आषाढी एकादशी:-
म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करुन त्याला प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीविष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, उभयतांच्या लढाईत श्रीविष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हा - विष्णू - महेश या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी देवी होय. तिने नंतर देवांना अभय देऊन म्रुदुमान्याला ठार मारले. देवांनी तीची स्तुती केली आणि तीनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील.
तर अशी ही एक एकादशीची कथा.
आषाढ शुक्ल ११ व कार्तिक शुक्ल ११ या दोन एकादशांना महाएकादशी असे म्हणतात. त्यातील आषाढी एकादशीला शयनी एकादशी तर कार्तिकी एकादशीला प्रबोधीनी एकादशी असेही म्हट्ले जाते.
आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी भगवान श्रीविष्णु शयन करतात (झोपतात) ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी समजुत आहे. म्हणुनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला संपतो. हे चार महिने व्रतस्थ रहायचे असुन सणासुदीनी भरलेले आहेत.
फ़ार पुर्वि आर्य लोक ऊत्तर ध्रुव प्रदेशी किंवा त्याच्या जरा खाली वसति करुन रहात होते. तेव्हा याच दिवसात चार महिने त्यांना सूर्यदर्शन होत नसे. त्यामुळे सूर्यरुपी विष्णू झोपलेला आहे अशी कल्पना त्यांनी केली असावी व नंतर पुराणकारांनी त्या घटनेवर कथा रचल्या असाव्यात असे काही जणांचे मत आहे.
महाराष्ट्रातील विशेषत: भागवतधर्मीय किंवा पंथीय म्हणवणारे लोक या दिवशी उपवास तर करतातच पण शक्य तर पंढरीची वारी करुन श्रीविठ्ठ्ल दर्शन घेतात नच जमले तर गावातल्या एखाद्या देवळात जाऊन अभंग गाऊन ती रात्र नामसंकीर्तन, भजन, पूजनात घालवितात.
उपवास या शब्दाचा अर्थ केवळ उपास करणे किंवा दिवसभर उपासाचे खाणे असा नसुन थोडा वेगळा आहे. उपवास याचा मुळ अर्थ जवळ जाणे (उप + वास) असा आहे. म्हणजेच परमेश्वराच्या जवळ जाणे, त्याची आराधना करणे. परमात्म्याचे स्मरण करणे, त्याचा निकटवास अनुभवणे म्हणजे उपवास. उपासकाला आहार कमी करण्यावाचुन गत्यंतर नाही असे पाहुन धार्मिक साधनेप्रीत्यर्थ केलेल्या अन्नत्यागाला पुढे उपवास म्हणण्याची प्रथा पडली असावी. उपवासाने मन अंतर्मुख होते, द्रुष्टि निर्मळ होते, शरीर हलके रहाते, वासना शुध्द होते, संकल्प शक्ति वाढते.
आषाढी एकादशीच्या या व्रताला विष्णूशयनोस्तव असेही म्हणतात. चातुर्मास व्रतारंभ याच दिवशी करतात. यापुढील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना या दिवशी करतात.
आपल्याकडील नव्या पिढीतील लोकांना तसेच परदेशी स्थायीक झालेल्या लोकांना धार्मिक सण, व्रते, आपल्या परंपरा याची थोडीशी माहिती असावी या उद्देशाने हे लिखाण केले आहे. आणखी काही माहिती उपलब्ध असल्यास ती इथे अवश्य द्यावी. पुढील चातुर्मास काळात येणा-या व्रत आणि सणांची थोड्क्यात माहिती देण्याचा देखील विचार आहे.
बज्जु गुरुजी
प्रतिक्रिया
21 Jul 2010 - 2:17 pm | अवलिया
बोला पुंडलिक वरदे हाऽऽऽरी विठ्ठल...
--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
23 Jul 2010 - 7:05 am | Nile
सदर प्रतिसाद संपादित केला आहे याची नोंद घ्यावी. एकादशीवर येणारे धागे मिसळपावाच्या धोरणांत बसणारे आहेत याची कृपया नोंद घ्यावी. त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी देव किंवा व्यक्तिंवर टिका करताना आपण पातळी सोडत नाही याची काळजी घ्यावी.
