(चटेपटेरी चड्डीचा हा दोष असावा)

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
7 Aug 2010 - 2:21 am

नुकत्याच मिपावरच्या पौगंडी विचारसरणीच्या लेखनाची परखड टीका केशवसुमार यांनी एक समर्थ विडंबन लिहून केली. ती वाचून शब्दांच्या गुणसूत्रांचाच दोष वगैरे कारणं देण्यापेक्षा तसल्या लेखकांनी आत्मपरिक्षण करावं असं आम्हाला वाटलं. (ते लोकांनी करण्याआधी आपणच केलेलं बरं, नाही का? कारण काही काही वेळा सिगार हा फक्त सिगार असतो) त्यातून या स्वडंबक कवितेचा जन्म झाला. प्रेरणा अर्थातच अभ्यंकरांची उत्तम कविता.

चटेपटेरी चड्डीचा हा दोष असावा
स्वप्नलिपीचा ठसा लायनित का उमटावा?

कधीतरी चित्रांच्या रीती मला जमाव्या
कधी खरा मज एखादा आकार मिळावा

कट्टा-कॉलेज दोन मितींच्या प्रतलामध्ये
अंतरातला त्रिमिती भाव कसा लपवावा?

युगे बदलली काळ बदलला जरी अट्टला
तरी न फोटो फेसबुकवरी तू बदलावा?

कितीक वेळा मी वाचावे पुस्तक माझे
सोळा पानांपुढे तरी मी का ना जावा?

उगाच चर्चा मी तेव्हा केली पाकृंची
कवितेचा तव ध्यास, मजला कसा कळावा?

अता सरावी सैपाकाची दुसरी भाषा
एकार्थी हा मस्त वडा मी चापुन खावा

हास्यकरुणकविताविडंबन

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

7 Aug 2010 - 2:23 pm | इंटरनेटस्नेही

छान!

परिकथेतील राजकुमार's picture

7 Aug 2010 - 2:27 pm | परिकथेतील राजकुमार

स्वप्नलिपीचा ठसा लायनित का उमटावा?

ठ्ठो!!!!!

गुर्जींना आवरा !!!

अप्पा जोगळेकर's picture

7 Aug 2010 - 2:33 pm | अप्पा जोगळेकर

स्वप्नलिपीचा ठसा लायनित का उमटावा?
गारद.

मेघवेडा's picture

7 Aug 2010 - 2:36 pm | मेघवेडा

हा हा हा! खरंच आवरा गुर्जींना कुणीतरी..

अत्यंत 'हलकट' विडंबन!

नाना बेरके's picture

7 Aug 2010 - 4:47 pm | नाना बेरके

लायनीत ?
हल्लीचे बहुतेक गुर्जी हे शाळेत लाईन किंवा लायनीची 'शाळा' करणारे असतात त्यामुळे
स्वप्नलिपीचा ठसा लायनित का उमटावा? : हेसुध्दा एखाद्या गुर्जीनी केलेले आत्मपरीक्षण म्हणावे कां ?

पाषाणभेद's picture

7 Aug 2010 - 6:37 pm | पाषाणभेद

नानाकडे अशा चड्या मिळतात.