डिस्क्लेमरः कोणे एके काळी मी डायरी लिहायचे, सुमारे १० वर्षांपुर्वी..म्हणजे मी कॉलेजला असतानाच्या काळात, आणि मग ती अधून मधून चाळायचे पण!
हा उतारा त्यातून घेतालाय्...अगदी तारखेसकट.
ही माझी तेव्हाचीमते आहेत, आत्ता वाचले तर कदाचित वेगळे पण मत बनू शकेल. माहीत नाही.
मी पहिल्यांदा जेव्हा ही एन्ट्री ब्लॉगवर टाकली, तेव्हा मला ब-याच लोकांनी "नेमाडे हे फार मोठे लेखक आहेत..तुला त्यांचे लेखन झेपत नाहीये म्हणजे तुझा प्रॉब्लेम आहे", "तुझी बौद्धिक पातळी कशी टिपिकल मध्यमवर्गीय आहे, मग तुला व्.पु., अवचट असे टिपिकल लोकांचे लेखनच आवडत असेल" इ. इ. प्रतिक्रिया दिल्या.
मी म्हणते..असतील नेमाडे कुणी लय भारी लेखक... म्हणून त्यांचे सगळे लेखन भारी असेल असा नियम आहे का? मी वाचक आहे..आणि मला जे लिखाण भिकार वाटले त्याला भिकार म्हणायचे मला पूर्ण स्वातंत्र्य आहे मग कुणी का लिहीना!
राहता राहीले, व.पु. आणि अवचट्...वेल मला आवडते त्यांचे लिखाण...आणि मला त्याचा अभिमान आहे.. तुम्हाला ते मध्यमवर्गीय वाटतेय याच्याशी मला काही देणे घेणे नाही.
------------------------------------------------------------
१३-oct-२००१
आज भालचंद्र नेमाडे नावाच्या कोणातरी लेखकाचे ’कोसला’ वाचून पूर्ण केले. तशी सुरवात कालच केली होती, काल बरं वाटलं पण आज पूर्ण केल्यावर ’अतिशय फुटकळ’ या सदरात मी त्याची गणना केली. कथेला काहीतरी चांगला शेवट किंवा काय म्हणतात ते..’कथाबीज’ असावं. आयुष्यभर काही न करता बापाच्या पैश्यावर मजा करणारा माणूस...ज्याच्या आयुष्यात फारसं महत्वाचं किंवा वेगळं काही घडत नाही अशा माणसाची..दररोजचे फालतु तपशील असलेली डायरी..काय वाचायची गोष्ट आहे?
खरंच ही असली पुस्तकं लोक का लिहीतात? आणि छापणारे का छापतात? त्यातलं मुख्य पात्र जसं भंकस विचार करून वेळ घालवतं तसंच आपणपण ब-याच वेळेला करतो असं मात्र माझ्या लक्षात आलं. म्हणजे पुस्तक वाचल्यावर मला तो माणूस...म्हणजे कथानायक भंकस आणि थोडा सायकिक वाटला. उद्या माझी डायरी वाचून पण कोणी असाच निष्कर्ष काढेल का?
खरंच मला असं ब-याच वेळेला असं वाटतं की मी वेडेपणा आणि शहाणपणा यांच्या फार बारीक सीमारेषेवर आहे. जरा धक्का द्या..एका साईडला मी नक्कीच पडेन..आणि ते ही वेडेपणाच्या..असं मला नेहमी वाटतं. मी एकटी असताना कित्येक वेळेला असंबद्ध आणि वेडगळ, विकृत वाटतील असे काहीतरी विचार करत राह्ते.खरंच मला हे टाळण्यासाठी माणसांच्या संगतीत जास्त राहीलं पाहिजे..पण घडतं नेमकं उलटं!..मला पुस्तकं, टी.व्ही, कॉम्प्युटर यांचीच संगत जास्त आवडते. चार माणसं जमली की ती या खोलीत तर मी माझ्या पुस्तकासकट दुस-या खोलीत..हे कायम घडतं.
सगळी अतिबुद्धीमान माणसं थोडीशी वेडसर असतात असं म्हणतात.मी अभ्यासात नंबर वन नसले तरी चांगली आहे, ज्याला चौफेर/चौकस म्हणतात तशी पण आहे मग माझे काही वेळेसचे असंबद्ध विचार हे असेच अतिबुद्धीमान लोकांचा वेडसरपणा या सदराखाली मोडत असतील का? बघा....मी जी पुस्तकं वाचते..तसे माझे विचार असतात आणि असं काहीतरी फालतू वाचलं आहे ना...मग आज माझे विचार पण तसेच असणार...ते सगळं खरडत बसण्यापेक्षा झोपावं हे बरं!!!
प्रतिक्रिया
12 Sep 2010 - 2:40 pm | बिपिन कार्यकर्ते
बाब्बौ!!!
12 Sep 2010 - 8:09 pm | प्रदीप
झाली माझी.
पहिले छूटच व. पु. आणी अवचट ह्यांना एकाच माळेत बसवून झाले, नंतर मग नेमाडे फुटकळ वगैरे झाले.
13 Sep 2010 - 9:40 am | सविता
अहो व.पु. आणि अवचट यांना मी नाही एका माळेत बसवलं. मला प्रतिक्रिया देणा-याने बसवले... मी त्याचा उल्लेख केला इतकंच!!!
12 Sep 2010 - 2:43 pm | दत्ता काळे
'बाब्बौ'शी सहमत
12 Sep 2010 - 3:14 pm | विलासराव
मी म्हणते..असतील नेमाडे कुणी लय भारी लेखक... म्हणून त्यांचे सगळे लेखन भारी असेल असा नियम आहे का?
मलाही वाटत नाही असा काही नियम असावा.
मी वाचक आहे..आणि मला जे लिखाण भिकार वाटले त्याला भिकार म्हणायचे मला पूर्ण स्वातंत्र्य आहे मग कुणी का लिहीना!
सहमत.
12 Sep 2010 - 3:27 pm | मितान
छानंय डायरीचं पान :)
12 Sep 2010 - 3:57 pm | शानबा५१२
आता 'प्रयोजन का?' म्हणुन विचारणारे कुठे आहेत?
माझ्यावेळी सर्वांना बोलावस वाटत.
13 Sep 2010 - 10:00 am | सविता
व.पु. च्या लेखनाला मध्यमवर्गीय संकुचित म्हणणा-या ... जे अनाकलनीय ते भारी म्हणणा-या लोकांसारखेच या प्रतिसादाला फाट्यावर मारण्यात आले आहे.
अवांतर : तुमचा तो अंडा बिर्याणी,शेठ वाला लेख आवडला.... सुरवातीच्या खजूर, स्त्रिया इ. बद्दलच्या काही "डेस्परेट" ओळी सोडता. त्या वेळी लॉगिन नव्हते त्यामुळे तिकडे प्रतिसाद द्यायचा राहून गेला!!