23 Jul 2010 - 10:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
माहितीत खूप तृटी वाटत आहेत, म्हणून हा प्रतिसाद. या प्रतिसादातून कुणाच्याही श्रद्धांवर अथवा व्यक्तीगत चिखल उडवण्याची इच्छा नाही.
>> म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले <<
सर्व देव्यांनी तेव्हा काय केले? यात जे लग्न झालेले देव होते त्यांच्या बायकांनी आपल्या पती-परमेश्वरासाठी, त्याच्या विजयासाठी काहीच केलं नाही का?
मर्त्य लोकांतील राजपूत स्त्रिया आणि राणी लक्ष्मीबाई हातात तलवार घेतात तर या देवींनी का नाही! पटत नाही.
>> ... शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. <<
वर देताना देवांनाही असा विचार न करता येणं ... पटत नाही.
>> नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. <<
तेव्हा सर्व देव्या काय करत असाव्यात?
>> तिथे काही दिवसानी ब्रम्हा - विष्णू - महेश या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी देवी होय. <<
ही गोष्ट मी फारतर तिघांनी मिळून एकाचं वेषांतर केलं अशी मान्य करू शकते.
>> तिने नंतर देवांना अभय देऊन म्रुदुमान्याला ठार मारले. <<
देवांना अभय ... पुन्हा एकदा "देव" या संकल्पनेला छेद देणारं वाक्य! ज्यांचा देवावर विश्वास आहे त्या लोकांना या गोष्टीचं आश्चर्य, राग इ.इ. येऊ नये याची गंमत वाटली.
>> देवांनी तीची स्तुती केली आणि तीनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील. <<
खरंच पापमुक्त होतात का? किंवा काहीही पापं करून पुन्हा व्रत केलं की पाटी कोरी?? हाच संदेश आषाढीच्या निमित्ताने द्यायचा का?
त्यापेक्षा भोळे भाबडे वारकरी देवाप्रती जी निष्ठा, भक्ती दाखवतात, जातपात विसरण्याचा संदेश देतात त्याचा प्रचार केलेला जास्त चांगला असेल का?
>> तर अशी ही एक एकादशीची कथा. <<
अगदीच तर्कदुष्ट वाटली.
>> म्हणुनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला संपतो. हे चार महिने व्रतस्थ रहायचे असुन सणासुदीनी भरलेले आहेत. <<
व्रत आणि सण यांची सांगड कशी घालायची?
>> फ़ार पुर्वि आर्य लोक ऊत्तर ध्रुव प्रदेशी किंवा त्याच्या जरा खाली वसति करुन रहात होते. तेव्हा याच दिवसात चार महिने त्यांना सूर्यदर्शन होत नसे. त्यामुळे सूर्यरुपी विष्णू झोपलेला आहे अशी कल्पना त्यांनी केली असावी व नंतर पुराणकारांनी त्या घटनेवर कथा रचल्या असाव्यात असे काही जणांचे मत आहे.<<
या विधानावर मी आधीच प्रश्न विचारला आहे.
>> पुढील चातुर्मास काळात येणा-या व्रत आणि सणांची थोड्क्यात माहिती देण्याचा देखील विचार आहे. <<
जरूर द्या. आम्ही तर्कदुष्टता दिसल्यास प्रश्न विचारू, अर्थात 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' आपणां सर्वांनाच माहित आहे. तेव्हा आम्ही प्रतिसाद देत राहू, प्रतिसादांचे पक्षी होणं आमच्या हातात नाही.
अदिती
23 Jul 2010 - 11:49 am | भारतीय
पुर्ण सहमत..
http://anildaily.blogspot.com
21 Jul 2010 - 2:21 pm | परिकथेतील राजकुमार
सुंदर माहिती, ज्ञानात खुप मोलाची भर पडली.
जय श्री हरी विठ्ठल !!
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
21 Jul 2010 - 7:12 pm | तिमा
मान्य. नवीन माहिती पण ही कलादालनात कशी ते कळलं नाही.
