मॉंटेसरीत असताना होळीच्या भूतांना घाबरले होते. तोंडे रंगवलेले, मुखवटे घातलेले लोक, लहान मुलं पाहून मागे मागे जात गेले अन खरोखरच तारेच्या काटेरी कुंपणावर पडले. बरच ओरखडलं होतं, धनुर्वाताची लस टोचून घ्यावी लागली होती. तेव्हा कितीही सांगीतलं असतं की ती भूतं खोटी असतात तरी बालमनाला पटलं नसतं. त्या क्षणापुरता त्यांची विद्रूप, भडक रूपं हेच वास्तव होतं.
___
भविष्यविषयक चिंता , असुरक्षितता मग ती वित्तीय असो वा आरोग्यविषयक या भूतांसारख्याच असतात का? आपलं उरलं सुरलं मानसिक स्वास्थ्य नष्ट करणार्या. असायला काल्पनिक पण खरोखर पायावर कुर्हाड मारणार्या.
___
लहानपणी आई जवळ नव्हती मग खरच त्या लोकांनी काय केलं असतं? रंग फासला असता माझ्या चेहेर्याला, केसांना मी रडेपर्यंत? मला गुदमरवलं असतं? मी तारेवर पडले म्हणून तो घोळका थांबला आणि २/४ कनवाळू लोकांनी रडणार्या मला उचलून घरी पोचवलं.
____
वास्तवात माऊली सवे नसताना नक्की काय होतं? बागुलबुवा, काल्पनिक संकटांना घाबरून जाऊन आपण धडपडतो का? या धडपडीतूनच घराकडे, सुरक्षिततेकडे आपली वाटचाल होते का? हे २/४ रस्ता दाखविणारे कोण? - गुरु, विज्ञान,, महत्त्वाकांक्षा, छंद यापैकी काहीही असू शकेल का?
__
मला हे प्रश्न पडतात.
प्रतिक्रिया
6 Oct 2010 - 2:43 am | इंटरनेटस्नेही
असे अनुभव लहानपणी मलाही आले आहेत. त्यावेळी आपले वय, आपल्याला उपलब्ध माहिती, विचार/विश्लेशण करण्याची क्षमता, अनुभव आदि सारेच तुलनेने अतिशय इममॅच्युर असते, अर्थात आपले सवंगडी ही त्यवेळेस असेच असतात.. याची परिणीती म्हणुन असे अनुभव येत असावेत. बाकी, मोठेपणी वाट्ण्या-या असुरक्षे बाबत बोलायचे झाले तर मॅच्युरिटी ही टर्मच मुळात रिलेटीव्ह आहे.
(विचारमग्न) इंट्या.
6 Oct 2010 - 3:04 am | शुचि
>> मॅच्युरिटी ही टर्मच मुळात रिलेटीव्ह आहे. >>
खरं आहे.
___
तसच सुरक्षितता. नक्की काय मिळालं की सुरक्षित वाटतं? मनाजोगा पैसा, मनाजोगा छंद, गुरु की व्यवसायात यश? कधी वाटणार ती सुरक्षितता? आणि ती वाटणार का या जन्मी? अशी काही "कमींग होम फायनली" भावना असते का? का तगमग चालूच रहाते काहीजणांची?
जपजी साहीब मधे लिहील्याप्रमाणे-
इकना हुकमी बक्षीस इक हुकमी सदा भवाइये
काहींना बक्षीस मिळतं तर काहीजण फक्त दारोदार भटकत राहतात.
6 Oct 2010 - 11:37 pm | इंटरनेटस्नेही
याला जीवन ऐसे नाव...
6 Oct 2010 - 10:36 am | विसोबा खेचर
हम्म..
येस्स..
तात्या.
--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..
6 Oct 2010 - 11:15 am | अनिल २७
प्रवास करताना धावत्या वाहनातून (बस, कार, ट्रेन, विमान ई. ) बाहेर बघू नका, असे प्रश्न पडणार नाहीत..
6 Oct 2010 - 2:57 pm | देव जय
आर्शात नका बघु....
