दोघे-२

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
21 Sep 2010 - 3:20 pm

आता किती वेळ थांबायचेय?
भुक लागली आहे का?
तसेच काही नाही. पण उगाच खोळंबा कशाला.
सवय. सर्व डॉक्युमेंटस क्लियर असुन सुद्धा २ महीने रखडवायचो मी पार्टीला.
ओके. आता सुद्धा २ महीने?
नाय नाय फार तर अर्धा तास.
इतर जण पण वाट बघताहेत.
ते गेले ढगात. तशी क्वालीटी काही चांगली वाटत नाही.
आता इथे हीच क्वालीटी. तु बासमती वाला वाट्टे?
नाही रे. कोलम, नाही तर आंबे मोहर.
बाकी तुझी केस सुटली का?
नाही रे. डेटा करप्ट झाल्यामुळे १५ दिवस उशीर होणार आहे. मधे संप असल्यामुळे थोडासा बॅकलॉग आहे असे मंडळी म्हणताहेत.
तुझे काय?
ऑडिट मधे अडकलोय. हायर अथॉरीटी कडे आहे फाईल. बहुतेक लेवल ५ किंवा लेवल १.
तो पर्यंत कुठे?
घरीच.
तुझे काय?
मी मल्टीप्लेक्स मधे. फुकटची करमणुक सोडा कशाला? तु पण ये.
नको. घरी माहीत नसलेले बरेच काही कळतेय.
म्हणजे?
छोटा २४ तासात मोठ्याकडे भांडला. डबल बेनिफिट मधला ५०% पाहीजे म्हणुन. खुप लाडाचा माझा तो. तसा मोठा पण हलकट. सहा वर्षाच्या प्रिमियम वर २०० % अ‍ॅप्रिसियेशन. ट्रेन अ‍ॅक्सीडेंट म्हणुन भरपाई वेगळी . साला बायकोची काळजी वाटते. म्हणुनच तीला बघुन घेईन चे वचन दिल्याशिवाय पिंडाला शिवणार नाही.
अरे, पंधरा मिनिटात दर्भाचा करतील. भट डामरट दिसतोय. अर्ध्या तासात विधी आटोपले. पुढची अपॉइंटमेंट असणार.
तुझे काय?
आपण तर आपली सर्व जिंदगी मस्त जगलो. सर्व ठि़काणी बायको नॉमिनी. झक मारत सांभाळतील. तशी पोरगी वाट्याला येणार नाही. पण तिची व्यवस्था आधीच करुन ठेवली आहे. आता इथे काय ते बघु. स्वर्ग लेवल ५ मिळेल सारखे वाटते आहे.
तुला?
मला पण स्वर्ग लेवल ५ किंवा नरक लेवल १. लेवल पाच पण चालेल. फक्त पॉवर शॉर्टेज मधे एसी नसतो. लेवल १ वाल्यांना फ्रंट रो ची तिकीटे मिळतात कार्यक्रमाची. सर्व सुविधा २४ तास. अगदी ३ डायमेन्शनल डीश टीवी. पण लेवल १ वर संख्या रोडावत चालली आहे असे म्हणत होता क्लार्क. म्हणुन ऑक्युपन्सी अ‍ॅड्जेस्ट करायला कधी कधी नरक लेवल १ वाले घेतात.
करु काही तरी मांडवली. मी क्लार्क बरोबर फिल्डींग लावतो. दोन चार राड्याच्या एंट्र्या काढुन टाकायला लावले की झाले.
थॅक्स.
अरे थॅक्स कसले त्यात. आपला नेहेमीचा धंदा. चल आता उशीर करु नको. मला ३ च्या शो ला जायचे आहे. टोच पींडाला आणि हो मोकळा.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

21 Sep 2010 - 3:36 pm | अवलिया

काव काव

सहज's picture

21 Sep 2010 - 4:12 pm | सहज

क्लिष्ट आहे लेख.

असो.

विनायक प्रभू's picture

21 Sep 2010 - 4:18 pm | विनायक प्रभू

उगाचच हां
साधे सरळ आहे.

