाटत नाही. कदाचित इथे सगळेच एकदम हात धुवून मागे लागतात, म्हणून कटकट नको ह्या भावनेनेही शुचिने गप्प बसणे आणि धगे उडवणे हे केले असावे, मी धागे पाहिले नव्हते, त्यामुळे कल्पना नाही.
>>स्वतः लेखिका, माझी कदाचित अंधश्रद्धा असु शकेल असे विधान करत>>>>हो कदाचित ते तुला गप्प बसवायला केले असेल, की हो बाबा, असेल माझी अंधश्रद्धा. पुढे? असे असेल ते. :D
13 Oct 2010 - 3:12 pm | Nile
कशी पसरेल कीती पसरेल याला महत्त्व नाही. तुम्ही जर मुद्दा मांडत असाल तर तो पुर्ण मांडा, त्यावर होणार्या टिकेला तयार रहा.
हे मला नाही, जाहिर धाग्यावर कुठल्यातरी प्रतिसादात लिहले होते.
म्हणुन प्रतिसादात मी लिहले होते की, मुद्दा विस्तृत, खात्री करुन मांडा. जर तुमच्यामुद्द्यांबद्दल खात्री नसेल तर धागा लिहुन मग नंतर चुका निघाल्यावर उडवावे लागण्याची वेळ येणार नाही. (चुकलात तरी तुमचे मत विचार करुन मांडल्यात तर धागा उडवावासा वाटणार नाही.)
13 Oct 2010 - 3:12 pm | मेघवेडा
कदाचित इथे सगळेच एकदम हात धुवून मागे लागतात, म्हणून कटकट नको ह्या भावनेनेही शुचिने गप्प बसणे आणि धगे उडवणे हे केले असावे, मी धागे पाहिले नव्हते, त्यामुळे कल्पना नाही.
असेच म्हणतो. आणि निळ्या, संबंध शोधून काढणे ही तुझी जबाबदारी नाही याची ज्याप्रमाणे तुला जाणीव आहे त्याचप्रमाणे एखादी गोष्ट न कळाल्यास किंवा माहिती नसल्यास "ती असंबंद्ध आहे" असे उगाच आपली करमणूक म्हणून शिंतोडे उडवणे देखील योग्य नाही हे जाणण्याइतपत जबाबदारीची जाणीव तुझ्यात असावी असं वाटतं.
>> हो कदाचित ते तुला गप्प बसवायला केले असेल, की हो बाबा, असेल माझी अंधश्रद्धा. पुढे? असे असेल ते.
पुन्हा फुल्टू सहमत! जयंत कुलकर्णींची सही आठवली. "त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी गप्प बसतो." :D
13 Oct 2010 - 3:20 pm | Nile
हा जावईशोध आपणास कुठुन लागला? जे मला असंबंध वाटते ते तसे आहे असे म्हणणे म्हणजे शिंतोडे उडवणे का? इथे फक्त, वा सुदंर अप्रतिम अश्याच प्रतिक्रीयांची तुम्ही अपेक्षा ठेवता का?
असे म्हणण्याआधी थोडा अभ्यास केला असतात तर बरे झाले असते.
13 Oct 2010 - 3:35 pm | मेघवेडा
>> हा जावईशोध आपणास कुठुन लागला?
आणि मला "अभ्यास करा" असे सल्ले देतोस? वा!
>> जे मला असंबंध वाटते ते तसे आहे असे म्हणणे म्हणजे शिंतोडे उडवणे का?
परत विचारतो, कसं ठरवलंस? असंबद्ध वाटले म्हणजे त्या दोन गोष्टींची तुला पूर्ण माहिती आहे, बरोबर? अन्यथा तू त्या दोन गोष्टींमध्ये संबंध आहे की नाही ठरवू शकतच नाहीस. मग "कोणती कुंडलिनि, कोणते सहस्त्राकार चक्र?" हे प्रश्न उगाचच विचारलेले नाहीत काय?
