“ रात्र यौवनांत ”
गंध सुगंधि, परिचित वारा,
आभासले, आली प्रिया,
प्राजक्त बरसले आज नभातून,
चंद्र साक्षीला अन उभी प्रिया..
स्पर्शून पाहीन तुज
आस होती ही जिवनी
आज सामोरी तू अशी
जाग आली स्वप्नातुनी
“ दूर इतुकी का उभी ” ?
आज जवळी असूनही
ये अशीच मज समिप
याद राहील रात्र ही
रात आहे यौवनांत
अन अधिरता ही अंतरी
लाज हृदयीं का वृथा
जाईल वाया रात्र ही
आज बहरू दे प्रितवसंता,
फुले गुलाबी, धुंद प्रितिचे,
जतन करू या सदैव हृदयीं
क्षण सोनेरी अन गंध प्रितिचे.
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
19 Jun 2010 - 9:01 pm | मदनबाण
कविता आवडली... :)
मदनबाण.....
"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg
19 Jun 2010 - 9:15 pm | टारझन
डोळे पाणावले ;)
21 Jun 2010 - 11:34 am | sagarparadkar
अहो भर दिवसा देखील त्या रात्रीच्या कल्पनेने रोमांचित झालो ...
'जावयाची जात' मधील " ... होवून आज राधा, माझी प्रिया हसावी" हे गाणं आठवलं. कोणाकडे आहे का ह्या गाण्याची लिन्क? मला तरी सापडली नाही .
21 Jun 2010 - 11:58 am | sagarparadkar
इथे हे गाणं ऐकायला मिळेल:
http://www.hummaa.com/music/song/Majhi+Priya+Hasavo/90657#