प्लास्टिक आणि कागदी राष्ट्र ध्वज विक्रीचा विरोध

लीना सचिन चौधरी's picture
लीना सचिन चौधरी in जनातलं, मनातलं
10 Sep 2010 - 3:21 pm

प्लास्टिक आणि कागदी राष्ट्र ध्वज विक्रीचा विरोध

15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन व २6 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या हर्षोल्हासाने साजरा करीत असतो. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले तर काहींना घरदार सोडावे लागले आहे. आजही जेंव्हा आपण सुखाने झोपलेलो असतो, आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करत असतो, तिकडे सीमेवर आपल्या रक्षणासाठी कोणीतरी रात्रंदिवस पहारा करत असतं.
मात्र गेल्या काही वर्षापासून आपल्या देशाचे मानचिन्ह 'तिरंगा' झेंड्याची अवहेलना होत असल्याचे दिसत आहे.

दरवर्षी आपल्या देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिनी व स्वतंत्रता दिनी अगणित प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांची विक्री होत असते. लोक अतिशय उत्साहाने ही खरेदी करतात मात्र दुसर्याच दिवशी हे राष्ट्रध्वज केविलवण्या परिस्थितीत रस्त्यात इतस्तत: पडलेले असतात. सार्वजनिक सफाई कामगाराव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणी वळुन पाहणण्याचेही कष्ट घेत नाही. आपल्याच राष्ट्रध्वजाची अशी उपेक्षा या स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून आपल्याला शोभते का?
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करता येणार नाही, या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाला लाथाळून सर्रासपणे असे ध्वज तयार केले जात असून भारतीय जनता आपल्या मुलांना त्या ध्वजाचे महत्त्व न सांगता त्यांना खुशाल असे प्लास्टिकचे ध्वज खरेदी करून देत असतात. मुले तर मुलेच ना, त्यांना या ध्वजाचे महत्त्व माहित नसल्याने त्यांच्याकडून अशा चूक होणारच. परंतु पालकांनी सजगता दाखवून अशी प्लास्टिकचे ध्वज खरेदी करू नयेत. तरच त्याचे उत्पादनाला आपोआप खिळबसेल.

या देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक बानविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.
आपण प्रजासत्ताक व स्वतंत्र राष्ट्र आहोत याचा जल्लोष मांडून झाल्यावर त्याच राष्ट्रध्वजाला, पायदळी तुडवतना, कचरयाच्या पेटीत टाकताना आपल्याला काहीच वाटत नाही?

रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नलाच्या कडेला हे ध्वज विकणारी मुले, ते गरज म्हणून विकतात पण आपण ते काय म्हणून विकत घेतो?
क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांकडूनही आपल्या ध्वजाचा अवहेलना केली जाते. त्यांना तोंड व परिधान केलेल्या कपड्यावर तिरंगा रंगवून घेतांना काहीच कसे वाटत नाही. याचे आश्चर्य वाटते. आपण सांगा हे कितपत योग्य आहे. ध्वजाला कपड्यावर नाही तर मनावर स्थान पाहिजे. आणि ते आपल्या कर्तृत्त्वातून जाणवत.असते.

फाटलेला किंवा मळलेला राष्ट्रध्वज वापरु नये, याची सर्वांनाच कल्पना आहे, असायलाच हवी. मात्र फाटलेला किंवा मळलेला राष्ट्रध्वज पुर्णत: नष्ट कसा करावा याची किती लोकांना माहिती आहे?

स्वतंत्र भारतात आपल्याला श्वास घेता यावा म्हणून कित्येकांनी आपल्या आयुष्याची होळी केली आहे. आपल्या घराची समृद्धी या देशासाठी त्याग केला आहे. त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची परतफेड आपण अशा प्रकारे करणार आहोत का?

अशा प्रकारे ध्वज विकत घेऊन त्याची उपेक्षा करण्यपेक्षा, तो न विकत घेता, खरंतर तो विकण्यावरच आक्षेप घेऊन स्वत:ला या देशाची नागरिक म्हणवणं मी जास्त पसंत करीन.

यापुढे प्लास्टिक आणि कागदाच्या राष्ट्रध्वजविक्रिसाठी मी आक्षेप घेणार आहे. जिथे जिथे मला अशा प्रकारची विक्री होताना आढळेल, तिथे तिथे मी स्वत: जाउन लोकांना असे ध्वज खरेदी न करण्याविषयी आवाहन करणार आहे.

स्वत:च्या देशाचा मानसन्मान कायम राखाण्याकरिता तुम्ही काय करणार आहात?

