आतून किर्तन-वरून तमाशा

यशवंतकुलकर्णी's picture
यशवंतकुलकर्णी in जनातलं, मनातलं
26 Aug 2010 - 2:27 am

मिसळपावच्या वाचकांनो सप्रेम नमस्कार!!! मिसळपावची मनसबदारी मिळाल्याचा विरोप येऊन पडला होता पण दरबारात हजर झालो नव्हतो. आता झालो आणि एक पोस्ट टाकलीसुध्दा. आता ही माझी स्वत:ची ओळख करून देणारी पोस्ट - मिसळपाववर अशी पध्दत आहे की नाही ते माहित नाही पण अपने बारे में जरूर कुछ कहना चाहुंगा. तसा कानूनी पूछताछ करणारा रेडिमेड फॉर्म आहे व्यक्तिरेखा तयार करताना पण त्यात जास्त काही सांगता येत नाही. म्हणून इतर सगळ्या फॉर्म सारखा तोही निम्मा-अर्धा कोराच सोडून दिलाय. इथे का आलो?? येऊन काय करणार?? नसतो आलो तर काय फरक पडला असता? काय मिळणार इथे येऊन? असे निरर्थक प्रश्न पडायचे ते पडलेच. लोक बाहेर होळीचा रंग खेळत आहेत, दिलखुलासपणे एकमेकांना यथेच्छ अल्पगालीप्रदान करीत आहेत, देश, भाषा, राजकाराणी आणि कळीचे ठरणार्‍या अनंत मुद्यांच्या नावाने ठो!! ठो!! सुरू आहे, कुणी हजारो मैलावरच्या देशात जाऊन कुठल्यातरी जन्मात जुळलेल्या ऋणानुबंधांना या जन्मात घट्ट करून येत आहे, कुणी पृथ्वीच्या त्या टोकावर बसून या टोकाच्या मायभूमीची, इथल्या माणसांची, इथल्या पक्वान्नांची रोज याद करीत आहे, कुणी आपलं दिल इथं हनुमंतासारखं उघडून दाखवत आहे तर कुणी छंदी-फंदी कविता-लेख-कथा-किस्से-अनुभव अभ्यासपूर्वकपणे शब्दबध्द करीत आहे, वास्तविक जीवनात भेटू शकणार नाहीत एवढे दोस्तलोग इथे रोज मैफिल जमवत आहेत आणि तुम्ही हे सगळं खिडकीत मख्खपणे बसून पाहात आहात. होईल का हे शक्य? मी तर कधीच मुसलमान व्हायला तयार होतो हो, पण मला तसा हुकूम होत नव्हता ना. आज तो झालेला पाहिला आणि कुबूल है! कुबूल है! कुबूल है! असं तीनदा म्हणून इथं आलोय. आजपर्यंत जे काही र, ट, फ शिकलो आहे ते पुन्हा इथे गिरवून पाहाणार आहे - देता येईल तेवढं देणार आहे- नेता येईल तेवढं नेणार आहे ! आता देणे-घेणे आले म्हटले की त्यासोबतच्या सगळ्या गोष्टी आल्याच - वाद आले, रूसवे आले, कट्टरता आली सगळं-सगळं आलं. पण वादाच्या बाबतीत मी थोडा दुर्बळ माणूस आहे (मिसळपाववर यायचे म्हणजे कडकडीत वाद घालता यायला पाहिजे ही रिक्विसाईटच वाटतेय मला)...म्हणजे कुस्त्यांच्या फडात जग गाजवून आलेले नामचीन पैलवान शड्डू ठोकून एकमेकांना आसमान दाखवत असतील, तर मध्ये काही बोलायची हिंमत नाही आपल्यात (हाडं जास्त नाही झाली अंगात) - पण या कुस्त्या चालु असताना शिट्ट्या फुंकायला, उलट्या-पालट्या उड्या मारायला कमी करणार नाही. तर आता या माणसाबद्दल बोलतो. बंदा मराठवाड्याच्या राजधानीत (औरंगाबादसंभाजीनगर) तजुर्मेकार (अनुवादक हो!) म्हणून काम करतोय - लाथ मारीन तिथं पाणी काढीन या वाडवडिलांच्या म्हणीवर विश्वास ठेऊन नोकरीवर वर्षाभरापूर्वीच लाथ मारलेली आहे आणि नवी लाथ मारलेल्या ठिकाणी दिवसभर पुरेल इतकं पाणी निघालेलं आहे. बाजारातल्या चार-दोन पुस्तकांवर भाषा करायचा चानस मिळालेला आहे - अजून चार-दोन छापखान्यात आहेत. वाचता येईल तेवढं वाचलेलं आहे, ऐकता येईल तेवढं ऐकलेलं आहे आणि डोळे बराच काळ उघडे राहात असल्यानं बरंच काही पाहावं लागलेलं आहे. इतर कुणाच्याही धंद्यासारखी आमचीही नाळ गेटससाहेबाच्या या संगणकात घुसलेली असल्यानं, आम्ही दिवसभर संगणकालाच मिठी मारलेली असते (खर्‍या मिठ्या ज्यांना मारायला पाहिजेत तेही लोक संगणकातच असतात हे सांगणे नलगे !) फॉर दि टाईम बिईंग बडबडीसाठी ब्लॉगही लिहीतो हेही सांगाव लागणार नाही, तरी उगाच आपलं सांगून ठेवतो. तर या पार्श्वभूमीवर होईल तेवढं आतून किर्तन-वरून तमाशा करणार आहे - चूकभूल द्या-घ्या. बाकी सर्व क्षेम !

