निर्लज्जपणाचे फायदे केवळ ऑफिसमधेच नव्हे तर इतरत्रही होतात. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे लोकल ट्रेन्स. इथे तर निर्लज्जपणाचा कळस करावा लागतो. मुंबईतल्या माणसांना पडणार्या स्वप्नातही ते स्वतःला विंडो सिट वर बसलेलं बघत नाहीत. किमानपक्षी दोन सिट्सच्या मधल्या जागेत धक्के न खाता उभं राहता यावं इतकीच माफक अपेक्षा मुंबईकराची असते. पण ती सुद्धा अनेकवेळा पूर्ण होत नाही.
दरवाजातच मुर्खासारखे लटकणारी लोक, उतरायचं नसूनही मधेच उभे राहणारे, भयाण वासाची तेलं डोक्यावर थापून आलेले भैय्ये, अशक्य गोंगाट करणारे गुजराथी, आपल्या मित्रांसाठी जागा अडवून ठेवणारे कंपू आणि साक्षात गणपती, विठ्ठल, श्री राम इत्यादि देवाधिकांना कानात बोटं घालायला लावणारी भजनी मंडळं ह्यांच्या सोबत प्रवास करणं आणि लोकांचे घाम पुसत पुसत इच्छितस्थळी पोहोचणं ही काय सर्कस आहे ते मुंबई बाहेरच्या लोकांना कळणार नाही. पण हा अनुभव लाखो मुंबईकर रोजच घेत असतात. ट्रेनमधे शिरण्यापासून आपल्याला संघर्ष करत करत मुक्कामी पोहोचायचे असते.
घटना २ - सामान्य दॄष्टीकोन
स्थळ - फलाट
वेळ - सकाळी ८:३० ते १० आणि संध्याकाळी ५:३० ते रात्रीची शेवटची ट्रेन जाईपर्यंत कधीही
पार्श्वभूमी - तुम्ही ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्मवर उभे आहात. नलाने दमयंतीची केली नसेल इतकी लोकलची प्रतीक्षा करणारा जनसागर. तुम्ही धावत्या ट्रेनमधे उडी मारून चढण्यासाठी तयार आहात. ट्रेन येते. इतक्यात कुठून तरी एक माणूस तुम्हाला धक्का मारून तुमच्या पुढे येतो आणि तुमच्या ऐवजी तो गाडीत चढतो. तुम्ही ट्रेनच्या सोबत धावत धावत दरवाज्यापाशी येता. दरवाज्यात खांब धरून उभा असलेल्या माणसाला विनंती करता.
तुम्ही - अंदर चलो अंदर चलो...
खांबधारी माणूस - अरे जगा नहिये भैय्या...
तुम्ही - अरे अंदर जगा है, मेरेको दिख रहा है इधरसे...
खांबधारी माणूस - इधरसे दिखता है तो उधरसे जाओ...
तुम्ही - अरे ऐसा कैसा बात करता है तुम... कमसेकम पैर तो अंदर रखने दो...
(आता ती पाय ठेवायची २ इंच x २ इंच जागा त्याने पुढल्या स्टेशनवर चढण्यार्या मित्रासाठी ठेवलेली असते.)
खांबधारी माणूस - अरे किधर दिखताय तुमको जगा?
तुम्ही - यार कबसे खडा हुं, दो ट्रेन छोडा इसके पहलेका.
खांबधारी माणूस - तो एक ट्रेन और छोड. नेक्स्ट ट्रेन पूरा खाली हे, उसमे चढो...
(तरी तुम्ही कसे बसे दांडा पकडता. पण पाय कुठे ठेवायचा हा प्रश्न उरतोच. ट्रेन सुटते. भूतदयेने लोकं तुम्हाला वर खेचून घेतात.)
खांबधारी माणूस - साला मरने का है क्या? खाली फोकट हमारा खोटी करेगा...
लोकांनी आपला जीव वाचवल्याचं ओझं डोक्यावर घेऊन तुम्ही अख्खा प्रवास उभ्याने करतात. काही लोकं पार शेवटच्या स्टेशनवर उतरायचं असूनही तुमच्यापुढे पॅसेजमधेच उभी राहतात. त्यामुळे चढणारी-उतरणारी सगळी मंडळी तुम्हाला धक्के देत, शिव्या घालत चढतात-उतरतात. तुम्ही फुकटात कंप्लीट बॉडी मसाज मिळाला (आजूबाजूला भैय्ये असतील तर ऑईल मसाज) असं समजून गप गुमान आपल्या स्टेशनवर उतरून मान खाली घालून घरी जाता.