सौ. लीना सचिन चौधरी (अध्यापक)
ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी (गुरुकुल विभाग)

समाजविचार

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

10 Sep 2010 - 4:30 pm | गांधीवादी

लेख खूप चांगला आहे.
पण माझी खालील प्रतिक्रिया न राहवून अक्षरशः हातातून निसटून गेली. (माफ करा)

>>राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करता येणार नाही, या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाला लाथाळून सर्रासपणे असे ध्वज तयार केले जात असून भारतीय जनता आपल्या मुलांना त्या ध्वजाचे महत्त्व न सांगता त्यांना खुशाल असे प्लास्टिकचे ध्वज खरेदी करून देत असतात.
राष्ट्रध्वजातील कोणत्याही रंगाचा, दहशतवाद्यांना संबोधण्यासाठी वापरता येणार नाही. केंद्रीय गृहमंत्री ह्या नैतिकतेलाच लाथाडून सर्रासपणे भर संसदेत अशी विधाने करीत असतात. कोन्ग्रेस वाले त्यांची कानउघाडणी न करता 'सिंघवी' त्याचे खुशाल समर्थन करतात.

>>मुले तर मुलेच ना, त्यांना या ध्वजाचे महत्त्व माहित नसल्याने त्यांच्याकडून अशा चूक होणारच. परंतु पालकांनी सजगता दाखवून अशी प्लास्टिकचे ध्वज खरेदी करू नयेत. तरच त्याचे उत्पादनाला आपोआप खिळबसेल.
जनता तर जनताच ना, काहीजण सुज्ञ नसल्याने कधी कधी अशा चुका करणारच, परंतु केंद्रीय गृहमंत्र्यांनी सजगता दाखवून अशी विधाने करू नयेत. तरच जनतेच्या विचारघौडीला आपोआप खिळ बसेल.

>>या देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक बानविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.
या देशाचे सुजाण नेते बनण्याची जबाबदारी प्रत्येक नेत्यावर आहे.

>>आपण प्रजासत्ताक व स्वतंत्र राष्ट्र आहोत याचा जल्लोष मांडून झाल्यावर त्याच राष्ट्रध्वजाला, पायदळी तुडवतना, कचरयाच्या पेटीत टाकताना आपल्याला काहीच वाटत नाही?
आपण जगातील सर्वांत मोठा लोकशाहीतील संसदेत बसलो आहोत. आपले बोलणे संपूर्ण जग ऐकू शकत आहे. तेव्हा रंगांच्या नावानी दहशत वाद्याना संबोधताना, ती नैतिकताच कचरा पेटित फेकून देताना केंद्रीय गृहमंत्र्यांना जरा सुद्धा लाज वाटली नाही का ?

>>स्वतंत्र भारतात आपल्याला श्वास घेता यावा म्हणून कित्येकांनी आपल्या आयुष्याची होळी केली आहे.
त्या होळीवर त्यांचेच नातेवाईक/नातू/सुना आता आपापली पोळी भाजून घेत आहे. आणि जनता महागाईच्या होळीत होरपळून निघत आहे.

>>आपल्या घराची समृद्धी या देशासाठी त्याग केला आहे.
आता ह्या नेत्यांनी आपल्या घराच्या समृद्धीसाठी देशहिताचा त्याग केला आहे. (खरतर माझे विधान चुकीचे म्हणावे लागेल, कारण त्याग करण्यासाठी आधी ते असायला हवे)

>>स्वत:च्या देशाचा मानसन्मान कायम राखाण्याकरिता तुम्ही काय करणार आहात?
फक्त ५ वर्षांनी अख्खे एक बटन दाबणार.

आमच्या गणप्याच्या भाषेत,
मेराइच भारत महान. और किसीका देश महान होच नाही सकता.

लीना सचिन चौधरी's picture

15 Oct 2010 - 3:09 pm | लीना सचिन चौधरी

या वर्षीच्या स्वातंत्रदिनी, राष्ट्रध्वजाचे विडंबन रोखण्याची माहिती देण्याचा प्रयत्न यशस्वी केला. ते पुढील प्रमाणे

