शाळा रे शाळा

भीडस्त's picture
भीडस्त in जनातलं, मनातलं
24 Aug 2010 - 2:00 am

'अगं बायांनो तुमच्या एकेकीच्या एका वर्षाच्या फीत माझं बालवाडीपासून ते बी.डी.एस. पर्यंतचं पूर्ण शिक्षण झालंय ग'.अस्मादिकांच्या दोन कन्यारत्नांच्या दर शालेय वर्षाच्या सुरुवातीस त्या बिचार्‍या दोघींना माझ्याकडून न चुकता हे ऐकून घ्यावं लागतं. खेरीज वर्षभरातही अनेकदा त्याची पुनरावृत्ती प्रसंगोपात होत असते ती न्यारीच.तरी ही फी मोठ्या शहरातील शाळांच्या तुलनेत कितीतरी कमी आहे.

पुण्या-मुबंईतील शाळांमधील प्रवेशाबाबत बरेच काही ऐकत आलो होतो.पण आज जे ऐकले ते सगळ्यांबरोबर शेअर करावसं वाटतंय.

मित्राचा आत्येभाउ मुंबईत फोर्टमधे रहातो.त्याच्या मुलाला ज्युनियर के.जी.च्या वर्गात यंदा प्रवेश प्रवेश घेतला.शाळा फ़्लोरा फाउंटनला आहे.कॅपिटेशन किंवा डोनेशन म्हणा फक्त रुपये दोन लाख. हे थोडंफार ऐकीवातलं होतं. ठीकायं नं.ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्य़ंत दुसरी शाळा तर बघावी लागणार नाही. त्यामुळे मुलाच्या 'उज्ज्वल' भवितव्यासाठी एवढी गुंतवणूक व्यवहार्य आहे.त्यात फारसं वावगं असं काही नाही

मात्र मित्राने पुढं दिलेली माहिती फारच उद्बोधक होती. निदान मला तरी ती तशी वाटली.

त्या पालकाकडून शाळेने अपेक्षिलेली माहिती-

तुमचं उत्पन्न किती.

तुम्ही नेमकं कुठं रहाता.

तुम्ही घरात संभाषणासाठी कुठली भाषा वापरत असता.

तुम्ही घरी कुठल्या प्रकारचा आहार घेता.

तुमच्याकडे किती आणि कोणकोणत्या गाड्या आहेत.

मुलाला रोज शाळेत कसं सोडणार - पायी की टॅक्सीने की स्कूलबसने.

या सर्वावर कडी म्हणजे, तुमच्याकडून आलेल्या माहितीची विश्वासार्हता पडताळण्यासाठी की काय-तुमचे मागच्या तीन वर्षांचे आय.टी. रिटर्न्स देखील दाखवणं अनिवार्य होतं.

एवढं सगळं दिव्य यशस्वीपणे पार पाडल्यानंतर एकदाचा प्रवेश मिळाला आहे.

सध्या ते पूज्य पिताजी बीटरुट जर्मिनेशन प्रोजेक्ट नामक उद्योगात गर्क आहेत असे समजते.एक बीट स्लाइस करून पाण्यात सोडलं आहे. एक कुंडीत लावलं आहे. अजून एक दुकानापुढच्या बागेतही लावून ठेवलं आहे. आणि यातलं निदाएकतरी फळद्रूप (की बीजद्रूप )व्हावं म्हणून ईश्वराची करुणा भाकताहेत.

शिवाय आपली मरगठ्ठ्याची औलाद शाळेतल्या उच्चभ्रू परप्रांतीय सहकार्‍यांना आज मराठी हिसका तर दाखवून आली नाही ना ही भ्रांत तर रोजचीच झाली आहे.

समाजशिक्षणअनुभव

प्रतिक्रिया

आजी आजोबांचा इंटरव्ह्यु झाला होता का?
माझ्या ऐकिवात अशी शाळा आहे जिथे आईवडील व पाल्य एवढेच नाहीत तर आजीआजोबांनाही शाळेत बोलावून कोणकोणते संस्कार करणार? असे विचारले होते. आमच्या दोन नातेवाईकांनी एकाच शाळेत अर्ज केला होता. वडील आय टीवाले आणि आई डॉक्टर असल्याने लगेच प्रवेश मिळाला. आजीआजोबांनीही ग्रेट संस्कार करण्याचे आश्वासन दिले होते.
दुसर्‍या नातेवाईकांना मात्र प्रवेश मिळाला नाही कारण आजीआजोबा वयस्कर आहेत व आई त्यांची काळजी घेण्यासाठी घरी असते जॉब करत नाही म्हणून!

भीडस्त's picture

24 Aug 2010 - 10:50 am | भीडस्त

आजी आजोबांचा इंटरव्ह्यू नाही झाला. ते दोघेजण अगदी टिपीकल गाववाले आहेत्. टू बी मोअर प्रिसाइज -अगदी मावळातील म्हणावेत असे. त्यांच्या इंटरव्ह्यूने शाळेलाच घाम फुटला असता.

