साध्याचे मीपा वर प्रकाशित झालेले काही लेख आणि अयोध्धेचा निकल ह्या पार्श्वभूमी वर सर्वधर्मसमभाव आजूबाजुला मला कुठे दिसतो ह्या साठी प्रपंच !
पहिला किस्सा
लग्ना नंतर आम्ही सध्या राहत असलेल्या घरी भाढ्याने रहवायस आलो. आमचा मजला म्हणजे एक छोटा भारत असावा , आम्ही हिंदू , समोरच घर मुस्लिम , शेजारी ख्रिचन जैन आणि अजुन एक हिंदू. अश्या एकदम कॉसमपलिटिन शेजार म्हणजे आम्हाला सॉलिड धाकधुक होती , खासकरून घरी येणारे सर्व पाहुणे समोरच फ्लॅट वरच मुस्लिम नाव पाहून नाक मुरडायचे.
त्यातून आम्हाला अस कळल की त्या घरातला करता माणुस ह्याचा बिल्डींग बांधकामाचा व्ययसाय आणि बर्यापैकी राजकीय वजन असलेला होता.
पण हळु हळु सर्वच कुटुंबांची जशी ओळख झाली आणि वाढली तसे सर्व संभ्रम दूर झाले , ईद ला खीर-कूर्मा (की शीर-कूर्मा) घरी , नातळला केक , कुकीज , ईस्टरला काही गोड-धोड , जैनांचे पर्युषण संपला की त्यांच गोड-धोड बाकी इतर प्रसंग पूजा , वाढदिवस वैइगरे दणक्यात सुरू झाले.
नंतर हे घर आणि शेजार एवढ आवडले की मालक ते विकायला तयार आहे हे कळल्यबरोबर विकत घेऊन टाकल.
ह्या वर्षी तर रमझान-ईद आणि गणेश-चतुर्थी एकाच दिवशी पुन्हा शीर-कूर्मा आणि मोदकन्ची देवाण घेवाण झाली.
सर्वधर्मसमभावाचा पहिला टप्पा पोटोबातुन जाउ शकतो याची खात्री झाली.
दुसरा किस्सा
आम्ही समस्त कुटुंब आई-बाबासकट मेंफिस(अमेरिका) इथे दोन वर्षांसाठी होतो , तेव्हा अर्थातच आमच्या बाप्पाच पण स्थलनन्तर झाले , दुसर्या वर्षी बाप्पा च आगमन झाल्या नंतर एका मुस्लिम बाईने आमच्या गुजू शेजर्याच्याकडून गणपती बाप्पाच्या दर्शनाला येउका म्हणून विचारणा केली , नसीम त्यांच नाव. आम्ही जास्त आडे-वेधे न घेता पटकन या सांगून दिल.
तर त्या बाईंनी येताना चक्क बदामी शिरा पसाद म्हणून आणला , आम्ही घेऊ की नाही याची खात्री नव्हती म्हणून अजुन एक फळांची मोठी बासकेट पण आणली.
नसीम आली तेंव्हा आम्ही काय बोलणार म्हणून एका-मेकांची तोंड बघताना त्यानीच बोलायला सुरूवात केली. ती म्हणाली मी लहान पणापासून सायन कोळी-वाड्यात वाढले गणपती आणि ईद आणि कोळी लग्न याना खूप मिस करते , इथे आल्या नंतर मंदिरात जाऊ की नाही याचा विचार करताना दहा वर्ष गेली पण आता तुमचा कडे गणपती बाप्पा आहे हे कळल्याननंतर राहवले नाही.
तिच्या इतर अनेक आठवणिनी नकळत हळवी झाली. ती गेल्या नंतर आम्ही सर्व जन बराच वेळ एकमेकाशी बोललो नाही शेवटी धर्म माणसांना जोडण्यासाठी असतो पण आपण सर्वच नेमक उल्ट करत राहतो.