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
दरवर्षी आपल्या देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिनी व स्वतंत्रता दिनी, सर्वजण मोठ्या अभिमानाने कागदी’ किंवा प्लास्टिक’ चे राष्ट्रध्वज, बिल्ले,स्टीकर मिरवत असतात.मात्र दुसर्याच दिवशी हे राष्ट्रध्वज केविलवण्या परिस्थितीत रस्त्यात इतस्तत: पडलेले असतात. सार्वजनिक सफाई कामगाराव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणी वळुन पाहणण्याचेही कष्ट घेत नाही. आपण ते उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावत नाहीत.आपल्या राष्ट्रध्वजाची अशी उपेक्षा करू नये.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करता येत नाही.पर्यावरणाच्या बचावासठी आपण सर्वचजण आपापाल्या परीने प्रयत्न करीत असताना कागदाचा इतका गैरवापर आपण कसा करू शकतो?.जिथे सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यावर बंदी घातली तिथे आपण प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरतो आणि नुसता वापरात नाही तर आपण तो दुसर्याच दिवशी कचरा फेकून दयावा इतक्या सहजपणे फेकूनदेतो?
आपले एक मुख्य राष्ट्रीय प्रतिक म्हणजे भारताचा राष्ट्रध्वज’,ज्याच्या सन्मानासाठी , रक्षणासाठी आजपर्यंत लाखो राष्ट्रभक्तांनी आपल्या प्राणांचेही बलिदान केले आहे.त्यामुळे त्याचे रक्षण करणे, मान राखणे, आणि विडंबन रोखणे हे आपल्या प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.
आपला राष्ट्राभिमान जोपासण्याचा एक मार्ग म्हणजे, प्रत्येक देशावासियाने आपल्या राष्ट्रीय प्रतीकांचा,राष्ट्रध्वजाचा मान राखणे हा होय. तसेच राष्ट्राभिमान जोपासणे, तो सतत जागृत ठेवणे अन वृद्धिंगत करणे हे राष्ट्ररक्षणाचे कार्य करू इच्छिणाऱ्या प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्यच आहे.
राष्ट्रध्वजाचे स्थान खाली नाही, उंचावर आहे तर मग या स्वातंत्र्यदिनी कागदी’ किंवा प्लास्टिक’ चे राष्ट्रध्वज, बिल्ले,स्टीकर न वापरण्याचा, तसेच राष्ट्रध्वजाचे होणारे विडंबन रोखण्याचा निश्चय करूया.
तसेच स्वातंत्र्यदिन किंवा त्यानंतर जर आपल्याला कागदी’ किंवा प्लास्टिक’ चे राष्ट्रध्वज, बिल्ले,स्टीकर रस्त्यात इतस्तत: पडलेले दिसले तर ते गोळा करून माझ्याकडे जमा करावे.
राष्ट्रध्वजाचे विडंबन रोखा आणि त्याचा मान राखा.
वंदे मातरम

मुळ लेखाचा तसेच येथील लिखाणाचा संदर्भ : कांचन कराई यांचे व http://padsaad.blogspot.com/2008/11/blog-post_06.html
http://marathiblogs.net/node/79396

वेताळ's picture

13 Sep 2010 - 7:50 pm | वेताळ

अजुन एक शंका आहे,कपड्याचे जीर्ण झालेले ध्वज काय करतात?त्याबद्दल माहिती द्या.

लीना सचिन चौधरी's picture

14 Sep 2010 - 10:58 am | लीना सचिन चौधरी

ध्वज नष्ट कसा करायचा :
रंग उडालेला, फाटलेला राष्ट्रध्वज फडकावण्यास योग्य नसतो. असे करणे म्हणजे ध्वजाचा अपमान करणे आहे हे लक्षात ठेवा. राष्ट्रध्वजाची अशी स्थिती झाल्यास गुप्तपणे त्याला अग्नीच्या स्वाधीन केले पाहिजे. किंवा वजन किंवा रेतीत बांधून पवित्र नदी किंवा जलसमाधी दिली पाहिजे. पार्थिव शरीरावरून उतरवलेल्या ध्वजाच्या बाबतीतही असे केले पाहिजे.

नितिन थत्ते's picture

15 Sep 2010 - 6:10 pm | नितिन थत्ते

>>वजन किंवा रेतीत बांधून पवित्र नदी किंवा जलसमाधी दिली पाहिजे.

नदी पवित्र आहे की नाही हे कसे ओळखावे याबाबत एक (वेगळा) लेख लिहावा.

>>राष्ट्रध्वजाची अशी स्थिती झाल्यास गुप्तपणे त्याला अग्नीच्या स्वाधीन केले पाहिजे.

याचे कोणी ष्टिंग ऑपरेशन केले आणि ती चित्रफीत काळेकाकांना मिळाली तर महाराष्ट्रातही 'इंचाइंचाने माघार घेत' असल्याचे लेख वाचावे लागतील.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2010 - 6:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तर महाराष्ट्रातही 'इंचाइंचाने माघार घेत' असल्याचे लेख वाचावे लागतील.

