प्लास्टिक आणि कागदी राष्ट्र ध्वज विक्रीचा विरोध
प्लास्टिक आणि कागदी राष्ट्र ध्वज विक्रीचा विरोध
15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन व २6 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या हर्षोल्हासाने साजरा करीत असतो. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले तर काहींना घरदार सोडावे लागले आहे. आजही जेंव्हा आपण सुखाने झोपलेलो असतो, आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करत असतो, तिकडे सीमेवर आपल्या रक्षणासाठी कोणीतरी रात्रंदिवस पहारा करत असतं.
मात्र गेल्या काही वर्षापासून आपल्या देशाचे मानचिन्ह 'तिरंगा' झेंड्याची अवहेलना होत असल्याचे दिसत आहे.
दरवर्षी आपल्या देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिनी व स्वतंत्रता दिनी अगणित प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांची विक्री होत असते. लोक अतिशय उत्साहाने ही खरेदी करतात मात्र दुसर्याच दिवशी हे राष्ट्रध्वज केविलवण्या परिस्थितीत रस्त्यात इतस्तत: पडलेले असतात. सार्वजनिक सफाई कामगाराव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणी वळुन पाहणण्याचेही कष्ट घेत नाही. आपल्याच राष्ट्रध्वजाची अशी उपेक्षा या स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून आपल्याला शोभते का?
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करता येणार नाही, या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाला लाथाळून सर्रासपणे असे ध्वज तयार केले जात असून भारतीय जनता आपल्या मुलांना त्या ध्वजाचे महत्त्व न सांगता त्यांना खुशाल असे प्लास्टिकचे ध्वज खरेदी करून देत असतात. मुले तर मुलेच ना, त्यांना या ध्वजाचे महत्त्व माहित नसल्याने त्यांच्याकडून अशा चूक होणारच. परंतु पालकांनी सजगता दाखवून अशी प्लास्टिकचे ध्वज खरेदी करू नयेत. तरच त्याचे उत्पादनाला आपोआप खिळबसेल.
या देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक बानविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.
आपण प्रजासत्ताक व स्वतंत्र राष्ट्र आहोत याचा जल्लोष मांडून झाल्यावर त्याच राष्ट्रध्वजाला, पायदळी तुडवतना, कचरयाच्या पेटीत टाकताना आपल्याला काहीच वाटत नाही?
रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नलाच्या कडेला हे ध्वज विकणारी मुले, ते गरज म्हणून विकतात पण आपण ते काय म्हणून विकत घेतो?
क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांकडूनही आपल्या ध्वजाचा अवहेलना केली जाते. त्यांना तोंड व परिधान केलेल्या कपड्यावर तिरंगा रंगवून घेतांना काहीच कसे वाटत नाही. याचे आश्चर्य वाटते. आपण सांगा हे कितपत योग्य आहे. ध्वजाला कपड्यावर नाही तर मनावर स्थान पाहिजे. आणि ते आपल्या कर्तृत्त्वातून जाणवत.असते.
फाटलेला किंवा मळलेला राष्ट्रध्वज वापरु नये, याची सर्वांनाच कल्पना आहे, असायलाच हवी. मात्र फाटलेला किंवा मळलेला राष्ट्रध्वज पुर्णत: नष्ट कसा करावा याची किती लोकांना माहिती आहे?
स्वतंत्र भारतात आपल्याला श्वास घेता यावा म्हणून कित्येकांनी आपल्या आयुष्याची होळी केली आहे. आपल्या घराची समृद्धी या देशासाठी त्याग केला आहे. त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची परतफेड आपण अशा प्रकारे करणार आहोत का?
अशा प्रकारे ध्वज विकत घेऊन त्याची उपेक्षा करण्यपेक्षा, तो न विकत घेता, खरंतर तो विकण्यावरच आक्षेप घेऊन स्वत:ला या देशाची नागरिक म्हणवणं मी जास्त पसंत करीन.
यापुढे प्लास्टिक आणि कागदाच्या राष्ट्रध्वजविक्रिसाठी मी आक्षेप घेणार आहे. जिथे जिथे मला अशा प्रकारची विक्री होताना आढळेल, तिथे तिथे मी स्वत: जाउन लोकांना असे ध्वज खरेदी न करण्याविषयी आवाहन करणार आहे.
स्वत:च्या देशाचा मानसन्मान कायम राखाण्याकरिता तुम्ही काय करणार आहात?
सौ. लीना सचिन चौधरी (अध्यापक)
ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी (गुरुकुल विभाग)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेख खूप चांगला आहे.
या वर्षीच्या स्वातंत्रदिनी,
नमस्कार मॅडम
कपड्याचे जीर्ण झालेले ध्वज काय करतात.
>>वजन किंवा रेतीत बांधून
ठ्ठॉ ...
मग प्लास्टिकचे ध्वज देखिल त्या पध्दतीने नष्ट करु शकतो ना?
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या
..
सुंदर....
माहिती बद्दल धन्यवाद...
लीना मॅडम चोरी का करता?
लीना मॅडम तुमचा हेतु स्तुत्य
...
आणि याच लेखाची आणखी एका
...
समानता म्हणजे चोरी
अहो लीना ताई, एवढ्या छोट्या
तुम्ही उत्तर नक्की द्याल याची
जास्तीत जास्त लोकांना माहिती
मॅडम, तुमच्या प्रतिक्रियेवर
ठकू ताईशी सहमत
शिव शिव शिव! (विद्यार्थी)
काय
गीता वचनाची आठवण झाली.पण
अरेरे