सदर लेखातील मजकूर हा आक्षेपार्ह असल्याची तक्रार अनेक सदस्यांनी केल्यवरून मजकूर अप्रकाशित करण्यात येत आहे. संबंधितांनी नोंद घ्यावी
- संपादक मंडळ
नितिन थत्ते यांचे स्पष्टीकरण
माझ्या जालीय आयुष्यात मी कुणाची बदनामी केली नाही. जे वाक्य आक्षेपार्ह वाटले तेथेही * चिह्न देऊन तळटीप लिहिली होती. (*शत्रूबाबत असेच म्हणायचे असते अशी पद्धत त्याहीकाळी होती).
लेखाचा मूळ उद्देश "शाहिस्तेखानाची बोटे तोडणार्या, आता पराभूत झालेल्या आणि भर दरबारात औरंगजेबाचा अपमान करणार्या शिवाजीलाही सर्वशक्तिमान औरंगजेबाने तत्काळ ठार मारण्याचा मार्ग अवलंबला नव्हता" हा मुद्दा ठसवणे हा होता. आणि अफजल गुरू आणि कसाब जिवंत असल्याबद्दल रोज सकाळ संध्याकाळ दु:ख करणार्यांसारखेच त्याकाळी कोणी लोक असतील तर त्यांची मुक्ताफळे काय असतील याची कल्पना केली होती.
प्रतिक्रिया
26 Jul 2010 - 8:57 am | महेश हतोळकर
नाही आवडले.
26 Jul 2010 - 9:07 am | प्रकाश घाटपांडे
आपण आणि ते अशा द्वैत विभागणीतील आपापले विश्व कसे असते? हे सांगणारे उत्तम विडंबन. आपली ती स्ट्रॅटीजी इतरांची ती लबाडी अस नेहमीच प्रत्येकाला वाटत असत.
26 Jul 2010 - 9:17 am | नितिन थत्ते
हो. आणि क्रौर्य आणि लबाडी यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्यांनीसुद्धा नेहमीच शत्रूला ठार मारण्याचा मार्ग अवलंबला नाही हे दाखवणे हा ही विडंबनातला हेतू आहे.
26 Jul 2010 - 7:58 pm | llपुण्याचे पेशवेll
बरोबर औरंगजेब संत होते असं म्हणायचं आहे का? उगाच कोणालातरी झोडायला काहीही रुपकं वापरायची का?
26 Jul 2010 - 11:33 am | सहज
:) विडंबन आवडले.
मुघल साम्राज्य व वेगळ्या वेगळ्याशाही हे भारतीय इतिहासाचे अविभाज्य अंग आहे. त्यावर वेगवेगळा प्रकाश टाकणारे अजुन माहीतीपूर्ण लेख यावेत.
26 Jul 2010 - 6:49 pm | आळश्यांचा राजा
विडंबन छान आहे.(म्हणजे लिहिले छान आहे.)
पण पटण्यासारखे नाही.
आपली वस्तुनिष्ठता इ. सिद्ध करण्यासाठी महाराजांनाच वेठीला धरले पाहिजे का?
(अतिसंवेदनशील)
26 Jul 2010 - 6:56 pm | अवलिया
बिनडोकपणाचा कहर.
26 Jul 2010 - 7:11 pm | बिपिन कार्यकर्ते
मला वाटते की कंपॅरिझन नेहमी 'अॅपल टू अॅपल' असावी. इथे तसे दिसत नाही. पण एक रूपक म्हणून ठीकच आहे (आणि म्हणूनच सत्याच्या जवळ येणारी नावे आणि घटना असल्या तरी त्याचा सत्याशी संबंध न लावता वाचले). एका टोकाच्या वर्तनावर भाष्य केले आहे हे उघड आहेच. पण दुसर्या टोकाच्या वर्तनावरही कधी तरी काही तरी यावे.
अर्थात, एकाचा फ्रीडम फायटर दुसर्याचा टेररिस्ट असतोच. पण मग खरा फ्रीडम फायटर कोण आणि टेररिस्ट कोण हे कळण्या इतकी नीरक्षीरविवेकबुद्धी असते तोच खरा शहाणा भले मग तो टेररिस्ट आपला असो. जो केवळ पूर्वग्रहांवर अवलंबून असतो तो चूकच.
