माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मिपाला नुकतीच ३ वर्षे झाली . माझ्याही आत्तापर्यंतच्या वाटचालीत मिपाचा फार मोठा वाटा आहे .. म्हणुन हा लेख मिपाला आणि मिपाकराना अर्पण .....
भवताल ..
परवा कॉलेजच्या गणपतीच्या मिरवणूकीत तीन तास नाच नाच नाचलो खरं, पण नंतर माझाच माझ्यावर विश्वास बसेना.. कधी काळी मिरवणूकीत साधा सहभागीही न होणारा मी, पण भवतालचा माहौलच असा होता की, You have to rock .. आणि एकदम डोक्यात सणक गेली . अरे आपला भवताल आपल्या नकळत आपल्यावर कीती अफेक्ट करतो. नाही का ? युरेका! युरेका !! माझ्या बर्यापचशा प्रश्नांची उकल झाली ना भाऊ..! काही गोष्टी , ज्यांची उत्तरच सापडत नव्हती , हळु हळु समजु लागल्यात !!
गोष्ट फार पूर्वीची नाही.. सकाळी सकाळी नॅशनलला कार्यक्रम लागायचा.. 'सुबह सवेरे' ,त्यात एक गाणे लागायचं.. जोशमधलं.. ते गाणं आजपण ऐकतो. पणं आत्ता सकाळी नॅशनल लावलं जात नाही. चॅनल्स वाढलीत.. झगमगाटीची सवय झाली.. कोणत्या रिऍलिटी शो मध्ये काय चालू आहे त्याची चर्चा सुरू झाली आणि त्यात असं काही खरं खुर नकळत मागं पडलं.. आय थिंक सुरभीचे पण एक-दोन एपिसोड बघितलेत मी.. पण आता कोणीच एवढं निरागस नाही राहीलं. ना मी, ना टीव्ही कोणीचं.. आणि जाणूनबुजुन नाही., आपोआपं. मालगुडी डेज चे व्हिडिओज दिसत असुनही लावले जात नाहीत ते यासाठीच वाटत !!
हा, हा, हा.. आत्ता मलाच हसू येतयं. अगदी परवापर्यंत मी कोणत्या मुलीशी बोलायला घाबरायचो. आजकाल बिनधास्त बोलतो. साला त्या फेसबुकने तर माझ्या नकळत माझी जिंदगीच बदलली. भाषा, पेहराव.. होल चेंज. आत्ता कोणाला तरी मला 'हाय' चे स्पेलिंग hiee नसुन hi असते असे सांगायला लागले नाही. म्हणजे मिळवले. एक साईट, सहा महिन्यांचा काळ.. but, what a effect.. Awsome..
'
'नाटय महोत्सवाचा एक इव्हेंट''.. काय शिकवलं नाही त्यानं? अवघे 15 दिवस - पण 15 वर्षातही जे शिकता येणार नाही ते शिकविलं.. कोल्हापूरचीच नवी ओळख झाली. जगण्याचा ऍंगलच बदलला राव! एका दिवशी अचानक ''साधना'' चे ऑफिस समोर दिसते. मी आत जातो, 'विनोद शिरसाठांची भेट होते आणि माझे लिखाणच बदलते. एक माणूस, 5 मिनीटे,.... ओह! अनबिलिव्हेबल !!
अरेच्या, केवढं काय काय आठवतयं मला आज .. हम्म, जरा थांबायला, मागं बघायला वेळ मिळालायं.. खुप बदल जाणवताहेत.. माझ्या नकळत झालेले.. माझ्या आजुबाजुच्या गोष्टींनी माझ्यात केलेले .. हिंदी बोलताना माझ्यात आमच्या दुबे सरांचा टोन जाणवतो... होनगेकरांची दोनच लेक्चर्स झालीत.. पण, त्यांची स्टाईल माझ्या नकळत कॉपी होतेय..