>> असे म्हणण्याआधी थोडा अभ्यास केला असतात तर बरे झाले असते.
एक शॉट खेळून चार डिफेन्सिव्ह असं टेस्ट मॅच मोडमध्ये खेळू नकोस रे. तितका वेळ नाही. टी२०चा जमाना आहे. सगळं फास्ट हवं.
13 Oct 2010 - 3:43 pm | Nile
मला दोन्ही गोष्टींची शुन्य माहीती आहे असं समजुया. लेखात मल संबंध दिला आहे का? लेखिका इथे अशी अपेक्षा करते का संबंध सर्वांना माहित असावा? मला माझ्या सामान्य ज्ञानाप्रमाणे संबंध नाही असे वाटते.
संदर्भ महत्त्वाचे असतात. पहात चला.
ह्याला आम्ही तुमची पुर्वग्रहदुषित दृष्टी असे म्हणतो. का ते अभ्यास केल्यास कळेलच. :)
13 Oct 2010 - 4:00 pm | मेघवेडा
>> मला दोन्ही गोष्टींची शुन्य माहीती आहे असं समजुया. लेखात मल संबंध दिला आहे का? लेखिका इथे अशी अपेक्षा करते का संबंध सर्वांना माहित असावा? मला माझ्या सामान्य ज्ञानाप्रमाणे संबंध नाही असे वाटते.
नाही दिसला ना तुला. मग ते तसं सांग की. नाही कोण म्हणतो. पण संबंध दिलेला नाही म्हणजे लिखाण असंबद्ध कसे ठरते? माझा आक्षेप केवळ या एकाच वाक्याला होता नि तो अजूनही आहे. आपल्याला एखादी गोष्ट कळली नसल्यास किंवा माहिती नसल्यास उगाच ताशेरे ओढण्यात येऊ नयेत.
>> ह्याला आम्ही तुमची पुर्वग्रहदुषित दृष्टी असे म्हणतो.
तुला कदाचित परत एकदा समोरच्याला काय म्हणायचंय ते कळलेलं दिसत नाही. "मला (किंवा 'लोकांना' म्हणूयात का, ते जास्त समर्पक ठरेल! ;) ) अभ्यास करण्याचे सल्ले देतोस पण तुझाच अभ्यास कमी पडत आहे" असं म्हणायचं होतं मला. आपला नाय बाबा पूर्वग्रह! :)
13 Oct 2010 - 9:00 pm | Nile
मी वरती लिहले. लेखात मल संबंध दिला आहे का? ... मला माझ्या सामान्य ज्ञानाप्रमाणे संबंध नाही असे वाटते.
चार ओळींचा लेख वाचल्यानंतर मला जे वाटलं ते लिहलेलं आहे, असेल नसेल टाईप प्रतिक्रिया हव्या असतील तर मुक्तपीठ ओपन आहे.
माझा मुद्दा मी मांडलेला आहे, पुन्हा पुन्हा तेच लिहण्यात इथुन पुढे स्वारस्य नाही. तुमचे चालु द्या.
13 Oct 2010 - 9:08 pm | धमाल मुलगा
उपक्रम पलिकडं आहे.
13 Oct 2010 - 9:11 pm | Nile
चला जाउ 'बागा' मधी, का.कु. खेळु चला...
13 Oct 2010 - 3:13 pm | Nile
कशी पसरेल कीती पसरेल याला महत्त्व नाही. तुम्ही जर मुद्दा मांडत असाल तर तो पुर्ण मांडा, त्यावर होणार्या टिकेला तयार रहा.
हे मला नाही, जाहिर धाग्यावर कुठल्यातरी प्रतिसादात लिहले होते.
म्हणुन प्रतिसादात मी लिहले होते की, मुद्दा विस्तृत, खात्री करुन मांडा. जर तुमच्यामुद्द्यांबद्दल खात्री नसेल तर धागा लिहुन मग नंतर चुका निघाल्यावर उडवावे लागण्याची वेळ येणार नाही. (चुकलात तरी तुमचे मत विचार करुन मांडल्यात तर धागा उडवावासा वाटणार नाही.)
