सखा राजगड : भाग -२

जिप्सी's picture
जिप्सी in जनातलं, मनातलं
7 Sep 2010 - 2:03 am

पहिला भाग

------------------------------------------------

कशा ना कशावर बसून संक्रांत येते,रथसप्तमीपासून सुर्यनारायण आपल्या घोड्यांचा वेग कमी करतात,दिवस लांबडा होत जातो आणि रात्र आकसत जाते. गडावरचं गवत आता पिवळं पडायला लागतं,सगळ्या पायवाटा अगदी लख्ख दिसायला लागतात. उन्हं कळाकळा तापायला लागतातं,मधूनच एखादी वावटळ येते,गवत्,काडी-कचरा आपल्याभोवती भोवर्‍यासारखी गरागरा फिरवते.दिवसभर अंगाची अगदी काहीली होते,संध्याकाळमात्र थंडगार वार्‍याच्या झुळका घेउन येते.
यावेळी आपण बालेकिल्ल्यावर असावं,तोरण्यामागं बुडणारा सुर्यनारायण इथंनं बघावा,संधीप्रकाशात घटकाभर तिथंच बसून रहावं आणि मग मुक्कामावर यावं. अगदी पहाटे उठून बालेकिल्ल्याच्या दरवाज्यापाशी यावं,समोर सुवेळीच्या मागं उगवणारा सुर्य बघावा आणि अगदी हरखून जावं.

सुर्योदयाच्या वेळी सुवेळामाची

सुर्योदय
वैशाख सरत येतो,परत पावसाची चाहूल लागते,तसा तो अधून मधून आपले चौघडे ताशे वाजवत असतोच.मृगाच्या आसपास संध्याकाळी बालेकिल्ल्यावर यावं, तोरणा आणि राजगडाच्या मधल्या डोंगराच्या धारेवरून ढ्गांची लाट हळुवार फुटत असते. धुपाचा धूर संथपणे पसरावा तसे ढग फुटत असतात्,पसरत असतात. तोरणा ढगांचच मुंडास डोक्याला बांधून असतो. त्यातूनसुद्धा त्याची बुधलामाची अधनंमधनं डोकावत रहाते.एकाएकी तोरण्यावरचे ढग पांगतात आणि सुर्यनारायण बुडताना दर्शन देतो.

ढगांच मुंडासं बांधलेला तोरणा


ढगांच्या फुटणार्‍या लाटा आणि तोरण्यामागे बुडणारा सुर्य
पुन्हा एक ऋतूचक्र सुरू होतं,या सगळ्या ऋतूत राजगड पुन्हा-पुन्हा बघायचा आणि अनुभवायचा. राजगड म्हणजे एका दिवसात उरकणारी गोष्टच नाही. इथं यायचं ते २-३ दिवस मोकळे काढूनच आणि जाताना हृदयात भरून न्यायचा राजगडाचा सहवास !
असा माझा सखा, राजगड !

मुक्तकआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

7 Sep 2010 - 2:24 am | इंटरनेटस्नेही

सुरेख! जियो!

पहिल्या भागाचा धागा कसा जोडायचा?

मेघवेडा's picture

7 Sep 2010 - 2:48 am | मेघवेडा

कातिल फोटु आहेत!

असुर's picture

7 Sep 2010 - 3:26 am | असुर

ख ल्ला स!!!

फोटू जबरा हायेत बरं!

आणि ओ जिप्सीभौ, जरा सढळ हाताने फोटू सोडा की राव! काय आपले नमनाला २-४ फोटूचे शिंतोडे उडवले आणि पोवाडा सुरु व्हायच्या आधीच पडदा पाडून दिला की!
जरा निवांत, पद्धतशीर येऊ द्या की! २-३ दिवसांची राजांच्या गडाची गोष्ट आम्हाला पन ऐकायची आहे. लिवा की दमानं!

येऊंद्या आजून आनि आजून भारी!

--असुर

स्पंदना's picture

7 Sep 2010 - 8:32 am | स्पंदना

___/\___!!!

पैसा's picture

7 Sep 2010 - 8:56 am | पैसा

पण एवढेच का?

दुसऱ्या फोटोमध्ये कोणी तपस्वी आपला तेजोमय आत्म्याला साक्षी ठेवून वंदन करत असल्याचा भास होतोय. अत्यंत सुरेख.

जिप्सी's picture

7 Sep 2010 - 10:02 am | जिप्सी

पैसाभाऊ:-आहो पहिला भाग लिहून झालेला आहे, पण त्याची लिंक कशी द्यायची हेच माहीत नाही,त्यामुळं देता नाही आली. त्यामुळ तुम्ही पहीला भाग शोधून वाचा म्हणजे वाचताना लिंक लागेल.

असुरदादा :- फोटो न टाकायचे कारण म्हणजे, आळस बाकी काही नाही. माझ्याकडं राजगडाचे सुमारे १०००+ फोटो आहेत्,त्यातून फोटो शोधा,पिकासावर चढवा मग ले़खाला जोडा फार व्याप आहे. आता लौकरच राजगडावरच एखादा फक्त फोटो स्पेशल लेख टाकतो. खास आपकी फर्माइश !

