" स्वप्न" पहिला पाउस
सुटला वैरी वादळवारा,
रिमझिम बरसतील रेशीम धारा,
इंद्र धनुचे रंग घेउनी,
भेटावीस तू अशाच प्रहरा.
पहिला पाऊस तू होऊन यावी,
प्रेमघनासम मजवर बरसावी,
तव प्रीतीच्या जलधारांनी,
प्रेमसागरा भरती यावी.
ओलेती तव रूप पहावे,
संमोहित गात्रांनी व्हावे,
प्रेमरंगी तल्लीन होऊनी,
प्रीतीचे अमृतघट प्राषावे,
विसारावीस तू क्षणिक ह्या जगा,
मजसी माझा विसर पडावा,
तव मिलनाचा अपूर्व ठेवा,
हृदय अंतरी जतन करावा,.
सुटला वैरी वादळ वारा ………
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
22 Jun 2010 - 4:05 pm | शानबा५१२
काय कविता आहे!!!!
चांगली आहे का??
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
22 Jun 2010 - 6:43 pm | शुचि
सुंदर
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
23 Jun 2010 - 3:34 am | sur_nair
चांगली कविता आहे. पण इंग्रजीत या कवितेच्या शीर्षकाचा भलताच अर्थ निघतो म्हणून आधी चरकलो होतो:)
23 Jun 2010 - 6:10 am | शिल्पा ब
कविता छान आहे....
इंग्रजी नाही पण मराठीतलाच वेगळा अर्थ वाटला मला :-) ..
इथे बाकी इंग्रजी अर्थाची कविताही येऊ शकते बरं!!!
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
23 Jun 2010 - 7:21 am | निरन्जन वहालेकर
प्रतिसादासाठी धन्यवाद व आभार !
शीर्षकात बदल केला आहे. सूचनांसाठी पुन्हा आभार !
23 Jun 2010 - 8:23 am | मदनबाण
ओलेती तव रूप पहावे,
संमोहित गात्रांनी व्हावे,
प्रेमरंगी तल्लीन होऊनी,
प्रीतीचे अमृतघट प्राषावे,
:)
मदनबाण.....
"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson