मोगरा

शुचि's picture
शुचि in जे न देखे रवी...
1 Sep 2010 - 12:52 am

हा मोगरा नक्की चोंबडा आहे
माझी पक्की खात्री आहे
तू जेव्हा कधी स्वप्नात येतोस
माझ्याशी गुजगोष्टी करतोस
हा मोगरा बहरतो
नक्की हा आपल्या गोष्टी ऐकतो
चोरून ऐकतो अन मोहरतो
लक्षलक्ष चांदणकळ्या मिरवतो
अंगोपांगी सौंदर्यानी ऊतू जातो
टप्पोर्‍या फुलांनी डवरून धुमसतो
सुगंधी निश्वास उसासे टाकतो
नक्कीच!!
कारण आजकाल हा रोज बहरतो
आजकाल मोगरा रोज बहरतो ....!!!

शृंगारकविता

प्रतिक्रिया

अनामिक's picture

1 Sep 2010 - 1:08 am | अनामिक

शुची, कविता आवडली!

कविता आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू
येथे मोगर्‍याला चोंबडा म्हटलंय ते का हे स्पष्ट झालेले नाही. किंवा कवितेतून जे स्पष्ट होते आहे, त्यावरून मोगर्‍याला चोंबडा म्हणता येणार नाही, असे वाटते. फार फार तर आगाऊ, भोचक अशा अर्थाचे काहीतरी म्हणता आले असते.
(छिद्रान्वेषी)बेसनलाडू

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

1 Sep 2010 - 1:49 am | जाई अस्सल कोल्हापुरी

अवखळ शब्दरचना पण छान जमलिये!

शिल्पा ब's picture

1 Sep 2010 - 7:31 am | शिल्पा ब

छान कविता आहे...आवडली..

मदनबाण's picture

1 Sep 2010 - 8:01 am | मदनबाण

छान कविता... :)

(सोनचाफा प्रेमी)

निरन्जन वहालेकर's picture

1 Sep 2010 - 9:05 am | निरन्जन वहालेकर

व्वा ! क्या बात है ! ! अतिशय सुंदर कल्पना ! ! !

मोगर्‍याचा सुगंध दरवळतो आहे ..

पण चोंबडा का बरं ? .. तुमच्या आनंदानेच बहरला आहे ना ?

फ्रॅक्चर बंड्या's picture

1 Sep 2010 - 11:02 am | फ्रॅक्चर बंड्या

मस्तच ...

परिकथेतील राजकुमार's picture

1 Sep 2010 - 11:28 am | परिकथेतील राजकुमार

शुचि यांचं सर्वच लेखन मला अतोनात म्हणजे अतिशय आवडतं.

खुपच छान आहे पद्य.

चोंबडा कोंबडा

नगरीनिरंजन's picture

1 Sep 2010 - 2:39 pm | नगरीनिरंजन

रोमांचक कल्पना! सुंदर कविता.

स्पंदना's picture

2 Sep 2010 - 7:38 am | स्पंदना

व्वा!! स्वप्न तुझी अन बहरतो हा काय?

गंगाधर मुटे's picture

13 Sep 2010 - 11:49 am | गंगाधर मुटे

छान कविता.

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Sep 2010 - 12:40 pm | llपुण्याचे पेशवेll

कविता छान वाटली.

जागु's picture

13 Sep 2010 - 12:44 pm | जागु

छान.

प्राजक्ता पवार's picture

13 Sep 2010 - 1:59 pm | प्राजक्ता पवार

कविता आवडली .