निक्काल

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
18 Jun 2010 - 12:33 pm

#%^#&$%((&&#((##(%*&^#%###)(#*#&#&#*#(#(#(#(#(
ञृ$^%*।़फ्((ॠ#*#((&^^#*ऊ़*$&*($($*़ड्फ*#((#(#(#(#(#(#("
अहो एवढ झाले तरी काय?
"%&**" सीबीएस्सी च्या मुलाला ९९%. माय्ला ते पोरग स्वतः म्हणतय. ९५% वर अपेक्षा नव्हती म्हणुन. वरचे मार्क देवाची कृपा असे मुलाखतीत म्हणाला"
म्हणजे बोर्ड म्हणजे देव का?
"अहो चेष्टा काय करताय मास्तर? एस्.एस्.सी वाले पण खुळावले की हो"
आता काय झाले?
" आयला १४००० मुलांना ९०%+"
१३५००
"अहो ३ वर्षाअलिकडे ही संख्या सुमारे ३००० असायची"
म्हणजे खिरापती वाटताहेत असे म्हणायचे आहे तुम्हाला.
" म्हणुनच आम्ही कोर्टात गेलो आहोत. आय.सी.एस्.सी च्या मुलांना मराठी ला ३ कादंबर्‍या. इंग्रजीला
शेक्सपिअर. किती मेहेनत घ्यावी लागते.? त्या मानाने एस्.एस्.सी वाल्यांना भाषे मधे काहीच त्रास नाही.
तुलनात्मक दृष्ट्या काहीच नाही त्यांचे सिलॅबस. वर ३० मार्कांचे डी ग्रुप काढून टाकलेली गणित आणि शात्रामधे. सगळा पेपर एकदम सोपा. आम्ही आय.सी.एस्.सी वाल्यांना चांगल्या कॉलेजमधे अ‍ॅडमिशन मिळाणार ती कशी हो?"
हे चांगले कॉलेज म्हणजे काय?
" झाली का तुमची चेष्टा सुरु. अहो जिथे कट ऑफ जास्त ते चांगले"
उत्तम. चांगली व्याख्या आहे तुमची. अहो तुम्ही चांगले चांगले म्हणता त्या कॉलेज मधे ११वी चा सुमारे ३५% पोर्शन सुद्धा होत नाही हे तुम्हाला माहीत आहे का? त्या पेक्षा गेल्या वर्षी जे कट ऑफ होते त्यात सुमार २.५% वाढवुन जवळातल्या जवळ कॉलेज अ‍ॅडमिशन घ्या. अगदी ज्युनियर पण चालेल. हे चिखलाचे कुल्ले येत्या दोन वर्षात आपोआप गळुन पडणार आहेत.
"पण कित्येक जणांना १००% मार्क हे जरा जास्तच होते आहे असे तुम्हाला वाटत नाही का?"
ते स्पोर्टस च्या मार्कांनी झालय. त्या कडे दुर्लक्ष करा.
" हम्म. बघु आज कोर्टाचा काय निकाल लागतोय बेस्ट ऑफ फाईव चा? मग ठरवतो. नाहीतर बाझवला सरळ डीप्लोमालाच टाकतो. कटकटच नाही."

जाता जाता: एक मॉडरेटर भेटले होते. त्यांना वरील संभाषण सांगितले. ते म्हणाले " बघा मास्तर आम्हाला चौकट बांधुन दिलेली असते.एखाद्या मुलाने टच चे स्पेलींग Tuch लिहीले तर त्याचे मार्क कापले जात नाही. बच्चे की भावना को समझो चा आदेश आहे. नाहीतर आम्ही शेक्स्पियर ला सुद्धा इंग्लिश मधे ९९ मार्क देणार नाही.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

18 Jun 2010 - 12:56 pm | अवलिया

वा वा छान छान !

मास्तरच्या लेखांना (कसेही असले तरी) चांगले म्हणायची मिपावर फ्याशन आहे म्हणुन छान.

असे लेख उडणार नाही, असे असेल तर आता बाराखडी लिहुन धागा लिहिणे काय वाईट ?

--अवलिया

छोटा डॉन's picture

18 Jun 2010 - 2:06 pm | छोटा डॉन

>>असे लेख उडणार नाही, असे असेल तर आता बाराखडी लिहुन धागा लिहिणे काय वाईट ?

असा बाराखडीचा धागा आला तर मी स्वतः उडवेन असे सांगतो.
उगाच मुदलात गल्लत असु नये, असो.