15 Sep 2010 - 10:51 pm | शानबा५१२
पहील्यांदा आपण माझी प्रतिक्रीया स्वःताला का लावुन घेतेलीत??????????????????????????
मी मला जे माझ्या लेखांवर विचारतात त्यांना विचारल होत.लेख आपला आहे,मला त्यात काहीच उद्देश नाही दीसला म्हणुन तस लिहल.आपण आमच्या प्रतिसादास कशेही व काहीही करु शकता.आपण खवमधे जे लिहलत म्हणुन मी हा प्रतिसाद लिहला नव्हता,तसले विचार मी ठेवत नाही.
now something serious,
१.मी रोज खजुर खातो कारण मला लोहाची कमतरता होती/आहे.
२.I had a gorgeous,well-mannered,highly educated girlfriend,I left her just because she was not hindu!
desperate??????????????
To hell with that all beauties man!!!
12 Sep 2010 - 4:22 pm | चिंतामणी
आज भालचंद्र नेमाडे नावाच्या कोणातरी लेखकाचे ’कोसला’ वाचून पूर्ण केले. तशी सुरवात कालच केली होती, काल बरं वाटलं पण आज पूर्ण केल्यावर ’अतिशय फुटकळ’ या सदरात मी त्याची गणना केली.
परखड आणि स्पष्ट मत बघुन अमंळ भावुक झालो.
12 Sep 2010 - 7:55 pm | अप्पा जोगळेकर
स्वतंत्र बुद्धीने वेगळ्या धाटणीचा विचार करणे ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे जी तुम्ही करता असं वाटतंय. जे रुढ आहे ते योग्य असेलच असे नाही आणि जे योग्य आहे ते रुढ नाहीच असेही मानण्याचे कारण नाही.
सगळी अतिबुद्धीमान माणसं थोडीशी वेडसर असतात असं म्हणतात.मी अभ्यासात नंबर वन नसले तरी चांगली आहे,
तुम्ही खरोखर खूप बुद्धिमान आहात असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटत असेल तर तसं सरळ लिहा. कोणी तुम्हाला आडकाठी करणार नाही. असे नथीतून तीर मारण्याचे कारण कळले नाही.
चार माणसं जमली की ती या खोलीत तर मी माझ्या पुस्तकासकट दुस-या खोलीत..हे कायम घडतं.
तर्हेवाईकपणा.
12 Sep 2010 - 8:51 pm | शानबा५१२
अप्पा रे अप्पा, खर बोललास हो!!
बाकी खर कडु असते व तिखट पण असते हे दाखवलस.
कमालीचा फटकळ आहेस की रे बबन्या
13 Sep 2010 - 9:54 am | सविता
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद......
नथीतून तीर मारला नाही.... आपण काय आहोत याबद्दल वयाच्या १८-१९ व्या वर्षी ला केलेले चिंतन आहे.
आणि मी बुद्धीमान तर आहेच यात मला संशय नाही :) ..पण माझ्यापेक्षा खूप बुद्धीमान खूप माणसे पण पाहिली आहेत त्यामुळे "मी लय भारी..माझ्यासारखे कुणी नाही" असे स्वतःबद्दल मत बनवलेले नाही.
12 Sep 2010 - 8:19 pm | यशवंतकुलकर्णी
जोपर्यंत तुम्ही स्वत: बद्दल कायम वेडेपणाचा संशय घेत राहात नाही तोपर्यंत सबकुछ ओके !
सीमारेषा वगैरे झूठ.
आणि नेमाडे भिकार लेखक आहेत/भिकार लिहीतात याबद्दल सहमत!
12 Sep 2010 - 8:27 pm | चतुरंग
त्यामुळे मला त्यांच्या पुस्तकाबद्दल/लिखाणाबद्दल मतप्रदर्शन करता येणार नाही. आमचा पास! :)
(दुबळा वाचक)चतुरंग
12 Sep 2010 - 8:50 pm | प्राजु
हेच म्हणते..
मीही नेमाडेंचे एकही पुस्तक वाचलेले नाहिये. माझाही पास!!
13 Sep 2010 - 12:19 am | मी-सौरभ
शाळेत असताना त्यांच्या 'कोसला' मधलाच काहीतरी भाग धडा म्हणून होता :(
तो वाचून एवढा धडा घेतला की परत ह्या माणसाच्या पुस्तकाल हात लावायचा नाही :)
13 Sep 2010 - 12:32 pm | मृत्युन्जय
हुश्श. कोसला वाचली नसल्याबद्दल वाटणारा अपराधीपणा थोडा कमी झाला आज. असे नेहेमी वाटायचे की अश्या काही अजरामर कलाकृती आपण वाचत नाही आणि स्वत:ला वाचनप्रेमी म्हणुन कसे काय घेउ शकतो. पण आज मनावरचे दडपण कमी झाले. माझ्यासारखे बरेच लोक आहेत हे पाहुन बरे वाटले.
बाकी एवढेच म्हणेन की एवढ्या सगळ्या लोकांनी डोक्यावर घेतलेली कादंबरी अगदीच फुटकळ नसेल. कुछ तो बात होगी. कदाचित धागाप्रवर्तिकेला आवडली नसेल ही गोष्ट वेगळी. पण म्हणुन एकदम फुटकळ?
मलाही नारायण सुर्व्यांच्या कविता फारश्या आवडत नाहीत. काही डोक्यावरुन जातात आणि काही डोक्यात. पण म्हणुन सुर्व्यांना फुटकळ म्हणावे का? आणि तश्याही कवी ग्रेसांच्या तरी सगळ्या कविता कुठे पुर्णपणे झेपल्या आहेत.
अवांतर: ग्रेसांचा उल्लेख खटकला असेल तर कृपया "वस्त्रांत द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता" या ओळीचा अर्थ समजावुन द्या. (आणि नसेल खटकला तरी कृपया माहिती असेल तर समजावुन द्या) :)
13 Sep 2010 - 12:33 pm | अन्या दातार
शाळेत असताना तो कोसलामधला धडा वाचल्यावर कोसला हातात घ्यायची इच्छा झाली नाही. त्यामुळे नेमाड्यांचे एकही पुस्तक वाचले नाही. माझाही पास! :)
15 Sep 2010 - 10:55 pm | प्रियाली
मीही नेमाड्यांचे पुस्तक वाचलेले नाही. एवढेच काय मी पुलंचीही बरीच पुस्तके वाचलेली नाहीत. ;)
16 Sep 2010 - 10:05 am | विसोबा खेचर
हरकत नाही.. फक्त गणगोत आणि व्यक्ति आणि वल्ली मात्र अवश्य वाच इतकाच सल्ला.. :)
(गजाखोत प्रेमी) तात्या.