अवलिया's picture

21 Sep 2010 - 4:21 pm | अवलिया

समजायला हवं

सूड's picture

21 Sep 2010 - 4:26 pm | सूड

>>तो पर्यंत कुठे?
घरीच.

हे काही कळलं नाही बुवा !!

विनायक प्रभू's picture

21 Sep 2010 - 4:33 pm | विनायक प्रभू

फोटो जवळ घुट्मळत.
१२ व्या पर्यंत.
दुध आणि पाणी पीत.

हर्षद आनंदी's picture

21 Sep 2010 - 4:37 pm | हर्षद आनंदी

काय लिवलय...
आत्मे कावळ्याच्या रुपात :- परंपरा
स्वर्ग \ नरक जागांसाठी अप्लिकेशन :- काळाचा महिमा

बाकी तुझी केस सुटली का?
नाही रे. बाकी तुझी केस सुटली का?
नाही रे. डेटा करप्ट झाल्यामुळे १५ दिवस उशीर होणार आहे. मधे संप असल्यामुळे थोडासा बॅकलॉग आहे असे मंडळी म्हणताहेत.
तुझे काय?
ऑडिट मधे अडकलोय. हायर अथॉरीटी कडे आहे फाईल. बहुतेक लेवल ५ किंवा लेवल १.
:D :D :D :D :D

नुसत्या छकड्या मारल्यात...

करु काही तरी मांडवली. मी क्लार्क बरोबर फिल्डींग लावतो. दोन चार राड्याच्या एंट्र्या काढुन टाकायला लावले की झाले.
हा कळस.. (चित्रगुप्ताला घाम फुटला असेल)

रेवती's picture

21 Sep 2010 - 4:44 pm | रेवती

हा हा!
कल्पना छानच!
चक्क प्रभूसरांची गोष्ट समजली.
एक शंका आहे. नवरे आपापल्या बायकोबद्दल असे मित्राजवळ बोलत असतील का?

विनायक प्रभू's picture

21 Sep 2010 - 4:47 pm | विनायक प्रभू

शंका आहे तुम्हाला तै?
बोलतातच. अगदी डीटेल मधे.
न बोलला तो नवरा नाही.
आणि न बोलली ती बायको नाही.

अग्ग्ग्ग!
रंगा असं बोललेला ठाउक नाही हो!
मीही मैत्रिणींच्या गराड्यात तिखटमीठ लावून काही सांगितलय असं आठवत नाही.
आता आली का पंचाईत?;)

प्रीत-मोहर's picture

21 Sep 2010 - 4:59 pm | प्रीत-मोहर

कल्पना आवल्डी

भडकमकर मास्तर's picture

21 Sep 2010 - 5:19 pm | भडकमकर मास्तर

मस्त ...
लेखन कावडले आपलं आवडले

परवा जसा पोलार्डने डोक्या वरुन जाणारा बाउंसर पार मैदाना बाहेर भिरकावला ना तसा शेवट्च्या क्षणी गुथ्था उलगडला.
अन्यथा मास्तर नेहमी क्रिप्टिक बाउंसर टाकुन टाकुन डोकी फोडतात ना तसा आज पण कपाळमोक्ष जवळ जवळ निश्चित होता ;)

गणेशा's picture

22 Sep 2010 - 1:46 pm | गणेशा

मस्त लिहले आहे

सुनील's picture

22 Sep 2010 - 3:22 pm | सुनील

छान.

अवांतर - जयवंत दळवी यांची अशाच कल्पनेवर आधारीत (कावळारुपी आत्मे एकमेकांशी संवाद करतात) एक झक्कास कथा आहे. पैकी एक दुसर्‍याला विचारतो , "ज्ञानेश्वर माऊली कुठेशी असतात". "ते आजकाल इथे येत नाहीत. मागे एक मराठीचे प्राध्यापक आले होते. त्यांनी ज्ञानेश्वरांनाच ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगायला सुरुवात केली. तो अर्थ ऐकून जे पळाले ते इथे परत आलेच नाहीत!"

बेसनलाडू's picture

23 Sep 2010 - 5:09 am | बेसनलाडू

(श्रोता)बेसनलाडू

समयोचीत लेख.