आपर्णाताई :- ___/\___!!! म्हंजे काय हो? नेहमी बर्‍याच प्रतिसादात बघतो पण अर्थ माहीत नाही.

इरसाल :- अहो खरच की! मला एवढे वेळा फोटो बघून पण हे कधीच सूचलं नव्हतं! तुम्ही तर फोटोला एकदम अध्यात्मिक उंचीवर वगैरे नेऊन ठेवलं.

बाकी सगळ्यांचे आभार !

विलासराव's picture

7 Sep 2010 - 10:24 am | विलासराव

पैसाभाऊ:-आहो पहिला भाग लिहून झालेला आहे, पण त्याची लिंक कशी द्यायची हेच माहीत नाही,त्यामुळं देता नाही आली. त्यामुळ तुम्ही पहीला भाग शोधून वाचा म्हणजे वाचताना लिंक लागेल

पहिली गोष्ट त्या पैसाताई आहेत माझ्या माहितीप्रमाणे.

पहिल्या भागाची लिंक ही घ्या
http://www.misalpav.com/node/14188

पैसा's picture

7 Sep 2010 - 10:41 am | पैसा

+१

विलासराव's picture

7 Sep 2010 - 10:38 am | विलासराव

सगळे म्हणतात तर टाका आणखी फोटो आन लिवा की राव.
मला विचाराल तर आपल्याला नाही आवडल बॉ लिखाण तुमचं. खर तर मिच लिहायला पाहीजे होत पण जाउदे आता.

अवांतरः मला कोणी आणखी फोटो टाकायला सांगितलेच नाही. नायतर मी ढिगाने टाकले असते.

अमोल केळकर's picture

7 Sep 2010 - 10:25 am | अमोल केळकर

जबरदस्त !! पहिला फोटो विशेष आवडला

अमोल केळकर

छान आहेत. चौथा फोटो फार आवडला.

गणेशा's picture

7 Sep 2010 - 1:32 pm | गणेशा

सर्व फोटो आवडले
दूस्र्या फोटो मध्ये कृष्ण बासरी वाजवत आहे असा भास होतो आहे.
सर्व फोटो अतिशय सुंदर आणि सखा राजगड हे नाव ही छान आहे.

जिप्सी's picture

7 Sep 2010 - 1:37 pm | जिप्सी

दूस्र्या फोटो मध्ये कृष्ण बासरी वाजवत आहे असा भास होतो आहे ---> खरच की,कृष्ण बासरी वाजवत आहे आणि त्याच्यातून तेज ओसंडून बाहेर येत आहे असच वाटतयं. खरच कलात्मक दृष्टी आहे तुमची!

गणेशा's picture

7 Sep 2010 - 2:29 pm | गणेशा

कलाकार आपण आहात .. कीती छान फोटो आणि वर्णन
राजगड अजुन पाहिला नाहिये मी .. अशे म्हणताना लाज वाटत आहे.
नुकताच रायगड फिरलो .. तुम्ही म्हण्ता तसेच वाटले तेथे ..
पण राजगड ला लवक्र येण्याची ओढ लागली आहे .. आणि तुमच्या लिखाना मुळे तर कधी येकदा पाहतोय सखा राजगड असे वाटत आहे ...

जिप्सी's picture

7 Sep 2010 - 2:32 pm | जिप्सी

कधी जायचं बोला????

नगरीनिरंजन's picture

7 Sep 2010 - 2:34 pm | नगरीनिरंजन

सगळे फोटो फार छान आहेत! आणि छानच लिहीलं आहे!

नगरीनिरंजन's picture

7 Sep 2010 - 2:35 pm | नगरीनिरंजन

सगळे फोटो फार छान आहेत! आणि छानच लिहीलं आहे!

ढगांच्या फुटणार्‍या लाटा आणि तोरण्यामागे बुडणारा सुर्य हा फोटु विशेष आवडला.

स्वाती दिनेश's picture

7 Sep 2010 - 6:02 pm | स्वाती दिनेश

हा भागही आवडला.
दोन्ही भाग एकत्र चालले असते असे वाटते.
स्वाती

दोन्ही भाग एकत्र चालले असते ! ----> १०१% मान्य ! पण ताई एका दमात एवढं लिहायचा कंटाळा आला,म्हणून क्रमशः झालं ते !

सर्व फोटो आवडले. राजगड आम्हीसुद्धा पाहिला आहे..!! खूप छान आहे.

प्रभो's picture

7 Sep 2010 - 9:40 pm | प्रभो

झ का स!!!!

स्पंदना's picture

18 Dec 2012 - 7:22 am | स्पंदना

जरा त्या पत्त्याच्या कॅटना कुणी हे फोटो दाखवा. उगा मिपाकरांच नाव बुचकळुन राहिले गढुळ पाण्यात.

मालोजीराव's picture

18 Dec 2012 - 5:09 pm | मालोजीराव

:P

ढगांच्या फुटणार्‍या लाटा आणि तोरण्यामागे बुडणारा सुर्य

प्यारे१'s picture

18 Dec 2012 - 6:02 pm | प्यारे१

सोळ्ळेड फटु१