काय ना काय? किती छोटया गोष्टी.. पण, फार परिणाम करतात. माझेच नाही, सगळयांचेच होत असावे असे. माझा एक मित्र .. पुण्याला गेलाय.. परवा फोन केला.. तोंडात शिवी ''आईच्या गावात'' .. कधीकाळी ''रां*च्या'' म्हणायचा.. गाव बदलं की शिव्यापण बदलतात तर! २० दिवसातला बदल ..अजुबाजुचे जरा काही बदलले की किती बदलतो आपण .. अगदी क्वचित हातातले पेन बदलले तरी लिहिताना त्रास होतो .मराठी गाण्याचा माझ्यासारखा फॅन असला की २- ४ दिवस सलीलचे गाणे ऐकले नाही की काही वेगळेच वाटते .
हम्म..आपण म्हणतो मी स्वत:ला घडवतो, नाही, नाही! आजुबाजुचा भवताल तुम्हाला, मला घडवतो. आपण फक्त प्यादे असतो. कुठं जन्मायचं ते आपल्या हातात नसतं .. पटावरल्या कोणत्या पोझिशनवर आपण असणार हे माहित नसल्यासारखं.फक्त मित्र वगैरे चुज करण तेवढे हाती , कोणत्या घरात पाऊल टाकायचे तसे .... तसं, मी जे म्हणतोय ते अनुभव काही नवे नाही आहेत.. बरेच विचारवंत म्हणून गेलेत की समाज तुमच्यावर अफेक्ट करतो.. बरोबर आहे, पण पर्टीक्युलरली भवताल.. कडेला पडलेले आय पॉड सारखे एखादे छोटेसे गॅजेट असो वा एखादा थोडाच वेळ भेटणारा माणूस.. It changes us .. भवताल .. आज आपला भवताल बदलतोय झपाट्यान आणि म्हणुन आपणही .. मीच बघा ना २ वर्षापुर्वी काहीही न लिहिणारा आज असे काही लिहायला लागलोय .. बदलणारी स्थिती आणि त्यामुळे बदलणारे आपण सारे...
बाकी विचारवंतांच्या ऍंगलने विचार केला तर, नेहमीप्रमाणे बरेच पॉईंट सापडतात. की बाबा रे, तरूणाईच्या बाबतीत या भवतालचा तेवढा विचार होत नाही. तरूणाईचा विचार करायचा असेल तर याच्या जरा जास्तच खोलात जायला हवे. कारण, मी सेकंदभरात ने खर कुठे क्लिक करतो. ती क्लिक माझी पर्सनॅलिटी डिसाईड करते. कडेला पडलेला मोबाईल, आय-पॉड ,माझे खरे आणि व्हर्चुअल मित्र हे आजुबाजुचे छोटेसे घटक माझ्यावर सर्वात जास्त अफेक्ट करतात..ब्ला .. ब्ला...ब्ला..
हुश्श.. केवढे ते फॅक्टर्स.. पण, थोडक्यात एवढेच की हा भवताल आपल्या नकळत आपल्याला घडवतो. It moulds us … आणि, तो भवतालच आता प्रचंड वेगाने बदलतोय.. आजची एक पीढी 5 वर्षाची आहे फक्त .. दर सेकंदाला जग बदलतयं आणि त्यामुळेच तुम्ही, मी आणि आपण.. आपले जग तांत्रिक आहे , विज्ञानाचे आहे .. आणि या माहितीचे आहे . म्हणुनच या महापुरात आपण कुठे जाणार ते कळत नाहीये... असुदेत की.. जाऊ दे कुठेही .. we will face it... आपल्या मनाला जीवंत ठेवता आलं... कान, डोळे उघडे ठेवता आले आणि स्वत:ला टिपता आलं की सगलंच बदलत .. नेटवर तास तास टाइमपास करताना कोणाकडे असाच मराठी रॅपरचा व्हिडिओ सापडतो आणि दिवस बनुन जातो .. अगदी तसं .. एवढे असले की या छोटया छोटया गोष्टी, हे भवताल आणि जग आपल्यालाच खेळायला दिलेलं अंगण आहे, नाही का?