6 Oct 2010 - 5:10 pm | प्रकाश घाटपांडे
अनेकांना पडतात.उत्तर शोधण्यात आयुष्य सरुन जातं.
6 Oct 2010 - 5:49 pm | Nile
सहमत.
काही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात, काही खुळचट अंधश्रद्धा मनात धरुन दिवस उद्यावर ढकलतात.
6 Oct 2010 - 6:40 pm | बिपिन कार्यकर्ते
काही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात, काही खुळचट अंधश्रद्धा मनात धरुन दिवस उद्यावर ढकलतात तर अजून काही खुळचट योग्य मार्गाने उत्तरे शोधणार्यांनापण अंधश्रध्दाळू म्हणतात.
6 Oct 2010 - 6:58 pm | Nile
असेलही. कित्येक खुळचट अवांतरही बोलत राहतात. पण त्याचा इथे काय संबंध?
6 Oct 2010 - 7:12 pm | बिपिन कार्यकर्ते
नसतोच, पण म्हणूनच त्याला अवांतर म्हणतात ना. शिंपल कळंना राव तुमाला. असो. असंबद्ध असतं म्हणून बहुतेक वेळा मी दुर्लक्षच करतो. कधी तरी उगाच गंमत म्हणून उत्तर देतो. ;)
6 Oct 2010 - 7:18 pm | Nile
कुठे गेल्या यशोधरा ताई, हे पहा 'ज्या मार्गावर काहीही हशील नाही' अश्या मार्गावर चालण्याचे उदाहरण. ;-)
6 Oct 2010 - 7:20 pm | यशोधरा
हो, ते तुझे उदाहरण माहितच आहे आम्हांला! नवीन काय त्यात! ;)
6 Oct 2010 - 7:14 pm | Nile
इथे खुळचट हे विशेषण अंधश्रद्धांसाठी वापरलेले आहे, काहींच्या नजरेतुन हे सुटण्याची शक्यता असल्याने खुलासा.
6 Oct 2010 - 7:21 pm | बिपिन कार्यकर्ते
Explanation is admission of guilt असे ऐकले होते मध्यंतरी इथेच कुठे तरी.
6 Oct 2010 - 7:24 pm | Nile
If you wish to take it that way you are welcome, but sadly there is none.
6 Oct 2010 - 5:59 pm | यशोधरा
>>काही खुळचट अंधश्रद्धा मनात धरुन >> एखाद्याला जी अंधश्रद्धा वाटेल, ती दुसर्याने मनाशी जपलेली श्रद्धा असू शकते. त्यात काही गैर आहे? जोवर त्या श्रद्धेचा, ती न मानणार्याला त्रास होत नसेल, तर ज्याला श्रद्धा बाळगायची आहे, त्याला बाळगू देण्यात काय प्रत्यावाय आहे? श्रद्धावंतांचा जसा अश्रद्धावंतांना त्रास होऊ नये, त्याचप्रमाणे अश्रद्धावंतांनी श्रद्धावंतांच्या श्रद्धेला तरी का धक्का लावावा?
कदाचित त्या सो कॉल्ड "खुळचट" श्रद्धेच्या सहाय्याने त्यांना त्यांची उत्तरे सापडतील. सब अपने अपने रास्ते पकडो. :)
6 Oct 2010 - 6:29 pm | Nile
नुसता शब्दांचा खेळ आहे हो. वर दिलेल्या प्रतिसादात श्रद्धा काय अंधश्रद्धा काय ह्या वादाला हात घालायचा नसुन, काही लोक अवलंबु शकतात असा एक पर्याय दिलेला आहे.
बाकी उद्या मला काय वाटेल ते मी माझ्या मनात काय वाटेल त्या नावाने जपुन ठेवु शकतो, त्यात काय विशेष? हा मुद्दा नाही. इथे कोणाला कुणाच्या श्रद्धे-अंधश्रद्धेने कुणाला त्रास होतो असे प्रतिपादनही केलेले नाही. (असा निष्कर्ष प्रतिसाद लेखिकेने कसा काढला याचे कुतुहल आहे)
ही अजुन एक अंधश्रद्धा असु शकते.