नव्हे नव्हे,

तर 'झेंडा' महाराष्ट्रातही 'इंचाइंचाने माघार घेत' असल्याचे लेख वाचावे लागतील.

-- अदिती (गुप्ते)

लीना सचिन चौधरी's picture

26 Sep 2010 - 7:56 pm | लीना सचिन चौधरी

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करता येत नाही

लीना सचिन चौधरी's picture

25 Sep 2010 - 9:04 pm | लीना सचिन चौधरी

..

प्रसन्न केसकर's picture

14 Sep 2010 - 3:11 pm | प्रसन्न केसकर

फ्लॅग कोड आणि फ्लॅग अ‍ॅक्ट याबाबत एव्हढे कष्ट घेऊन केलेले हे लिखाण प्रचंड आवडले.

वेताळ's picture

14 Sep 2010 - 5:18 pm | वेताळ

मुळात आपल्या देशात ध्वज फडकवणे खुप कठिण काम आहे.त्यासाठी खुप सोपस्कर पार पाडावे लागतात.मला ते कधी बरे वाटते कधी कधी त्याचा अतिरेक वाटतो.बाकी आपल्या लिखाणामुळे खुप नवी माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद.

वा! छान चाललंय. अहो, अध्यापक सौ. लीना सचिन चौधरी मॅडम, तुम्ही स्वत:चं काही लिहिता की नाही? चर्चा करण्यासाठी तुम्ही माझा लेख निवडलात, हे ठीक आहे. त्यात स्वत:ची दोन तीन वाक्यं टाकलीत हेदेखील ठीक आहे. पण लेखक म्हणून खाली स्वत:चं नाव देताना मूळ स्त्रोत म्हणून माझ्या लेखाची निदान लिंक द्यावी असं नाही का वाटलं तुम्हाला? बरं, हरकत नाही. मीच देते.

ही लेखाची मूळ लिंक - http://padsaad.blogspot.com/2008/11/blog-post_06.html

आणि याच लेखाची आणखी एका ठिकाणी ही चोरीपे चोरी - http://marathiblogs.net/node/79396

मूळ लेख तुम्ही वाचला आहेच. (त्याशिवाय का चोरी केलीत? ईमेलने मिळाला लेख असं कारण देऊ नका.) मूळ लेख पुन्हा पाहून घ्या हं! ६ लेख नोव्हेंबर २००८ ला लिहिलेला आहे. या लेखाची गूगल कॅश्डही तयार झालेली आहे. तुमच्यासारख्या लोकांसाठी काही महत्त्वाच्या आणि उपयुक्त लिंस मी इकडे देतेय, अध्यापन आणि चौर्यकर्म यातून वेळ मिळाल्यास हेही वाचा -

साहित्यचोरीचा नमुना आणि सुरक्षिततेचे उपाय

कुठल्याही ब्लॉगवरचा लेख उचलून तो स्वत:च्या नावाने खपवणा-याला कायद्याने शिक्षा होऊ शकते, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही ना?! आणि वरच्या लिंकमधे दिलेले चार लेख वाचल्यानंतर ती उरणारणारही नाही.

आता एकच विचारावंसं वाटतं, तुम्ही नक्की शिक्षिका आहात का? आमच्या काळी आईवडीलांनंतर मुलांवर सुसंस्कार करणारी एक आदरणीय़ व्यक्ती म्हणून आम्ही शिक्षकांकडे पहात असू.

--
सस्नेह
कांचन कराई (मि.पा.वर ठकू)

मोगरा फुलला

ब्लॉगवाले

विशाल कुलकर्णी's picture

15 Sep 2010 - 11:19 am | विशाल कुलकर्णी

लीना मॅडम तुमचा हेतु स्तुत्य आहे पण मार्ग चुकीचा. हाच आदर्श आपल्या विद्यार्थ्यांसमोर ठेवणार आहात का. निदान लेखाखाली कांचनच्या मुळ लेखाबद्दल संदर्भ किंवा कृतज्ञता तरी व्यक्त करायला हवी होतीत. माफ करा पण हे चुकीचे आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

14 Sep 2010 - 9:04 pm | अविनाशकुलकर्णी

...

अविनाशकुलकर्णी's picture

14 Sep 2010 - 8:59 pm | अविनाशकुलकर्णी

आणि याच लेखाची आणखी एका ठिकाणी ही चोरीपे चोरी - http://marathiblogs.net/node/79396

.बापरे...अहो त्या पेक्षा आमचा आदर्श ठेवा व एक ओळिचा धागा काढा...