- तिरशिंगराव एकादष्णे
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
21 Jul 2010 - 2:29 pm | शानबा५१२
ही माहीती आवडली.
21 Jul 2010 - 2:31 pm | खडूस
म्रुदुमान्य हा भक्त प्रल्हादाचा नातू होता
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
21 Jul 2010 - 2:32 pm | जागु
छान माहिती.
21 Jul 2010 - 3:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
उत्तर गोलार्धात आषाढ ते कार्तिक (साधारण जुलै ते नोव्हेंबर) या महिन्यांत सूर्यदर्शन होत नसे ... चमत्कारिक वाटत आहे. फिनलंडच्याही उत्तरेच्या प्रदेशात डिसेंबरचे काही दिवस सूर्य दिसत नाही. चार महिने सूर्य न दिसण्यासाठी खूपच उत्तरेला, ध्रुवाच्या फार जवळ जावं लागेल.
शिवाय परांचन गतीचा विचार केल्यास साधारण १०००० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे हे पण मान्य करावं लागेल. दहा हजार वर्षांपूर्वी उत्तर ध्रुवाच्या जवळ असणार्या दंतकथा आज फक्त भारतात टिकून आहेत ही गोष्ट पचायला कठीण जाते आहे.
अदिती
21 Jul 2010 - 3:18 pm | सहज
अश्या पचायला जड गोष्टींचे प्रमाण वाढल्यामुळेच उपासाची प्रथा आली असावी! :-)
बाकी ब्रम्हा- विष्णु - महेश बायोलॅब लै भारी!
21 Jul 2010 - 3:35 pm | अवलिया
टिंग्या त बोल्ला विंग्लंडात बारा म्हैने सुर्व्या दिसत नाय म्हुन
--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
21 Jul 2010 - 11:00 pm | Nile
त्यासाठी विग्लंडात कशाला जा? रोज रातच्याला (टिंग्या सारखंच) जरा जास्तच प्या, तुम्हाला पण सुर्य दिसाचा नाही. (टिंग्या बद्दल मला अवलियाने सांगितले असे परा धम्याला बोललेला डॉन्याचा खरडवहीत अदितीने पाहिल्याचे म्हणणारा सहजकाकांचा व्यनी मला नंदनकडुन आला)
-Nile
21 Jul 2010 - 9:12 pm | पक्या
पूर्वी दिवाळी पर्यंत चांगला पाऊस पडायचा असे माझी आजी सांगायची.
पावसाळ्यातील ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन अधूनमधून / क्वचित होत असावे. गोष्टीं सांगताना थोडीशी अतिशयोक्ती होऊ शकते.
श्रध्दा नसेल तर नाव वाचून असले धागे न उघडण्याचे स्वातंत्र्य आहेच..त्याचा वापर व्हावा.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
21 Jul 2010 - 10:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> पूर्वी दिवाळी पर्यंत चांगला पाऊस पडायचा असे माझी आजी सांगायची.<<
गेल्याही वर्षी पाऊस दिवाळीपर्यंत लांबला होता. पण आपण काही शे ते हजार वर्षांपूर्वीची गोष्ट करत आहोत.
>> पावसाळ्यातील ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन अधूनमधून / क्वचित होत असावे. गोष्टीं सांगताना थोडीशी अतिशयोक्ती होऊ शकते. <<
'गोष्ट' आहे हे मान्य केलं तर विषयच संपला. पण मग आर्यांनी उत्तरेतूनच यायचं कारण नव्हतं, दक्षिणेलाही चार काय, जास्तच महिने पाऊस पडतो.
>> श्रध्दा नसेल तर नाव वाचून असले धागे न उघडण्याचे स्वातंत्र्य आहेच..त्याचा वापर व्हावा. <<
खराय! विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेली मांडणी पटत, समजत नसेल तर मी सरळ पुढचा प्रतिसाद पहाता येतो.
अदिती
21 Jul 2010 - 10:56 pm | Nile
श्री पक्या,
(अशी अंध)श्रद्धा नसली तर आम्हाला काय वाटते हे प्रतिसाद देण्याचे स्वातंत्र्य नाही आहे का?