प्रतिक्रिया
13 Sep 2010 - 1:08 pm | परिकथेतील राजकुमार
भिड रे विन्या,
भाड्या एकदा पुण्यात आल्याबरोब्बर किती बदललास बघ ;) आता पुढच्यावेळी आलास की तुला टेबललाच घेउन बसतो म्हणजे अजुन सुधारशील.
बर आता खरा प्रतिसाद :- ते इंग्रजी शब्द टाळता आले असते तर अजुन छान झाला असता लेख. इंग्रजी शब्द वापरले की मगच तो लेख तरुणाईचा वगैरे होतो असे काही नाही. काही इंग्रजी शब्द लेखनाच्या ओघात आल्याने खटकत नाहीत मात्र काही शब्द उगाच आणुन पेरल्यासारखे वाटतात.
बाकी लेख उत्तम. इनायक आणि इनायकाचे विचार-लेखन-वाचन-वागणे आता सगळेच सुधारले आहे असे म्हणायला हरकत नाही.
खुप दिवसांनी लिहिल्यामुळे तुझे अभिनंदन :P
13 Sep 2010 - 1:36 pm | विनायक पाचलग
साक्षात परासाहेबांचा प्रतिसाद .. मन भरुन आल ;)
जाता जाता - आपल्या मागणीप्रमाणे हे मिपासाठी ओरिगिनल लिहिले आहे
ते ईंग्लिश शब्द म्हणजे कॉलेज मध्ये इंग्लिश बोलण्याचा परिणाम आहेत ...
असो
धन्स
13 Sep 2010 - 5:45 pm | धमाल मुलगा
आता साक्षात पर्यानंच आमच्या तोंडची वाक्यं पळवली म्हणल्यावर आम्ही काय बुवा, नि:शब्दच.
छान छान...विन्या, उत्तम आहे बदल..भवताल चांगलंच मानवलेलं दिसतंय... शुभं ताल भव! ;)
अवांतरः इतका नको रे इच्चार करुस!
13 Sep 2010 - 1:11 pm | विनायक प्रभू
याद राख परा.
पोराला ग्रॅज्युअली ग्रॅज्युएट होउ दे.
घाई करु नकॉ हां
13 Sep 2010 - 1:17 pm | विनायक प्रभू
ताल ठीक.
"भव " सांभाळा बर का?
13 Sep 2010 - 3:27 pm | इन्द्र्राज पवार
"कुठं जन्मायचं ते आपल्या हातात नसतं .. पटावरल्या कोणत्या पोझिशनवर आपण असणार हे माहित नसल्यासारखं.फक्त मित्र वगैरे चुज करण तेवढे हाती..."
~~ फार सुंदर आणि समजूतदारपणाचे हे वाक्य वा कबुली आहे. या मुक्तकात व्यक्त झालेली भावना हाच विचार अधोरेखीत करते की, माहितीच्या या वेगवान धबडग्यात स्वतःला न विसरता आजुबाजूला बदलत चाललेल्या परिस्थितीशी, मित्रांना/सहविचारी लोकांना/हितचिंतकाना घेऊन, कसे जुळते घ्यायचे. तसेच त्यातदेखील स्वतःची आयडेंटिटी कशाप्रकारे स्थापन करायची इतपत समज मनी ठेवली की, येणार्या प्रपाताला थोपवण्याचा प्रयास करण्यापेक्षा त्यातीलच एक बिंदू बनून त्या प्रपाताची भव्यता आपल्या अंगी आणण्यासाठी आणखीन किती पावसाळे काढले पाहिजेत, याचा लेखाजोखादेखील या निमित्ताने काढता येतो !
श्री.श्री.ना.पेंडसे म्हणायचे, "कारकुनी माझ्या नशिबी आली हे काही माझ्या हाती नव्हते, पण कारकुनासारखे जगायचे नाही, हे तरे माझ्या हाती आहे ना..?" बस्स समजुतीची हीच गुरुकिल्ली आहे आणि श्री.विनायकराव म्हणतात त्याप्रमाणे, "आपल्या मनाला जिवंत ठेवता आलं... कान, डोळे उघडे ठेवता आले आणि स्वत:ला टिपता आलं की सगलंच बदलत.....". सर्वात विशेष म्हणजे हे समजण्यासाठी कुठल्या आयआयटी वा आयआयएम वा गेला बाजार सिम्बॉयॉसिसची शिकवणी लावण्याची आवश्यकता नाही.