12 Sep 2010 - 8:32 pm | अडगळ
(नेमाडपंथी देवळाबाहेर फुटाणे विकणारा ) अडगळ
13 Sep 2010 - 7:56 am | नीधप
व.पु. आणि अवचट ( नक्की कोणते अनिल की सुभाष?) एकाच ओळीत, एकाच कप्प्यात टाकून तुम्ही तुमच्या अमाप विद्वत्तेची साक्षच दिलीत की.
सॉलिड परखड मतं हो...
कोसला मला खूप आवडलेले नाही पण ते आलं तेव्हाचा काळ बघता कोसला महत्वाचं, माईलस्टोन म्हणावं असं पुस्तक आहे याबद्दल मला शंका नाही. नेमाड्यांचं बाकीचं थोडंसंच वाचलंय आणि नक्कीच आदर आहे. आणि काही झालं तरी समृद्ध अडगळ वाचणारच आहे.
13 Sep 2010 - 9:48 am | सविता
नेमाडे नक्कीच मोठे लेखक असतील... पण मला वयाच्या अठराव्या वर्षी त्यांचे लेखन झेपले नाही.
असो.... कोणाला मी विद्वान किंवा उथळ, ढ किंवा अजून काही वाटले म्हणुन मी अनुक्रमे फुशरून गेले, मी तशी नाही याचे पुरावे देत बसले, निराश झाले तर मग माझे काय होईल?
तुम्हाला माझी विद्वत्ता(?) अमाप वाटते...तर वाटू दे बापडी!!!!
13 Sep 2010 - 9:57 am | नगरीनिरंजन
>>कोसला मला खूप आवडलेले नाही पण ते आलं तेव्हाचा काळ बघता कोसला महत्वाचं, माईलस्टोन म्हणावं असं पुस्तक आहे
सध्याचा काळ बघता आणखी काही तरी (सध्याच्या परिमाणाने) विचित्र लिहून भविष्यकाळात 'माईलस्टोन म्हणावं असं' मानले जाणारे पुस्तक लिहून ठेवावे असा माझा विचार चालला आहे. ;-)
(फेसबुकावरचे स्टेटस अपडेट्स संकलित करून लिहील्यास भविष्यात त्याला सद्यस्थितीचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारा महान ग्रंथ अशी विद्वज्जनांची मान्यता मिळण्याची शक्यता आहे असं मला वाटतं ).
13 Sep 2010 - 11:18 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे रे नगरी. :) असे करून अनेक वेगवेगळ्या परिस्थितींवर भाष्य करता येईल आपल्याला. वेगवेगळ्या लोकांचे ट्वीट गोळा करूनही हे करता येईल. आताच सुचलेला विषय : ट्विटरवरील युद्धे.
13 Sep 2010 - 12:21 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या दोन ओळींचा अर्थ समजला आणि पुढचे वाचणे बंद केले.
13 Sep 2010 - 2:30 pm | सविता
निरीक्षण फारच आवडले बुवा......
मी पण या दोन ओळी बरोबर अशा कधी वाचल्या नव्हत्या!!! :)
15 Sep 2010 - 12:08 pm | चिगो
कित्ती कित्ती बरं वाटतंय म्हणून सांगु ? मला थेंबभर, कणभर, नखाएवढीही न आवडलेली कादंबरी म्हणजे "कोसला"... मी वारंवार त्यावर मतप्रदर्शन केलंच आहे.. इथे रिपीट करतो. माझ्यामते कोसला म्हणजे "ढकोसला".. नुस्ती हुल आहे.
16 Sep 2010 - 9:43 am | आजानुकर्ण
तुम्ही दुणियादारी वगैरे शुशी वाचा.
17 Sep 2010 - 10:07 pm | चिगो
ठीक.. तुम्ही उदाहरणार्थ म्हणजे वगैरे काहीतरी लिहीलेलं वाचत रहा..
15 Sep 2010 - 12:30 pm | जिप्सी
कलावंत आणि संशोधक यांच्यात संशोधक जास्त सुखी कारण त्याचं म्हणणं जर आपल्याला कळलं नाही तर लोक आपली बुद्धी कमी आहे म्हणून गप्प बसतात्,पण कलावंताच अस नाही जर त्याची एखादी गोष्ट जर आपल्याला कळाली नाही तर आपण लोक त्याला भिकार ठरवून मोकळे होतात असं व्यंकटेश माडगुळकर म्हणतात.
(कोसलाप्रेमी)जिप्सी
15 Sep 2010 - 12:40 pm | नीधप
कलावंताच अस नाही जर त्याची एखादी गोष्ट जर आपल्याला कळाली नाही तर आपण लोक त्याला भिकार ठरवून मोकळे होतात<<<
हे १००% पटलं. :)
16 Sep 2010 - 12:22 pm | मितान
१०० % सहमत !
15 Sep 2010 - 3:58 pm | अमोल मेंढे
पुस्तकाचे पैसे वाचले...हॅहॅहॅ
15 Sep 2010 - 6:50 pm | ऋषिकेश
कोसला मला आवडली असली तरी तुमच्या भावना मी समजु शकतो. मला जी.ए. फारसे आवडत नाहीत म्हटल्यावर मंडळी अशीच धावून येतात ;)
बाकी माझ्या स्वाक्षरीत खास पुस्तकप्रेमींसाठी असलेल्या साईटची युआरएल आहे. तिथेही तुमच्या विविध पुस्तकांच्या मताबद्दल वाचायला आवडेल
16 Sep 2010 - 9:39 am | सविता
अगदी खरं..... मला पण जी.ए. च्या ब-याच कथा बाउन्सर जातात त्यामुळे मी लांब राहते त्यापासून!!!
15 Sep 2010 - 7:26 pm | धमाल मुलगा
लै लै ऐकुन उदाहरणार्थ फार थोर वगैरे म्हणुन पदरमोड करुन घेतलं होतं पुस्तक.
वाचुन संपल्यावर आम्ही स्वतःलाच 'कोसला'. काही काही उतारे चांगले आहेत,पण टोट्टलमध्ये आपल्याला सालं भंकस वाटलं.
आनंद झाला, सोबत आणखी कोणी आहे हे पाहुन.
15 Sep 2010 - 7:57 pm | विसोबा खेचर
माझाही पास! :)
मी नेमाड्यांचं कुठलंच लेखन वाचलेलं नाही, आणि बहुधा नेमाड्यांनीही माझं कुठलंच लेखन वाचलेलं नाही! :)
आपल्या वासरीचं पान बाकी आवडलं.. अजूनही येऊ द्यात अशीच काही पानं..
तात्या.
15 Sep 2010 - 8:01 pm | विसोबा खेचर
अवांतर - नेमाड्यांच्या मिश्या मात्र मला फार आवडतात! :)
आपला,
बोका नेमाडे.
15 Sep 2010 - 8:07 pm | जिप्सी
कोसलाच्या सुरुवातीला अर्पणपत्रिकेतच नेमाडे म्हणतात, शंभरातील नव्याण्णवास !. त्यातलेच आम्ही त्यामुळे आम्हाला आवडलं. बाकी अपवादातले एवढे सगळे एकदम भेटल्याचा आनंद झाला.