सबको रास्ते पहले से पता होते तो सबही मंजील पाते.
6 Oct 2010 - 6:38 pm | यशोधरा
शब्दांचे खेळ कोण करत नाही सांगा? सगळेच करतात हो तो, काहीजणांचा मान्य होतो, काहीजणांचा होत नाही, इतकच. बेरजेच्या गणिताचा खेळ आहे तो :) त्रासाचे तुम्ही प्रतिपादन केलेय असे म्हटलेले नाही, तर एक शक्यता मांडली इतकेच. स्वतःवर ओढवून घेऊ नये.
>>ही अजुन एक अंधश्रद्धा असु शकते. >> असूदेत की.
>>सबको रास्ते पहले से पता होते तो सबही मंजील पाते. >> अगर रास्ता लियाही नहीं, तो शायद कभी ना पायें.
6 Oct 2010 - 6:43 pm | Nile
चुकीचा रस्ता घेण्यात काहीच चुक नाही. परंतु तो चुकीचा आहे हे माहित असुनही त्यावरच चालत राहिणे नक्कीच खुळचट पणाचे लक्षण आहे असे मला वाटते.
हा तिरसा पर्याय असु शकतो. पण प्रस्तुत धागालेखिकेला प्रश्न पडले आहेत, म्हणजेच रस्त्याच्या शोधात लेखिका आहे असे समजावयास हरकत नसावी(मग एक किंवा अनेक बरोबर 'आणि' एक किंवा अनेक चुक इतकेच पर्याय उरतात). असे असल्यात तिसरा पर्याय बाद होतो. त्यामुळे त्याचा उल्लेख केलेला नाही.
6 Oct 2010 - 6:52 pm | यशोधरा
>>परंतु तो चुकीचा आहे हे माहित असुनही त्यावरच चालत राहिणे नक्कीच खुळचट पणाचे लक्षण आहे असे मला वाटते. >>
अगदीच मान्य. पण तो रस्ता चुकीचा आहे हे ठरवणार कोण? जोवर ती व्यक्ती स्वतःच्या अनुभवाने तो रस्ता चुकीचा आहे हे ठरवत नाही, तोवर तिच्या मते तो योग्यच असू शकतो. त्या व्यक्तीचेही काही अनुभव असतील की! तेह्वा दुसर्याच कोणी तो रस्ता चुकीचा आहे असे ठरवून, स्वतःची मते त्या सो कॉल्ड चुकीच्या रस्त्याने चाललेल्या व्यक्तेवर लादणे मला अधिक खुळचटपणाचे वाटते.
6 Oct 2010 - 6:56 pm | Nile
असहमत. चुकीचा ठरत (ठरवत) नाही म्हणुन काहीच योग्य होत नाही.
त्या व्यक्तीने तो मार्ग योग्य आहे हे ठरविणे ही क्रियाच महत्त्वाची आहे. त्याचा माझ्या प्रतिसादाशी संबंध नाही.
6 Oct 2010 - 6:59 pm | यशोधरा
आणि तो कसा ठरवणार?
6 Oct 2010 - 7:03 pm | Nile
यावर अनेक चर्चा झालेल्या आहेत. तसेच आंतरजालावरही पुष्कळ साहित्य यावर उपलब्ध असावे. यावर चर्चा करावयाची असल्यास नवा धागा काढणे. शक्यतो ठराविक उदाहरण घेतलेत तर चर्चा करणे सोपे जाईल. मोघमात अवांतरपणाच जास्त (होतो असे दिसते).
6 Oct 2010 - 7:08 pm | यशोधरा
बाकीच्या चर्चा व आंजावरचे साहित्य आहेच. ते असूदेत. ते अवांतर इथे नको. इथे बोलायचे नसेल, तर आपण ख व मधे बोलूयात. तुझे मत, तुला हवे ते उदाहरण घेऊन सांग. वाचायला आवडेल.
