आवाज की दुनीया के दोस्तों

सहज's picture
सहज in जनातलं, मनातलं
26 Jul 2010 - 1:55 pm

केबल टिव्हीच्या जमान्याच्या आधी दिवसभर मनोरंजनाचे साधन म्हणजे रेडीओ, म्हणजे विविध भारती. आणी अर्थात व्ही सी आर व व्ही एच एस टेप्स.
पावसाळा आला की पावसावर बेतलेल्या निसर्ग कवितांना एक वेगळाच भाव येतो. घाबरु नका मी काही कविता किंवा तिचे रसग्रहण करणार नाही. :-) पण पावसाळा ही थीम घेउन मला आवडणारी काही गाणी तुम्हाला ऐकवीन म्हणतो. लगेच सुरवात करुया. रेडीओवर ऐकून ऐकून बरीच गाणी मनात घर करुन जातात. माझ्या पटकन लक्षात येणारी ही गाणी तुलनेत नवीन आहेत, काही जुन्यापैकी आठवणारे म्हणजे हे एक गाणे. मधुबालाच्या फॅन्सना समर्पीत. पण धोक्याचा इशारा - भारतभूषण दिसणार.

आता मधुबाला व पाउस म्हणल्यावर हे गाणे तर यायला हवेच, नाही का?

सिनेमा आहे इजाजत. गायीका आशा भोसले. संगीतकार आर डी. गीतकार गुलझार. जेव्हा आमच्याकडे व्हिसीपी (व्हीसीआर नाही) आला तेव्हा मग आमच्या घरच्यांच्या सिनेमाप्रेमाला एक नवा आवेग आला. जमेल तेव्हा, परिक्षा असो किंवा नसो, पटकन एक टेप आणायची व सिनेमा दोन अडीच तासात बघायला घरात कोणाची ना नसायची. :-)

आर डी बर्मन यांचे अजुन एक गीत. सिनेमा १९४२ अ लव्ह स्टोरी.

चांदनी सिनेमातील सुरेश वाडकर यांनी गायलेले हे गाणे विसरुन कसे चालेल?

रोटी कपडा मकान मधले हे पुढचे प्रसिद्ध गाणे मला तितकेसे आवडत नाही पण तेव्हाच्या फक्त प्रेयसी व आजची प्रेयसी व पत्नीसाठी एक दोन वेळा दांडी मारुन एकत्र काढलेले दिवस आठवून छान वाटते :-)

अलिकडच्या काळात पावसाचा इतका सुंदर वापर करुन चित्रीत केलेली ही पुढची दोन गाणी मला अतिशय आवडतात. सिनेमा ताल, संगीत रेहमान.

आणी हे एक

तुमची आवडती पावसाची गाणी देखील प्रतिसादात जरुर लिहा.

संगीतसंस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

26 Jul 2010 - 2:02 pm | स्वाती दिनेश

मस्त.. गाणी पाहताना, ऐकताना पावसात भिजल्यासारखे वाटले..
स्वाती

निखिल देशपांडे's picture

26 Jul 2010 - 2:03 pm | निखिल देशपांडे

ऑफिसातुन व्हिडिओ दिसत नाही..
घरु जाउन गाणे एकुन सविस्तर प्रतिक्रिया देतोच

क्रान्ति's picture

26 Jul 2010 - 2:50 pm | क्रान्ति

माझी आवडती पाऊसगाणी :- घर आजा घिर आये बदरा सांवरिया [छोटे नवाब-लताबाई- आरडी], रिमझिम के तराने लेके आयी बरसात [काला बाजार-रफी-गीता दत्त- एसडी], रिमझिम गिरे सावन [मंजिल-लता-आरडी]{हे किशोरकुमारचंही आहे, मला लताचं जास्त आवडतं.}डर लागे गरजे बदरिया [रामराज्य-लताबाई-वसंत देसाईंचं संगीत], सदाहरित सावन का महीना पवन करे सोर [मुकेश-लता-एलपी], बरसे बुंदियां सावन की [भजन]आणि अजून बरीच.

श्रावणात घन निळा बरसला, घन घन माला नभी दाटल्या, अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, आला पाऊस मातीच्या वासात ग अशी खूप छान छान पाऊसगाणी मनात रुंजी घालताहेत.