अवांतर :- माझी आई मी लहान असताना मला नेहमी सांगायची की,कुठलाही पदार्थ आवडला नाही म्हणून अजिबात खायचा नाही किंवा त्याला वाईट म्हणायचं असं करायचं नाही.
(कोसला हौसेन विकत घेतलेला आणि पारायणप्रेमी)जिप्सी
15 Sep 2010 - 8:20 pm | छोटा डॉन
खरे सांगायचे तर "कोसला" मलाही फार लै भारी आहे असे नाही वाटले.
( इनफॅक्ट त्या तुलनेत ( जी मी कधीच करत नाही ) "बाकी शुन्य" जरा उजवे वाटले ).
अर्थात नेमाड्यांची इतर पुस्तके चांगली असली तर हे 'कोसला' मी 'बरे आहे' असेच म्हणेन.
पुस्तकातला काही काही भाग, काही प्रसंग आणि एकुणच भाषाशैली मस्त असली तरी टोटलमध्ये पुस्तक 'ठिक' ह्या कॅटेगिरीत येते.
बाकी कोसलावर लोकांनी एवढे भरभरुन लिहले आहे की ते वाचुन नेमाड्यांनीच डोक्याला हात लावला असेल
( पुस्तकाच्या प्रस्तावनेत / अभिप्रायात ( जो त्यावर छापला आहे ) खुद्द भाईकाकाच म्हणतात "कोसलावर खरे तर कोसलाएवढेच लिहता येईल ..." , असेल बाबा, मला ती कादंबरी एकुणातच ठिक वाटली )
संग्रही असावी का ?
जरुर असावी, जरा हटके भाषाशैली आणि काही खास प्रसंगांसाठी कोसला विकत घ्यायला हरकत नसावी.
बाकी पुस्तकवेडे असाल तर नेमाड्यांची इतर पुस्तकेही वाचु शकता, आवडतीलच आणि झेपतीलच असे नाही, मात्र काही वेगळे नक्कीच वाचायला मिळेल.
बाकी असो.
- छोटा डॉन
16 Sep 2010 - 11:20 am | नीधप
वपु मध्यमवर्गीय संकुचित (खरंतर भंपकच) म्हणल्यावर राग बिग येणारी मंङळी इतर लेखकांना का शिव्या घाल्तात काय समजले नाही.
16 Sep 2010 - 12:19 pm | मृत्युन्जय
आता व पु मध्यमवर्गीय , संकुचित आणि भंपक लेखक नाहीत म्हणुन जगातल्या सर्वच लेखकांना महान लेखक म्हणावे की काय? नाही आवडत एकेकाचे लेखन. काय चुकीचे आहेत त्यात. तुम्हाला वपुंचे आवडत नसेल तर नाही आवडत म्हणा ना. पण वपू भंपक असे म्हणाल तर फटके पडणारच ना.
16 Sep 2010 - 2:50 pm | प्रदीप
कधीच आवडले नाहीत, अगदी पहिल्यांदा (सत्तरीच्या दशकात त्यांचे 'वहीदा रेहमान' इत्यादी जे काही वाचले तेव्हापासून). ते अत्यंत भंपक आहेत असे तेव्हा वाटले आणि त्यांच्या लेखनापासून दूर राहिलो.
आता इथे रहातोय तेथे (महाराष्ट्राबाहेर) एकदा सुमारे पंधरा वर्षांपूर्वी ते आले होते. त्यांचे इथे येणे अचानक झाले, आणि एका त्यांच्या चाहत्याने भराभर फोन फिरवून मंडळाचे मेंबर गोळा करून त्यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम घडवून आणला. तेव्हा अगदी नाईलाजाने जावे लागले (मैत्रीखातर). तरी जातांना डोके व मन उघडे ठेऊन गेलो. म्हटले, आता इतकी वर्षे गेली आहेत, मिठी नदीतून बरेच पाणी वाहून गेले आहे, तेव्हा वपु आता वेगळे असतील. दोन कथा त्यांनी सांगितल्या सुमारे दोन+ तास लागून. एक अजिबात लक्षात राहिलेली नाही, दुसरी मात्र लक्षात आहे कारण ती इतकी फालतू आहे, आणि त्याचा 'पंच' (जो त्यांच्या चाहत्या मंडळीने अगदी 'चुकचुक' करत वगैरे साजरा केला) अत्यंत बाष्कळ होता, की खरे तर वाईट वाटले. एक मराठीतील जानामाना वगैरे कथाकार, इतका आता वयोवृद्ध झाला तरी वीस वर्षांपूर्वी जे काही लिहीत होता त्याहीपेक्षा आता फालतू लिहीतोय/ सांगतोय.
मिठी नदीत पाणी वाहिले नाही, गाळच साचत गेला, दुर्दैवाने.
16 Sep 2010 - 2:55 pm | विसोबा खेचर
कथाकथन करावं तर ते द मा मिरासदार, व्यंकटेश माडगुळकर आणि शंकर पाटील यांनीच..!
तात्या.
16 Sep 2010 - 4:14 pm | धमाल मुलगा
काय बोल्लासा तात्यानु!
कुठेही 'मी कथाकथन करतोय बरं का' असा अभिनिवेश नाही..छान ओसरीवर बसुन गप्पा मारता मारता 'अरे त्यादिवशी अमुक अमुक असं झालं..' म्हणुन कोणीतरी खुलवुन खुलवुन प्रसंग सांगावे असं वाटतं अगदी. :)
16 Sep 2010 - 3:15 pm | नीधप
तुम्हाला वपुंचे आवडत नसेल तर नाही आवडत म्हणा ना.<<
का? तुम्ही इतर लेखकांना शिव्या देऊन वाईट म्हणू शकता आणि तुमच्या आवडत्या लेखकाला भंपक म्हणलं तर फटके पडणारंच?
डबल ढोलकी.
वपु = भिकार, भंपक, खोटं लिखाण हे आमचं मत आहे. आता ते मांडायचं नाही कारण तुम्ही फटके मारणार ह्याला दहशतवाद म्हणतात.
16 Sep 2010 - 4:34 pm | मृत्युन्जय
म्हणजे तुम्ही वपुंना मध्यमवर्गीय संकुचित भंपक असे सगळे म्हणु शकता पण धागाकर्तीने इतर लेखकांना शिव्या घातलेल्या तुम्हाला चालणार नाहीत. तुम्ही जसे इतर लेखकांना शिव्या घालता तसेच लोकही तुमच्या आवडत्या लेखकांना शिव्या घालु शकत्तातच की.