बाकी मास्तरांचा लेख छान.
काय पेटवायचे आहेत का एवढे मार्क ?
बाकी दहावीच्या मार्काचा तसाही काही उपयोग नाही आणि त्याचा पुढच्या आयुष्याशी त अजिबातच संबंध नाही असे वाटते.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

अवलिया's picture

18 Jun 2010 - 2:34 pm | अवलिया

छान !

--अवलिया

धमाल मुलगा's picture

18 Jun 2010 - 4:11 pm | धमाल मुलगा

>>काय पेटवायचे आहेत का एवढे मार्क ?
काय पेटवायचं त्या मार्कांवर? :D

दोन वर्षांनी पुन्हा शी.ई.ट्या. देत हिंडायचंच 'तुझं दार माझं दार..भाऊ मला खेटर मार' करत!

शानबा५१२'s picture

18 Jun 2010 - 1:58 pm | शानबा५१२

आयला १४००० मुलांना ९०%+"

४००००+ आहे !!!!!!!!!!!!!!

काय अर्थ राहीला ह्याला???

मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळुच कसे शकतात??

साला T.Y ला प्रीतीला ९५/१०० भेटले organic chemistry मधे,मला 89 भेटले(८-९ मार्काचा पेपर सुटला होता)..........तिचा पेपर १००% बरोबर होता हे नक्की वाटत.
आणि ह्यांना १००/१०० मराठीमधे?????????????????????

चिरोटा's picture

18 Jun 2010 - 2:18 pm | चिरोटा

अहो हल्लीची पोरे आधिच्या पिढीपेक्षा टॅलेंटेड असतात असे म्हणतात ना समाजशात्रज्ञ का कोण ते?

तिचा पेपर १००% बरोबर होता हे नक्की वाटत.

हा हा. कॉपी केली की काय तुम्ही? मग फुल ९५ मार्काची तरी कॉपी करायची.

P = NP

शानबा५१२'s picture

18 Jun 2010 - 8:13 pm | शानबा५१२

कॉपी केली की काय तुम्ही? मग फुल ९५ मार्काची तरी कॉपी करायची.

खाsssssssssssमोsssssssश भेंडी!!!!!!!!!!!!१

ती माझ्या कॉलेजमधे नव्हतीच,अरे कुठे होती ते पण माहीती नाही............असे आरोप मी सहन करणार नाही...अब्रु नुकसानीचा दावा ढोकीन......

भेंडी बाजार,ज्याला T.Y.b.Sc ला ८० + भेटतात ना त्याने १००% टक्के बरोबर लिहलेला असतो पेपर..organic chemistry नसल तरी analytical chemistry ला तंतोतंत लागु होत हे वाक्य.

प्रमोद्_पुणे's picture

18 Jun 2010 - 2:19 pm | प्रमोद्_पुणे

१४००० नाही ४०००० ना ९०% + आहेत!!!

चिरोटा's picture

18 Jun 2010 - 2:24 pm | चिरोटा

हे परि़क्षा मंडळवाले भलतेच फॉर्मात दिसताहेत.असो. हलवायांचा धंदा तेजीत असणार पुढचे काही दिवस्.परिक्षा मंडळ आणि हलवायांचे काही साटेलोटे तर नाही ना?
P = NP

अर्धवट's picture

18 Jun 2010 - 2:22 pm | अर्धवट

असाच एक मित्र होता आमचा.. 'होता' म्हणलय कारण त्याला जास्त मार्क पडायला लागल्यावर आम्ही संबंध तोडले.. त्याला सकाळी गेला तरी मार्कच पडायचे..

Dipankar's picture

18 Jun 2010 - 2:43 pm | Dipankar

१००% मार्क!!!!! यात २ विद्यार्थी पास झाले असते

आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

धमाल मुलगा's picture

18 Jun 2010 - 4:12 pm | धमाल मुलगा

>>त्याला सकाळी गेला तरी मार्कच पडायचे..
=)) =))

सहज's picture

18 Jun 2010 - 4:13 pm | सहज

=))

टारझन's picture

18 Jun 2010 - 10:41 pm | टारझन

त्याला सकाळी गेला तरी मार्कच पडायचे..

=)) =)) =)) =)) =))
बाकी कुठला म्हणायचा तुमचा मित्र ? कोलापुरातला का ?

अर्धवट's picture

19 Jun 2010 - 12:06 pm | अर्धवट

जवळचाच.. सातारचा

शुचि's picture

18 Jun 2010 - 8:16 pm | शुचि

>> त्याला सकाळी गेला तरी मार्कच पडायचे..>>
=)) =)) =))
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शिल्पा ब's picture

18 Jun 2010 - 10:08 pm | शिल्पा ब

त्याला सकाळी गेला तरी मार्कच पडायचे..

