मोगरा
हा मोगरा नक्की चोंबडा आहे
माझी पक्की खात्री आहे
तू जेव्हा कधी स्वप्नात येतोस
माझ्याशी गुजगोष्टी करतोस
हा मोगरा बहरतो
नक्की हा आपल्या गोष्टी ऐकतो
चोरून ऐकतो अन मोहरतो
लक्षलक्ष चांदणकळ्या मिरवतो
अंगोपांगी सौंदर्यानी ऊतू जातो
टप्पोर्या फुलांनी डवरून धुमसतो
सुगंधी निश्वास उसासे टाकतो
नक्कीच!!
कारण आजकाल हा रोज बहरतो
आजकाल मोगरा रोज बहरतो ....!!!
शुची, कविता आवडली!
कविता आवडली | छिद्रान्वेषीपणा
छान ग शुचि...
छान कविता आहे...आवडली..
छान कविता... (सोनचाफा
व्वा ! क्या बात है !
मोगर्याचा सुगंध दरवळतो आहे
मस्तच ...
शुचि यांचं सर्वच लेखन मला
रोमांचक कल्पना! सुंदर कविता.
व्वा!! स्वप्न तुझी अन बहरतो
छान कविता.
कविता छान वाटली.
छान.
छान