जालावर येउन अनावर आपण सगळेच होत असतो की. डोन्ट डिनाय इट! सांगा बरे तुम्हालाही असे काहीसे वाटते का? तुम्हा सगळ्या अनावरांना समर्पित! :-)
एखाद्या धुंद सायंकाळी पूर्व-पश्चिमेची दिग्गज मंडळी जमली असताना,
सदाबहार माणसांच्या काव्य हास्य मैफिलीने सभा पूर्ण बहरलेली असताना,
तुझा प्रतिसाद मनात साठवत तो धागा,
फुलताना, दौडताना पहायचाय.
एखाद्या प्रसन्न, सुगंधी पहाटे,
एका कवितेतील शुभ्र पाकळी न पाकळी उघडून,
रसग्रहण करुन देत असलेला तो क्षण कविसमवेत टिपायचाय.
जमलं तर कधी एखाद्या कट्ट्यावर,
रात्री लक्ष लक्ष गजाल्या करत जागरण करायचय.
अफाट जालविश्वात हरवून जायचय तुम्हा सर्वांच्या सोबत.
खरं सांगायचं तर काहीच पुरेसं वाटत नाही.
एवढ्याशा कुडीत सगळ्यांबद्दलचं प्रेम, घृणा कुठलीच भावना मावतच नाही.
दिसावी माणसं सगुण, साकार.
पण मनातल्या आयड्या निराकार, अथांग, अमर्याद.
अन माझी स्थिती नेहमी "किती घेशील किंवा ठोकशील दोन कराने?"
प्रतिक्रिया
1 Jul 2010 - 7:49 am | टारझन
इल्लो इल्लो ... इल्लोजी सहज तुम आ गये ... आज फिर कविता लेके =))
=)) =)) =))
हे विडंबण कसलं आहो ... सगळा कोथळा बाहेर काढलाय
टाळ्या !!!
-(आंधारात टपल्या मारुन जाणार्यामुळे हल्ली त्रस्त) टारझन
1 Jul 2010 - 9:04 am | चित्रा
आहेत खरे कधी न संपणारे प्रश्न.
1 Jul 2010 - 9:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता कवितांचा पूर (आवर) म्हणायची वेळ आली म्हणायची!
अदिती
1 Jul 2010 - 10:05 am | प्रभो
सहजकाका, बोळा कुठे अडकलाय तुमचा???? ;)
किती ट्युशन घ्याल आता लोकांची??
1 Jul 2010 - 11:08 am | विसोबा खेचर
छान रे.. :)
1 Jul 2010 - 11:29 am | परिकथेतील राजकुमार
'ठोकशील' हा शब्द काळजाला भिडला ;)
बाकी 'जनावर' असे एक विडंबन सुचले होते.
असो...
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
1 Jul 2010 - 12:51 pm | गणपा
खुपच मस्त जमलय हे विडंबन, इतक की स्वतंत्र कवितेचा मान मिळावा असं.
काका लै फार्मात आहेत सध्या ;)
1 Jul 2010 - 3:57 pm | भडकमकर मास्तर
हेच मन्तो..मस्त
1 Jul 2010 - 7:12 pm | sur_nair
सुंदर
2 Jul 2010 - 11:17 am | अवलिया
छान !
--अवलिया