मी पहात होतो दूर...

भारतीय's picture
भारतीय in जे न देखे रवी...
24 Jul 2010 - 7:41 pm

तसा काव्याच्या प्रांतात मी नवशिक्याच.. जमेल तशी केलीय, चू.भू.दे.घे.

मी पहात होतो दूर,
तू दिलास मजला सूर,
लावलीस मला हुरहूर,
मी पहात होतो दूर..

मीच होतो मूढ,
की तूच होती शूर,
तू केलस मला चूर,
मी पहात होतो दूर..

तुझा होता वेगळाच नूर,
माझ्या भावनांना आला पूर,
तू छेडलास माझा सूर,
मी पहात होतो दूर..

तू आलीस जवळ पुरेपूर,
सांग माझा काय कसूर,
लावलीस मला हुरहूर,
मी पहात होतो दूर..

तू पलटविलास तूझा नूर,
केलस मला भेसूर,
मी पहात होतो दूर....
तू... तू ऊडुन गेलीस भूर्र्....

हास्यकवितामुक्तक

प्रतिक्रिया

मितभाषी's picture

28 Jul 2010 - 2:14 pm | मितभाषी

वा. कविता एकदम फुर्रर्रर्रर्र
वाचुन झालो तर्रर्रर्रर्र
झोप उडाली चुर्रर्रर्रर्र
आवरा आता पुर्रर्रर्रर्र.