मेंदूतला माणूस - पुस्तकपरिचय

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
3 Sep 2010 - 8:13 pm

नुकतेच 'मेंदूतला माणूस' हे पुस्तक वाचले. मला ते फारच आवडले.
लेखकांनी म्हटल्याप्रमाणे मेंदूचे कार्य कसे चालते हे सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिले नाही. पण माणसाचा विचार करण्याची पध्दत, वर्तणुकीमागचा कार्यकारणभाव समजावून घेण्यासाठी ते लिहिले आहे. लेखन विज्ञानानिष्ठ असले तरी लेखकांनी रोजच्या व्यवहारातली हलकी फुलकी उदाहरणे देऊन विषय अतिशय सोपा व आकर्षक केला आहे. यांत उल्लेख केलेले काही संशोधन हे अगदी अलिकडचे असून ते मेडिकलच्या पाठ्यपुस्तकातही नाही असा लेखकद्वयींचा दावा आहे.
झोपेत पडणार्‍या स्वप्नांचे मेंदूतले केंद्र, भावनांचे उगमस्थान, तर्कबुध्दी व भावना यातील रस्सीखेच, निजदेहभान वगैरे मेंदूतल्या घडामोडींबद्दल आश्चर्यकारक माहिती यातील प्रकरणांमधे आहे.
नवीन व जुन्या भावना, आभासी अंग (फँटम लिंब्ज) अशा प्रकारची सामान्य माणसाला नवीन असलेली माहितीही त्यात आहे. मुख्य म्हणजे कुठलेही प्रकरण काढून वाचले तरी चालेल अशी पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक वाचून आपण समोरच्या व्यक्तिला जास्त समजावून घेऊ शकतो, मानवी मनोव्यापारांची जवळून माहिती झाल्यामुळे परस्परांमधले समज-गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल हे लेखकांचे म्हणणे मनापासून पटते.
पुस्तकातल्या माहितीबद्दल इथे विस्ताराने लिहिणे ही पुनरावृत्ती होईल, म्हणून ते टाळून, एक अवश्य वाचण्यासारखे विज्ञाननिष्ठ पुस्तक, अशी मिपावरील सर्व नव्या जुन्या मित्रमंडळींना ही पुस्तकाची तोंडओळख.

लेखक : डॉ. आनंद जोशी/सुबोध जावडेकर

राजहंस प्रकाशन, पहिली आवृत्ती : मार्च २०१०

छापील किंमत : रु. २२५/

विज्ञानमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

सुनील's picture

3 Sep 2010 - 8:22 pm | सुनील

पुस्तकाची ओळख फारच त्रोटक वाटली. पुनरावृत्तीचे कारण देण्यापेक्षा थोडी अधिक माहिती दिलीत तर चांगले.

असो, पुस्तक किती पानी आहेत. चित्रे आहेत काय?

तिमा's picture

3 Sep 2010 - 8:31 pm | तिमा

पुस्तक २३३ पानांचे आहे. पुस्तकात भरपूर चित्रे व शास्त्रज्ञांचे फोटो आहेत. तसेच स्वतः करुन पहाता येतील असे बरेच प्रयोगही आहेत.

पुस्तक रोचक वाटतय. ओळख आवडली.

हे मी नुकतेच वाचले. आवडले.

छान परिचय करून दिलात. वाचायला हवे हे पुस्तक.

आमोद शिंदे's picture

4 Sep 2010 - 9:51 am | आमोद शिंदे

इंटरेष्टींग वाटतय पुस्तक! वाचून पाहायला हवं.