सर्व मिपाकरांना सांगण्यास आनंद होतो की मिपा चा सभासद झाल्या मुळे आता माझ्या ओर्कुट आणि तत्सम सोशल वेब साईटच्या वाऱ्या कमी झाल्या आहेत . पूर्वी जणू काही मला या साईटसचे व्यसनच होते. मात्र मिपा वरील शुचीताई, टारझन, आदी थोर लेखकांचे लेखन वाचणे हे जास्त आनंददायी वाटते. अशी सुंदर वेब साईट बनविल्याबद्दल तात्या अभ्यंकर यांचे मनः पूर्वक आभार.
--
(उपकृत) इंटरनेटप्रेमी.
प्रतिक्रिया
4 Apr 2010 - 1:10 pm | पाषाणभेद
इंप्रे अरे ऑर्कूटला फाट्यावर मारते रे मिपा. ते म्हणजे नाष्टा अन हे म्हणजे जेवण रे चांगले भरल्या ताटाचे, पुरणपोळीचे.
येत रहा जेवत रहा.
बाकी तुझा झोपेचा प्रॉब्लेम सुटला की नाही. मी तुला किती प्रश्न विचारले तुला त्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. पण तुम्ही नविन लोकं ना काही मागे लागतच नाही. असो.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
4 Apr 2010 - 10:48 pm | अविनाशकुलकर्णी
मिसळ पाव ची गोडी न्यारी
त्याच्या सारखि मस्त मजा नाहि
दिवसामाजी एकदा भेट द्यावि
त्याशिवाय दिवस पुर्ण होत नाहि
नाहि लिहिता येत काव्य वा लेख
म्हणुन नाराज व्हायचे नसते
एक चांगला रसिक वाचक आहा
हे ही अति उत्तम लक्षण असते.
नसतिल जवळ फुलबाज्या वा फटाके
म्हणुन कधिच नाराज व्हायचे नसत
इथल्या आतष बाजीच्या आनंदात आपण
नेहमी आनंदाने सामील व्हायच असत.
अविनाश
24 Aug 2010 - 6:08 pm | इंटरनेटस्नेही
@ अविनाश कुलकर्णी
सुंदर कविता. (अवांतर: आत्ता सुद्धा मस्त चहा आणि थोरामोठयांच्या लेखांचा आस्वाद घेतोय!)
5 Apr 2010 - 12:19 am | मी-सौरभ
इतर मातबर लेखकांचा उल्लेख का टाळलाय????
णिशेढ!
णिशेढ!
णिशेढ!
णिशेढ!
-----
सौरभ :)
5 Apr 2010 - 8:52 am | चटोरी वैशू
मिसळ पाव ची गोडी न्यारीच आहे... इथली जनता पण भारी आहे...
24 Aug 2010 - 6:10 pm | चिंतामणी
सहमत. सहमत. सहमत.
24 Aug 2010 - 6:10 pm | चिंतामणी
सहमत. सहमत. सहमत.