वावरविचारमाहिती

प्रतिक्रिया

रेवती's picture

26 Aug 2010 - 2:31 am | रेवती

http://www.misalpav.com/node/13764 येथे आपली ओळख दिलीत काय?
आपले मिपावर स्वागत!
अल्पगालीप्रदान हा शब्द मस्तच!

यशवंतकुलकर्णी's picture

26 Aug 2010 - 2:41 am | यशवंतकुलकर्णी

असे अनेक शब्द वापरले जातात तेव्हा कानाकडे हात जातोच

अनामिक's picture

26 Aug 2010 - 2:34 am | अनामिक

स्वागत!

मुक्तसुनीत's picture

26 Aug 2010 - 3:28 am | मुक्तसुनीत

दिलखुलास लिखाण. एंट्री एकदम जोरदार ! मुख्य म्हणजे अलिकडे अतिशय दुर्मिळ बनत चाललेला ऐसपैसपणा.
आओ ठाकूर , आओ ! :-)

सहज's picture

26 Aug 2010 - 7:58 am | सहज

'ठाकूर बलदेवसिंग के घर जाना है!'

>> आता देणे-घेणे आले म्हटले की त्यासोबतच्या सगळ्या गोष्टी आल्याच - वाद आले, रूसवे आले, कट्टरता आली सगळं-सगळं आलं. >> (टाळ्यांची स्मायली)

मस्त लेख!!!

अर्धवटराव's picture

26 Aug 2010 - 6:29 am | अर्धवटराव

आणखी एक भिडु आला.

वेलकम सर !!
(स्वघोशीत स्वागताध्यक्ष) अर्धवटराव

नंदन's picture

26 Aug 2010 - 8:08 am | नंदन

वा, वा, जोरदार एन्ट्री केलीत. मिसळपाववर स्वागत, तुमचे लेखन वाचण्याची उत्सुकता आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Aug 2010 - 10:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दमदार एंट्री! तमाशा (का कीर्तन) आवडलं.

मेघवेडा's picture

26 Aug 2010 - 1:56 pm | मेघवेडा

पुढील लिखाणाच्या प्रतीक्षेत! :)

अर्धवट's picture

26 Aug 2010 - 9:12 am | अर्धवट

या..

पुढची कुस्ती कुठची घ्यायची बरं.

निखिल देशपांडे's picture

26 Aug 2010 - 10:01 am | निखिल देशपांडे

अरे वा जोरदार ओळख
मिसळपाव वर परत एकदा स्वागत.

मिसळपाववर यायचे म्हणजे कडकडीत वाद घालता यायला पाहिजे ही रिक्विसाईटच वाटतेय मला >>>

हा हा हा हा !!

चला , आमच्या औ.बादचा अजुन एक बंदा हाजिर झाला तर ..

स्वाती दिनेश's picture

26 Aug 2010 - 12:23 pm | स्वाती दिनेश

वेंन्ट्री मस्तच.. पुढेही असेच खुसखुशीत,चुरचुरीत,खमंग लेखन वाचायला मिळेल ह्याची खात्री या नांदीने झाली आहे.
स्वागतम्!
स्वाती

दिपक's picture

26 Aug 2010 - 12:38 pm | दिपक

अगदी असेच म्हणतो...

लै भारी येण्ट्री..लेख पण येऊद्यात.

राजेश घासकडवी's picture

26 Aug 2010 - 2:28 pm | राजेश घासकडवी

मिसळपाववर यायचे म्हणजे कडकडीत वाद घालता यायला पाहिजे ही रिक्विसाईटच वाटतेय मला

तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. इथले सगळेच मृदू हृदयाचे, विशाल अंतःकरणाचे आणि संवेदनाशील असतात... उगाच वितंडवाद घालून इथलं निर्मळ वातावरण कलुषित करू नये. बरं, करायचं तर करा बापडे... आम्हीही विशाल अंतःकरणाचे आहोत. हेही चालवून घेऊ.