प्रत्येक २ पानांमागे २ भुकबळी, ३ आत्महत्या, नवर्याने दारु पिउन बायकोला मारल्याच्या ४ घटना आणि पोराने बापाला घातलेल्या ५ अर्वाच्य शिव्या याशिवाय साहित्य निर्माणच होउ शकत नाही अशी मानसिकता का? साहित्य म्हणजे काय फक्त गरीबी, दारिद्र्य, भुकबळी, निराशा हेच सगळे का?
देशातला सगळ्यात मोठा वर्ग मध्यमवर्ग. पण त्याच्या मानसिकतेवर, त्याच्या पांढरपेशी प्रश्नांवर कोणी लिहिले की तो भंपक, संकुचित का रे बाबा?
आणि भंपकता कशात? कोणाचाही कैवार घेउन किंवा कोणाच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे आव आणुन लिहिलेले साहित्य नाहीच आहे वपुंचे. मग भंपकपणा कसला नक्की? आणि संकुचोत वृत्ती का म्हणे? त्यांनी आपल्या लिखाणातुन दलितांच्या अन्यायाला वाचा फोडली नाही म्हणुन की वेश्यावस्तीवर कादंबर्या लिहिल्या नाहीत म्हणुन?
आणि मध्यमवर्गीय लिखाण म्हणुन फक्त वपुंना नावे का ठेवता मग? पुलंचे लिखाण काय वेगळे होते? शिवाजी सावंत कसे संकुचित विचारसरणीचे नाहीत?
16 Sep 2010 - 4:49 pm | धमाल मुलगा
आता कुडं सामना रंगात यायला लागल्येलाय.
चला...पाच का दस.. पाच का दस..पाच का दस..पाच का दस..पाच का दस..पाच का दस..पाच का दस..
साथ में पॉपकॉर्न का चार्ज अलग...
16 Sep 2010 - 4:53 pm | मितान
आन् निस्ते पापकार्नं केव्ड्याला देता भौ ?
नाही , कवाचि झाडावर बसून लै कट्टाळा आलाय म्हून...
16 Sep 2010 - 5:07 pm | मृत्युन्जय
आयला मी स्वतः पॉपकोर्न घेउन बसलो आहे. पाच का दस थोडे कमी वाटते खरे. सामना रंगत जाइल तसा दर वाढत जाइल काय?
16 Sep 2010 - 5:53 pm | धमाल मुलगा
>>पाच का दस थोडे कमी वाटते खरे. सामना रंगत जाइल तसा दर वाढत जाइल काय?
जरुर... (म्हणजे अवश्य! )
16 Sep 2010 - 7:42 pm | सविता
च्यामारी.... माझ्या धाग्याचा आखाडा झाला की!!!
होऊन जाऊ दे..... आम्ही झाडावर बसून पॉपकॉर्न खातो :)
खुद के साथ बातां : ६०+..आणि अजून सुरू...जमलं जमलं..शतकी प्रतिसाद आपल्या पण धाग्याला पण मिळण्याची शक्यता आहे .. अगदी चोता दोन, परा सारखे द्विशतकी, त्रिशतकी नाही जमलं तरी!!!!
16 Sep 2010 - 10:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गो, सुपारी दे ना ... परा आणि चोता दोन काय उगाच फेमस नाही झाले! ;-)
16 Sep 2010 - 10:40 pm | सविता
ही घे सुपारी......
16 Sep 2010 - 10:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रकाटाआ
16 Sep 2010 - 9:27 pm | बिपिन कार्यकर्ते
धम्या, खुलाशाबद्दल धन्यवाद. नाही तर आम्हाला भलतंच वाटलं असतं.
16 Sep 2010 - 9:31 pm | धमाल मुलगा
बरोबर आहे. अपेक्षित होतं म्हणुनच सांगितलं हों
16 Sep 2010 - 8:19 pm | नीधप
आधी नीट वाचा आणि मग तारे तोडा.
धागाकर्तीने मुळात वपुंच्याबद्दल वाईट बोलणार्यांबद्दल नाराजी व्यक्त केलीये आणि मग दुसर्या एका लेखकाबद्दल भरपूर तोंडसुख घेतलेय.
ह्या विरोधाभासाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं?
तुम्ही पण वपुंबद्दल काही बोलाल तर फटके पडतील अशी धमकी दिलीतच की.
मी माझ्या आवडत्या लेखकांबद्दल कोणी काय बोलावं वा बोलू नये, एवढेच काय माझे आवडते लेखक कोण हेही सांगण्याच्या भानगडीत पडलेली नाहीये.
माझ्या आवडत्या लेखकांबद्दल तुम्ही काय बोलता किंवा नाही याबद्दल मी कशाला चिंता करू? मला फरक पडत नाही अजिबात तुम्ही काय बोलता याने आणि म्हणूनच माझ्या न आवडत्या लेखकांबद्दल जे वाटेल ते प्रांजळपणे लिहिण्याचा मला अधिकार नक्कीच आहे. आणि तुमचं फटके पडतील हे बोलणंही तितकंच हास्यास्पद आहे.
पण ज्याला आपल्या आवडत्या लेखकाबद्दल कोणी काहीही बोललेलं चालत नाही. त्याला दुसर्याच्या आवडत्या लेखकांबद्दल तरी काही बोलण्याचा अधिकार उरतोच कुठे?
इतकाच मुद्दा आहे. अर्थात वपु आवडणारे लोक असेच हमरीतुमरीवर उतरताना आणि तितक्याच जोरात इतरांना नावं ठेवताना नेहमीच बघितलेत त्यामुळे आश्चर्य नक्कीच वाटलं नाही.
16 Sep 2010 - 8:50 pm | मृत्युन्जय
धागाकर्तीने मुळात वपुंच्याबद्दल वाईट बोलणार्यांबद्दल नाराजी व्यक्त केलीये आणि मग दुसर्या एका लेखकाबद्दल भरपूर तोंडसुख घेतलेय.
ह्या विरोधाभासाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं?
माझं कशाला काही म्हणणं असेल. तुम्ही वेगळे काय केले?
तुम्ही पण वपुंबद्दल काही बोलाल तर फटके पडतील अशी धमकी दिलीतच की.
मी? छ्या ब्वो. मी नाही असली काही धमकी दिली. मी सोज्वळापणे तुम्हाला सांगितले की नसेल आवडत तर नाही आवडत म्हणा ना. उगाच नसती विशेषणॅ नको त्याला लावली तर फटके पडतीलच म्हणुन. मी फटके देइन अशी धमकी अजिबात नाही दिली. दिलीच असती तर एव्हाना फटके दिलेही असते.
त्यावर तुम्ही तारे तोडलेत की "तुम्ही इतर लेखकांना शिव्या देऊन वाईट म्हणू शकता......" तर गंमत अशी की मी कोणालाच शिव्या नव्हत्या दिलेल्या. मी तर माझ्या ७ वर्षे वयाच्या भाच्च्याने लिहिलेले साहित्य पण उच्च दर्जाचे आहे असे म्हणतो.