सणासुदीप्रसंगी भोजनाचेवेळी धाकट्या बहिणीने ताटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढलेली असते, त्यामुळे स्वयंपाकघराला एक देखणेपण येते. पण म्हणून जेवून उठताना जेवणार्याने फक्त रांगोळीचे कौतुक करून उठायचे नसते तर त्याचबरोबर सुग्रास जेवण करणार्या वहिनीच्या हाताचीदेखील दोनचार शब्दात वाखाणणी केली तर दोन्ही गोष्टी घराच्या 'शुद्ध कल्याण" रागाला पूरकच ठरतात. हा "भवताल" आपल्या घराला खर्या अर्थाने घरपण देतो. श्री.पाचलग म्हणतात "आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी...." तथापि ह्याच किती हिरकण्या आहेत हे फक्त तो जाणू शकतो जो "कशासाठी पोटासाठी...." करीत घराच्या मंजुळ गाण्यापासून दूरवर फेकला गेलेला आहे.
धन्यवाद विनायका या आनंदलहरीसाठी !!
इन्द्रा
13 Sep 2010 - 3:54 pm | शुचि
नेहेमीप्रमाणे सुंदर प्रतिसाद.
13 Sep 2010 - 6:28 pm | इन्द्र्राज पवार
थॅन्क्स शुचीताई....प्रतिसादालाही दाद देण्याची तुमची ही वृत्ती मन हर्षभरीत करून जाते.
इन्द्रा
13 Sep 2010 - 7:15 pm | विनायक पाचलग
त्यापेक्षा इतक्या अत्युत्तम प्रतिसादासाठी आपले आभार :)
13 Sep 2010 - 4:00 pm | शुचि
लेख आवडला.
>> आजुबाजुचा भवताल तुम्हाला, मला घडवतो. आपण फक्त प्यादे असतो. कुठं जन्मायचं ते आपल्या हातात नसतं .. पटावरल्या कोणत्या पोझिशनवर आपण असणार हे माहित नसल्यासारखं.फक्त मित्र वगैरे चुज करण तेवढे हाती >>
नियती (डेस्टिनी) आणि स्वतन्त्र इच्छाशक्ती (फ्री विल) या दोन्ही प्रत्येकाच्या नशीबी येतात.
मित्र निवडणं ही गोष्ट्च "फक्त" नसून तारक अथवा मारक असते.
>> तरूणाईच्या बाबतीत या भवतालचा तेवढा विचार होत नाही. तरूणाईचा विचार करायचा असेल तर याच्या जरा जास्तच खोलात जायला हवे >>
हा मुद्दा खरच लक्षात घेण्याजोगा आहे.
13 Sep 2010 - 4:08 pm | जागु
लिखाण आवडले.
13 Sep 2010 - 5:17 pm | मितान
खूपच छान स्वगत !
भवताल एकदम तालासुरात मांडलाय :)
13 Sep 2010 - 6:09 pm | भडकमकर मास्तर
बदल भरपूर जाणवतोय....
हा लेख आवडला रे....
( ते शिव्यांचे निरीक्षण मस्त)..
13 Sep 2010 - 6:56 pm | वेताळ
नव्या पोरी म्हटले कि आपोआप टॅलेन्ट जागे होते .बाकी लेख छानच.
13 Sep 2010 - 7:15 pm | विनायक पाचलग
;) ;) ;)
13 Sep 2010 - 7:43 pm | बिपिन कार्यकर्ते
विन्या, लेख वाचला नाही पण वरवर बघितला. आणि खाली साक्षात पराची कॉमेंट बघितली. आनंदाने ऊर भरून आला. ;) तुझ्यात बदल होतोय आणि तो नक्कीच स्वागतार्ह आहे. जस्ट कीप इट अप.