13 Oct 2010 - 3:15 pm | Nile
कशी पसरेल कीती पसरेल याला महत्त्व नाही. तुम्ही जर मुद्दा मांडत असाल तर तो पुर्ण मांडा, त्यावर होणार्या टिकेला तयार रहा.
हे मला नाही, जाहिर धाग्यावर कुठल्यातरी प्रतिसादात लिहले होते.
म्हणुन प्रतिसादात मी लिहले होते की, मुद्दा विस्तृत, खात्री करुन मांडा. जर तुमच्यामुद्द्यांबद्दल खात्री नसेल तर धागा लिहुन मग नंतर चुका निघाल्यावर उडवावे लागण्याची वेळ येणार नाही. (चुकलात तरी तुमचे मत विचार करुन मांडल्यात तर धागा उडवावासा वाटणार नाही.)
13 Oct 2010 - 3:24 pm | यशोधरा
अरे नायल्या, टीका करताना टीका करणार्यानेही मुद्दा मांडावा लागतो. तो मांड ना.
13 Oct 2010 - 3:27 pm | Nile
काय मुद्दा मांडणार कपाळ. जे लिहले आहे त्याचा काही अर्थ लागत नाही ह्यापेक्षा अजुन काय मुद्दा हवा?
त्याशिवाय वरती कुंडलिनी फिंडलीनी वर प्रश्न विचारले आहेत ते वाचले नाहीत का?
13 Oct 2010 - 3:34 pm | परिकथेतील राजकुमार
हे निळ्या सारखे प्रस्थापीत लोक कायम अशीच दादागिरी करतात. लवकरच ह्यांना 'दुर्लक्षित पँथर'चा हिसका दाखवण्यात येईल !
13 Oct 2010 - 3:57 pm | यशोधरा
बोलले काडीकुमार! :D
की हे खुषखबरीचे प्रात्यक्षिक रे पर्या? :D
13 Oct 2010 - 4:02 pm | परिकथेतील राजकुमार
हा तळागाळातल्यांचा आवाज आहे ;)
13 Oct 2010 - 4:07 pm | यशोधरा
तेच की! मिपाकरांसाठीची खुषखबर! :D
13 Oct 2010 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार
का टा
13 Oct 2010 - 3:55 pm | यशोधरा
कुंडलिनी ऐकून तरी ठाऊक आहे, वाचून ठाउक आहे, पण ही फिंडलिनी म्हंजे काय रे? :D
>>जे लिहले आहे त्याचा काही अर्थ लागत नाही ह्यापेक्षा अजुन काय मुद्दा हवा? >> मग तेवढेच म्हण ना. बाकीचे कशाला?
13 Oct 2010 - 9:02 pm | Nile
च्यायला, आता काय म्हणायचे ह्यावर आधी कौल घेउन मग प्रतिसाद टंकायचे का आम्ही? जे म्हणायचे आहे तेच म्हणले आहे.
13 Oct 2010 - 9:03 pm | Nile
च्यायला, आता काय म्हणायचे ह्यावर आधी कौल घेउन मग प्रतिसाद टंकायचे का आम्ही? जे म्हणायचे आहे तेच म्हणले आहे.
13 Oct 2010 - 12:31 pm | विसोबा खेचर
सुंदर लिहिलंय..
मोगरा फुलला गाण्यात गोरखकल्याणची प्रसन्नता आहे..
तात्या.
--
शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!
13 Oct 2010 - 12:33 pm | अवलिया
अतिशय सुरेख प्रकटन !!!
13 Oct 2010 - 2:07 pm | विसोबा खेचर
एक लहानशी सुधारणा सुचवतो -
'तयाचा वेलू गेला गगनावरी..' असे नसून 'तयाचा वेलू गेला गगनावेरी..; असे आहे..
तात्या.
13 Oct 2010 - 3:44 pm | सुहास..
क्षणभर मटामधील 'मैत्रीण' नावाच सदर वाचतोय असा भास झाला.
