धागा धागा अखंड दळूया

केसुरंगा's picture
केसुरंगा in जे न देखे रवी...
4 Aug 2010 - 2:18 am

गेल्या दोन दिवसांपासून मिपावर अनेक सुरेख चर्चा चालू आहेत.
अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत.
विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत, विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे.. अनेक लोकांना आनंद झालेला आहे.. जुन्या मिपाच्या नावे उमाळे फुटू लागले.. हे सगळे बघून आम्हालाही काव्य गुदगुल्या सुरु झाल्या

धागा धागा अखंड दळूया
वाईफ वाईफ मुखे म्हणूया

अजाईलाचे विवाहितांचे
उभे आडवे गुंफुन धागे
नविनआयडी धुरंधरांचे
वस्त्र फिटले केसूरंगे
सर्केश्वर तो दहिकर पहिला
धाग्याअंती त्यास स्मरुया

आयटी वाईफ धाग्यावरती
मणामणांचे जंतू टाका
टाकुन काडी झाडावरती
कोक घेउनी जागा राखा
स्त्रीमुक्तीचा फिरवित चरखा
प्रतिसादांची मजा बघूया

-केसुरंगा

हास्यकविताविडंबन

प्रतिक्रिया

दिनेश's picture

4 Aug 2010 - 2:24 am | दिनेश

आपणच बाकी होतात..
बाकी आमची कोक ची पिंपे संपली.

दिनेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 9:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

छ्या दिनेशदादा, तुम्ही कोकवरच कसं काय समाधान मानता ब्वॉ! नाही म्हणजे लाह्याही घ्या असं! ... (पळा आता; नाहीतर दिनेशदादा देतोय एक टोला.)

विडंबन आवडले.

गणपा's picture

4 Aug 2010 - 2:27 am | गणपा

तरी म्हटल अजुन एकाही विडंबकाला स्फुर्ती कशी मिळाली नाही.
इतका सारा कच्चा माल वाया जातो की काय ;)

केसुरंगा's picture

4 Aug 2010 - 2:32 am | केसुरंगा

पक्का माल करायला जरा वेळ लागला मालक! ;)

नितिन थत्ते's picture

4 Aug 2010 - 9:35 am | नितिन थत्ते

पक्का माल लवकर व्हावा म्हणून नवसागर टाकतात. ;)

झकास विडंबन. :)

अडगळ's picture

4 Aug 2010 - 2:42 am | अडगळ

मजा आली.
***********
जळत्या धाग्यावरती धरू या , केरोसीनची धार ,
अडगळा , मज्जा येते फार.

केशवसुमार's picture

4 Aug 2010 - 3:23 am | केशवसुमार

केसुरंगाशेठ,
१ लंबर विडंबन..
सर्केश्वर तो दहिकर पहिला ... हा हा हा..
(वाचक)केशवसुमार

चतुरंग's picture

4 Aug 2010 - 4:17 am | चतुरंग

अरे आज काय हसवून मारता का रे बाबानो?
सकाळपासून इतका हसलोय की आता हसणे शक्य नाही!
पण विडंबन चोक्कस केसुरंगा! ;)

>>>सर्केश्वर तो दहिकर पहिला....

क्या बात है!!

चतुरंग

स्वाती२'s picture

4 Aug 2010 - 4:24 am | स्वाती२

_/\_

जम्या.. पण अजुन मोठ करुन बरेच मुद्दे घेता आले असते.. आत्ताशी २०%च कच्चा माल संपलाय..

दत्ता काळे's picture

4 Aug 2010 - 8:39 pm | दत्ता काळे

धागा धागा अखंड पिळूया
'ऐटी'त वाईफ मुखे म्हणूया ...