शेंगा खाल्या तर टरफले उचला

लीना सचिन चौधरी's picture

27 Sep 2010 - 11:38 am | लीना सचिन चौधरी

...

लीना सचिन चौधरी's picture

15 Sep 2010 - 4:09 pm | लीना सचिन चौधरी

नमस्कार कांचन ताई ,
तुमच्या अभिप्रायामुळे माझे डोके सुन्न झाले आहे.
आपल्या भावना आपल्या प्रतिक्रिया मधून जाणवते आहे.तुमच्याकडून बरीच चांगली माहीती मिळाली त्याबद्दल धन्यवाद .
पण यातून मला एकाच जाणवते कि ...............
आता मला समजले, समजा मी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांचा निबंध लिहायला सांगितला व जर त्यामध्ये समानता आढळली म्हणजे कॉपी ( तुमच्या शब्दात "चोरी") झाली. या इंटरनेटच्या महाजालात आपल्याल्या भरपूर ठिकाणी समानता आढळेल.

असे लेख प्रकाशित करण्यामुळे काही पैसे मिळतात काय हो ? किंवा असे काम केल्यामुळे प्रसिद्धी व पैसा मिळतो का? कोण लीना ,ती उंच कि ठेग्नी,काळी कि गोरी,नकटी कि देखणी हे नावातून समजते का ?

मी स्वातंत्रदिनानिमित्त माझ्या शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजा विषयी माहिती देऊन होणारे विडंबन रोखले .तसेच स्वातंत्रदिनाच्या दिवशी एकत्रित झालेल्या जवळजवळ २०० पालकांना सुद्धा त्यादिवशी माहिती दिली.
येथे हे प्रकाशित करण्याचा हा उद्देश होता कि नेट माध्यमातून सुशिक्षित पालकांना माहिती मिळावी. हे मी माझ्या नावासाठी करत नसून राष्ट्र द्वाजाचे विडंबन रोखण्यासाठी करत आहे.

समानता म्हणजे चोरी हे प्रथमच मला मिसळपाव च्या माध्यमाने समजले.त्याबद्दल मी आपली आभारी आहे. मिसळपाव च्या लेखामध्ये एडीट करण्याची सुविधा दिसत नाही.असेल तर मला कळवावे. मी माझे नाव काढून टाकते किंवा व्यवस्थापकाने ते काढून टाकावे.

अरे, मी तर विसरले होते कि मी मराठी समाज्यामध्ये राहून राष्ट्रविकसन करण्याचा प्रयत्न करतेय.

कुणीतरी राष्ट्रध्वजाचे होणारे विडंबन रोखण्याचा मनापासून प्रयत्न करतंय, व प्रत्यक्ष कृती करतंय त्याला प्रोस्ताहन देण्यापेक्षा.....................

राष्ट्रध्वजाचे विडंबन रोखण्याचा छोटासा प्रयत्न का केला? आत्मिक समाधानासाठी, राष्ट्राविकासानासाठी, स्वातंत्र दिनानंतर हे प्रकाशित करण्याची काय गरज होती ?. जास्तीत जास्त लोकांना माहिती ह्वावी.

आपण असे म्हणता तर गांधीवादी ची ह्यामधील प्रतिक्रिया वाचा.वादविवाद करायचा असेल तर तो फार मोठा होऊ शकतो पण तसे करण्यात काही फायदा पण होणार नाही.

असे तुम्हाला वाटत असेल तर मी मिसळपाव च्या सदस्श न विनंती करते कि तुम्ही "प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज विक्रीचा विरोध" या विषयावर प्रत्येकाने लेख लिहावा व येथे प्रकाशित करावा.. विशेष करून अविनाश कुलकर्णी ,विशाल कुलकर्णी यांचा अभिप्राय प्रथम अपेक्षित आहे.

आज खरोखर मला मराठी समाजात जन्म झाला याचे दुःख होत आहे.

गांधीवादी's picture

15 Sep 2010 - 5:25 pm | गांधीवादी

अहो लीना ताई, एवढ्या छोट्या गोष्टी नका हो मनावर घेऊ.

चांगले विचार मांडणे नक्कीच स्तुत्य आहे, पण त्या विचारांवर प्रत्यक्षात काम करणे हे (त्याहून जास्त) वंदनीय आहे. कांचन कराई ताई ह्यांनी त्यांच्या ब्लोग वर त्यांचे विचार मांडून नक्कीच एक चांगले काम केले आहे, पण त्याहून पुढे जाऊन ते जनसामान्य माणसांपुढे, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आणण्याचे जे काम तुम्ही केले ते (माझ्या दृष्टीने) अधिक जास्त महत्वाचे वाटते.
आपण कांचन कराई ताई ह्यांच्या ब्लोग वरून प्रेरणा घेतली असेल तर त्या देखील स्तुतीस पात्र ठरतात. व त्यांच्या विचारांना कुठेतरी पाऊले फुटली हे बघून खरतर त्यांना आनंद होत असेल.

