भाग (१) = http://misalpav.com/node/14749
तर मग मी साईटवर आलो अन अगोदर ऑटो लेव्हल सेट केली होती तिथे गेलो.. तोही लगेच माझ्याजवळ येऊन ऊभा राहिला, मी त्याच्याकडे एकवार बघितले. यावेळेस त्याच्या चेहर्यावरचे भाव फार नम्र वाटले मला. "टीबीएम वर स्टाफ पकडायला सांग बरं.." मी एक डोळा झाकून ऑटो लेव्हलमधे दुसरा डोळा घालून त्याला सांगितले..तो लागलीच त्याच्या कामाला लागला. तासाभरात सगळ्या लेव्हल्स चेक करून झाल्या.. एक - दोन मिमीचा एरर होता काही ठिकाणी, पण बाकी लेव्हल्स सगळ्या बरोबर होत्या. मग लाईन आउटही चेक केले.. झिरो-झिरो होते सगळे ! मला त्याचे कौतुक वाटले.. मी त्याच्याजवळ जाऊन त्याला तसे म्हटलेही.. "गुड, लाईन आउट तर अगदी झिरो-झिरो आहे रे " "सर, मी केलेले लाईन आउट कधीही चुकलेले नाही " हे म्हणताना त्याच्या चेहर्यावर कुठलेही भाव नव्हते..
एव्हाना संध्याकाळ होत आलेली. मला काही विशेष काम नव्हते म्हणून साईट ऑफिस समोरील मोकळ्या जागेत ऊगाच घिरट्या घालत फोनवर बोलत होतो.. बोलताना मी त्याचेही निरिक्षण करित होतो.. तो साईट ऑफिसमध्ये बसलेला.. आपल्या कामात.. बहुदा डेली रिपोर्टस, सगळ्या चेक - लिस्ट्स, माझा विजीट रिपोर्ट असे काही करत असावा असे वाटत होते.. त्यात अधे-मध्ये सब - कॉन्ट्रॅक्टर्स, त्याचे ज्युनिअर्स, अश्या सगळ्यांना तो अगदी जास्तच प्रेमाने वागवत होता असे ऊगाच वाटले.. पण दुसरी एक गोष्ट होती ती म्हणजे बाकी लोकही त्याच्याशी जास्त आदराने बोलत्-वागत होते.. माझ स्वगत : 'च्यायला, आता आता मिसरुड फुटलेलं पोरगं दिसतय, थाट तर बराच भारी !'
संध्याकाळचे सात वाजत आलेले.. मी घरी निघण्याआधी परत एकदा साईट ऑफिसमध्ये गेलो.. "चल रे, जातो मी आता." सगळे सोपस्कर पुर्ण झाल्यानंतर मी त्याला म्हणालो.. "ओके सर, एक मिनीट थांबाल ? माझही आवरलच आहे, पार्किंगपर्यंत सोबतच जाऊ. " पार्किंगकडे जाता जाता मी त्याला म्हणालो, "लाईन आउट झाल ते ठीक, पण खरा जॉब ईथून पुढे आहे.. ८ मी खोदाई.. स्ट्राटा चेकिंगमध्ये सगळा रॉकच आहे असा रिपोर्ट आहे माहिती आहे ना ? त्याचा काय विचार केलाय ?" "माहिती आहे सर, ऊद्या संध्याकाळी बीमल (अर्थी : पोकलेन) येतेय व लगेच कामही चालु होईल. पण मला खरी काळजी खोदाई झाल्यानंतर खाली कराव्या लागणार्या लाईन आउटची आहे. ते किचकट आहेच, पण ईथे पर्कोलेटेड वॉटर खूप आहे.. पाण्यात कसे लाईन आउट करणार याचीच काळजी आहे.." मी त्याच्या चेहर्याकडे बघितले. चिंता स्पष्ट दिसत होती. "चल रे, आताच काय टेंशन घेतोस ? खोदाइ तर पुर्ण होऊ दे.. तोपर्यंत काहीतरी आयडीया निघेल.. डोण्ट वरी ." मी त्याच्या गळ्यात हात टा़कून त्याच्यासोबत पार्किंगमध्ये पोहोचलो.
अन माझ्या गाडीजवळ पोहोचताच मी त्याला बाहेरच्या हॉटेलवर चहा पिण्यासाठी ये म्हणून मी पुढे निघून गेलो....
(क्रमशः)
प्रतिक्रिया
8 Oct 2010 - 4:53 pm | गणपा
वाचतोय...
8 Oct 2010 - 4:54 pm | भाऊ पाटील
आणि भागही छोटा आहे..पटापट येऊ द्या की राव!
8 Oct 2010 - 5:01 pm | गणेशा
आवडले ...
लिहित रहा .. वाचत आहे..
8 Oct 2010 - 10:07 pm | रणजित चितळे
फार थोडे थोडे लिहीता, पण छान लिहीता
8 Oct 2010 - 10:19 pm | प्राजु
फारच छोटा भाग आहे बुवा!!
9 Oct 2010 - 5:13 am | कौशी
मस्त्....थोडे जास्त लिहा
9 Oct 2010 - 11:05 am | डावखुरा
वाचतोय...पटापट येउद्या...
पुलेशु
1 Dec 2010 - 6:12 pm | योगेश सुदाम शिन्दे
फार दिवस झाले.
पटापट येउद्या...