-Nile
22 Jul 2010 - 2:49 am | निस्का
छे छे...श्रद्धा (ही भानगड) आणि मत/विचार-स्वातंत्र्य ह्या दोन मुळातच परस्परविरोधी गोष्टी आहेत...तुम्हाला 'सर्दाळू' सोडून इतर मते दर्शवण्याचे स्वातंत्र्य नाही :P :P :P
नि...
23 Jul 2010 - 7:15 am | Nile
खरे आहे, अंधश्रद्धाळु धागे आणि प्रतिसाद हाच खरा आपला अमुल्य ठेवा आहे. इतर सर्व फक्त उडवण्यासाठीचे.
-Nile
22 Jul 2010 - 3:22 am | आमोद शिंदे
(अशी अंध)श्रद्धा नसली तर आम्हाला काय वाटते हे प्रतिसाद देण्याचे स्वातंत्र्य नाही आहे का?
हो नक्कीच आहे. आम्ही आमच्या ठिकाणी बरोबर तुम्ही तुमच्या ठीकाणी असा पवित्रा ठेवक्ल्यास चर्चा करण्याची मजा कशी मिळणार? होऊन जाऊद द्या एक जोरदार डिबेट..
22 Jul 2010 - 4:27 am | Nile
कृपया आमच्या वाटचालीवर थोडी नजर टाकणे. ;)
-Nile
21 Jul 2010 - 3:22 pm | गणपा
नविनच माहिती/कथा मिळाली.
21 Jul 2010 - 3:23 pm | परिकथेतील राजकुमार
मिपावरील काही सदस्यांचे अध्यात्मिक व धार्मिक अधःपतन बघुन खरेच वाईट वाटले.
ईश्वर ह्यांना सदबुद्धी देवो.
श्रद्धावान व धार्मिक
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
21 Jul 2010 - 7:37 pm | jaypal
=)) =)) =)) =)) =)) <:P <:P <:P >:) >:) >:) <:P <:P <:P <:P :)) :)) :)) :O) :O) :O)
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
21 Jul 2010 - 3:26 pm | विजुभाऊ
काहीच तर्कशुद्ध वाटत नाहिय्ये.
एकादशीच एव्रत करायचे म्हणजे नक्की काय करायचे.
उप + वास हा पावसाळ्यातील एकूण वातावरण आणि अग्निमांद्य पहाता कमी खाणे /लंघन करणे हे शास्त्राशी सुसंगत आहे
साधनेप्रीत्यर्थ केलेल्या अन्नत्यागाला पुढे उपवास म्हणण्याची प्रथा पडली असावी

साधना करायची तर तीचा अन्नत्यागाशी काय संबन्ध.
ज्ञानसाधनेत व्यग्र असल्यामुळे अन्नाचा भूकेचा विसर समजू शकतो पण अन्नत्याग म्हणजे ज्ञान साधना हे द्राविडी तर्कशास्त्र कोणी लावले असेल
( इस्लाम मे दाढी है मगर दाढी मे इस्लाम नही है: इति: शोएब अख्तर.")
उपवासाने मन अंतर्मुख होते, द्रुष्टि निर्मळ होते, शरीर हलके रहाते, वासना शुध्द होते, संकल्प शक्ति वाढते.
दिवसभर जड वातूळ तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीर हलके होते हे पटत नाही. उपवास हा साबुदाणा रताळे बटाटे शेंगदाणे ( हे सारे अभारतीय पदार्थ ) वरीचे तांदूळ वगैरे वगळून करायला कोणीतरी सांगेल का?
वासना शुद्ध होते म्हणजे काय?
संकल्पशक्ती ही मेडीटेशन मुळे वाढते हा अनुभव घेतलाय. पण उपवासामुळे संकल्प शक्ती कशी वाढणार?
नव्या पिढीतील लोकांना तसेच परदेशी स्थायीक झालेल्या लोकांना धार्मिक सण, व्रते, आपल्या परंपरा याची थोडीशी माहिती असावी या उद्देशाने हे लिखाण केले आहे.