आपण दोघांनी असेच लिहित राहावे. मनोधैर्य वाढण्यास मदत होते.
आपल्या दोघांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
(फक्त पुढच्या लेखनासाठी कुठून प्रेरणा मिळाली ते लिहायला विसरू नका. आता कट्टी सोडून बट्टी करा बरं)

लीना सचिन चौधरी's picture

26 Sep 2010 - 6:13 pm | लीना सचिन चौधरी

तुम्ही उत्तर नक्की द्याल याची मला खात्री होती.
अहो आयुष्य निघून गेले तरी कोणाच्या नजरेस हे लेख (दोन्ही) पडणार नाही हेही तितकेच सत्य आहे.
शब्दांमध्ये निखारे असतात. शब्दांमध्ये बंद अण्वस्त्रेही असतात.पण शेवटी त्या शब्दातील भाव समजून घेणेही सगळ्यांना जमत नाही. प्रत्यक्ष कृती करून बघावी ते बोलण्यासारखी साधी गोष्ट नाही .

लीना सचिन चौधरी's picture

15 Oct 2010 - 3:12 pm | लीना सचिन चौधरी

जास्तीत जास्त लोकांना माहिती ह्वावी यासाठीच केलेला प्रयत्न
संदर्भ : कांचन कराई यांचे व http://padsaad.blogspot.com/2008/11/blog-post_06.html
http://marathiblogs.net/node/79396

मॅडम,

तुमच्या प्रतिक्रियेवर विषादाने हसावं की तुमच्या तकलादू स्पष्टीकरणाची कीव करावी, हे मला कळत नाही.

समानता! कुठला शब्द कुठे वापरताय? लेख जसाच्या तसा कॉपी करणं म्हणजे समानता? हा नवीनच अर्थ मला कळला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर निबंध लिहिताना वाक्यांमधे समानता येऊ शकते पण एकाचा निबंध दुसर्‍याच्या निबंधाशी वाक्य न् वाक्य तंतोतंत जुळणारा असला तर त्याला कॉपी म्हणजेच नक्कल म्हणतात आणि तसं होऊ नये म्हणूनच ना, परिक्षा सुरू होण्याआधी शिक्षक ’कॉपी करू नका’ असं विद्यार्थ्यांना बजावतात.

१. लोकमान्य टिळकांचा जन्म चिखली या गावी झाला.
२. लोकमान्य टिळकांचे जन्मगाव चिखली आहे.

वरील दोन वाक्यांतून समान घटना कळली पण ती वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांत लिहिली आहे म्हणूनच ती कॉपी नाही. माझ्या भाषेत मी ज्याला चोरी म्हणतेय, त्याला तुम्ही कॉपी म्हणत असाल, तर तुम्ही स्वत:च या लेखाखाली माझं नाव दिलं असतंत. महाजालावर एकाच गोष्टीची माहिती निरनिराळ्या साइट्सवर त्याच शब्दात मिळतंही असेल पण म्हणून तुम्ही माझा लेख कॉपी करून त्या कृतीला 'समानता' असं गोंडस नाव देण्याचं लायसन्स तुम्हाला कुणी दिलं?

असे लेख प्रकाशित करण्यामुळे कुणाला काय मिळतं, हे मला माहित नाही. मी तुम्हालाच विचारते - "माझ्या लेखाखाली माझं नाव न टाकता तुमचं नाव देऊन तुम्हाला काय मिळालं?’ मीही तेच म्हणते लेख कॉपी करताना कांचन कराई कोण, काळी का गोरी, हे तुम्हाला समजलं नव्हतं.

चोरी म्हणजेच समानता हा गैरसमज तुमचा आहे मॅडम. समानता म्हणजे चोरी असं मिसळपावने कधी शिकवलं नाही आणि मि.पा. कुणाला शिकवायला जातही नाही. उलट तुमच्यासारख्या लोकांमुळे हे संकेतस्थळ बदनाम मात्र होईल. लेख प्रकाशित करण्याआधी पूर्वदृश्य पहाण्याची सोय मि.पा. ने उपलब्ध करून दिलेली आहे, दुसर्‍याच्या लेखाखाली स्वत:चं नाव टाकताना लेख प्रकाशित होण्याआधी विचार करायचा होतात.