6 Oct 2010 - 7:04 pm | पैसा
जोपर्यंत त्या व्यक्तिच्या हातून काही समाजविघातक प्रकार होत नाही, तोपर्यंत आपल्या बाबतीत काय योग्य-अयोग्य हे ज्याचं त्याला ठरवायचं स्वातंत्र्य असलं पाहिजे.
आणि एखाद्याला त्याची मतं बदलायला कोणीच फोर्स करू शकत नाही. भले वर वर त्या माणसाचं वागणं बदलेल, पण आतून आणखी कडवटपणा तयार होईल.
6 Oct 2010 - 7:10 pm | Nile
असं ठरवता न येण्याचं पारतंत्र्य भारतात आहे असे माझ्या तरी ऐकीवात नाही.
ठरविणे बाबत वरती यशोधरा ताईंना दिलेला प्रतिसाद पहावा.
6 Oct 2010 - 6:02 pm | सहज
अनेक प्रश्नांवरच्या उत्तरांसाठी 'आस्क द ऑडीयन्स' लाईफलाइन वापरायलाच संकेतस्थळ आहेच.
प्रश्न बरेच जणांना असतात. प्रश्न नसणारे फार फार दुर्मिळ. भिती, धास्ती, असुरक्षीतता लहानपणापासून पार आयुष्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत असु शकतात.
7 Oct 2010 - 5:37 am | धनंजय
मोकळेपणाने लिहिलेला अनुभव आहे.
6 Oct 2010 - 6:05 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
..... भय ....fear...
....सगळ्यांनाच असतं ना कशा ना कशाच भय?...
स्वरूप फक्त वेगळ ......कोणाला अगदी सामान्य,general भय....म्हणजे अंधार...भूत-खेत...मृत्यू! काहीना भविष्याची भीती...पुढे काय होईल?...काहीना past चे भय..भूत काळाची आठवण सूद्धा घाबरवते. काहीना आपण जाणून करत असलेल्या चुका..त्या उघडकीला येतील का काय हे भय. तर काहीना नकळत घडलेल्या चुकांचे भय.काहीना आजूबाजूच्या माणसाचे भय...काहीना समाजाचे भय.
...आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराचे भय...! प्रत्येकाला असताच ना कशा ना काशाच भय?...
मला कशाची भीती वाटते?
कुठेही..बंद खोलीत किंवा अंधारात जायची भीती वाटते. का माहिती नाही...may be लहान पणी खूप भीती दाखवल्यामुळे असेल..पण मला जे काही scary movies मधले कही scenes पाहिलेले असतात ना..ते मी जेव्हा काढे एकटी असते त्या वेळी आठवते आणि मग तेव्हा मला खूप भीती वाटते.वेड्या वाकड्या...विद्रूप चेहऱ्यांची नाही बर का भीती वाटत..पण कही न दिसणार ...अज्ञात काहीतरी आप्लया आसपास असु शकते याची भिती वाटते.खुप प्रयत्न करुनही नाहि जात ही भीती.
म्हणजे जुने रामसे वाले मूव्हीज ची भिती नाही वाटत्...पण राम्-गोपाल्...भूत्...वास्तुशास्त्र्..वगैरे चा एखादा दुसरा scene जरी चुकुन पाहिला तरी ४-५ दिवस खिडकीत /आरशात /बन्द कपाट उघडायची देखील भिती वाटते. पण दोम्-चार दिवसानी नॉर्मल वेर येते..एकटी अस्ताना त्या picture मधल्या situation apply करते..! हे सगळ माहिती आहे तरी भय आहे ते आहेच.
6 Oct 2010 - 6:40 pm | अवलिया
कधी अक्राळ विक्राळ स्वरुपात अंगावर धावुन येणारी..
कधी सुप्त मनात अलगद घुसुन कुरतडणारी...
कधी अज्ञानामुळे समजेच्या पलिकडल्या गोष्टिंची..
कधी ज्ञानामुळे समजेच्या कवेतल्या गोष्टींची...
