एका स्थळात लिहिली, वीडंबने हि दोन

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
16 Jul 2010 - 2:18 am

एकाच विषयावर दोन , दोन विडंबनं येण्याचा प्रकार दोनदा घडला, मग आम्हाला काही नतद्रष्ट शंका आल्या...

एका स्थळात लिहिली, वीडंबने हि दोन
शंका विचारणारे, नतद्रष्ट आम्ही कोण?

पहिलेच काव्य येई नावाने केसुरंगा
केशवसुमार देती पुढचे विरुद्ध अंगा
दावीत दोन्हि रंगा पाध्ये चतूर दोन?
शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही कोण?

पाध्यांस प्रश्न भारी, पडतोय या क्षणासी
पंचास काय बोलू, अन् काय सदस्यांशी?
दळली पिठी कुणाची, जात्यात आणि कोण?
शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही कोण?

एके दिनी परंतू पाध्यांस त्या कळाले
कंटक जरूरी आता त्यांना जरा न भासे
दोन्ही स्वतःच बडवी, बाजूंनी ढोल कोण?
शंकाच ती उरेना, पाध्ये हुशार, हो नं?

हास्यकविताविडंबन

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2010 - 2:27 am | मुक्तसुनीत

मीटरचे गणित जुळवताना प्रस्तुत यतिचा भंग झाला आहे. (पहा :""यति की पती ? " करि मनोरंजन जो पाध्यांचे जडेल नाते मिपाशी तयांचे. इत्यादि इत्यादि)

- अमेरिक्कन हिरवा "येटी".

राजेश घासकडवी's picture

16 Jul 2010 - 2:08 pm | राजेश घासकडवी

थोड्या दुरुस्त्या केल्यामुळे जे "मीटरात घोळा झाला" (संदर्भ केशवसुमार यांची खालची कविता) ते बहुतेक सर्व "व्यवस्थिता झाला" आहे. निदान मिपाच्या शुद्धलेखनाच्या मानदंडांनुसार तरी. संपादक आता तो दंडही उगारायला लागले म्हणायचे.... :)

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2010 - 3:02 pm | मुक्तसुनीत

मानदंड शब्दावरून दंड उगारण्यावर केलेली कोटी रोचक आहे. त्यापेक्षा "मानगूट धरणे" वगैरे जास्त रोचक झाली असती. ;-)

केशवसुमार's picture

16 Jul 2010 - 3:23 am | केशवसुमार

एका स्थळात येता, विडंबने अनेक
भलता कयास करती, नतद्रष्ट काही लोक

कोणी विचारले ना, अपुल्या मतास सांगा
समजून चालती ते आम्हीच केसुरंगा
अन ऐकुनि तयांना, चेकाळती अनेक
भलता कयास करती, नतद्रष्ट काही लोक

कवड्यास खाज भारी, खेळे विडंबनाशी
मीटरात घोळा झाला, सांगेल ते कुणाशी ?
मुसु तयास टोची, मारी हळूच हाक
भलता कयास करती, नतद्रष्ट काही लोक

केसुस डाव त्यांचे जेव्हा इथे कळाले
नतद्रष्ट सर्व वेडे, फटक्यामधे उडाले
धुरळा जरी उडाला, धाग्यावरी क्षणैक
होती मुळात सगळी ती विडंबने सुरेख

राजेश घासकडवी's picture

16 Jul 2010 - 2:09 pm | राजेश घासकडवी

;)

सहज's picture

16 Jul 2010 - 2:55 pm | सहज

>नतद्रष्ट सर्व वेडे, फटक्यामधे उडाले

रोचक!

अजुन एक नोंद केली केली आहे. (कुत्राचे शेपूट वाकडे ते वाकडेच, सदस्याच्या खवमधे धमकी, आजकाल कोणीही विडंबन करायला लागले आहे, दिवा विझायच्या आत मोठा होतो, आता नतद्रष्ट वेडे. )

-------------------------------------------------
लायसेन्स आहे मग खुशाल वाट्टेल ते बोला!

अवलिया's picture

16 Jul 2010 - 3:01 pm | अवलिया

रोचक प्रतिसाद. ऑरवेलला कधीही विसरु नका सहजराव.

--अवलिया

गणपा's picture

16 Jul 2010 - 3:21 pm | गणपा

सहमत कुंपणानेच शेत खाल्ले तर काय?