अरे, मी तर विसरले होते कि मी मराठी समाज्यामध्ये राहून राष्ट्रविकसन करण्याचा प्रयत्न करतेय.

तुमच्या या वाक्यातून नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही मराठीतून राष्ट्रविकसन करताय म्हणजे तुम्हाला उचलेगिरीची मुक्त परवानगी मिळायला हवी होती? की मराठी समाजाची राष्ट्रविकसन या शब्दाची व्याख्या समजून घेण्याची तयारी नाही? की राष्ट्रविकसन करणार्‍या लोकांसाठी ब्लॉगर्सनी त्यांचे लेख उचलेगिरीकरता राखून ठेवायला हवे होते?

समाजप्रबोधनाचं कार्य करा ना मॅडम. सारखं सारखं प्रत्यक्ष कृती, प्रत्यक्ष कृती काय म्हणताय? तुमच्या अखत्यारित जितकं होतं तितकं तुम्ही केलंत. एक सामान्य माणूस म्हणून इथे कितीतरी लोकं तुमच्यासारखंच राष्ट्रध्वजाचं विडंबन रोखतात, रस्त्यावर थुंकणा-या माणसांवर आक्षेप घेतात पण त्याचे पुरावे जपून ठेवत नाही कुणी. तुम्हाला प्रत्यक्ष कृती करण्याची संधी आणि मुभा मिळालीत म्हणून केलंत. पण प्रत्येकालाच तसं करता येतं नाही. प्रत्येकालाच मेधा पाटकर होता येईल का? तुम्ही राष्ट्रध्वजाचं विडंबन रोखलंत, त्याची माहिती तुमच्या शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना दिलीत, चांगलं कार्य केलंत. पण तुम्हाला आपण खूप ग्रेट काहीतरी केलंय, असं का वाटतं? या देशाचा नागरिक या नात्याने प्रत्येकाचंच कर्तव्य आहे ते. इंटरनेटच्या माध्यमातून सुशिक्षित पालकांना माहिती मिळावी असं वाटत असताना, ज्या व्यक्तीने हा लेख लिहिला, त्याचा नामोल्लेख करावासा आपल्याला वाटला नाही. पण ’हे मी माझ्या नावासाठी करत नसून राष्ट्र द्वाजाचे विडंबन रोखण्यासाठी करत आहे’, असं स्पष्टीकरण आपण केव्हा देताय तर माझा लेख स्वत:च्या नावावर खपवून झाल्यावर! सुशिक्षित लोकांना आणखी सुशिक्षित करताना आपण स्वत: मात्र अशिक्षितासारखं वागावं?!

गांधीवादी यांनी त्यांची या लेखावरची प्रतिक्रिया दिली. मला आता ती वाचायला सांगताय? अहो, तुम्हाला ती प्रतिक्रिया झोंबली, उत्तर देता आलं नाही आणि आता मूळ लेखक आला म्हटल्यावर तुम्ही अंग काढून घेताय. सुंदर! आणि पुन्हा मि.पा.जे सदस्य साहित्यचोरी विरोधात प्रतिक्रिया देतील त्यांना नवीन लेख लिहायला अप्रत्यक्षरित्या चिथवायचं?!

मराठीत समाजप्रबोधन म्हणजे काय धूमकेतू सारखं दुर्मिळ आहे का काही? मराठीत तुमच्या आधी समाजप्रबोधन करणारं कुणी नव्हतं की काय? तुमचा जन्म मराठी समाजात झाला याचं मलाही दु:ख आहे.

आपले विचार कळले. आयुष्य निघून गेले तरी कोणाच्या नजरेस हे लेख (दोन्ही) पडणार नाही हेही तितकेच सत्य आहे. माझा लेख चोरी करताना हाच विचार डोक्यात होता काय?

आता तुम्हाला मी जे सांगतेय त्याचं कारण तुम्ही शिक्षिका आहात.

गेल्या एका वर्षात मराठी ब्लॉगिंग विश्वात साहित्यचोरीच्या केसेसमधे भर पडली आहे. केवळ मीच नाही तर अनेक ब्लॉगर्सना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी समज देऊन काम होत असे, आता मात्र साहित्यचोर निर्ढावले आहेत. आम्हीच आमच्या लेखांची काळजी नाही घेतली तर उद्या आमचेच लेख समाजप्रबोधक लेख म्हणून आम्हाला पाठवले जातील.