भिती न जाणे किती काळापासुन मानवाच्या मनात सुप्त पणे वास करुन आहे हे सांगता येत नाही
त्या भितीवर मात करण्याचे प्रत्येकाचे उपाय भिन्न असतात.कुणाला उजेडामुळे भिती गेली असे वाटते. कुणाला अंधारामुळे भिती गेली असे वाटते. कुणाला लख्ख चांदणे दिलासा देते तर कुणाला पुनवेचा चांद मनातुन कोसळवुन लावतो. आपल्याला ज्या उपायाने भिती जाते असे वाटते तो उपाय आपल्यासाठी श्रेष्ट. मग भले ते हनुमान कवच असो, रामरक्षा असो. कुराणाचे पठन असो की बायबलचे पठन असो की देव पूजा असो की पिकनिकला फिरायला जाणे असो की मॉलमधे लोकांमधे आहे अशी जाणीव असो की नको असलेल्या गोष्टींची खरेदी करुन भितीवर तात्पुरती मात असो की अजुन काही.. अक्षरशः काहीही.
साध्य हे आहे की भिती जाणे हे महत्वाचे. साधन काहीही असो .. काहीही. !
6 Oct 2010 - 6:39 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
.. हे मस्त बोललात!
6 Oct 2010 - 7:23 pm | श्रावण मोडक
पॉप कॉर्न!!!
6 Oct 2010 - 7:29 pm | शुचि
मला एवढच कळलं-
एकंदर भीती ही गोष्ट सनातन आहे आणि प्रत्येकजण कधी ना कधी या गोष्टीने ग्रासला गेलेला आहे.
फरक इतकाच आहे मग की काही लोकांना दुबळेपण, भीती लपवता येत नाही तर काहीजण ते लपविण्यात निष्णात असतात.
बाकी चू भू दे घे.
6 Oct 2010 - 7:30 pm | यशोधरा
क्या बात है शुचि! ब्येष्ट! :)
लिहिलंस पण मस्त होतं.
6 Oct 2010 - 7:34 pm | Nile
सिंहाला घाबरणारे लोक आहेत म्हणुन झुरळाला घाबरण्याचे समर्थन होत नाही.
(निळु काळे)
6 Oct 2010 - 7:35 pm | यशोधरा
काहीजण सिंहाला न घाबरता झुरळालाच घाबरतात.
पुन्हा एकदा, प्रत्येकाचे कोणाला घाबरायचे याचेही स्वातंत्र्य.
अवांतरः तुला जायचे होते ना मघाशी?
6 Oct 2010 - 7:41 pm | सूड
वास्तवात माऊली सवे नसताना नक्की काय होतं? बागुलबुवा, काल्पनिक संकटांना घाबरून जाऊन आपण धडपडतो का? या धडपडीतूनच घराकडे, सुरक्षिततेकडे आपली वाटचाल होते का? हे २/४ रस्ता दाखविणारे कोण? - गुरु, विज्ञान,, महत्त्वाकांक्षा, छंद यापैकी काहीही असू शकेल का?
हो, माउली सवे नसताना आपण धडपडतो, पण ती धडपड असते एका जाणीवेतून निर्माण झालेली असते. ती जाणीव म्हणजे आपली आजपर्यंत जिने काळजी घेतली ती आता नाही, आता सगळं आपलं आपल्याला करायचंय सकाळचा चहा ते रात्रीचं अंथरूण सग्गळं. वरपांगी कष्टाचं वाटणारं हे सारं, शेवटी सुख हातात ठेवून जातं. त्यामुळे त्रास वाटला तरी धडपड थांबवायची नाही. आणि माऊली सवे नसणं म्हणजे काय तो देह आपल्यासमोर नसतो, पण त्या देहाने कमवलेलं पुण्य (कदाचित कुणीतरी अंधश्रद्धा म्हणतील याला) नेहमी आपल्यासोबत असतं. 'दिवा न दिसतो आता परंतु मागे आहे अजून सावली' हे नेहमी लक्षात ठेवायचं असतं.