शिल्पा ब's picture

24 Aug 2010 - 11:02 am | शिल्पा ब

पैशे खायचे धंदे नुसते...मुर्खांचा बाजार आहे शाळेच्या नावाखाली..

सहज's picture

24 Aug 2010 - 1:01 pm | सहज

बापरे! असाच प्रकार सुरु राहीला तर लवकरच भारतात 'घरची शाळा'चा मोठा प्रसार होणार.

बाकी एवढी फी भरल्यावर विद्यार्थ्याला एक फायदा व्हावा.

भीडस्त's picture

24 Aug 2010 - 1:05 pm | भीडस्त

अगदी अगदी
पण शाळांत दिल्या जाणार्‍या शिक्षणाच्या दर्जाकडे पाहता घरची शाळा हा पर्याय स्वीकारणार्‍या पालकांची संख्या वाढतच जाणार यात शंका नाही.

मला प्रायव्हेट शाळांचा अनुभव नाही, पण एक शंका आहे. r these school so great to go through all these tortures? माझे शिक्षण सरकारी शाळा व कॉलेजमधुन झालेय, आणि मला त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम झालेला नाही. ( competition etc.).. त्यामुळे नुस्त्या अंधानुकरणापेक्षा स्वतः विचार केलेला बरा...

मला प्रायव्हेट शाळांचा अनुभव नाही, पण एक शंका आहे. r these school so great to go through all these tortures? माझे शिक्षण सरकारी शाळा व कॉलेजमधुन झालेय, आणि मला त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम झालेला नाही. ( competition etc.).. त्यामुळे नुस्त्या अंधानुकरणापेक्षा स्वतः विचार केलेला बरा...

विश्वेश's picture

25 Aug 2010 - 11:26 am | विश्वेश

आमच्या संकुलामध्ये साधारण ८०० कुटुंबे आहेत , ९९% मुले Convent मध्ये जातात,
मराठी शाळामध्ये असले उछादार्जीया शोषण नसले तरीही, मुलांनी survive कसे व्हायचे .. खेळायचे कोणाशी?

एक उदाहरण ... येतील एक मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात होता .. (convent नव्हे) त्याच्याशी बाकी कोणी खेळायचे नाही ...
बाकीच्या मुलांच्या पालकांनी देखील हाच सल्ला दिला कि त्याची शाळा बदला ... जर ह्या संकुलात जुळवून घ्यायचे असेल तर शाळा पण तशीच हवी ...

आता ह्या समस्येवर उपाय काय ?

अर्धवट's picture

25 Aug 2010 - 12:38 pm | अर्धवट

संकुल बदला

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Aug 2010 - 5:40 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. संकुल बदला.
अवांतरः तुमच्या संकुलात परप्रांतीय जास्त आहेत का?

नंदन's picture

29 Aug 2010 - 12:45 pm | नंदन

सहमत. 'कॉम्प्लेक्स' सोडा ;)

मलाही हाच प्रॉब्लेम माझ्या मुलींच्या शाळा प्रवेशाच्या वेळी माध्यमाची निवड करताना आला होता. आपला ज्यांच्याशी संबध आहे, त्यांची,परिसरातली ,सारीच मुलं झाडून इंग्रजी माध्यमाकडे जात असताना आपल्यालाही त्या भाउगर्दीत सामील व्हावच लागतं

आपल्या चाकोरीबाहेर जाण्याच्या हट्टापायी त्याचं बालपण तर खुरटणार नाही ही धाकधूक असतेच.त्यामुळे आमच्याकडच्या इंग्रजी माध्यामाच्या शाळांच्या दर्जाबद्दल असंतुष्ट असूनही तो मुद्दा खुंटीला बंधन भाग पडतं.

पण या सगळ्या धबडग्यात अजून निराळ्याच समस्या पुढ्यात येवून ठाकताहेत

मराठी माध्यमात मुलाना शिकवावेसे वाटते पण ऊच्च शिक्शणाच्या वेळी ते त्रासदायक ठरु शकते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.मराठीची गोडी आपण मुलाना लावु शकतो.घरात भरपूर मराठी पुस्तक मात्र हवीत आणि ती आनन्दाने वाचणारे लोक!

विसोबा खेचर's picture

26 Aug 2010 - 9:52 pm | विसोबा खेचर

इयत्ता दुसरी की तिसरीमध्ये वर्गातल्या किंतानावरच मुक्तपणे मुतलो होतो आणि नंतर गोडसेबाईंच्या हातचा मस्त धपाटा खाल्ला होता या प्रसंगाची उगाचंच आठवण झाली..:)

बाकी चालू द्या..

तात्या.

भीडस्त's picture

27 Aug 2010 - 5:28 pm | भीडस्त

"खंडीच्या वरणात मुतणे " हा वाक्प्रचार आपल्या या निधड्या ( आणि सोड्लेल्या नाडीच्या) कर्तृत्त्वानेच तर मायममराठीला प्राप्त झाला नाही ना ?

(आशंक) भीडस्त