आपण माझ्या ब्लॉगवरच्या लिंक्स वाचल्यात की नाही हे मला माहित नाही पण एक आठवडा स्वत:ची वैयक्तिक कामं बाजूला ठेवून एका साहित्यचोराच्या मागे मला हात धुवून लागावं लागलं. त्यासंदर्भात मला एक स्वतंत्र पोस्ट लिहावी लागली. आपण जे केलंत तेच त्या साहित्यचोरानेही केलं होतं. त्याच्या आईवडीलांना या प्रकरणात त्रास होऊ नये म्हणून मी अजूनही पुढच्या कारवाईकडे लक्ष देत नाहीये. याचा अर्थ असा नाही की मी त्याला सोडून दिलं.

ब्लॉगरने वेळ आणि बुद्धी खर्च करून लेख लिहायचा आणि तो कुणा तिर्‍हाईताने स्वत:च्या नावावर खपवायचा, हे यापुढे चालणार नाही. मग ब्लॉगरला त्या लेखाचे पैसे मिळोत अगर न मिळोत पण याच्यापुढे कुठल्याही साहित्यचोराची मराठी ब्लॉगर्सकडून हयगय केली जाणार नाही. ही हवंतर वॉर्निंग समजा. तुम्ही मराठी आहात म्हणून घाबरायचं की नाही, हा तुमचा प्रश्न.

तुमचं समर्थन अत्यंत तकलादू आणि निष्फळ आहे. आज माझा लेख चोरी करून त्याला समानता हे निरर्थक नाव देता, उद्या दुसर्‍या कुणाचा तरी लेख कॉपी कराल!

आपण ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे अध्यापिका म्हणून काम करता. लेखाखाली स्वत:चं नाव देताना शाळेचंही नाव दिलं आहे. श्री. मनोज देवळेकर यांना त्यांच्या शाळेतील शिक्षिका शाळेबाहेरही समाजप्रबोधनाचं काम किती जोमाने करताहेत हे मी सांगावं का?

पिंगू's picture

16 Sep 2010 - 6:31 am | पिंगू

लीना ताई,

तुम्ही लिहिलेला लेख आणि कांचनताईने लिहलेला लेख तंतोतंत कसा बरे जुळला? अहो समाज प्रबोधन ही एक चांगली गोष्ट आहे. पण ती करताना तारतम्य बाळगायला हवे...

- पिंगू

इंटरनेटस्नेही's picture

27 Sep 2010 - 12:36 am | इंटरनेटस्नेही

शिव शिव शिव!

(विद्यार्थी)

आंसमा शख्स's picture

27 Sep 2010 - 9:34 am | आंसमा शख्स

काय वाचायला आलो आणि काय वाचायला मिळाले. भलतेच झेंडे फडकलेले इथे.

रुमुझ ए बेखुदी

लीना सचिन चौधरी's picture

27 Sep 2010 - 11:35 am | लीना सचिन चौधरी

गीता वचनाची आठवण झाली.पण लिहिण्याचे धाडस होत नाही .प्रश्न पडलाय, संदर्भ कुणाचा द्यावा.

त्याबरोबर आठवण झाली या वाचनाची “शिक्षण पन्नास वर्षानंतर” .

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-4469194,prtpage-...

येथे सर्वच वयोगटातील लेखक, स्वतःचे लेखन करतात. साहित्य लेखनातील अजाणता मुळे व अविचाराने केलेलं लेखन यामुळे कुणावर मूळ लेखकाच्या आगीत होरपळण्याची वेळ आली तर ?

आंसमा शख्स's picture

27 Sep 2010 - 12:28 pm | आंसमा शख्स

अरेरे, लिनाबाई,
हे बरे नाही केलेत.
मखलाशी करू नका!
तुम्ही असेही म्हणू शकला असता
"कांचनताई तुमचा लेख वाचून मला माझ्या मनातल्या भावना कुणीतरी उतरवल्या सारखे वाटले. तुमचे शब्द अगदी माझेच वाटले. मी हा लेख माझ्या शाळेतील प्रबोधनासाठी घेऊ का?
लेख मुलांसाठी घ्यायचा झाला, तर त्यात काय सुधारणा तुम्हाला सुचतात?"

किंवा सरळ असेही म्हणता आले असते की "क्षमा करा चुकले!"
स्वत: लिखाणाचे मनावर घेऊन वेगळा लेख लिहून दिला असता तर ते जास्त योग्य दिसेल.

तुम्ही सरळ कबुली दिली असती तर बरे झाले असते.
यातून कांचनताईंचा त्रास वाचला असता. तुमचा मनस्ताप वाचला असता आणि तुम्हाला काही तरी भक्कम सुधारणा केल्याचे समाधान लाभले असते.

छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके
बात अजब कह दीनी रे मोसे नैना मिलाइके
- आमीर खुस्रो