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शानबा५१२'s picture

19 Jun 2010 - 12:19 pm | शानबा५१२

माझ्या निष्पाप मनावर ह्या वाक्यांचा वाईट परीणाम झाला आहे तेव्हा संपादकांनी हे वाक्य व प्रतिक्रीया उडवाव्यात...........

***************************************************
दील दो दील दो,या तो इंटरनेट का बिल दो!

भडकमकर मास्तर's picture

18 Jun 2010 - 3:43 pm | भडकमकर मास्तर

मस्त निकाल आहे..
मला तर फार आवडला...
इतक्या मुलांना १०० % गुण मिळाले पाहून फार म्हणजे फार मजा आली...
धमाल चाललीय...

( आम्हाला दहावीला नव्वद बिव्वद गुण मिळाले तेव्हा आजोबांना काय वाटत असेल त्याची कल्पना यायला लागलीय)

Dipankar's picture

18 Jun 2010 - 4:08 pm | Dipankar

सर्व विद्यार्थ्यांना १००% मार्क द्यावेत असा नियमच सरकारने करावा

आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

शुचि's picture

18 Jun 2010 - 8:15 pm | शुचि

=))

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

सहज's picture

18 Jun 2010 - 3:57 pm | सहज

अवघड आहे.

धमाल मुलगा's picture

18 Jun 2010 - 4:14 pm | धमाल मुलगा

बघा मास्तर आम्हाला चौकट बांधुन दिलेली असते.एखाद्या मुलाने टच चे स्पेलींग Tuch लिहीले तर त्याचे मार्क कापले जात नाही. बच्चे की भावना को समझो चा आदेश आहे.

व्वा! मज्जाय आहे!
आता काय, आठवीपर्यंत परिक्षा नाही...हिंडा पायजे तेव्हढं बोंबलत.. आणि दहावीला 'भावनाओं को समझो!"
च्छ्या:! अंमळ काही वर्षं लवकर जन्माला आल्याचा पश्चाताप होतोय आता!

>> नाहीतर आम्ही शेक्स्पियर ला सुद्धा इंग्लिश मधे ९९ मार्क देणार नाही.
=)) =))
हे बाकी खरं हां!

-(इंग्लिशच्या गुर्जींचा पुत्र) ध.

वाहीदा's picture

18 Jun 2010 - 4:50 pm | वाहीदा

एक मॉडरेटर भेटले होते. त्यांना वरील संभाषण सांगितले. ते म्हणाले " बघा मास्तर आम्हाला चौकट बांधुन दिलेली असते.एखाद्या मुलाने टच चे स्पेलींग Tuch लिहीले तर त्याचे मार्क कापले जात नाही. बच्चे की भावना को समझो चा आदेश आहे. नाहीतर आम्ही शेक्स्पियर ला सुद्धा इंग्लिश मधे ९९ मार्क देणार नाही.

आता यावर काय बोलणार ?? :-(
ब्रिटिशांचे Colour स्पेलिंग आणी अमेरीकनांचे Color स्पेलिंग शेवटी काय एकच
काही दिवसांनी पुढची पिढी इंग्लीश नव्हे हिंगलीश Hinglish(Hindi+English) बोलणार
~ वाहीदा
दहावीत योग्य इंग्रजी स्प्लेलिंगसाठी पट्टयांचा मार खाल्लेली

महेश हतोळकर's picture

18 Jun 2010 - 4:58 pm | महेश हतोळकर

ब्रिटिशांचे Colour स्पेलिंग आणी अमेरीकनांचे Color स्पेलिंग शेवटी काय एकच

वाहीदाचे "आणी" महेशचे "आणि" शेवटी काय एकच.

~महेश
तिसरीत शुद्धलेखनासाठी पट्ट्यांचा मार खाल्लेला

वाहीदा's picture

18 Jun 2010 - 5:47 pm | वाहीदा

वाहीदाचे "आणी" महेशचे "आणि" शेवटी काय एकच.
=)) सही बोलताय.. सही बोलताय .. =))
~ वाहीदा

रेवती's picture

18 Jun 2010 - 6:50 pm | रेवती

लेख समजला. सध्याची परिस्थिती काय असू शकेल याचा दोन ते चार टक्के अंदाज आला.

रेवती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jun 2010 - 7:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर, या बेष्ट ऑफ फाइव्ह ने निकालाची टक्केवारी खूप वाढली आहे.
फाल्तूपणा दुसरे काही नाही.