मी माझ्या आवडत्या लेखकांबद्दल कोणी काय बोलावं वा बोलू नये, एवढेच काय माझे आवडते लेखक कोण हेही सांगण्याच्या भानगडीत पडलेली नाहीये. माझ्या आवडत्या लेखकांबद्दल तुम्ही काय बोलता किंवा नाही याबद्दल मी कशाला चिंता करू?
मग कशाला उगाच व पु, इतर असा वाद उकरुन काढलात?
मला फरक पडत नाही अजिबात तुम्ही काय बोलता याने
तुम्ही प्रतिसाद दिलात तेव्हाच लक्षात आले होते ते.
आणि म्हणूनच माझ्या न आवडत्या लेखकांबद्दल जे वाटेल ते प्रांजळपणे लिहिण्याचा मला अधिकार नक्कीच आहे.
आहेच की नक्कीच आहे. पण मग इतर कोणि जर त्यांच्या नावडत्या लेखकाबद्दल लिहिले तर एवढे अंगावर कशाला येताय उगाच? आणी किमान प्रतिसाद देणार्याने कोणावर टीका केली आहे का हे तरी बघायचे मग किमान?
आणि तुमचं फटके पडतील हे बोलणंही तितकंच हास्यास्पद आहे.
मग हसा की. गरम कशाला होताय उगाच
पण ज्याला आपल्या आवडत्या लेखकाबद्दल कोणी काहीही बोललेलं चालत नाही. त्याला दुसर्याच्या आवडत्या लेखकांबद्दल तरी काही बोलण्याचा अधिकार उरतोच कुठे?
कसे बोललात. तुम्हालाच लागु होते हे. तुम्हाला लेखकांना शिव्या घातलेल्या चालतात ना? मग इतर कोणाला चालतात की नाही याच्याशी काय घेणे देणे?
इतकाच मुद्दा आहे. अर्थात वपु आवडणारे लोक असेच हमरीतुमरीवर उतरताना आणि तितक्याच जोरात इतरांना नावं ठेवताना नेहमीच बघितलेत त्यामुळे आश्चर्य नक्कीच वाटलं नाही.
इथे कोणिच वपु प्रेमी हमरीतुमरी वर उतरलेला नाही आहे. व पु हा विषयच नव्हता कुठे. तुम्हीच हास्यास्पद विषय पुढे केला. जळजळा काढण्यासाठी चुकीच्या माणासावर चुकीचे आरोप केलेत. बर कारणे विचारली तर ती न देता उगाच अवांतरच लिहिले. व पु भंपक का याचे उत्तर दिलेच नाही. वपुंचे किती आणी कोणते साहित्य वाचुन तुम्ही असले विनोदी मत बनवलेत देव जाणे.
16 Sep 2010 - 9:16 pm | धमाल मुलगा
दस का बीस....दस का बीस....दस का बीस....दस का बीस....
16 Sep 2010 - 9:28 pm | मृत्युन्जय
आत्तापर्यंत किती कमावलेत बारामतीकर?
16 Sep 2010 - 9:31 pm | धमाल मुलगा
आमच्या नावावर फक्त साडेबारा एकर आहे हाँ. बाकी कमाईचे प्रश्न असे जाहीर विचारु नयेत, आपली राष्ट्रकुल स्पर्धा करणेत येईल.
16 Sep 2010 - 9:38 pm | श्रावण मोडक
'बारामतीकर'!
17 Sep 2010 - 10:35 am | मृत्युन्जय
आपली राष्ट्रकुल स्पर्धा करणेत येईल.
बारामतीकरांचा पुणेकरांवर राग आहेच म्हणा.
17 Sep 2010 - 12:49 am | नीधप
>>तुम्ही वेगळे काय केले?<<
मी काही केलेच नाही. धागाकर्तीचा डबल ढोलकी प्रकार अधोरेखित केला फक्त.
>>उगाच नसती विशेषणॅ नको त्याला लावली तर फटके पडतीलच म्हणुन.<<
तुमच्या मते नसती आणि नको त्याला. माझ्या मते ती विशेषणे योग्य आहेत आणि योग्य व्यक्तीलाच आहेत. इतरांची मतं वेगळी म्हणून फटके पडतील हे सांगण्याचा काय अर्थ होतो? तशी मतं असायचा अधिकार नाही किंवा मांडू नका?
>>मी कोणालाच शिव्या नव्हत्या दिलेल्या. <<
शिव्या देणार्यांचं समर्थन केलंत ना. मग तुमच्या वपु ला नावं ठेवल्यावर का त्रास झाला?
>>मग कशाला उगाच व पु, इतर असा वाद उकरुन काढलात?<<
धागाकर्तीनेच वपु हे नाव काढलंय मूळ लेखात. मी नाही. आणि तुम्ही कशाला मधे पडलात एवढे चवताळून?
>>पण मग इतर कोणि जर त्यांच्या नावडत्या लेखकाबद्दल लिहिले तर एवढे अंगावर कशाला येताय उगाच? आणी किमान प्रतिसाद देणार्याने कोणावर टीका केली आहे का हे तरी बघायचे मग किमान?<<
चोराच्या उलट्या बोंबा... तुमच्या आवडत्या लेखकाबद्दल काही बोललं तर तुम्ही फटके पडतील अशी गुंडगिरीची भाषा बोलताय.
आणि माझा आवडता लेखक कोण हेच मी कधी लिहिले नाही इथे तर माझ्या आवडत्या लेखकावर कोणी टिका केली की नाही हे तुम्ही कसं ठरवलंत?
मुळात तुम्ही धागाकर्तीचे डुप्लिकेट आयडी असल्यासारखे का भांडताय माझ्याशी?
>>>इथे कोणिच वपु प्रेमी हमरीतुमरी वर उतरलेला नाही आहे. व पु हा विषयच नव्हता कुठे. तुम्हीच हास्यास्पद विषय पुढे केला. जळजळा काढण्यासाठी चुकीच्या माणासावर चुकीचे आरोप केलेत.<<
फटके पडतील याला हमरीतुमरीची भाषाच म्हणतात. वपु हा विषय धागाकर्तीनेच काढलेला आहे. वपुप्रेमामुळे दिसला नसेल तुम्हाला. तुम्ही सगळे आरोप अंगावर ओढवून घेतलेत धागाकर्तीचा डुप्लिकेट असल्याप्रमाणे. हा तुमचा प्रॉब्लेम माझा नव्हे.
>>व पु भंपक का याचे उत्तर दिलेच नाही. वपुंचे किती आणी कोणते साहित्य वाचुन तुम्ही असले विनोदी मत बनवलेत देव जाणे.<<
सगळं वाचलंय. अतिशय संकुचित आणि डबक्यात राहून आकाशाला मापायला बघण्याची, आणि डबक्यातले नियम आपल्या डबक्याबाहेरच्या विषयाला/ अवकाशाला लावून त्यावर डुढ्ढाचार्यासारखी टिप्पणी करण्याची शैली मला भंपक वाटते. अतिशय एकांगी लिखाण वाटतं. माझे मत तुम्हाला विनोदी वाटते याला माझ्या लेखी कणभरही अर्थ नाही.