-----------------------------------------------------------------------------------------------------
घटना २ - निर्लज्ज दॄष्टीकोन
स्थळ - फलाट
वेळ - सकाळी ७:३० ते १० आणि संध्याकाळी ५:३० ते रात्रीची शेवटची ट्रेन जाईपर्यंत कधिही
पार्श्वभूमी - तुम्ही ट्रेनची वाट बघत प्लॅटफॉर्मवर उभे आहात. नलाने दमयंतीची केली नसेल इतकी लोकलची प्रतीक्षा करणारा जनसागर. तुम्ही धावत्या ट्रेनमधे उडी मारून चढण्यासाठी तयार आहात. ट्रेन येते. इतक्यात कुठून तरी एक माणूस तुम्हाला धक्का मारून तुमच्या पुढे जाऊ पाहतो. तुम्ही त्याला आणि तुमच्या पुढच्याला कोपर मारून अजून पुढे जाता. धावत्या ट्रेन मधे चढता. दरवाज्याचे हँडल धरून उभे राहता. आत जाण्याची मोहीम सुरू होते.
तुम्ही - चले ए शाहरूख, अंदर चल...
खांबधारी माणूस - अंदर जगा नहिये
तुम्ही - बंदर की तरह खंबे पे क्या लटकता है, अंदर चल...
खांबधारी माणूस - अरे भैय्या बोलाना जगा नहीं है...
तुम्ही - ए भैय्या कोणाला बोलतो रे... च्यायला उतर प्लॅटफॉर्मवर दाखवतो तुला...
खांबधारी माणूस - अरे वैसा भैय्या नहीं रे...
तुम्ही - अंदर चल अंदर चल...
(तुमच्या पुढे एक भैय्या उभा आहे)
तुम्ही - ए भैया तेरेको किधर उतरने का है?
भैय्या - अंधेरी...
तुम्ही - तो अभिसे इधर कायको खडा है? बगिचे में आया क्या घुमने को? पिछे हट...
भैय्या - अरे मगर अंदर जगहा नही है...
तुम्ही - तुम साला हजारो लोग रोज आताय फिरभी मुंबई में जगा होताय ना...
भैय्या - कितनी भीड है...
तुम्ही - साला तुम लोग काई भीड है... अब गाव में खत डाल और बोल की और भैय्ये मत भेजो...
तुमचा आवेश बघून एक दोन माणसं तुम्हाला जागा करून देतात. दरवाज्याच्या पॅसेज मधून सिट जवळच्या पॅसेजमधे पोहोचायचा पहिला टप्पा पार पडला. हळू हळू सरकत सरकत तुम्ही सिट्स जवळ येता. तीन जणांच्या सिट वर चक्क तीनच माणसं बसलेली आहेत. त्यातला एक अंगाने जरा रूंद असल्याने बाकिचे लोक 'कसं सरकायला सांगायचं?' असा विचार करून दुसरं कुणी उठायची आशाळभूतपणे वाट बघत उभे असतात.
तुम्ही - थोडा सरकके लो...
विंडोवाला बाहेर बघत असल्याचे दाखवून अथवा झोपेचे सोंग घेऊन तुमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. २-३ नंबरचे केवळ जागच्याजागी हलतात.
तुम्ही - थोडा सरकके लो...
बसलेला - और कितना सरकेगा? इतनाही जगा है...
ह्या अशाच उत्तरांमुळे लोकं बसायचा नाद सोडून बाजुला उभे राहिलेले असतात. त्या सगळ्यांचा नजरेत 'आता काय करशील लेका' हे स्पष्ट दिसत असतं. अशावेळी पुढचा मागचा विचार न करता सरळ त्या उरलेल्या १ इंचाच्या पट्टीवर टेकून घ्यावे. बसताना तिसर्या सिटवरच्या माणसाला नीट घासून, दाबून बसावे.
बसलेला - अरे क्या करताय...
तुम्ही - बस थोडासा सरको... (असं म्हणून त्याला अजून थोडे आत दाबावे)
बसलेला - अरे धक्का क्यों मारताय...
तुम्ही - धक्का खानेका नै है तो फर्स्ट क्लास में जाओ. टिकीट हमने भी निकाला है.
एकदा टेकायला जागा मिळाली की मग बसायला मिळण्याचे चान्सेसही वाढतात. बाजुच्याला दाबत रहायचे विसरू नये. अन्यथा त्या १ इंचाच्या पट्टीवर फार वेळ बसल्यास अर्धशिशिचा त्रास संभवतो.
गाडी थोडी जरी हकली तरी निर्लज्जपणे मिलीमिटर मिलीमिटर लढवत सिटवर हळू हळू पसरायला लागायचं. १-२ स्टेशन्स गेली की तुम्हाला किमान टेकायला तरी मोप जागा झालेली असते. आणि मधेच कुणी उठला तर मधे उभ्या असलेल्या माणसाला सिट ऑफर करण्याचा अगोचरपणा न करता उठणारा माणूस पूर्ण उठायच्या आधीच आतच जागा ताब्यात घावी. मोहीम फत्ते.
