अवलियांनी टाकलेल्या रुळांवरुन बर्याच विडंबन गाड्या गेलेल्या बघितल्या आणि आम्हाला मात्र आमच्या घरातला 'रुल' आठवला! ;)
रिमोट हातात
घेवून आम्ही भांडायचो
ती एका बटणावर हात ठेवायची अन्
मी दुस-या बटणावर हात ठेवायचो
टिव्ही बघत
चरत असतांना बडबडत असतांना
असंच संध्याकाळभर भांडायचो
एकमेकांना हलकेच धमकावुन सांगायचो
एचबीओ चॅनेलवरुन
शेवटी 'तसल्या' शोची वेळ निघुन गेली
मी मात्र मारत आहे त्याच रिमोटवरुन
हवरटासारख्या चकरा... चॅनेल टु चॅनेल.
-केसुरंगा
प्रतिक्रिया
25 Jun 2010 - 2:40 am | केशवसुमार
केसुरंगाशेठ,
तुमचीच कमी होती..
हा हा हा. आयुष्य मध्यावरचा घोळ घोळ म्हणतात तो हाच का?
(३०+)केशवसुमार
25 Jun 2010 - 2:41 am | शुचि
ज-ह-ब-री चावट =)) =)) =))
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
25 Jun 2010 - 2:50 am | शिल्पा ब
देठ अजूनही हिरवाच आहे का !!!
=)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
25 Jun 2010 - 3:58 am | चतुरंग
आयला, आले की राव तुम्ही!!
आम्हाला वाटलं हे आवतण असंच जातंय की काय वाया?
एकदम झक्कास बार उडवला हो! ;)
(चॅनेलसर्फराज)चतुरंग
25 Jun 2010 - 9:00 am | निरन्जन वहालेकर
लय भारी राव ! ! मजा आली वाचुन !
25 Jun 2010 - 10:40 am | राजेश घासकडवी
झ्याक जमलं आहे
25 Jun 2010 - 12:54 pm | टुकुल
लय भारी राव....
तुमच्या सोईसाठी आमच्या कडुन तुम्हाला एक सीडी भेट.. कुठ पाठवु सांगा.
--टुकुल
25 Jun 2010 - 1:11 pm | बिपिन कार्यकर्ते
हॅहॅहॅ!!! टिप्स / ट्रिक्स शेअर करा राव... चॅनेल्सच्या म्हणातोय मी. ;)
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2010 - 5:19 pm | अवलिया
छान !
--अवलिया
25 Jun 2010 - 6:33 pm | प्रभो
मस्तच!!!