त्यामागची शास्त्रीय कारणे सांगता येत असतील तर जरूर लिहा. पण उगाच भोंगल अंधश्रद्ध पसरवू नका
21 Jul 2010 - 3:36 pm | मराठमोळा
माहितीपुर्ण लेख. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
21 Jul 2010 - 4:35 pm | sagarparadkar
मी आदितीशी सहमत आहे.
मला एकच सांगा, २१व्या शतकात जेव्हा ग्लोबल वॉर्मिंगचा एव्हढा परिणाम होत असताना सुद्धा उत्तर ध्रुवावर फारशी मनुष्य वस्ती नाहीये तर हजारो वर्षांपूर्वी, जेव्हा माणूस अप्रगत अवस्थेत होता तेव्हा उत्तर ध्रुवावर आर्य कसे काय टिकून राहू शकतील?
नुक्त्याच झालेल्या जनुक संशोधनानुसार, हे सिद्ध झालेले आहे की भारतात आर्य हे बाहेरून आलेले नाहीत तर ते मुळचे भारतीयच होते.
आर्य बाहेरून आले हा इन्ग्रजांनी केलेला अपप्रचार होता ज्याची पार्श्वभूमी मॅक्सम्युल्लरने बनवून दिली होती. इन्ग्रजांनी भारतीयांचे बौद्धीक खच्च्चीकरण करण्यासाठी ही भलतीच पुडी सोडून दिलेली होती. लोकमान्य टिळकांनी मॅक्स्मुल्लर्चेच ग्रंथ त्यांच्या "आर्याज आर्क्टिक होम इन द वेदांज" साठी संदर्भ म्हणून वापरले होते, असे ऐकून आहे.
21 Jul 2010 - 4:42 pm | बद्दु
" नुक्त्याच झालेल्या जनुक संशोधनानुसार, हे सिद्ध झालेले आहे की भारतात आर्य हे बाहेरून आलेले नाहीत तर ते मुळचे भारतीयच होते "
वरील संशोधन कुठल्या मासिकात छापुन आले आहे?
दुवा मिळेल काय?
"लोकमान्य टिळकांनी मॅक्स्मुल्लर्चेच ग्रंथ त्यांच्या "आर्याज आर्क्टिक होम इन द वेदांज" साठी संदर्भ म्हणून वापरले होते, असे ऐकून आहे"
बरोबर.
21 Jul 2010 - 4:58 pm | sagarparadkar
>> वरील संशोधन कुठल्या मासिकात छापुन आले आहे?
दुवा मिळेल काय? <<
मी स्वतः त्या संशोधनाची बातमी कुठ्ल्याशा छापील माध्यमांत वाचली होती. माझ्या अंदाजानुसार लोकसत्ता मधील लोकमुद्रा हे पाक्षिक असावे.
जालावर मी तरी ही माहिती वाचली नसल्याने दुवा देता येणार नाही.
पण मला त्या संशोधनाचे निष्कर्ष फारच तर्कसंगत वाटले, कारण हजारो वर्षांपूर्वी उत्तर ध्रुवावर वस्ती करण्यासाठी आवश्यक असणारी 'टेक्नॉलॉजी' कोणाकडे उपलब्ध असणार ?
21 Jul 2010 - 4:58 pm | Dipankar
http://timesofindia.indiatimes.com/news/india/Aryan-Dravidian-divide-a-m...
http://www.dnaindia.com/scitech/report_indians-are-one-people-descended-...
मुळ पेपर
http://www.google.co.in/url?sa=t&source=web&ct=res&cd=3&ved=0CBIQFjAC&ur...
21 Jul 2010 - 10:19 pm | भाग्यश्री
छान माहिती आहे. मला ठाऊक नव्हती.
धन्यवाद!
21 Jul 2010 - 11:51 pm | बज्जु
सर्व प्रतिक्रीयांबद्द्ल धन्स. :H
बाकी वादावादी चालु द्या अशीच, मजा येते वाचायला. =)) 8} @) ~X(
बज्जु
22 Jul 2010 - 2:46 am | पुष्करिणी
चातुर्मास आषाढी एकादशीपासून सुरू होतो तर गटारी अमावस्या हे काय प्रकरण आहे?