अशाप्रकारे प्लॅटफॉर्मवर शिरायच्या आधीच आपला भिडस्त स्वभाव बाजूला ठेवावा आणि निर्लज्जपणा अंगी बाणवूनच गाडीत चढावे, म्हणजे प्रवास कुठचाही असो, सुखाचा होईल.
(निर्लज्जपणे) पुन्हा क्रमशः
प्रतिक्रिया
1 Oct 2010 - 9:25 pm | आदिजोशी
"निर्लज्ज व्हा - भाग १" - http://www.misalpav.com/node/14656
1 Oct 2010 - 9:29 pm | निशदे
झकास........हा भाग सुद्धा आवडला.
(निर्लज्जपणे) पुढच्या भागाची वाट बघतो
1 Oct 2010 - 9:29 pm | शुचि
खी: खी: खी:
हा भाग देखील खूप मस्त जमलाय :)
पण बायकांच्या डब्यात त्या महामाया कोळीणींच्या पेक्षा निर्लज्ज होणं १० जन्म तरी शक्य नाही ..... बापरे काय त्यांच्या तोंडाचा तोफपट्टा ....
1 Oct 2010 - 9:52 pm | पैसा
झकास!
1 Oct 2010 - 9:55 pm | मस्त कलंदर
हेही आवडले रे..
फक्त तू बायकांच्या डब्याने प्रवास न केल्याने जागा असू दे किंवा नसू दे, दरवाजातच फतकल घालून बसलेल्या बायकांचा अनुभव नाही तुला. कितीही गर्दी असली तरी ढिम्म हलत नाहीत आणि त्यांना चढता-उतरता जराही चुकून पाय लागला तर आख्या ४२ पिढ्यांना लाखोली वाहतात... अगदी निर्लज्जपणे!!!! त्यांना कोचिंग देत नाहीस ना रे???
1 Oct 2010 - 10:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हो, आणि वर या बसक्या बायका तुमचा ड्रेस चेहेर्यावर येतोय, तुमची ओढणी माझ्या अंगावर येतेय असल्या तक्रारी करायला लागल्या की माझ्या सुंदरशा फ्लोटर्सचा पुरेपूर उपयोग करण्याची फार इच्छा होते.
2 Oct 2010 - 2:36 pm | नीधप
हा हा हा खरंय..
एकदा एका बाईने माझ्या पाठीवर असलेल्या सॅकबद्दल बडबड सुरू केली. कशाला हे घेऊन लोकलमधे चढता इत्यादी. हे सगळं दारातच. २ च स्टेशन जायचं असल्याने आत सिटस पर्यंत जायची हिंमत आणि शक्यता नव्हतीच. त्यामुळे सॅक पाठीला याला पर्याय नव्हता. खूप बडबड ऐकल्यावर तिला ऐकवलं मी (तेव्हा मी खूप बारीक असल्याने!) 'तुम अपना एरिया कम करो फिर सॅकवालोंको बोलना.' आजूबाजूच्या पोरी हसल्या. ती बाई गप्प झाली आणि माझं स्टेशन येईपर्यंतची २ मिनिटे सुखात गेली माझी.
1 Oct 2010 - 10:00 pm | गणपा
=)) =)) =))
तुफान मेल रे अॅड्या..
बोरिवली ते चर्चगेट चे धक्के पचवलेला.
4 Oct 2010 - 3:42 pm | धमाल मुलगा
बरोब्बर नको तोच पंच आपल्याला कसा काय बुवा सापडला? ;)
अजुन प्रभुमास्तरांनी वाचलेलं दिसत नाही हे! :D
मिष्टर अॅडीजोशी, पिश्टान तापावा तशी भट्टी तापल्यालीये... येऊंद्या दनादन पुढचं भाग :)
1 Oct 2010 - 10:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अॅड्या, महान आहेस भौ तू! _/\_
माझा निर्लज्जपणाची परमावधी एवढीच होती:
ठाणा स्टेशनला तिकीटाच्या रांगेत चिक्कार गर्दी होती. माझा नंबर आता चौथा-पाचवाच असेल. एक मावशी घुसून तिकीट काढायला लागली.
मी: ओ मावशी, मागून या रांगेतून.
मा: गाडी चुकेल ना माझी!
मी: आमच्या कोणासाठीही गाड्या उभ्या नाही केलेल्या गेला अर्धा तास.
मा: तू काय स्वतःला शहाणी समजतेस काय?
मी: समजते? मी आहेच शहाणी, तुमच्यापेक्षा तर नक्कीच जास्त शहाणी आहे. आता जा मागे रांगेत. एवढ्यात आणखी चार माणसं आली पहा रांगेत. आणखी वाद घालाल तर आणखी चाळीस येतील.
1 Oct 2010 - 10:42 pm | मस्त कलंदर
खारघर स्टेशन आता थोडे बदलतंय. तिथे ना स्मार्ट कार्ड मशीन्स आणि कुपन व्हॅलिडेटिंग मशीन्सही नसायची(आता आहेत की नाही माहित नाही..)आणि प्लॅटफॉर्मवर इंडिकेटरचा पत्ता अजून नाय.
