जसे राम फळ, सीता फळ तसे हे लव फळ. हे मोठे झाड होते. ह्याची पाने रुंद मोठी असतात. लव फळ कच्चे असताना हिरवेगार साधारण पोपटी असे असते. मग पिकत गेल की पिवळसर रंग चढतो. आणि पिकले की एकदम गर्द नारंगी कलर (पिकलेल्या पपई सारखा) येतो. ह्याचे साल चरट अगदी पातळ असते. ह्यात गरा पेक्षा बियाच जास्त असतात त्या पांढर्या असतात. चविला हे फळ आंबट गोड असते. ह्याच्या बियांमुळे हे फळ खायच म्हणजे टाइमपास असतो. बराच वेळ बिया तोंडातच काढत खात बसायला लागते. कारण ह्याचा गर सिताफळाप्रमाणेच बीला चिकटलेला असतो. पण अगदी चिवटपणे.
हे झाड माझ्या माहेरी अगदी आमच्या माळ्याच्या जिन्याच्या समोर आहे. शाळेत असताना मी सकाळी, संध्याकाळी जिन्यावर अभ्यास करत असे. त्यावेळी ह्या झाडावर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ही फळे खाण्यासाठी येत. त्यात पोपट, चिमण्या, सुगरण, कोकीळा, कावळे, पोपटी रंगाचे पण चिमण्यांएवढे पक्षीही येत. ते दृष्य अगदी बघतच रहावेसे वाटे. झाडाला भरपुर फळे यायची. आम्ही काढून ती पक्षांनापण उरायची. कारण हे फळ जास्त परिचित नसल्याने इतर लोकांकडून ह्या फळासाठी डिमांड येत नसे. पण ज्यांना ह्याची चव कळ्ली आणि ज्यांना आंबट गोड वर्गातील फळे आवडता आणि जे हे फळ खाण्यासाठी वेळ देउ शकतात ते मात्र घेउन जायचे. माझ्याही लव फळ हे आवडीचे फळ आहे. मी ह्या फळाचा पाव भाग १५ मिनीटेतरी साधारण खात बसायचे. पण मला ह्याची चव खुप आवडायची. आता ह्या झाडाला पुर्वी सारखी फळे धरत नाहित. पण मागच्या आठवड्यात माहेरी गेले तेंव्हा अचानक नजर गेली लागलेल्या फळावर आणि तुमच्याबरोबर हे झाड, फळ शेअर कराव म्हणुन खालील फोटो तुम्हाला दाखवायला काढले.
हे हिरवे कच्चे फळ
हे पिकत आलेले फळ पण पुर्ण पिकलेले नाही. पिकल्यावर एकदम ऑरेंज कलर होतो.
प्रतिक्रिया
12 Aug 2010 - 3:14 pm | स्मिता चावरे
एका नवीन झाडाची सचित्र ओळख करून दिल्याबद्दल!
12 Aug 2010 - 6:39 pm | परिकथेतील राजकुमार
हेच बोलतो.
एका नवीन झाडाची सचित्र ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
12 Aug 2010 - 3:20 pm | येडबंबू
मला वाटले प्रेमात काय काय फळे भोगावी लागतात ते सांगताय :)
छान लेख.
---
12 Aug 2010 - 3:21 pm | मनि२७
सहि आहे लव फळ.....
मनि :-)
12 Aug 2010 - 3:32 pm | जागु
रसराज, येडबंबु, मनी धन्यवाद.
12 Aug 2010 - 4:06 pm | सूड
मला पण येडबंबू सारखंच काहीसं वाटलं आधी, पण नवीन फळाची माहिती मिळाली.....( थोडं विषयांतर आहे, पण कुणी सांगेल का की लिखाणात स्मायली कसे अॅड करतात ?? मी नवीन आहे ईथे ....)
12 Aug 2010 - 4:30 pm | हेमा
नवीनच पाहिल . मला माहित नव्ह्त हे फळ
12 Aug 2010 - 4:31 pm | हेमा
नवीनच पाहिल . मला माहित नव्ह्त हे फळ
12 Aug 2010 - 4:31 pm | हेमा
नवीनच पाहिल . मला माहित नव्ह्त हे फळ
12 Aug 2010 - 4:31 pm | हेमा
नवीनच पाहिल . मला माहित नव्ह्त हे फळ
12 Aug 2010 - 4:31 pm | हेमा
नवीनच पाहिल . मला माहित नव्ह्त हे फळ
12 Aug 2010 - 5:01 pm | स्वाती दिनेश
सचित्र माहिती छान आहे जागु, ह्या फळाची माहिती नव्हती.
स्वाती
12 Aug 2010 - 5:59 pm | मदनबाण
जागु ताय... फोटु युक्त नविन माहिती बद्धल धन्स... ;)
12 Aug 2010 - 6:32 pm | तिमा
नवीन माहिती, धन्यवाद.
12 Aug 2010 - 7:04 pm | भाऊ पाटील
फोटो दिसत नाहीत :(
बाकी लव फळ पहिल्यांदाच ऐकले. त्यामुळे फोटॉ बघण्याची जास्त उत्सुकता आहे.
याचे इंग्लिश नाव सांगता का? म्हणजे गूगलवर फोटो पाहता येतील.
13 Aug 2010 - 12:39 pm | जागु
ह्याचे इंग्लिश नाव मलाही माहीत नाही. परत माहेरी गेले आणि हे फळ आले असले की मी ते फळ काढायला सांगुन त्या फळाचा फोटो टाकेन.
12 Aug 2010 - 7:01 pm | सुहास..
पहिलांद्याच ऐकले , पाहिले !!
13 Aug 2010 - 12:13 am | सुनील
हे फळ आणि फळाचे नाव प्रथमच ऐकले. सचित्र माहितीबद्दल धन्यवाद.
ह्याल लव फळ असे नाव कसे पडले? माझ्या मते, "लव" फळ हे नाव धारण करण्याचा अधिकार फक्त सफरचंदालाच आहे!
13 Aug 2010 - 12:36 pm | जागु
आहो जसे राम फळ सिता फळ तसे लव फळ रामाचा मुलगा हो.
13 Aug 2010 - 1:00 am | धनंजय
नवीनच माहिती कळली. छान.
13 Aug 2010 - 2:48 am | रुपी
फोटोयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
केरळमध्ये बर्याच मसाल्याच्या बागा पाहता येतात. त्यामध्ये आम्हाला एक झाड दाखवले होते, हनुमान फळाचे. पण, खूप दिवस झाले त्याला. माझ्याकडे फोटोही नाहीत, आणि मला ते दिसायला कसे होते हेही आठवत नाही.
कुणास ठाउक, कदाचित याच झाडाला तिकडे हनुमान फळ म्हणत असतील!
13 Aug 2010 - 12:40 pm | जागु
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.