आणि परत एकदा आश्चर्य नाहीच. वपु प्रेमी असेच चवताळतात.
17 Sep 2010 - 11:16 am | मृत्युन्जय
मी काही केलेच नाही. धागाकर्तीचा डबल ढोलकी प्रकार अधोरेखित केला फक्त.
धागाकर्तीनेही कुठेही डबल ढोलकी प्रकार केलेला नाही आहे.
तुमच्या मते नसती आणि नको त्याला. माझ्या मते ती विशेषणे योग्य आहेत आणि योग्य व्यक्तीलाच आहेत. इतरांची मतं वेगळी म्हणून फटके पडतील हे सांगण्याचा काय अर्थ होतो? तशी मतं असायचा अधिकार नाही किंवा मांडू नका?
अर्थ असा होतो की तुम्ही एखाद्याला भंपक म्हणु शकता तर मग दुसरा एखादा नेमाड्यांना भंपक म्हणु शकतो. आणि जेव्हा तो सडेतोड उत्तर देतो तेव्हा ते फटकेच असतात. कोण्या वपुप्रेमीने तुम्हाला आत्तापर्यंत घरी येउन प्रत्यक्ष फटके मारले असतील असे वाटत नाही. तुम्ही भंपक, संकुचित, मध्यमवर्गीय असे फटके मारु शकता तर मग इतर कोणी फटके मारले तर तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे?
शिव्या देणार्यांचं समर्थन केलंत ना. मग तुमच्या वपु ला नावं ठेवल्यावर का त्रास झाला?
मी वपुंचा भक्त नाही. पण त्यांच्या लिखाणावर तुमच्या प्रतिक्रिया तद्दन स्टंटबाजी वाटते. त्रास स्टंटबाजीचा होतो,
धागाकर्तीनेच वपु हे नाव काढलंय मूळ लेखात. मी नाही. आणि तुम्ही कशाला मधे पडलात एवढे चवताळून?
लेख नीट न वाचताच लोक बोंबा का मारतात ते कळाले नाही.
चोराच्या उलट्या बोंबा... तुमच्या आवडत्या लेखकाबद्दल काही बोललं तर तुम्ही फटके पडतील अशी गुंडगिरीची भाषा बोलताय.
धागा तर नाहीच नाही किमान ज्याला प्रतिसाद देता आहात त्याची प्रतिक्रिया तर नीट वाचत जा. मी आधीच्याच प्रतिक्रियेत लिहिले आहे की मी फटके मारेन असे कुठेच लिहिले नव्हते. तुम्ही फटके स्वतःवर ओढवुन घेतले. प्रतिक्रिय सार्वत्रिक होती. जर कोणी शिव्या घातल्या तर फटके पडतीलच अशी तुम्ही शिव्या घातल्या तर मी तुम्हाला फटके मारीन अशी नव्हतीच आणि हे मी मागेही सांगितले आहे. त्यावर चवताळुन उत्तर तुम्ही दिलेत. प्रतिक्रिया नीट न वाचताच दहशतवाद, गुंडगिरी असे तारे तोडलेत. साहित्य पण असे वाचत असाल तर तुमचे विचार बरोबरच आहेत असे म्हणायचे.
आणि माझा आवडता लेखक कोण हेच मी कधी लिहिले नाही इथे तर माझ्या आवडत्या लेखकावर कोणी टिका केली की नाही हे तुम्ही कसं ठरवलंत?
कोसला मला खूप आवडलेले नाही पण ते आलं तेव्हाचा काळ बघता कोसला महत्वाचं, माईलस्टोन म्हणावं असं पुस्तक आहे याबद्दल मला शंका नाही. नेमाड्यांचं बाकीचं थोडंसंच वाचलंय आणि नक्कीच आदर आहे. आणि काही झालं तरी समृद्ध अडगळ वाचणारच आहे.
अहो दुसर्यांची नाहीत तर किमान स्वत:ची मतं तरी नीट वाचत जा
मुळात तुम्ही धागाकर्तीचे डुप्लिकेट आयडी असल्यासारखे का भांडताय माझ्याशी?
तुमचा वरचा प्रतिसाद, धागा नीट न वाचताच वपु आणी अवचटांना एकाच रांगेत बसवल्याबद्दल केलेले अभिनंदन, नंतर वपुंबद्दल उगाचच मांडलेली मते, नंतर मला दिलेले उलट्सुलट प्रतिसाद यातुन उलट असेच सुचित होते आहे की भांडायचा आनंद तुम्हीच मनमुराद घेत आहात. एकामागुन अशी उलट्सुलट मते मुद्दाम मांडल्यासारखी वाटत आहेत. अजुन काही सांगने न लगे,
फटके पडतील याला हमरीतुमरीची भाषाच म्हणतात. वपु हा विषय धागाकर्तीनेच काढलेला आहे. वपुप्रेमामुळे दिसला नसेल तुम्हाला.
खुलासा वर केलेलाच आहे. आधीच नीट वाचले असते तर असे मत पडलेच नसते
तुम्ही सगळे आरोप अंगावर ओढवून घेतलेत धागाकर्तीचा डुप्लिकेट असल्याप्रमाणे. हा तुमचा प्रॉब्लेम माझा नव्हे.
तुम्ही माझ्यावर काही आरोप केलेत? नक्की कुठले?
सगळं वाचलंय. अतिशय संकुचित आणि डबक्यात राहून आकाशाला मापायला बघण्याची, आणि डबक्यातले नियम आपल्या डबक्याबाहेरच्या विषयाला/ अवकाशाला लावून त्यावर डुढ्ढाचार्यासारखी टिप्पणी करण्याची शैली मला भंपक वाटते. अतिशय एकांगी लिखाण वाटतं.
पुन्हा पहिलेच प्रश्न, २ पाने ... ४ आत्महत्या...
माझे मत तुम्हाला विनोदी वाटते याला माझ्या लेखी कणभरही अर्थ नाही.
मला विनोदी अजिबात वाटत नाही. तुमचे मत तसेच असेल तर त्याचा आदर करतो मी.
आणि परत एकदा आश्चर्य नाहीच. वपु प्रेमी असेच चवताळतात.
वपुप्रेमींपेक्षा वपुविरोधी जास्त चेकाळतात हे आज कळून चुकले मला. मला तर कुठलाही वपुप्रेमी असा उगाच वाद ओढुन काढणारा सापडला नाही आहे अजुन. पण म्हणजे वपु प्रेमींनी वपुंना कितीही शिव्या घातल्याघारीही "वा वा, छान छान. अजुन घाला. ती कोसला मधली पान क्रमांक ७४ वर असलेली शिवीही घाला" असे काहीतरी बडबडत रहायचे का?