तिथे एकदा तिकिट काढण्यासाठी लांबच लांब रांग लागली होती. चांगली पंधरा मिनिटं वाट पाहिल्यावर माझा दहावा नंबर लागला. तोवर तिथल्या फॅशन डिझायनिंग कॉलेजातली मुलगी आपण जणू काही रँपवरच चालत आहोत अशा अविर्भावात आली. सगळ्या रांगेकडे तिने एकवार पाहून घेतले. आणि माझ्यापुढे असलेल्या एका शामळू दिसणार्या मुलाला डोळ्यांची पिटपिट करत "प्लीज.." म्हणत तिकिट काढ म्हणून सांगितले. त्याने काही न बोलता पैसे घेतले. जर त्याने तसे करायला नकार दिला असता, तर काहीच प्रश्न नव्हता.
संवाद काय घडला हा इथे प्रश्नच नाही. मी तिला 'नीट' समजावून रांगेत उभं राहूनच तिकिट घ्यायला लावलं.
1 Oct 2010 - 10:44 pm | मिसळभोक्ता
गेकडे तिने एकवार पाहून घेतले. आणि माझ्यापुढे असलेल्या एका शामळू दिसणार्या मुलाला डोळ्यांची पिटपिट करत "प्लीज.." म्हणत तिकिट काढ म्हणून सांगितले. त्याने काही न बोलता पैसे घेतले.
सीनेमें जलन आंखोमे तूफान सा क्यों है ?
चालू द्या.
1 Oct 2010 - 11:18 pm | मस्त कलंदर
छे हो.. जलन बिलन काहीच नाही. तिने एकवार रांगेकडे पाहून अंदाज घेतला की हुज्जत न घालता/ आढेवेढे न घेता तिला तिकिट कोण काढून देईल याचा..
बाकी, उपप्रतिसाद देताना वरची वाक्ये अर्धवट तोडत जाऊ नका हो.. मलाच क्षणभर प्रश्न पडला, मी गे बद्दल कुठे काय लिहिले होते म्हणून!!!!
1 Oct 2010 - 11:37 pm | पैसा
काही दिवसांपूर्वीच्या एका सुप्रसिद्ध धाग्याची.
(दुसर्याचा नवरा)
1 Oct 2010 - 10:12 pm | Pain
हाहाहा :D
हा पण लेख आवडला.
1 Oct 2010 - 10:36 pm | शिल्पा ब
धमाल...
मी एकदा(च) सभ्यपणे एका बऱ्या घरातल्या दिसणाऱ्या बाईला " एक्स्कुज मी, मला जरा आत जायचंय" असा म्हणून मधल्या पासेजमधून आत डब्यात गेले तर ती बाई काय चालू झाली...मला काहीच कळेना काय झालं ते...मी आधी तिला थोडं उत्तर दिलं पण मग कंटाळून तिची एकटीची बडबड ऐकत गम्मत पाहत उभी राहिले...बाकीचेही काय एकटीच मुर्खासारखी बडबडतेय याची गम्मत पाहत होत्या..
एकदा एका पोरगी हि ssssss एवढी रांग असताना मधेच घुसली...रांगेत नसलेली एक बाई तिला म्हणाली " तुमच्यासारखे सुशिक्षितच असं वागायला लागले तर कसं व्हायचं? " ...मग ती जरा वाट पाहत असल्याचं नाटक करत इकडे तिकडे घाईने बघत उभी राहिती तेवढ्यात दोन माणसांनंतर माझा नंबर होता...आणि ती लागली मधेच घुसायला...मी तिला म्हणाले " ओ बीचमे नै घुसनेका...लैनमे जाव" तिने इंग्रजी फाडलं " I am getting late, I don't have time "
मी " Then leave early from home...we are also getting late...मेरे पिछेवला मानता है तो पीछे आ जाव , मेरे आगे नै आनेका"
शेवटी ती गेली मागे...अन मी तिकीट काढून आले तर ती शेवटी उभी होती...मला लगेच "स्टुपिड " म्हणाली तोंडातल्या तोंडात... मग नाईलाजाने मलापण तिला यु स्टुपिड *च" असे म्हणावे लागले..
डब्ब्यांची गम्मत तर भारीच असते...नशीब जोरावर असेल तर announcement करतात कि अमुक तमुक platform पार आनेवाली गाडी १२ डीब्बोकि हय....मग जी का पळापळ सुरु होते...त्याला तोड नाही..
1 Oct 2010 - 10:39 pm | मिसळभोक्ता
शिल्पातै,
आपले भाषाविषयक धोरण आवडले.
हिंदी, इंग्रजी, आणि मराठी तिन्ही भाषांची एका मिण्टात मस्त वाट लावून सर्वभाषासमभाव दाखवलात. छान !
