तू येतोस ...

ढब्बू पैसा's picture
ढब्बू पैसा in जे न देखे रवी...
24 Sep 2010 - 2:29 pm

नमस्कार मंडळी,
मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न! गेलं एक वर्ष खूप वाचलंय इथे. लिहिण्याचं धाडस मात्र आज पहिल्यांदाच करतेय. थोडी धाकधुक आहेच.
जे लिहिलंय त्याला कविता किंवा मुक्तक काय म्हणायचं हे मलाही ठरवता येत नाही. ह्या कवितेला मला सुचली होती ती "इश्किया" चित्रपटानंतर. विद्या बालन ने साकारलेल्या कृष्णाने पार झपाटून टाकलं होतं मला!

तू येतोस ...
नको ना जाऊस असा
उन्हं यायच्या आधी
रात्रभर दिलेल्या खुणा पुसट होण्याआधी !
तू येतोस अन् सगळं विस्कटून जातोस
मी जपत बसते खुणा कित्येक रात्री
पलंगावर, देहावर अन् मनावरही !
सुरकुतली चादर तुझीच सय देते,
तू पुन्हा येईपर्यंत !
तू ओरबाडून घेतोस हवं ते सगळं
कधी गोंजारत मला सुखावून
कधी नकळत मला दुखावून !
मी तोंडातून ब्र ही काढत नाही
कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर !
तू अवचित येतोस वावटळी सारखा
मी पण गिरकी घेते तुझ्या भोव-यात !
तू निघून जातोस शांत झाल्यावर आणि
मी विखुरते पाचोळ्यागत !
मी म्हणते "घर बांधूयात ..."
तू मधाळ हसतोस काहीच न बोलता
तुझ्या हसण्यावर जीव ओवाळून टाकत,
मी तयार होते पुन्हा एका रात्रीसाठी
अन् त्यानंतर येणार्‍या रित्या दिवसासाठीही !

शृंगारकवितामुक्तक

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

24 Sep 2010 - 2:40 pm | राजेश घासकडवी

कविता आवडली.

फक्त एक ओळ थोडी खटकली...

कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर !

हे कारण न येता नुसतंच बाकीचं वर्णन आलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. या ओळीमुळे एक रिश्ते का इल्जाम येतो.

अवलिया's picture

24 Sep 2010 - 2:44 pm | अवलिया

चांगला प्रयत्न !

विनायक प्रभू's picture

24 Sep 2010 - 2:46 pm | विनायक प्रभू

छा न लिहिता हो तुम्ही

आवडली कविता.
मी तोंडातून ब्र ही काढत नाही
कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर !
हा प्रेम करणारीचा निर्णय ना? मग तो बोलून दाखवला की मजा गेली की त्याची :)

परिकथेतील राजकुमार's picture

24 Sep 2010 - 3:14 pm | परिकथेतील राजकुमार

हा प्रेम करणारीचा निर्णय ना? मग तो बोलून दाखवला की मजा गेली की त्याची

हेच म्हणतो.

बाकी आमचा नानबा म्हणतो तसा प्रयत्न चांगला आहे.

पैसा's picture

24 Sep 2010 - 8:35 pm | पैसा

डिट्टो!

गणेशा's picture

24 Sep 2010 - 3:27 pm | गणेशा

कविता आवडली

ढब्बू पैसा's picture

24 Sep 2010 - 5:51 pm | ढब्बू पैसा

ही कविता एक monologue आहे. म्हणून त्या ओळी आल्या आहेत. पण तरीही पुढच्या वेळी अधिक चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करेन.

छान आहे कविता ! आवडली :)
बाकी घासकडवी नि यशोधरेशी सहमत..

>> तुझ्या हसण्यावर जीव ओवाळून टाकत,
मी तयार होते पुन्हा एका रात्रीसाठी
अन् त्यानंतर येणार्‍या रित्या दिवसासाठीही ! >>

सुंदर!!

संदीप चित्रे's picture

25 Sep 2010 - 1:55 am | संदीप चित्रे

पाहिल्यावर ह्या कवितेतली ओळनओळ पटते !
ह्याशिवाय वेगळा प्रतिसाद काय देणार?

बेसनलाडू's picture

25 Sep 2010 - 1:57 am | बेसनलाडू

यशोधरा आणि राजेश यांच्याशी सहमत आहे.
(सहमत)बेसनलाडू