मस्त कलंदर's picture

26 Jul 2010 - 4:01 pm | मस्त कलंदर

यात भर घालायचीच तर सहजपणे आठवलेली आणखी काही गाणी:
१. अब के सावन ऐसे बरसे.... (हे गाणं नुसते न वाजवता कानाच्या पडदे फाटतील असे जोरजोरात हवे आणि सोबतीला डॅन्स करायला मित्रमैत्रीणीही)
२. झेर झिर बरसे सावन अखियाँ साँवरिया घर आये.... (आशिर्वाद) पण हे गाणे कुठे संपते याकडे नीट लक्ष द्यायला लागते. नाहीतर लगेच "आ गया" म्हणत जाडजूड साँवरिया संजीवकुमार येतो..
३. सावन बरसे तरसे दिल.... (हे गाणे ऐकताना सोबत भिजायला एकच माणूस असले तरी पुरे. ;) )

>>ऑफिसातुन व्हिडिओ दिसत नाही..

शेम २ शेम ऐसाईच बोल्ताय पण वर्णना वरुन
१) जिंदगीभर नही भुलेंगे...
२) कतरा कतरा...
३) रीम झीम रीम झीम...
४) लगी आज सावन की ...
येवढीच गाणी ओळखता आली.
बाकी ही चारही गाणी अतिशय आवडती अजुन सुचली तर सांगेनच.
सहजराव ४-५ वाक्यात प्रत्येक गाण्याच रसग्रहण वाचायला आवडल असत. :)

सहज's picture

26 Jul 2010 - 4:10 pm | सहज

वेक अप सिड मधले हे एक गाणे

अजुन एक गाणे!

सावरीया सिनेमातील माशा अल्ला

समंजस's picture

26 Jul 2010 - 5:48 pm | समंजस

पावसाळा सुरू झाल्यावर हमखास आठवणारी काही आवडती गाणी.[ही गाणी बघताना/ऐकताना मुड काही वेगळाच सेट होतो :) ]

१. रिमझिम गिरे सावन...

२. पिया बसंती रे...

३. प्यार हुआ इकरार हुआ...

४. सुर है ना ताल है...

५. भागे रे मन....

६. तु ही रे....

या गाण्यांबद्दल जास्त काही सांगण्याची गरजच नाही, बघा आणि ऐका :)

मस्तच हो सहजराव...भिजलो लेखात पुर्ण.. :)

पावसाचं आमचं आवडतं गाणं..टिप टिप बरसा पानी...

मेघवेडा's picture

29 Jul 2010 - 1:37 am | मेघवेडा

हापिसात युट्युब बंद म्हणून घरी जाऊन प्रतिसाद देईन असा विचार करून हा धागा बाजूला ठेवला तो उरलाच.

सर्वप्रथम प्रभोंशी बाडिस आहे! पाऊस म्हटल्यावर हेच गाणं आठवतं आधी! ;)

मग रिमझिम गिरे सावन, अब के सजन सावन मे (गाण्यात पाऊस नाही पण शब्दांत आहे म्हणून), रिमझिम रिमझिम, भीगी भीगी रातों मे (याचं नवं व्हर्जनही अनुपमा वर्मा मुळे खूप आवडलं! ;)) वगैरे गाणी आठवली.

पण माझं सगळ्यात आवडतं गाणं हे : पहेली चित्रपटातील 'वॄष्टी पडे टापुर टुपुर'! अगदी टपोरे थेंब पडल्याचा भास होतो! मस्तच!

सहजराव, मस्त धागा!

धागा वर आलाय तर आमच्या अजून २-३ आवडी टाकतो.

जिया धडक धडक जाये - कलयुग - थोडासा पाउस आहे ह्यात :)
http://www.youtube.com/watch?v=wfSuwqmR9rs

तुझे याद ना मेरी आयी - कुच कुच होता है..
http://www.youtube.com/watch?v=CAiBQnm1VL0

आणी 'टिप टिप' च्याखालोखाल आवडणारं मि. इंडिया मधलं 'कांटे नहीं कटते दिन ये रात' ......
आहाहा..काय त्या श्रिदेवीच्या अदा... ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jul 2010 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहजराव, वरील सर्व गाणी पावसात भिजवणारी आहेत. मस्त भिजलो. :)
रुदालीतले 'दिल घुं घु करे घबराये. घन धम धम करे' चालेल काय !

-दिलीप बिरुटे

रेवती's picture

26 Jul 2010 - 6:32 pm | रेवती

आहाहा!
एकदम पावसात भिजल्यासारखं वाटलं.
मला तर पाऊस म्हटलं कि मायमराठीतली गाणी आठवतात.
आज कुणीतरी यावे.

चिंब भिजलेले रूप सजलेले वगैरे.