1 Oct 2010 - 10:43 pm | शिल्पा ब
आमच्याकडे सगळाच समभाव आहे...भाषा, वर्ण, वंश इ.इ.. त्यामुळे कोण एकाचीच वाट नाही लावत आम्ही.
1 Oct 2010 - 11:27 pm | नंदन
विरार गाडीत बोरिवलीला चढून दहिसरला उतरायचं असेल तर ह्या स्ट्रॅटेजीशिवाय तरणोपाय नाही ;)
खी: खी: खी:, अगदी!
2 Oct 2010 - 11:04 pm | मेघवेडा
>> बेष्ट!
विरार गाडीत बोरिवलीला चढून दहिसरला उतरायचं असेल तर ह्या स्ट्रॅटेजीशिवाय तरणोपाय नाही
अगदी, कर्मकठीण! अख्खा डब्बा क्रॉस करावा लागतो की! त्यापेक्षा प्रतिसादाच्या शीर्षकातली स्ट्रॅटेजीच बरी! ;)
अॅडीभौ, तुफान मेल सुटलीये! अजून येऊ दे!
4 Oct 2010 - 7:29 pm | गणपा
शहाणा माणुस एका स्टेशनपायी येवढे कष्ट घेणार नाही. रिक्षा बरी आणि रोजच असेल तर बेस्ट इज बेस्ट.
2 Oct 2010 - 2:56 am | रेवती
दुसरा भागही छान लिहिलाय!
मीही थोड्यावेळा गेलीये बुवा त्या गर्दीतून!
एकदा मैत्रिणीच्या लग्नाला जायचे असल्याने माफक साज लेवून ट्रेनमध्ये चढले.:)
उकाड्यामुळे आधीच काही सुचत नव्हतं त्यातून ठाण्याला उतरायची वेळ आली. सगळ्या बायकांची दरवाज्यापाशी गर्दी (खरंतर चेंगराचेंगरी) आणि ऐनवेळेस प्लॅटफॉर्म बदलल्याची अनाउन्समेंट झाली आणि सगळ्याजणींनी दुसरीकडे जाण्यासाठी जो दंगा केला त्यात मी अजिबात प्रयत्न न करताही आपोआप प्लॅटफॉर्मवर उतरती झाले.
नवरा जेन्टस् च्या डब्यात होता. आता हा आपल्याला कसा दिसणार असं वाटत असतानाच दिसला म्हणून बरं!
2 Oct 2010 - 7:09 am | स्वाती२
दोन्ही भाग आवडले. _/\_
2 Oct 2010 - 8:05 am | सहज
एक विनोद वाचला होता की 'पुण्याबाहेरच्या जिल्हात सोयिस्कर सार्वजनीक वाहन व्यवस्थेतुन होणारा आरामदायी प्रवास' याविषयावर राज्यभर केलेला एक मोठा सर्व्हे का अयशस्वी झाला? तर मुंबैकरांना 'आरामदायी प्रवास' म्हणजे काय हे कळले नाही, कोकणातल्या लोकांना 'सोयिस्कर' म्हणजे काय हे कळले नाही, खानदेशातल्या लोकांना 'सार्वजनीक वाहन व्यवस्थेतुन' म्हणजे काय हे कळले नाही, आणी काही स्वयंघोषित /बाटगे /उपरे पुणेकर 'हा सर्व्हे कशासाठी' म्हणत अडून बसल्याने. वगैरे...
प्रवास म्हणजे मुंबैकरांचा आणि लोकलमधुन प्रवास करणार्या मुंबैकरांच्या समस्या म्हणजे जागतिक समस्या त्यामुळे लोकलप्रवाशांचा दॄष्टीकोन हाच जागतिक दॄष्टीकोन असा समज लोकप्रिय होताना दिसतो आहे. चालू द्या. प्रबोधन करणार्यांची पिढी संपली आहे. आता निर्लज्ज होणे हा पर्याय नसून ते अपरिहार्य आहे असे दिसते आहे.
(निर्लज्ज) सहज
ता.क. - खानदेशातील किमान माहिती तरी बरोबर गोळा केली आहे का याची कल्पना नाही पण तो विनोद आहे याचे भान ठेवा. फक्त प्राध्यापकांनीच एखाद्या स्टिरीओटाईप विनोदाचा वापर आपल्या गंभीर मुद्याला समर्थन म्हणून संदर्भ द्यावा असा नियम नसल्याचा फायदा उठवला गेला आहे.
