बावळट ध्यान..
====================
ढगांच्या छत्रीमागुन
डोळा मारुन गेली वीज..
सोसाट्याचे वारे देखील..
सांगुन गेले लेका भीज..
तिच्याकडेच पाहात होतो..
मी मुर्ख बावळट अजुन..
झाडानेही हिंन्ट दिली
दोनचार पाने टाकुन...
मिठीत घे गधड्या तिला
पाऊस धो धो होता सांगत..
मी पेटलेलो आतुन बाहेरुन..
होत नव्हती माझी हिंमत..
सार्या पंचमहाभुतांनी
कपाळावर मारला हात..
ह्याच्याने काही होणार नाही..
ध्यान अगदी आहे पुळचाट..
उपाय शेवटचा म्हणुन
वीज कडाडली भयानक..
मीच तेव्हा तिच्या मिठीत
घाबरुन शिरलो अचानक..
वारा मनसोक्त हसु लागला..
ढगांमागुन वीजही..
झाडानेही घुसळवले अंग..
अन हसु लागली ती ही..
-----योगेश जोशी.
प्रतिक्रिया
16 Jun 2010 - 6:24 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
सह्हीच!!
एकदम 'केशव' दिसतोय गडी. :)
17 Jun 2010 - 6:18 am | शुचि
>> मीच तेव्हा तिच्या मिठीत
घाबरुन शिरलो अचानक..>>
=)) =)) =))
बिजली गिरा के आप खुद
बिजली से डर गये,
हम सादगी पे आप की
लिल्लाह मर गये ...
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
16 Jun 2010 - 9:03 pm | फ्रॅक्चर बंड्या
छानच
आमच्या आयुष्यात असली वीज कवा येणार ... :? :? :?
binarybandya™
16 Jun 2010 - 9:13 pm | टारझन
=)) मस्त रे काणडाऊ ... =))
मजेशिर आहे कविता :-)
16 Jun 2010 - 10:03 pm | शिल्पा ब
लै भारी...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
16 Jun 2010 - 10:08 pm | संदीप चित्रे
>> उपाय शेवटचा म्हणुन
वीज कडाडली भयानक..
मीच तेव्हा तिच्या मिठीत
घाबरुन शिरलो अचानक..
हे तर खासच :)
16 Jun 2010 - 11:07 pm | प्रमोद देव
http://www.divshare.com/download/11722331-a44
17 Jun 2010 - 12:11 am | अभिज्ञ
मस्तच,
कविता बेस झालीय.
अभिज्ञ.
17 Jun 2010 - 6:37 am | सहज
:-)