यशवंतकुलकर्णी's picture

26 Aug 2010 - 3:44 pm | यशवंतकुलकर्णी

एकवार माफी द्या, भिडू लिंबूटिंबू आहे, इथं पहिल्यांदाच लेखणी चालवली आहे....ते वाक्य परत घेतो..

यशवंतकुलकर्णी's picture

26 Aug 2010 - 3:50 pm | यशवंतकुलकर्णी

रेवती, अनामिक, मुक्तसुनीत, सहज, शुचि, अर्धवटराव, नंदन, ३_१४ विक्षिप्त आदिती, मेघवेडा, निखिल देशपांडेसाहेब, सुहास, स्वाती दिनेश, दिपक, राजेश घासकडवी साहेब - एवढ्या गर्मजोशीने पाठीवर थाप दिल्याबद्दल खूपखूप धन्यवाद!

चतुरंग's picture

26 Aug 2010 - 5:18 pm | चतुरंग

थांबा, थांबा एवढ्यात आभार मानून मोकळे होऊ नका!
तुमची वाणी ओघवती आहे, कीर्तन रसाळ आहे आणि हो मिपाकर तुम्हाला वाटतात तसे वितंडवादवाले नाहीत हो,
सगळे तुमचेच आहेत त्यांना आपलं म्हणा! ;)
मनःपूर्वक स्वागत. या मिसळ चापायला या! :)

चतुरंग

चित्रा's picture

26 Aug 2010 - 5:34 pm | चित्रा

हो मिपाकर तुम्हाला वाटतात तसे वितंडवादवाले नाहीत हो,

हाहाहा!

मिपावर स्वागत आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Aug 2010 - 6:37 pm | बिपिन कार्यकर्ते

साला येश्या!!! तुझं लेखन वाचताना अगदी मुक्तसुनितने जे लिहिले आहे ते तस्सेच मनात आले बघ. वाटले, अगदी दणका एंट्री. य्या!!! बसा. काय घेनार, पान तंबाकू?

अवांतर: आता 'ठाकूर बलदेव सिंगके घर जाना है' थाटात एंट्री झाली म्हणजे पुढे उडणारे 'शोले' आत्ताच दिसायला लागले आहेत. ;)

चिंतामणी's picture

26 Aug 2010 - 9:28 pm | चिंतामणी

बिकांशी सहमत.

पुढच्या शोल्यांची वाट बघत आहे.

यशवंतकुलकर्णी's picture

26 Aug 2010 - 6:45 pm | यशवंतकुलकर्णी

आओ ठाकूर, आओ
हे ऐकून अगदी न सांगता माझे हात पाठीमागे वळले ते त्यामुळेच वाटते...
कापले जाणार नाहीत असं वाटतंय...

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Aug 2010 - 7:30 pm | बिपिन कार्यकर्ते

एखादा रामलाल आधीच अ‍ॅरेंज करून ठेवा. नाही तर सगळीच पंचईत व्हायची.

(शामलाल)चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Aug 2010 - 8:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रवेश जोरात झालाय. मिपावर स्वागत आहे.

>>>>बंदा मराठवाड्याच्या राजधानीत (औरंगाबादसंभाजीनगर)

क्या बात है....! चलो गले मिलो. :)

मिपावर बरेच औरंगाबादकर झाले आता. मिपाचा एखादा कट्टा होऊ शकतो...!

-दिलीप बिरुटे
[औरंगाबादकर]

यशवंतकुलकर्णी's picture

27 Aug 2010 - 12:40 am | यशवंतकुलकर्णी

डॉक्टर साहेब, गले तो जरूर मिलेंगे...मिलेंगे तब!
आदेश द्या फक्त.

भडकमकर मास्तर's picture

27 Aug 2010 - 12:53 am | भडकमकर मास्तर

वा एन्ट्री मारावी तर अशी.. वेल्कम हो.. :) !!!!

शिल्पा ब's picture

27 Aug 2010 - 1:23 am | शिल्पा ब

या या...अन स्वताचा गैरसमज करुन घेउन लगेच वादावादी करु नका...

दाद's picture

28 Aug 2010 - 8:36 pm | दाद

स्वागत ! मला वाचनाचि आवड आहे .लिहिलेल अत्यत वाचनिय आहे !परत एकदा स्वागत

ऋषिकेश's picture

28 Aug 2010 - 9:16 pm | ऋषिकेश

वा वा वा! छान एंट्री / ओळख
तुमचे लेखन येऊ द्या लवकर