2 Oct 2010 - 8:49 am | नगरीनिरंजन
हाण्ण तिच्या! :-)
2 Oct 2010 - 8:18 am | सूर्य
वा वा, काळाची गरज ओळखुन लिखाण करणारा फक्त तुच अॅडी ;)
फार उपयोगी लिखाण ;)
- (निर्लज्ज व्हायच्या तयारीत)
सूर्य
2 Oct 2010 - 9:08 am | सन्जोप राव
आता कळाले हे असे का ते
2 Oct 2010 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त.........!
-दिलीप बिरुटे
2 Oct 2010 - 10:14 am | नितिन थत्ते
मस्त
2 Oct 2010 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त रे अॅडीभौ. हा भाग देखील झक्कास !
2 Oct 2010 - 1:49 pm | गुंडोपंत
वा डिटेलवार ट्रेनींग दिले रे बाबा आम्हाला तू. मी आप्ला पंचवटी ने जातो आणि तपोवन ने परत येतो. एकदाच चुकुन लोकलने गेलो होतो ४ वर्षांपूर्वी. मला बोरिवलीला उतरूच देईनात ते लोक . विरारला घेऊन गेले. नालायक हलकट माजोरडे! मग उलट आलो काय करणार? पुर्वी असतो तर दिले असते २ ठोसे हल्ली शक्य नाही...
2 Oct 2010 - 10:37 pm | निखिल देशपांडे
पंत आहो तपोवनची हालत लोकल ट्रेन पेक्षा काही फार वेगळी नसते. औरंगाबाद पर्यंत आरक्षण करुनही नाशिक पर्यंत अप-डाउन वाल्या लोकांना सामावुन घ्यावेच लागते.
अॅडी भौ.. लै भारी लेख..
2 Oct 2010 - 2:34 pm | ब्रिटिश टिंग्या
हा अॅड्या आजकाल फार माजला आहे साला :)
2 Oct 2010 - 9:20 pm | llपुण्याचे पेशवेll
हाहा हा .. मस्तं लेख. ३ एक वर्षांपूर्वी आमचा एक मोठा ग्रुप राजगड ट्रेकला गेला होता. परतताना आमच्या आधी गेलेला एक ग्रुप आमच्या बरोबर बस मधे होता , त्यात बर्याच मुली होत्या. बसमधे बसल्यावर आमच्या काही मित्रांना चेव आला नुकतेच किल्ला सर करून आलेले.. वीररसपूर्ण गाणी बेंबीच्या देठापासोन गायला सुरवात केली. डायवर कंडक्टर पण गाणी एंजॉय करत होते. पण त्या दुसर्या ग्रुपमधल्या मुलींना त्याचा त्रास होऊ लागला (मुलगे सगळे त्या ग्रुपमधले झोपलेले होते. दमले असतील बिचारे मुलींची ओझी वाहून). त्या चक् चक् करू लागल्या. आमच्या एका मित्राने विचारले "गाण्याचा त्रास होतो आहे का?" एकीने फणकारून " होय होतोय" असे म्हणले. त्यावर आम्चा मित्र "मग थोडावेळ सहन करा पुण्याला पोचायल फक्त ४५ मिनीटंच लागतात. "
तेव्हाच आम्हाला निर्लजम सदासुखी या मंत्राची महती कळली होती.
3 Oct 2010 - 9:41 am | नीधप
आपल्याला मजा करायची असल्याने सार्वजनिक ठिकाणी दुसर्याला त्रास होईल असं वागायचं वर परत ते मिरवायचं सुद्धा. चांगलं आहे.
बेसिक गरजांसाठीचा जसे की लोकलमधे चढून वेळेवर ऑफिसला पोचणे यातला निर्लज्जपणा आणि तुमच्या बेसुर्या गाणी म्हणण्यासाठीच्या गरजेसाठी केलेला निर्लज्जपणा यात फरक आहे.
4 Oct 2010 - 8:20 am | विश्वनाथ मेहेंदळे
नीधप यांचे म्हणणे एकदम मान्य. तरुणपणी सगळेच असा दंग घालतात. आम्हीही कालिजात घातला होता, पण एक वय असते ज्यानंतर आपण दुसऱ्यांचा पण विचार करायला लागतो, किमान तसे व्हावे ही अपेक्षा असते. जेव्हा जास्तीत जास्त लोक असा विचार करतात, तेव्हा ते राष्ट्र प्रगत व्हायला लागते असा माझा अंदाज आहे. हिरव्या देशात राहणारे जास्त सांगतील या बद्दल...
पण दंगेखोर शेजारी आपल्या वाटेला आले तर खालील प्रमाणे वागण्याची इच्छा होते.
http://www.youtube.com/watch?v=EzxfivZF9Yk
4 Oct 2010 - 7:07 pm | रेवती
नीरजाशी सहमत!
असाच त्रास तुमच्या आईवडीलांना द्या कि!
तरूण तुम्ही आणि त्रास मात्र दुसर्यांने सोसायचा?
निर्लज्जपणा आहे.
4 Oct 2010 - 9:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी सहमत आहे. आपल्या मजेसाठी इतरांना वेठीस धरणार्यांना असंस्कृतच म्हणावं लागेल, मग वय काही का असेना?