13 Oct 2010 - 4:37 pm | शुचि
>> कुठली कुंडलिनि? कुठले सहस्त्राकार चक्र? >>
ज्ञानेश्वरी ६ वा अध्याय वाचावा.
ते कुंडलिनी जगदंबा| जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा||
जया विश्वबीजाचिया| कोंभा साऊली केली||
जे शून्यलिंगाची पिंडी| जे परमात्मिया शिवाची करंडी||
जे प्रणवाची उघडी| जन्मभूमी||
असं वर्णन आहे या शक्तीचं. पुढे मणीपूर, अनाहत एकेक चक्राचा भेद करत कशी जाते त्याचं इतकं अवर्णनिय वर्णन केलेलं आहे, ते वाचण्यासारखं आहे.
पिंडे पिंडाचा ग्रासु| तो हा नाथ संकेतीचा दंशु||
परि दाऊनि गेला उद्देशु| श्री महाविष्णु||
13 Oct 2010 - 5:04 pm | जागु
छान वाटल वाचुन.
13 Oct 2010 - 5:07 pm | मितभाषी
शुतितै छान निरुपण. आवडले.
13 Oct 2010 - 5:10 pm | परिकथेतील राजकुमार
शुचि... शुचि आहे ते.
जाळ न धुर एकदमच काढला की तुम्ही भावश्याशेठ ;)
13 Oct 2010 - 6:13 pm | मितभाषी
मला शुचितै असच लिहायच होतं.
असो! माफ करा.
13 Oct 2010 - 6:20 pm | मेघवेडा
तुमच्या सहीतील वाक्ये प्रतिसादानुरूप बदलतात हा योगायोग म्हणावा की कसे? ;)
13 Oct 2010 - 6:33 pm | मितभाषी
तसे नाही हो मेघवेडा
कुंडलिनी सरकत सरकत वर चालली ना. आता आज्ञाचक्रापर्यंत पोहोचली आहे.
13 Oct 2010 - 6:38 pm | यशोधरा
अरे, ते कुंडलिनी + फिंडलिनी असल्याने तसे लिहिले असावे.
13 Oct 2010 - 6:41 pm | परिकथेतील राजकुमार
फिडेल कॅस्ट्रोच्या कुंडलिनीला फिंडलिनी म्हणत असत.
इतिहासाचार्य
प.रा.राजवाडे
13 Oct 2010 - 6:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आजच कुठल्यातरी फणी व्हीडोत कॅस्ट्रोने शिवाजीमहाराजांकडून प्रेरणा घेतल्याचं ऐकलं! आता खरं काय खोटं काय मला माहित नाही.
13 Oct 2010 - 6:47 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
असेल असेल. आणि चे गव्हेराने कुतुबशाहा वरुन घेतली असेल.
13 Oct 2010 - 6:47 pm | मितभाषी
हा हा हा खपलो. =)) =)) =))
13 Oct 2010 - 6:50 pm | यशोधरा
उद्या तुम्ही स्वतःच्या कुंडलिनीला परांडलिनी म्हणतात असे सांगाल! :D
13 Oct 2010 - 6:54 pm | परिकथेतील राजकुमार
परुंडलिनी किंवा पुंडलिनी ह्यात जे सेन्शेशन आहे ते परांडलिनी मध्ये नाही ;)
13 Oct 2010 - 6:57 pm | यशोधरा
ओक्के. तुम्हाला हवे ते घ्या. रडू नका.
13 Oct 2010 - 6:58 pm | परिकथेतील राजकुमार
आम्ही रडत नाही..रडवतो.
13 Oct 2010 - 7:05 pm | यशोधरा
त्यापेक्षा इतिहासाचे संशोधन करा, सरकारी पैसा फुकट खाऊ नका आणि खोटा इतिहास खरा म्हणून मांडू नका. ;)
13 Oct 2010 - 5:23 pm | वेताळ
लेखिकेचा अध्यात्माचा सखोल व गुढ अभ्यास ह्याची साक्ष देतोय.अजुन ह्यावर चर्चा येईल असे वाटते.