आता थोडेसे अवांतर:
आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो की तुला पराला भेटायचा सल्ला मी अगदी आपण प्रथम भेटलो तेव्हाच दिला होता. आठवतंय का? :) आणि लेखनातले बदलही सुचवले होते.
शिवाय, तू इथे नवीन असताना तुझ्यावर खूप टीका झाली, चेष्टा झाली, तुलाही वैफल्य वगैरे आले आणि तू सोडून जायची भाषाच केली नाहीस तर गेलासही. पण तरीही तुला परत यावेसे वाटले. उशिरा का होईना पण तुला इथल्या लोकांचे तुझ्या भल्यासाठीच हे सांगणे आहे हे पटले. त्यावेळीही कंपूबाजीचे आरोप झाले, तुला उचकवायचे प्रयत्न झाले. पण तथाकथित कंपुबाजांनी तुझी फक्त चेष्टाच नाही केली तर तुला खरंच मनापासून मदतही केली. (ते कंपुबाजीचे आरोप करणारे कुठे आहेत हो आता? ;) ) असो. आतातरी कंपुबाजी वगैरे आरोप होऊ नयेत.
मिपाशी तू कृतज्ञ आहेस हे बघून खरंच बरं वाटलं.
बाकी पराने दिलेल्या सूचनांशी सहमत.
- (विन्याच्या भवतालातला)
14 Sep 2010 - 11:29 pm | विनायक पाचलग
१०० % सहमत
13 Sep 2010 - 7:54 pm | गोगोल
केवढा प्रचंड फरक पडलाय तुझ्या लेखनात.
चांगला लेख. कीप इट उप.
14 Sep 2010 - 6:01 am | सहज
पुन्हा एकदा ह्या गाण्याची आठवण झाली.
14 Sep 2010 - 8:42 am | स्पंदना
धन्य रे विनायक!
कोणाचाही हातभार असो पण परिपुर्ण हो!
लेख अतिशय ओघवता, अन तरुणाई दर्शक घोंगावणारा देखिल !
14 Sep 2010 - 11:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
चांगलं लिहीलं आहेस रे! आधीच्या कोल्हापुरी दादापेक्षा आताचा तरूण विनायक पाचलग झालेला जास्त आवडला. अजून फक्त एक सूचना, इंग्लिश शब्द आणि विरामचिन्हांचा वापर कमी कर; लिखाण आणखी सुटसुटीत आणि वाचनीय होईल.
14 Sep 2010 - 11:31 am | इन्द्र्राज पवार
"....आधीच्या कोल्हापुरी दादापेक्षा...."
~~ अदितीची ही गुगली समजली नाही. अशा नावाने श्री.पाचलग यांचे अगोदरचे सदस्यत्व होते का?
बाकी मराठी लिखाणातील 'इंग्रजी' शब्दांच्या ज्यादाच्या वापराबद्दल व्यक्त केलेल्या मताला पाठिंबा. मराठी भाषेचे दालन खूपच समृद्ध आहे आणि विनायकरावांच्या लेखणीतून त्यांचा आविष्कार सुयोग्यरितीने होईल असेच त्यांच्या लेखनाची ताकद कळविते. शुभेच्छा !
इन्द्रा
14 Sep 2010 - 11:31 pm | विनायक पाचलग
दादा , खुप मोठा इतिहास आहे या नावाचा ...
सवड मिळेल तेव्हा टाका नजर ....
बाकी ,ते ईंग्लिश शब्दांबाबत नक्की बदल करतो ..
15 Sep 2010 - 2:09 am | चतुरंग
तुझ्या मनात विचार घोंघावताहेत..सगळे तुला पकडता आले नाहीयेत..तसं बर्याचदा शक्यही नसतं म्हणा.
लिखाणात निश्चित बदल आहे. लिहिता राहा. तुझा तुलाच सापडत जाशील.
(अवतीभवतीचा)चतुरंग