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2010 - 3:27 pm | मुक्तसुनीत

(कुत्राचे शेपूट वाकडे ते वाकडेच, सदस्याच्या खवमधे धमकी, आजकाल कोणीही विडंबन करायला लागले आहे, दिवा विझायच्या आत मोठा होतो, आता नतद्रष्ट वेडे. )

प्रस्तुत परिच्छेदातल्या एका विधानाचा दुसर्‍याशी असलेला संबंध मला जोडता न आल्याने , या परिच्छेदाचे साधर्म्य नानू सरंजाम्याच्या कवितेशी जुळते असे मला वाटले ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jul 2010 - 3:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी देतो रोज संपादकांना ढुशी ...

पुढची मूळ कविता नसल्याने विडंबन करणे जमणार नाही. क्षमस्व.

अदिती (सरंजामे)

श्रावण मोडक's picture

16 Jul 2010 - 3:27 pm | श्रावण मोडक

कूल सहजराव, कूल. तुमचा लिबरल विचारवंत होतोय. काय आहे या विचारवंताना माओवाद्यांची बाजू घेताना कळत नसतं की माओवाद खरंच सत्तेवर आला तर पहिला बळी त्यांचाच जाणार आहे. दुसरी एक गोष्ट अशीही आहे - माओवादी व्यवस्थेला आव्हान देत उभे राहतात, पण वेळ आली की त्याच भारतीय घटनेने केलेल्या न्यायव्यवस्थेचा आधार घेत हेबियस कॉर्पस वगैरे करत बसतात. तेव्हा हे सारं जाणून घेऊनच व्यवस्थेचा विचार करावयाचा असतो. बरोबर?

केशवसुमार's picture

16 Jul 2010 - 4:54 pm | केशवसुमार

अता सहजासहजी समजणार्‍या साध्या आणि सरळ विडंबनात कोणी वाकड्यात शिरायचे ठरवले तर त्याला आम्ही काय करणार.. शिरो बापडे.. ह्या विडंबनाच्या / प्रतिसादाच्या इतक्या वाचकातून काही लोकानांच नोंद कराण्या सारखे काही तरी दिसले हे ही रोचक!! बाकी चालू दे !! आम्ही ही नोंद करून ठेवतो..
(चो.म.चा.)केशवसुमार
स्वगतःनतद्रष्ट सर्व वेडे, फटक्यामधे उडाले...केसुरंगाच्या ह्या फटक्यात काय भलती जादू आहे.. फटके पडले एकीकडे आणि वळ उठले दुसरी कडे.. रोचक!!

अडगळ's picture

16 Jul 2010 - 3:55 am | अडगळ

आता कसे करावे , बदकेच हिंस्त्र झाली,
काठावरील पोरे ,गळ टाकुनि पळाली.
हलवीत काव्यनांगी ,फुगवून काव्यकल्ले,
घालून काव्यकाडी , खा अडगळा तु चोप.

प्रियाली's picture

16 Jul 2010 - 6:09 am | प्रियाली

इतके नतद्रष्ट एका ठिकाणी गोळा झालेले पाहून मन भरून आले आणि सामना चित्रपटातले हे वाक्य आठवले -

मास्तर: "काय करणार? जुनी खोड. स्वतःला सुद्धा सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच. नतद्रष्ट कुठला?"

श्रावण मोडक's picture

16 Jul 2010 - 10:45 am | श्रावण मोडक

+१

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jul 2010 - 12:05 pm | बिपिन कार्यकर्ते

+२

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jul 2010 - 12:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वीडंबन थोडेसेच आवडले.

अदिती

Nile's picture

16 Jul 2010 - 8:17 am | Nile

इडंबन आवडले.

-नतद्रष्ट

-Nile

प्रकाश घाटपांडे's picture

16 Jul 2010 - 8:22 am | प्रकाश घाटपांडे

शंकामूल्यांचा 'उपद्रव' कि ' उपयुक्तता' या भानगडीत न पडता विडंबनाचा आनंद घेतला.
(नीर्विकार)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

गणपा's picture

16 Jul 2010 - 2:18 pm | गणपा

एक विडंबन म्हणुन आवडले :)

कानडाऊ योगेशु's picture

18 Jul 2010 - 4:50 am | कानडाऊ योगेशु

हे पाध्ये कोण? :?

(डोमकावळा) योगेशु.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.