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

18 Jun 2010 - 10:01 pm | विनायक प्रभू

आज सुमारे(९०%) दहा पालकांच्या मुलाखती घेतल्या.
त्यांच्या 'भावनाओंको' समजायला.
सर्वांना आपल्या पोटी 'आइन्स्टाईन' व न्युटन जन्माला आलाय असे वाटायला लागले आहेत.
एकदम पोवई आयआयटी मधे काहीच नाय.
विनायका निंगे को वा विनायका.

चतुरंग's picture

18 Jun 2010 - 10:26 pm | चतुरंग

पहिलीत पहिला आलेला
(stein)चतुरंग

रेवती's picture

18 Jun 2010 - 10:57 pm | रेवती

आमच्या मुलाने दोन दिवसांपूर्वी समाजशास्त्राची उत्तरपत्रिका (त्याने लिहिलेली) दप्तरातून घरी आणली. इयत्ता दुसरी असल्याने दोनच प्रश्न होते. अपेक्षित उत्तरे दोन दोन वाक्यातून लिहायची होती.
त्यातला प्रश्न क्र. दोन होता, "या देशाचे नागरिक म्हणून तुमचे कोणतेही दोन हक्क कोणते?" याचे उत्तर आमच्या 'न्युटनने' असे लिहिले.
क्र. १ चा हक्क- टिव्ही बघणे
क्र. दोनचा हक्क- लाईफ एन्जॉय करणे
मला हसावे कि रडावे ते अजूनही कळत नाहीये.

रेवती

भडकमकर मास्तर's picture

19 Jun 2010 - 12:38 am | भडकमकर मास्तर

क्र. १ चा हक्क- टिव्ही बघणे
क्र. दोनचा हक्क- लाईफ एन्जॉय करणे

हे असं पाहिजे..
लै बेष्ट.. साहेब पुढे मोठे होणार

प्रमोद देव's picture

19 Jun 2010 - 11:52 am | प्रमोद देव

नाव काढणार....चिरंजीव. :D

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jun 2010 - 1:15 pm | बिपिन कार्यकर्ते

पोट्टं लाईणवर आहे, त्याला बिघडवू नका.

बिपिन कार्यकर्ते

शिल्पा ब's picture

18 Jun 2010 - 10:39 pm | शिल्पा ब

फार्फार दुःख झालं कि आम्ही या नवीन पिढीत जन्माला आलो नाही ते......
आम्ही आत्तापर्यंत ज्या परीक्षा दिल्या तिथे आमच्या मनाचा कोणीच विचार केला नाही....स्पेलिंग कसेही लिहा कायम चूकच...आमची भाषा तर कोणालाच कळायची नाही...इतिहासात रमायचो नाही....विज्ञान कळायचे नाही...गणिताचे आणि आमचे संबंध कायम भागलेले...त्यामुळे शिक्षण म्हणजे शिक्षा हेच समीकरण तेवढे ठाऊक...(गणितातून एवढा एक शब्द बरोब्बर समजला.)
..
नाही म्हणायला भूगोल कळायचा असे वाटायचे, बाईंनी नकाशावर एखादा देश दाखवा म्हंटले तर साधा भारतसुद्धा सापडायचा नाही...चुकून आफ्रिकाच दाखवायचो....पण आमच्या भावनांची कदर कोणीच करेना...त्यामुळे शिक्षणच सोडून दिले....असो,

आताच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा (खरं तर काही गरजच नाही, सरकारने परीक्षा काढून शाळा हा एक आनंदोत्सव करून टाकलेला आहे आणि नवीन मतदारसंघ तयार केला आहे. )

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

रेवती's picture

19 Jun 2010 - 1:09 am | रेवती

प्रतिसादाशी बरीचशी सहमत!

रेवती

बबलु's picture

19 Jun 2010 - 4:50 am | बबलु

शिल्पा... परफेक्ट प्रतिसाद. २००% सहमत.
लै भारी !

(कधीही पहिला नंबर न आलेला) बबलु

मदनबाण's picture

18 Jun 2010 - 10:47 pm | मदनबाण

टक्केवारी मिळवणार्‍यां पेक्षा जे अपयशी झाले आहेत त्यांची जास्त काळजी वाटते... या टक्केवारीच लयं मोठ ओझ मनावर बसलेलं असतं...पाठीवरच ओझं त्यापुढे काहीच नाही.
कालच एक बातमी पाहिली एका विद्यार्थीनी ने आत्महत्या केली,ते सुद्धा निकाल येण्याच्या आधीच... निकाल दुसर्‍या दिवशी आला...५०% पेक्षा जास्त मार्क तिला मिळाले होते.
टक्केवारी महत्वाची की आयुष्य ?

मदनबाण.....

A truly strong person does not need the approval of others any more than a lion needs the approval of sheep.
Vernon Howard