अवांतरः मी कधीही कुठल्याही लेखकाला शिव्या घातलेल्या नाहीत. लेखन आवडले नाही तर लेखनातले दोष दाखवतो कधीकधी (मला ते झेपलेच तर). नाहीतर लेखन माझ्या डोक्यावरुन गेले हे मान्य करुन मोकळा होतो. धागाप्रवर्तिकेला पण मी अश्याच आशयाची एक प्रतिक्रिया दिली होती (खाली परत देत आहे). पण त्या वपुप्रेमी असुनसुद्धा अश्या अंगावर धावुन आल्या नव्हत्या:
आधीची प्रतिक्रिया
बाकी एवढेच म्हणेन की एवढ्या सगळ्या लोकांनी डोक्यावर घेतलेली कादंबरी अगदीच फुटकळ नसेल. कुछ तो बात होगी. कदाचित धागाप्रवर्तिकेला आवडली नसेल ही गोष्ट वेगळी. पण म्हणुन एकदम फुटकळ?
17 Sep 2010 - 11:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
दस का पचास....दस का पचास....दस का पचास....दस का पचास....
हमाल धुलगी
17 Sep 2010 - 12:38 pm | सविता
ओ तै... माझे पॉपकॉर्न संपले...... देता का थोडे तुमचे?
17 Sep 2010 - 5:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे घे ... (एकेरीत ये गं प्लीज)
आणि सरक थोडी तिकडे, तेवढ्यात माझी जागा या द्मुने पळवली!
17 Sep 2010 - 6:09 pm | सविता
हात रे.... कोण तो विक्षिप्ततै ची जागा पळवतोय?
17 Sep 2010 - 12:40 pm | धमाल मुलगा
अच्रत बव्ल्त... =)) =)) =)) =))
दहा वरुन एकदम पन्नास? शिणुमा ब्लॉकबस्टर झाला काय? =))
17 Sep 2010 - 5:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
धम्या, ब्लॉकबस्टर नायतर काय? किती दिवस शिणुमा चाललाय बघतोयस ना तू! ;-)
17 Sep 2010 - 6:33 pm | पैसा
अदिती, सविताने तुझ्या "धाग्याचा खफ कसा करावा?" चा चांगलाच अभ्यास केलेला दिसतोय!
16 Sep 2010 - 10:55 pm | सविता
अहो नी ताई
मी म्हटलं होतंच..
"मी म्हणते..असतील नेमाडे कुणी लय भारी लेखक... म्हणून त्यांचे सगळे लेखन भारी असेल असा नियम आहे का? मी वाचक आहे..आणि मला जे लिखाण भिकार वाटले त्याला भिकार म्हणायचे मला पूर्ण स्वातंत्र्य आहे मग कुणी का लिहीना!
राहता राहीले, व.पु. आणि अवचट्...वेल मला आवडते त्यांचे लिखाण...आणि मला त्याचा अभिमान आहे.. तुम्हाला ते मध्यमवर्गीय वाटतेय याच्याशी मला काही देणे घेणे नाही."
तुम्ही माझ्या आवडत्या लेखकाबद्दल काय म्हणताय... या कडे मी लक्षच देत नाहीये मुळी...मग मला ते पसंत.नापसंत असण्याचा प्रश्न् च येत नाही....
16 Sep 2010 - 3:20 pm | यशोधरा
मलाही वपुंचे लेखन आवडत नाही.
16 Sep 2010 - 5:34 pm | अवलिया
वरती ज्या ज्या लेखकांची नावे आली आहेत ती सर्व भंपक आहेत. च्यामायला हाय काय अन नाय काय !
16 Sep 2010 - 5:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मग त्यात ऋ, धमाल मुलगा हे लेखकही आले का? धमाल मुलगा हे आमचे आवडते खरडलेखक आहेत.
16 Sep 2010 - 5:42 pm | अवलिया
धमाल मुलगा लेखक आहे ? कुठला कथासंग्रह किंवा कादंबरी प्रकाशित झाली आहे त्यांची? मागे शिकार नामक महाकादंबरी लिहिण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता ... पुढे काय झाले कळले नाही.
16 Sep 2010 - 5:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो लिहीलं ना, ते खरड लेखक आहेत! तसे ऋअण्णा आमचे आवडते स्वाक्षरीलेखक आहेत. तुम्ही असं कुठे म्हटलं होतंत कथा आणि/किंवा कादंबरी लेखकच भंपक आहेत म्हणून?
16 Sep 2010 - 6:00 pm | धमाल मुलगा
नानाऽऽऽ... ना! ना!
16 Sep 2010 - 5:55 pm | अडगळ
लेखक ही जातच मुळी भंपक आहे.
एक कादंबरी लिहून अमर झालो समजतात .अमर ..च्यायला.. अमर सायकल मार्ट.
कागद स्वस्त आहे म्हणुन साले लिहीतात.
एका तावाची किंमत एक लाख . आता कोण लिहील ?
(आम्ही सारे कोसला - वपु नेमाडे)
17 Sep 2010 - 11:54 am | अवलिया
कोसला वाचुन हसलो नव्हतो तेवढा हा धागा वाचुन हसत आहे !
नेमाडे झिंदाबाद !
17 Sep 2010 - 1:27 pm | सविता
शी बै अच्रत
17 Sep 2010 - 2:54 pm | पुष्करिणी
+१ , नेमाडे आणि सवितातैं झिंदाबाद.
डायरीच्या पुढच्या पानांबद्द्लही लिहा लौकर
17 Sep 2010 - 6:26 pm | समंजस
.....ये काय हो रहा है ?
आता पर्यंत या धाग्यापासून दुर होतो परंतू शेवटी न राहवून हे विचारावं लागतंय :)
[ अवांतरः धागा कर्ती ने "कोसला" ला थोडंसं कोसलं तर एवढी धुमश्चक्री ? नेमाडेंना कोसलं असतं तर काय झालं असतं ;) ]
17 Sep 2010 - 6:43 pm | अवलिया
>>>.....ये काय हो रहा है ?
कोसला काही जणांसाठी कुरआन सारखे आहे. त्याविरुद्ध बोलले की अंगावर धाऊन येतात :)
17 Sep 2010 - 6:45 pm | धमाल मुलगा
हाण्ण तिच्यायला!!!! नान्या...येकच नंबर. :D
17 Sep 2010 - 6:57 pm | समंजस
>>> कोसला काही जणांसाठी कुरआन सारखे आहे. त्याविरुद्ध बोलले की अंगावर धाऊन येतात..
बाप रे केवढा हा अतिरेक एखाद्या साहित्य/पुस्तका बद्दल..... :)
[अवांतरः एवढे अतिरेकी विचार असलेल्यांना साहित्यिक अतिरेकी म्हणता येईल का ? अश्या अतिरेंकीना कुठला कलर कोड द्यावा ? ]