आणि गारवातली सगळी गाणी.

नंदन's picture

26 Jul 2010 - 7:20 pm | नंदन

लेख आवडला. प्रतिक्रियांत सुचवलेली गाणीही मस्तच.
हे अजून एक अप्रतिम गाणं -

ओ सजना, बरखा बहार आयी

आणि लगानमधलं हे 'घनन् घनन्'

शिवाय 'सावन बरसे तरसे दिल'

मराठीत श्रावणात घननीळा,रिमझिम झरती श्रावणधारा, घन ओथंबून येती, नभ मेघांनी आक्रमिले अशी मोठी यादी आहे.

[गालबोट/दृष्ट लागू नये म्हणून भिकार गाणं पहायचंच असेल तर इथे पहा - http://www.youtube.com/watch?v=h99-DrCWttM (रेन इज फॉलिंग छमा छम छम) :).]

केशवसुमार's picture

26 Jul 2010 - 7:26 pm | केशवसुमार

सहजशेठ,
सुंदर धागा..काय एक से एक गाणी एकत्र ऐकता\पाहता आली ..धन्यवाद!
(आभारी)केशवसुमार
बर्‍याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या..इथल्या पावसात ती मजा नाही :(
(स्मरणशील)केशवसुमार

छोटा डॉन's picture

26 Jul 2010 - 11:23 pm | छोटा डॉन

एक से एक गाणी ....
मजा आली, चांगले कलेक्शन होते आहे ह्या धाग्यावर ...

पण आमच्या बिकाम्चे आवडते गाणे कसे कुनीच दिले नाही ;)

भाग्यश्री's picture

27 Jul 2010 - 5:02 am | भाग्यश्री

मस्त गाणी!!
मला तक्षकमधील बुंदोंसे बातें पण आवडते.
चित्रिकरणात पाऊस आहे असे सरफरोश मधील जो हाल दिलका पण आठवले! :)

संजय अभ्यंकर's picture

27 Jul 2010 - 11:40 am | संजय अभ्यंकर
राजेश घासकडवी's picture

27 Jul 2010 - 1:23 pm | राजेश घासकडवी

मधुबालेला बघून दिल खुष झालं. (भारत भूषणसाठी केव्हाच फिल्टर डेव्हलप केला होता)
झीनतला डिट्टो डिट्टो डिट्टो डिट्टो.(मनोज कुमारसाठी डिट्टो डिट्टो.......................)

पुष्करिणी's picture

28 Jul 2010 - 10:57 pm | पुष्करिणी

मस्त धागा ,
मला गुरू मधलं ऐश्वर्याचं 'बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा बरसो' हे गाणं पण खूप आवडतं. यु-ट्युब हाफिसात नाही उघडत त्यामुळं लिंक नाही देता येत.....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jul 2010 - 12:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे गाणं खूप आवडतं. माझी पावसाची आवडती गाणी आधीच दिलेली आहेतच, पिया बसंती, भागे रे मन वगैरे.

नंदनला देखो बारीश हो रही है आठवलं नाही, कमाल आहे ;-)

घाटावरचे भट's picture

29 Jul 2010 - 1:15 am | घाटावरचे भट

सुंदर धागा... यग्झॅक्टली पावसाचं नाही पण 'कहां से आए बदरा' पण चांगले आहे.

बहुगुणी's picture

29 Jul 2010 - 1:25 am | बहुगुणी

चित्रपट पहेली: सत्यजित आणि नमिता चंद्रा, गायलंय सुरेश वाडकर-हेमलता यांनी

मूळ गाणं बंगाली होतं, रवींद्रनाथ टागोरांचं, त्यातले 'बृष्टी करे टापूर टूपूर' हे शब्द या हिंदी अवतारात तसेच ठेवलेत, आणि बर्‍याच वर्षांनंतर तेच लक्षात राहतात हे गाणं आठवलं की...

चित्रपटः अजनबी, राजेश खन्ना- झीनत, लता-किशोर

मेघवेडा's picture

29 Jul 2010 - 1:41 am | मेघवेडा

मीपण आताच प्रतिसाद लिहिला त्यात या गाण्याचा व्हिडिओ दिलाय! खरंच फार सुंदर गाणं आहे! :)

धनंजय's picture

29 Jul 2010 - 2:06 am | धनंजय
घाटावरचे भट's picture

29 Jul 2010 - 2:47 am | घाटावरचे भट

अर्रे.... 'आज रपट जाएं' कसे विसरलो आपण????