आमचं आजोळ कर्जतच्या पुढे सात-आठ किलोमीटरवर! लहानपणी मजा यायची गाडीतून परत येतानाही; आईबाबांशी चिक्कार गप्पा मारायला मिळायच्या. एरवी कुठे त्यांनाही वेळ मिळायचा निवांत? पण पुढे पुढे नेरळ, माथेरानचे प्रवासी आणि ट्रेकर्स लोकं जीव नकोसा करून सोडायचे. या लोकांच्या आरड्याओरड्याला कंटाळूनच आम्ही आजोबांकडून लवकर निघायला सुरूवात केली.
4 Oct 2010 - 10:36 pm | रेवती
हो, हे तर बाहेर गेल्यावरचं नेहमीचच झालं!
एकदा आई फार आजारी होती, घर सोडून कुठे जाणार? तर खालच्या मजल्यावरची भाडेकरू (कॉलेजची) मुलं इतका दंगा करत असायची कि विचारता सोय नाही. दोनवेळा शांतपणे दंगा न करण्याबद्दल सुचवून झालं. तिसर्यांदा चिडून त्यांच्याकडे जाऊन भांडले तर निर्लज्जपणे हसत निघून गेले. त्यांचे इतरही निर्लज्ज चाळे आणि कटाक्ष सहन न झाल्यामुळे सोसायटीच्या मिटींगमध्ये ठरवून कॉलेजची मुलं, लग्न न झालेले बाई अथवा पुरुष यांना जागा भाड्याने देणे बंद केले. माझ्या मैत्रिणीला त्यातल्याच एका मुलाने रात्री लाईट गेले असताना जिन्यात गाठून जे वर्तन केलं त्यासाठी त्याला 'कसाबच्याबरोबर' तुरुंगात टाकलं पाहिजे इतका राग आला आहे.
5 Oct 2010 - 7:46 am | नीधप
आणि तो मुलगा मात्र निर्लज्जपणे कसा मी त्रास दिला म्हणून मिरवत असेल वरच्या मिरवणार्या सारखंच.
7 Jun 2016 - 3:01 pm | पियू परी
दोन्ही पोस्टींना अनुमोदन. अगदी मला जे लिहायचे होते तेच लिहिलेस जणू.
3 Oct 2010 - 7:45 am | मदनबाण
दोन्ही भाग आवडले, आता पुढील भागाची वाट पाहतोय... :)
3 Oct 2010 - 12:10 pm | सद्दाम हुसैन
अच्च्चा लिखा है उई अॅडी भाई!
4 Oct 2010 - 3:45 pm | धमाल मुलगा
मुंबईकरांनी मुंबईकरांसाठी चालवलेला खास मुंबईकर धागा!
चालू द्या!
-(स्वयंघोषित ,बाटगा,उपरा पुणेकर) ध.
(व्वा! काडी टाकून तर दिलीये, आता बघु का कसं पेटतंय...मस्त लांबून मज्जा बघत बसावं आपण..पुणेकर मुंबईकर झक्कपैकी डोकी फोडत बसा आता.)
4 Oct 2010 - 7:10 pm | निखिल देशपांडे
तुम्ही भांडुपला राहायचे ना????
4 Oct 2010 - 7:19 pm | कुंदन
पर लोकलनी प्रवास करायची हिम्मत नव्हती त्यांची.
कं च्या बसनी प्रवास करायचे ते नेहमी.
4 Oct 2010 - 7:34 pm | धमाल मुलगा
कोण त्या विचक्यात शिरेल च्यामारी!
त्यापेक्षा भांडूप-गोरेगाव रोज रिक्षानं गेलेलं परवडायचं. आणि तुम्हा लोकांसारखं हिंदाळुन गेलो नाही बरं का...
भांडूपातल्या निदान चार रिक्षावाल्या भैय्याना तरी नीट मराठीत बोलायला शिकवलं आणि भाग पाडलं.
4 Oct 2010 - 7:45 pm | सूड
एकदम मस्त !!
बदलापूर-अंधेरी-बदलापूर प्रवास करताना आमच्यासारख्यांना असेल नसेल तितका निर्ल्लजपणा पणास लावावा लागतो. त्यात बेस्टचे कंडक्टर लोक एक एक अर्क असतात. गाडीत कितीही गर्दी असो ह्यांचं 'पुढे चला' काही बंद होत नाही.
एकदा तर बसमध्ये एका माणसाने हाईट केली, म्हणजे त्याच्या हिमतीची दाद द्यायला हवी. स्त्रियांसाठी रिझर्व नसलेल्या सीट्वर एका मुलीला बसलेली बघून तिला त्याने सरळ सांगितलं 'उठो यहा से, फॉर लेडिज जो रिझर्व है वहा बैठो' (बहुतेक त्याला आधी कोणीतरी 'फक्त स्त्रियांसाठी' वाल्या सीट्वरुन उठवलं असावं )नंतर त्या दोघांत जे काय जुंपलं होतं. आणि एरवी तारसप्तकात ओरडणारे कंडक्टर महाशय त्या माणसालाच सौम्यपणे सांगत होते 'सोडा हो, कशाला भांडताय'. शेवटी बिचार्याला गप्प बसावं लागलं.
