संवाद

हेरंब's picture
हेरंब in जनातलं, मनातलं
27 Apr 2008 - 10:07 am

काही बोधपर व मनोरंजक संवाद

: - भटो भटो
: - ओ
: - कुठे गेला होता ?
: - प्रवेश घ्यायला
: - मिळाला ?
: - नाही.
: - का ?
: - कोटा आडवा आला
: - बरं झालं, आम्ही खातो गरे, तुम्ही खा आठळ्या!
: - आठळ्याही तुम्हीच खा, मी जातो 'तिकडे'.

: - भटो भटो
: - ओ
: - कधी आला ?
: - परवाच
: - काय आणलं ?
: - चॉकलेटं
: - उभी कापू का आडवी ?
: - नका कापू, तुमच्यासाठीच आणलीयेत.
: - मजा आहे ना तिकडे ?
: - मजा नाहीये, पण सजा पण नाही.

: - भटो भटो
: - ओ
: - कुठे गेला होता ?
: - 'तिकडे', मुलाकडे.
: - काय केलेत तिकडे ?
: - नेहेमीचेच, आराम केला, फिरलो, मुलं सांभाळली.
: - मग पुढे काय ?
: - त्यांत काय ? सहा महिने इकडे, सहा महिने तिकडे!
: - मजा आहे बुवा
: - मजा कसली ? सजा आहे सजा!

बालकथाप्रकटनप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

27 Apr 2008 - 10:17 am | विसोबा खेचर

मस्त लिहिलं आहे! :)

आपला,
तात्या भटो.

देवदत्त's picture

27 Apr 2008 - 10:20 am | देवदत्त

पूर्ण नाही समजले :(

(पाचवी पास से तेज नसलेला) देवदत्त

चतुरंग's picture

27 Apr 2008 - 5:49 pm | चतुरंग

B)
चतुरंग

मन's picture

27 Apr 2008 - 6:42 pm | मन

सुरेख!
अड्मिशन्,विद्यार्थ्याचे अमेरिका गमन ,कोटा,आरक्शण सगळ्यावर वरच भारी कॉमेन्ट केलित की
राव!(तेही प्रत्यक्षात कशाचच नाव न लिहिता!)

"उपक्रमा"वरचा राज ठाकरे/मुम्बै तील "पर प्रांतीय" प्रश्ना वरचा लेखही अगदि ह्याच शैलीत आहे.

साठ्यांचे नाठाळ कार्टे.

प्रशांतकवळे's picture

27 Apr 2008 - 7:06 pm | प्रशांतकवळे

लै भारी लिवलेय

पिवळा डांबिस's picture

27 Apr 2008 - 8:19 pm | पिवळा डांबिस

संवाद #१ आणि #२ एकदम रिअलिस्टिक वाटले.
#३ कदाचित अप-डाऊन करणार्‍यांना रिअलिस्टिक वाटत असेल. इथेच रहात असल्याने आम्हाला त्याची गंमत कळली नाही..
हे अजून वाढवता येईल काय, हेरंबजी?

: - भटो भटो
: - ओ
: - 'इकडे' परत कधी?
: - 'इकडे'? आता कशासाठी?
: - का हो, का नाही?
: - नेहेमीचेच, भ्रष्टाचार, बेशिस्त, ट्रॅफिक, धूळ, कोटा.
: - मग पुढे काय ?
: - त्यांत काय ? वर्षभर 'इकडे', सुट्टीला 'तिकडे'!
: - माज करताय राव!
: - माज कसला? नाईलाज आहे, राजा!

चतुरंग

तिमा's picture

20 Apr 2013 - 11:24 am | तिमा

एक संवाद नांवाचा धागा बघितला. त्यावरुन 'याची' आठवण आली.