हाच आपला ढंगु आहे...

घाटावरचे भट's picture
घाटावरचे भट in जे न देखे रवी...
8 Jul 2010 - 3:19 am

टायम मोठा झकास आला
आवळा नाड्या सावरा चड्डी
दारू कोंबडी हिरवा गांधी
सुरू नव्याने रोज कबड्डी

धोंडे फेकू गोळ्या झाडू
स्वत: स्वत:चे कपडे फाडू
'कैसी जनता भूखी नंगी'
म्हणत आपणच गळेही काढू

लाठ्या काठ्या अश्रूधूर अन्
कधि एखादी गोळी आहे
थांबायाला वेळ कुणा पण
भाजायाची पोळी आहे

पिचले रडले कुणी भरडले
कैवाराला आपण आहे
फोटो बाईटा काळे झेंडे
चुलीत अपुल्या सरपण आहे

शरम बेशरम नीती अनीती
जुन्या बुकातील फंदा आहे
राजकीय रंडीबाजीचा
खुल्लमखुल्ला धंदा आहे

कुबड्यांचेही शॉर्टेज झाले
जो तो साला पंगु आहे
'अपनेकू क्या करना यारों?'
हाच आपुला ढंगु आहे...

कवितासमाजराजकारण

प्रतिक्रिया

सहज's picture

8 Jul 2010 - 3:35 am | सहज

भटोबा लै भारी!

अजुन येउ दे.

(ढोंगु) सहज

नंदन's picture

8 Jul 2010 - 4:13 am | नंदन

कुबड्यांचेही शॉर्टेज झाले
जो तो साला पंगु आहे
'अपनेकू क्या करना यारों?'
हाच आपुला ढंगु आहे...

--- क्या बात है! झकास भटोबा, अजूनही येऊद्या.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

Nile's picture

8 Jul 2010 - 4:23 am | Nile

+१.

आवड्या.

-Nile

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jul 2010 - 10:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-(

मि.भ. प्रकटन आवडले.

अदिती

श्रावण मोडक's picture

8 Jul 2010 - 11:46 am | श्रावण मोडक

+३

टारझन's picture

8 Jul 2010 - 8:00 am | टारझन

च्यायला भटा !! लै भारी यार :)

प्रभो's picture

8 Jul 2010 - 8:02 am | प्रभो

एक लंबर रे भटोबा...

निरन्जन वहालेकर's picture

8 Jul 2010 - 8:23 am | निरन्जन वहालेकर

कुबड्यांचेही शॉर्टेज झाले
जो तो साला पंगु आहे
'अपनेकू क्या करना यारों?'
हाच आपुला ढंगु आहे.

खरच ! लय भारी राव ! !

प्रकाश घाटपांडे's picture

8 Jul 2010 - 9:59 am | प्रकाश घाटपांडे

भटोबा कविता आवडली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

वेताळ's picture

8 Jul 2010 - 10:11 am | वेताळ

:D वेताळ

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jul 2010 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार

ज ब र्‍या !!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

वारा's picture

8 Jul 2010 - 12:52 pm | वारा

सांगा कधी बसताय???
:)
>>टायम मोठा झकास आला
>>आवळा नाड्या सावरा चड्डी
>>दारू कोंबडी हिरवा गांधी
>>सुरू नव्याने रोज कबड्डी
:)

धमाल मुलगा's picture

8 Jul 2010 - 2:13 pm | धमाल मुलगा

किती मोठ्या काळानंतर ह्या भल्या माणसाचं लेखन वाचायची संधी मिळाली!
का रे बाबा, तुला असंच लिहितं राहण्यासाठी काय सारखे बंद/दंगली वगैरे व्हायला हवे काय?

लिहीत जा रे बाबा...लिहीत जा.... फार अप्रतिम लिहितोस तू. मला अजुनही तुझी आणि मिभोची काव्य जुगलबंदी आठवतेय.

कविता खासच आहे. एकदम चोक्कस!
भटा लिहीत जा रे.

चतुरंग

राजेश घासकडवी's picture

8 Jul 2010 - 4:11 pm | राजेश घासकडवी

लिहित रहा...

यशोधरा's picture

8 Jul 2010 - 4:14 pm | यशोधरा

मस्त हो भटोबा! :)

स्पंदना's picture

8 Jul 2010 - 4:45 pm | स्पंदना

मस्त!!

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

अविनाशकुलकर्णी's picture

8 Jul 2010 - 5:01 pm | अविनाशकुलकर्णी

खुप आवडली..चपखल शब्द रचना

बहुगुणी's picture

8 Jul 2010 - 6:35 pm | बहुगुणी

विदारक वास्तव आहे तसं उतरवलं आहे, बहोत खूब!

{फालतू 'संदेश' फॉरवर्ड करण्यापेक्षा लोकांनी असल्या "डोळे-उघडू" कविता फॉरवर्ड कराव्यात असं वाटलं, मी तर नक्की करेन. 'उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' असं म्हणायची वेळ कधीची आलेली आहे, थोडीशी जागृती झाली तर हवीच आहे.}

मी-सौरभ's picture

8 Jul 2010 - 8:18 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

घाटावरचे भट's picture

8 Jul 2010 - 8:21 pm | घाटावरचे भट

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे मनःपूर्वक आभार. :)

- भटोबा