दोघे-२
आता किती वेळ थांबायचेय?
भुक लागली आहे का?
तसेच काही नाही. पण उगाच खोळंबा कशाला.
सवय. सर्व डॉक्युमेंटस क्लियर असुन सुद्धा २ महीने रखडवायचो मी पार्टीला.
ओके. आता सुद्धा २ महीने?
नाय नाय फार तर अर्धा तास.
इतर जण पण वाट बघताहेत.
ते गेले ढगात. तशी क्वालीटी काही चांगली वाटत नाही.
आता इथे हीच क्वालीटी. तु बासमती वाला वाट्टे?
नाही रे. कोलम, नाही तर आंबे मोहर.
बाकी तुझी केस सुटली का?
नाही रे. डेटा करप्ट झाल्यामुळे १५ दिवस उशीर होणार आहे. मधे संप असल्यामुळे थोडासा बॅकलॉग आहे असे मंडळी म्हणताहेत.
तुझे काय?
ऑडिट मधे अडकलोय. हायर अथॉरीटी कडे आहे फाईल. बहुतेक लेवल ५ किंवा लेवल १.
तो पर्यंत कुठे?
घरीच.
तुझे काय?
मी मल्टीप्लेक्स मधे. फुकटची करमणुक सोडा कशाला? तु पण ये.
नको. घरी माहीत नसलेले बरेच काही कळतेय.
म्हणजे?
छोटा २४ तासात मोठ्याकडे भांडला. डबल बेनिफिट मधला ५०% पाहीजे म्हणुन. खुप लाडाचा माझा तो. तसा मोठा पण हलकट. सहा वर्षाच्या प्रिमियम वर २०० % अॅप्रिसियेशन. ट्रेन अॅक्सीडेंट म्हणुन भरपाई वेगळी . साला बायकोची काळजी वाटते. म्हणुनच तीला बघुन घेईन चे वचन दिल्याशिवाय पिंडाला शिवणार नाही.
अरे, पंधरा मिनिटात दर्भाचा करतील. भट डामरट दिसतोय. अर्ध्या तासात विधी आटोपले. पुढची अपॉइंटमेंट असणार.
तुझे काय?
आपण तर आपली सर्व जिंदगी मस्त जगलो. सर्व ठि़काणी बायको नॉमिनी. झक मारत सांभाळतील. तशी पोरगी वाट्याला येणार नाही. पण तिची व्यवस्था आधीच करुन ठेवली आहे. आता इथे काय ते बघु. स्वर्ग लेवल ५ मिळेल सारखे वाटते आहे.
तुला?
मला पण स्वर्ग लेवल ५ किंवा नरक लेवल १. लेवल पाच पण चालेल. फक्त पॉवर शॉर्टेज मधे एसी नसतो. लेवल १ वाल्यांना फ्रंट रो ची तिकीटे मिळतात कार्यक्रमाची. सर्व सुविधा २४ तास. अगदी ३ डायमेन्शनल डीश टीवी. पण लेवल १ वर संख्या रोडावत चालली आहे असे म्हणत होता क्लार्क. म्हणुन ऑक्युपन्सी अॅड्जेस्ट करायला कधी कधी नरक लेवल १ वाले घेतात.
करु काही तरी मांडवली. मी क्लार्क बरोबर फिल्डींग लावतो. दोन चार राड्याच्या एंट्र्या काढुन टाकायला लावले की झाले.
थॅक्स.
अरे थॅक्स कसले त्यात. आपला नेहेमीचा धंदा. चल आता उशीर करु नको. मला ३ च्या शो ला जायचे आहे. टोच पींडाला आणि हो मोकळा.
प्रतिक्रिया
काव काव
क्लिष्ट
उगाचच
समजायला हवं
काही कळलं नाही
फोटो
मस्त आहे
हा हा! कल्पना छानच! चक्क
शंका
अग्ग्ग्ग! रंगा असं बोललेला
कल्पना आवल्डी
मस्त ... लेखन कावडले आपलं
परवा जसा पोलार्डने डोक्या
छान
मस्त कल्पना
काकसंवाद आवडला
या पंधरवड्याच्या सुरुवातीचा