शिवरात्रीचा उपास / पूजा करणारे एकादशीचा उपास करत नाहीत..हे खरं का? कारण काय?
पुष्करिणी
22 Jul 2010 - 2:49 am | प्रभो
१. गटारी अमावस्या= श्रावणाच्या आधीची आमावस्या
२. शिवरात्री - आषाढी , हे शैव - वैष्णव उपवास आहेत अनुक्रमे.
22 Jul 2010 - 3:03 am | पुष्करिणी
पण वर लेखात शंकर, विष्णू यांनी एकत्रच एकादशीची निर्मिती केली असं लिहिलय..
शैव आषाढी एकादशीचा उपास करत नाहीत का?
शैव / वैष्णव हे व्यक्तिगत उपासनेचे मार्ग आहेत की जन्मानुसार परंपरागत आहेत..
फक्त श्रावण महिन्यात ( १ महिना ) दारू / मांसाहार करायला मिळणार नाही
म्हणून गटारी अमावस्या असते का? ( कारण लगेचच त्यानंतर गणपती, पितृपक्ष्,नवरात्री,दिवाळी इ. असतात..आणि बरेच लोकं या काळाला चातुर्मास म्हणतात... )
पुष्करिणी
22 Jul 2010 - 5:37 am | चिन्मना
ही कथा पहिल्यांदाच ऐकली आहे. बेसिकली एकादशी देवी वगैरे प्रकरण नवीनच ऐकतोय...
शैव आषाढी एकादशीचा उपवास करतात का ते माहित नाही पण वैष्णव महाशिवरात्रीचा अजिबात करत नाहीत. माझ्या एका वैष्णव मित्राकडे चुकुन शिवरात्रीच्या दिवशी गेलो तर त्यांच्याकडे पुरणपोळी होती. "तुला नकोच असेल" असं म्हणत त्या हरामखोराने माझ्यासमोर चांगल्या २-३ पोळ्या जिभल्या चाटत हाणल्या X(
>> शैव / वैष्णव हे व्यक्तिगत उपासनेचे मार्ग आहेत की जन्मानुसार परंपरागत आहेत..
माझ्या मते पूर्वी जन्मजात असावेत. शैव आडवे गंधवाले आणि वैष्णव उभे गंध वाले. माझी आजी म्हणत असे की कडवे वैष्णव लोक झाडू सुद्धा आडवा मारायचे नाहीत :P
>> फक्त श्रावण महिन्यात ( १ महिना ) दारू / मांसाहार करायला मिळणार नाही म्हणून गटारी अमावस्या असते का?
हो हो, म्हणूनच असते. एक महिन्याची रसद एका रात्रीत भरून घेतल्यामुळे अनेकजण गटारात सापडत नाहीत का? :D
चातुर्मास म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी. आपले बरेचसे सण याच काळात येतात.
चिन्मना
22 Jul 2010 - 5:47 pm | शुचि
फार छान माहीती!!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
22 Jul 2010 - 7:00 pm | क्रेमर
उपयुक्त माहिती.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
22 Jul 2010 - 9:07 pm | Nile
वा वा वा! सुरेख लेख. असेच तर्कशुद्ध आणि शास्त्रीय लेख लिहित चला. मिपाला तुमच्या सारख्या लेखकांची फार गरज आहे.
बाकी राशींवरही काही जमले तर लिहा आणि इथले आम्ही लोक सत्यनारायण घालायला तयारच आहोत, कधी येताय तेव्हढे फक्त सांगा गुरुजी.
-Nile
22 Jul 2010 - 9:11 pm | यशोधरा
नायल्या, सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा तेवढा व्यवस्थित आणि भरपूर बनव! :P
23 Jul 2010 - 12:20 am | पुष्करिणी
आणि पंचामृतही... दूधाचा धागा लक्षात आहे ना? :)
पुष्करिणी