4 Oct 2010 - 9:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> बदलापूर-अंधेरी-बदलापूर <<
अरे बाप रे! माझा नवरा एकेकाळी, इंजिनियरींगची तीन वर्ष बदलापूर ते बेलापूर प्रवास करायचा; तेव्हा पहिली दोनेक वर्ष लोकल फक्त वाशीपर्यंतच होत्या. नंतर तुमच्यासारखाच (असंच तीनेक वर्ष) बदलापूर-अंधेरी-बदलापूर केलंन त्याने!
एकदा मुंबैबाहेर नोकरी मिळाल्यावर मुंबै आणि आसपासच्या भागात परत जायचं नाव काढलं तरी वाकडा चेहेरा करतो. म्हणजे अगदी सख्ख्या आईवडलांनी याला भेटायची इच्छा व्यक्त केली तरी त्यांनी इथे यायचं, हा अगदीच नाईलाजच असेल तरच घाटाखाली उतरणार!!
बाकी काही जागा (लोकलमधे डबे) आरक्षित असतात पण इतर जागा अनारक्षित असतात. कोणीही तिथे बसू शकतं.
5 Oct 2010 - 10:47 am | दत्ता काळे
मी १९७८-७९ ते १९८१-८२ ला डोंबिवलीला रहात होतो आणि नोकरीसाठी मुंबैला बॅक बे रिक्लेमेशनला जायचो त्यावेळी माझी दररोजची ठरलेली लोकल असायची सकाळची ९.०१ ची. डबलफास्ट. फक्त ठाणे, दादर थांबत असे. मी ती लोकल डाउन अप करून, म्हणजे ती लोकल प्लॅट. नं. १ वर ८.३२ची कल्याण म्हणून यायची, ती पकडून डोंबिवली-कल्याण ते व्ही.टी. असा प्रवास करत असे. त्या ८.३२च्या कल्याणलासुध्दा प्रचंड गर्दी असे. येताना संध्याकाळी मी ६.१७ ची अतीव गर्दीची कर्जत लोकल पकडंत असे ( ही लोकलपण डबलफास्ट ). त्यावेळी चौथी सिट मिळणेदेखील नशीबाचा भाग असे. त्यासाठी अनेक क्लृप्त्या कराव्या लागायच्या.
शरीर पिळवटून निघणं, आपोआप बाहेर फेकलं जाणं आणि उतरल्यावर घामांनी प्रचंड थबथबून जाणं- हे जसं भानामती झालेल्या माणसांच्या बाबतीत घडतं, तसाच अनुभव मुंबैत लोकलचा प्रवास केल्यावर मिळतो.
5 Oct 2010 - 11:13 am | शिल्पा ब
<<<शरीर पिळवटून निघणं, आपोआप बाहेर फेकलं जाणं आणि उतरल्यावर घामांनी प्रचंड थबथबून जाणं- हे जसं भानामती झालेल्या माणसांच्या बाबतीत घडतं, तसाच अनुभव मुंबैत लोकलचा प्रवास केल्यावर मिळतो.
=)) =))
7 Jun 2016 - 3:04 pm | पियू परी
शरीर पिळवटून निघणं, आपोआप बाहेर फेकलं जाणं आणि उतरल्यावर घामांनी प्रचंड थबथबून जाणं- हे जसं भानामती झालेल्या माणसांच्या बाबतीत घडतं, तसाच अनुभव मुंबैत लोकलचा प्रवास केल्यावर मिळतो.
>> =)
- अंबरनाथ ते मरीन लाईन्सची प्रवासी
24 Oct 2013 - 1:26 pm | प्रसाद गोडबोले
लईच भारी लेखन .
7 Jun 2016 - 11:39 am | शाम भागवत
येऊ द्या हाही धाग वरती.
श्रिया यांनी पहिल्या भागावर दिलेल्या चुकीच्या प्रतिसादाबद्दल
धन्यवाद.
7 Jun 2016 - 5:38 pm | पीसी
खुप मस्त
7 Jun 2016 - 8:22 pm | विवेकपटाईत
मस्त लेख. वाचल्या वर वाटते दिल्लीकर मुंबैकरांपेक्षा थोडे सभ्य आहेत. बहुतेक मेट्रोत लोक थोडे सभ्य रीतीने वागतात.
8 Jun 2016 - 2:09 pm | मारवा
पहीला- मोठे व्हा
दुसरा- पेर्ते व्हा
आता तुमचा तिसरा महान संदेश
निर्लज्ज व्हा
झकास
9 Jun 2016 - 11:21 am | शित्रेउमेश
(निर्लज्जपणे) पुढच्या भागाची वाट बघतोय....