असे अनेक प्रसंग आहेत पण त्यावर नंतर कधी तरी , मी-पा वरील जाणकारणी असे काही प्रसंग लिहिल्यास माझा लेखाचा उद्देश नक्कीच पूर्ण होईल.
प्रतिक्रिया
22 Sep 2010 - 4:44 pm | कुक
असेच शेजारी सरवाना लाभो
22 Sep 2010 - 4:47 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
मस्त!
22 Sep 2010 - 4:50 pm | निवेदिता-ताई
अगदी नविन घडलेला किस्सा.....
आमची कन्या शिक्षणासाठी बाहेरगावी आहे, आत्ता गणपतिची आठ दिवस सुट्टी मिळालि,
आणी काय सागू , आमच्या घरात तिच्या मित्रमंडळाची ये - जा सुरु झाली,त्यात तिच्या काही मुस्लिम मैत्रिणी पण आहेत , त्यांनी ही ईद ला न्हवती म्हणून खास हिच्यासाठीच शिर-खुर्मा करुन आणला.
आम्हीही तो आवडीने खाल्ला.
आमच्या इथे जवळच पिर मंदिर आहे, दरवर्षी त्याच मंदिरात गणपतिही बसवला जातो.
आहे की नाही सर्वधर्म समभावाचे उत्तम उदाहरण.
22 Sep 2010 - 9:07 pm | माझीही शॅम्पेन
छान किस्सा ! :)
22 Sep 2010 - 6:07 pm | गणेशा
धर्म माणसांना जोडण्यासाठी असतो पण आपण सर्वच नेमक उल्ट करत राहतो.
बरोबर एकदम ..
22 Sep 2010 - 9:09 pm | पैसा
+१
22 Sep 2010 - 9:53 pm | बाबा योगीराज
एकदम १०० न॑. सत्य आहे................
गणपती बाप्पा................मोरया
पुढ्च्या वर्शी..................लवकर या
दर वर्शी आम्हि सर्व मित्र आपापल्या बायकोला सोबत घेउन माजीद्च्या (आमचा एक मुस्लीम मित्र) घरी जेवायला जातो..................त्याच्या घरचे सुद्धा दिवाळीत आमच्या येथे पुरण-पोळी खाण्या साठी येतात...........सर्वधर्मसमभावाचा पहिला टप्पा पोटोबातुन जातोच जातो..................!!!
आमच्या मित्रम्॑डळात ०१ मुस्लीम, ०१ ब्राम्हण, ०१ चा॑भार, ०२ छ्त्रपती आहेत्.................आम्हास कधिच काही त्रास झाला नाही............
____________________________
23 Sep 2010 - 4:07 am | शहराजाद
तुमच्याप्रमाणे सर्वांना असा खेळीमेळीचा शेजार लाभो.
23 Sep 2010 - 5:07 am | बेसनलाडू
(शुभेच्छुक)बेसनलाडू
23 Sep 2010 - 5:59 am | विश्वनाथ मेहेंदळे
@माझीही शॅम्पेन
छान अनुभव. वाचून बरे वाटले.
@बेला
तथास्तु म्हणाला असतात तर जास्त बरे वाटले असते. (मराठी स्थळ आहे म्हणून हो, बाकी काही नाही)
23 Sep 2010 - 6:12 am | बेसनलाडू
तुमची कामना पूर्ण होवो असे म्हणालो असतो कदाचित. तथास्तु हे संस्कृत आहे ना ;)
(खोचक)बेसनलाडू
23 Sep 2010 - 12:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे
शब्दाचे मूळ संस्कृत असले तरी हा शब्द वापरला जातो मराठीत. त्यामुळे त्याला मराठी शब्द म्हणायला हरकत नाही.
आणि मराठी नाही असे गृहीत धरले तरी आमेन पेक्षा तथास्तु मराठीला जवळच ना?
(मुद्देसूद) वि. मे.
कामना हा शब्द संस्कृत की मराठी ??
(छिद्रान्वेशी) वि. मे.