जेव्हा कोणावरही विश्वास ठेवता येत नाही तेव्हा तो देवावर, त्या अज्ञात शक्तीवर ठेवावा, आणि पाउल उचलावं. ती आदिमाया आपला विश्वास खोटा ठरवत नाही आणि येत्या प्रसंगाला तोंड देण्याचं बळ देते.
6 Oct 2010 - 9:05 pm | शिल्पा ब
आपणच सर्वद्न्य आहोत असे मनात धरले कि काही कशाची भीती वाटत नाही...यालाच पुणेरीपणासुद्धा म्हणतात.
थोडक्यात पुणेरी व्हा सगळ्या भीत्या नाहीश्या होतील अन भूतेसुद्धा तुम्हालाच घाबरतील..
7 Oct 2010 - 9:32 am | कवितानागेश
तरीच मला आश्चर्य वाटत होते, की मला कसलीच भिती का वाटत नाही?!
पुण्यात जन्म झाल्याचा परिणाम बरे,........ दुसरे काही नाही!
6 Oct 2010 - 10:57 pm | उपेन्द्र
निर्भय असणं हा एक चांगला गुण समजलं जात असलं तरीही कधी कधी भितीची भावना आपल्याला अधिक सुरक्षीत वागायला भाग पाडून संकटापासून दूर ठेवू शकते असं मला वाटतं..
मी स्वत: कधी फारसा भ्यायलेला आठवत नाही. पण भीती अजिबात नसते असंही नाही.
तसेच "माऊली सवे नसताना " ही लढाई आपल्याला एकट्यानेच लढायची आहे ही अपरिहार्य जाणीव अधिक धाडसही निर्माण करू शकते..
6 Oct 2010 - 11:49 pm | पुष्करिणी
शुचि, प्रत्येकाला या ना त्या गोष्टीची भीती वाटत असतेच. वर उपेंद्र नी लिहिल्याप्रमाणे आपल्या अस्तित्वाच्या लढाइत भीती आपल्याला काहीशी सावध रहायला शिकवते.
प्रत्येकजण आपाप्ला ट्राइड अँड टेस्टेड तारकमंत्र वापरून भीतीशी मुकबला करतो.
माझ्यामते शूर व्यक्ती म्हणजे निर्भय व्यक्ती नसून जी भीती वाटत असतानाही काही अॅक्शन घेते ती ( म्हण्जे सेल असले की जशी मी पहाटे ३.३०-४ ला एकटी काळ्याकुट्ट अंधारात ,मोठी मोठी झाडं असणार्या रस्त्यानं चालत जाते तशी :) )
7 Oct 2010 - 12:14 am | शुचि
सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद.
7 Oct 2010 - 5:43 am | सद्दाम हुसैन
शुचि , छान लिहीतेस! मला तुझं लिखान मनापासुन आवडतं. काही लोकं स्वतः फार हुशार असल्याच्या आवेशात तुमच्या लेखांवर टिका करताना दिसतात त्यांना देखील तुम्ही दुर्लक्षाने मारतात. तुमच्या ह्या शैलीचा मला हेवा वाटतो . बर्याच जणांना जमत नाही हे! तुमचे विषय ही अगदी आसपासचे असतात (पित्रुपक्ष असो वा पाप-पुण्य) उगाच मोठ्या मोठ्या विषयांना हात घालुन "मी कित्ती हुश्शार" किंवा कोणाची टिंगल करुन "मीच्च कित्ती भारी" असा तोरा तुमच्यात बिल्कुल नाही , किप इट अप उई.
7 Oct 2010 - 7:00 am | प्रियाली
भीती स्वाभाविक आहे. भीती वाटत नाही असा माणूस भेटणे विरळा.
बाकी, मलाही कधीकधी भूतांची भीती वाटते. ;)
असो. सध्या "कोई आने को है"चा ब्रेक सुरु आहे म्हणून प्रतिसाद लिहिला. आता पळते. भूत यायची वेळ झाली. ;)