अवांतरः जरा कुठे शांत होतंय तर तेवढ्यात काहीही कारण नसताना संपादक वगैरे विषय उकरून काढायचे या बद्दल वाईट वाटले. थत्त्यांकडून ही अपेक्षा नव्हती आणि नाही.
26 Jul 2010 - 7:25 pm | अवलिया
>>>>मला वाटते की कंपॅरिझन नेहमी 'अॅपल टू अॅपल' असावी. इथे तसे दिसत नाही.
कसं बोललात...
>>> पण एक रूपक म्हणून ठीकच आहे.
रुपक ठिक? अहो शिवाजीमहाराजांना जग ओळखतं ते कल्याणच्या सुभेदाराची सुन परत मानाने पाठवणारा, रांझ्याच्या पाटलाचे दुर्वर्तन केले म्हणुन हातपाय तोडणारा... माझे काही फार वाचन नाही पण कट्टर शिवाजीच्या विरोधकांनी सुद्धा शिवाने बायाबापड्या लुटल्या असे विधान केल्याचे मी वाचले नाही. संदर्भ असेल तर द्या जरुर खात्री करुन घेईन. हां.. शिवाजीने लुट केली, तह मोडला असे अनेक किस्से आहेत पण ...
म्हणजेच ही रुपकाच्या माध्यमातुन वैयक्तिक खाज भागवुन घेणेच झाले ना? वर विचारवंती आव आणायचा...
टाळ्या पिटायला इतर विचारवंत आहेच... जास्त बोलत नाही.. मराठी अस्मिता जागी होवुन अनेकांचे पोट दुखायचे.
>>एका टोकाच्या वर्तनावर भाष्य केले आहे हे उघड आहेच. पण दुसर्या टोकाच्या वर्तनावरही कधी तरी काही तरी यावे.
नाही येणार ... येणारच नाही
>>>अर्थात, एकाचा फ्रीडम फायटर दुसर्याचा टेररिस्ट असतोच. पण मग खरा फ्रीडम फायटर कोण आणि टेररिस्ट कोण हे कळण्या इतकी नीरक्षीरविवेकबुद्धी असते तोच खरा शहाणा. जो केवळ पूर्वग्रहांवर अवलंबून असतो तो चूकच.
+१
>>>अवांतरः जरा कुठे शांत होतंय तर तेवढ्यात काहीही कारण नसताना संपादक वगैरे विषय उकरून काढायचे या बद्दल वाईट वाटले. थत्त्यांकडून ही अपेक्षा नव्हती आणि नाही.
सहमत.
26 Jul 2010 - 7:46 pm | बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद नाना. तुम्ही प्रतिसाद टाकत असतानाच मी माझा प्रतिसाद थोडा अजून स्पष्ट केला आहे.
26 Jul 2010 - 7:17 pm | चतुरंग
काय अपेक्षा काय आहे?
26 Jul 2010 - 7:22 pm | श्रावण मोडक
कैच्या कैच. उगा भलते संदर्भ जोडले जाणार या धाग्याला. त्यात पुन्हा सिवा आणि बायाबापड्यांची विटंबना वगैरे विडंबनातही येऊ शकत नसते हे व्यवहारातील परिस्थिती पाहता पक्के. मी संपादक नाही याचा, आणि होणारही नाही या निर्णयाचाही याचा पुन्हा आनंद झाला. कारण असतो तर हा धागा केवळ या एका कारणासाठी अप्रकाशित केला असता.
26 Jul 2010 - 7:35 pm | अवलिया
अप्रकाशित? नाही होणार अप्रकाशित.
मी तर म्हणतो या धडधडीत अपमानासाठि सदर सदस्यावर बंदी घातली पाहिजे.
26 Jul 2010 - 7:49 pm | बिपिन कार्यकर्ते
हा धागा अप्रकाशित केला नाही, अॅट लीस्ट तूर्तास, त्याचे एकच कारण की काय लिहिले गेले आहे हे खुले आम थोडा वेळ तरी दिसावे. नाही तर नेहमी प्रमाणे लोकांसमोर एक बाजू आलीच नसती आणि संपादकांविरूद्ध रान उठले असते.