13 Oct 2010 - 7:01 pm | मितभाषी
इथे गौळणींचे कुणी जाणकार असतील तर "डोळे मोडीत राधा चाले, वारीयाने कुंडल हाले" ह्या गौळणीचे निरुपण करावे.
ही गौळण मालिकेतील आहे ह्याची क्रूपया नोन्द घ्यावी.
13 Oct 2010 - 9:24 pm | मुक्तसुनीत
"इवलेसे रोप" म्हणजे व्हिजा मिळालेला आहे आणि कंपनीकृपेने कन्स्लटंटला प्रोजेक्टची टर्म मिळाली आहे. हा व्हिजा फक्त "एल १ " किंवा "बी १" असा शॉर्ट् टर्म व्हिजा असू शकेल किंवा "एच १" असा लाँग टार्म व्हिजा देखील असू शकेल. पण हा इवलासा व्हिजा कन्स्लटंटला मिळाला आहे.
आणि काय आश्चर्य "तयाचा वेलु गेला गगनावरी" ; एक वेळ अशी आली की या साधनेला फळ आलं. त्या इवल्याशा व्हिजाने ग्रीन कार्ड प्रॉसेस पार होऊन त्याचा प्रवास सिटीझनशिप अर्थात हिरव्या माजाच्या दिशेने सुरू झाला.
13 Oct 2010 - 9:29 pm | शुचि
हे खूप आवडलं :) :) :)
हसले
असं काहीतरी वाचायला मजा येते.
13 Oct 2010 - 9:32 pm | Nile
हा हा हा. आता कसा परस्पर संबंध स्पष्ट उठुन दिसतो आहे. ;-)
13 Oct 2010 - 9:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
व्हिजा म्हणजे 'इवलेसे' रोप ... चालू द्या!
13 Oct 2010 - 9:39 pm | Nile
हे ग्रीन कार्ड वाले इतक्या महत्प्रयासाने मिळालेल्या बी१-एफ१ वगैरे विसावाल्यांना कसे कमी लेखतात पाहिले ना!!
13 Oct 2010 - 9:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गडद हिरवा माज, दुसरं काय!
14 Oct 2010 - 12:03 am | नंदन
शिवाय 'बापरखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला' मधला विठ्ठल कोण हेही थोडे खोदकाम केल्यास सापडावे ;) [सध्या तो पुढच्या महिन्यातल्या निवडणुकांच्या चिंतेने ग्रस्त आहे म्हणे.]
बाकी 'वेलु' वर कोटी करण्याचा मोह महत्प्रयासाने आवरला आहे :)
14 Oct 2010 - 12:26 am | मुक्तसुनीत
शिवाय 'बापरखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला' मधला विठ्ठल कोण हेही थोडे खोदकाम केल्यास सापडावे
"विठ्ठले आळविता भक्त न दे सादुं " अशी परिस्थिती ! ;-)
14 Oct 2010 - 9:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सध्या विठ्ठलावर मुंबई पोलिस नाराज आहेत म्हणे!
14 Oct 2010 - 12:45 am | बिपिन कार्यकर्ते
छानच लेख.
14 Oct 2010 - 11:41 am | परिकथेतील राजकुमार
ह्या बिकांची लेखन न वाचता प्रतिक्रीया द्यायची सवय कधी जाणार आहे विठ्ठलाला माहिती.
14 Oct 2010 - 7:39 pm | मदनबाण
छान लिहले आहे...
बाकी तुमचे मनोगत वाचताना ही ओळ विशेष आठवली...
त्वंगुणत्रयातीतः । त्वंदेहत्रयातीतः ॥
त्वंकालत्रयातीतः । त्वंमूलाधारस्थितोसिनित्यं ॥
त्वंशक्तीत्रयात्मकः । त्वांयोगिनोध्यायंतिनित्यं ॥